Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Dhule424001

नंदुरबार में सभी जलाशयों में पानी भरा; सालभर के जल संकट से राहत

PPPRASHANT PARDESHI
Oct 02, 2025 10:30:12
Dhule, Maharashtra
नंदुरबार जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरण भरले असल्याने, वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा झाल्याने जिल्ह्यावरील जल संकट टळलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाची तूट राहून जात होती, मात्र यावर्षी सर्वत्र पावसाने गरजेपेक्षा जास्त हजेरी लावल्यामुळे सर्व धरण भरले आहेत तर नदीन आले ओसंडून वाहत आहेत. ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठा खंड दिला होता त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न उद्भवला होता परंतु सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरण भरले आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
Oct 02, 2025 13:58:05
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 02, 2025 13:57:40
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी, जी बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखली जाते, येथे यंदा प्रथमच दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी पुढील आंदोलनाची रूपरेषा निश्चित करण्यात आली. तसेच, दरवर्षी अशाच प्रकारे दसरा मेळावा आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारमधील मंत्री, आमदार, खासदार यांनी सहकार्य करीत आहेत मात्र त्यांना काही मर्यादा असल्याचे पोहरादेवी येथील मंहत सुनील महाराज यांनी सांगितले. बंजारा समाजातील महंत, धर्मगुरू तसेच राज्यभरातील बंजारा समाजातील जाणकार या गोर बंजारा दसरा मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Oct 02, 2025 13:53:39
Pandharpur, Maharashtra:आज विजयादशमीच्या सणानिमित्त विठ्ठल आणि रुक्मिणीला नखशिकांत सोनेरी दागिन्यांनी सजवलेला आहे. विठुरायाला सोन्याची पगडी हातात चांदीची काठी आणि खांद्यावर घोंगडी तर रुक्मिणी मातेला विजयालक्ष्मी रूपामध्ये पोशाख परिधान करण्यात आला आहे. श्री विठ्ठलास सोन्याची पगडी, नामनिळाचा, कौस्तुभ मणी, दंड पेठया जोड, कंगन जोड, हिऱ्याचा मोत्याचा तुरा, शिरपेच लहान, मोत्याची कंटी दोन पदरी, मोठ्याची कंठी एक पदरी, बाजीराव कंठा, पुतळ्यांची माळ, मोहरांची माळ, तुळशीची माळ एक पदरी मोठी, बोरमाळ तीन पदरी, हिऱ्यांचे पैंजण, नवरत्नांचा हार, सोन्याचे घोंगडे, चांदीची कंठी, सोन्याचे पितांबर, सोन्याचे तोडे जोड, लॉकेट इ. अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत. रुक्मिणी मातेस जडावाचा मुकुट, तन्माणी मोठा, खड्यांच्या पाटल्या जोड, मोठी नथ, कर्णफुले जोड, सूर्य, चंद्र, जडावाचे तारवाड जोड, चिंचपेटी हिरवी, हातसर जोड, खड्यांची वेणी, जडावाचा हार, तन्माणी लहान, मोत्याचा कंठा लहान, पाचूची गरसोळी, बाजीराव गरसोळी, खड्याची बिंदी, जाडावाचे बाजूबंद जोड, रूळ जोड, पैंजण जोड, सोन्याचा करंडा, मस्त्य जोड, तारामंडळ, तोडे जोड, सोनाचे बाजूबंद जोड, दशावतारी हार, मद्रासी कंठा, शिन्देहार ३ पदरी, मास पट्टा, सोने साडी, छत्रछामार इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत。
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 02, 2025 13:21:39
Satara, Maharashtra:सातारा - विधान परिषद माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर और माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. मात्र रामराजे नाईक निंबाळकर यांनी मनोमिलनाचे संकेत दिले आहेत. काही दिवसांपासून तुम्हा दोघांमध्ये मनोमिलन होणार अशी चर्चा सुरू असल्या बाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना विकासाचे राजकारण करायचे असेल तर मनोमिलन होईल मात्र सत्तेचे राजकारण होणार असेल तर जसं चाललं आहे तसं चालेल. या बाबत वरिष्ठ लक्ष घालतील. मनोमिलन हे दोन मनांचे होते मग रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देखील विचारा अशी टिप्पणी देखील रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे. बाईट - माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 02, 2025 12:51:51
Jalna, Maharashtra:जालना ब्रेकिंग: जालन्यात सुरु असलेलं धनगर समाजाच्या दिपक बो-हाडे यांचं उपोषण स्थगित मुलीच्या हस्ते ज्युस पिऊन सोडलं उपोषण धनगर समाजाच्या बैठकीनंतर बो-हाडे यांचा निर्णय काही वेळ सरकारला दिला पाहिजे- बो-हाडे आम्ही आशावादी आहोत, सरकार शब्द पाळेल लढा टिकला पाहिजे म्हणून हे उपोषण थांबवत आहे उपोषण सोडल्यानंतर राज्यभरात फिरणार आहे मुंबईत प्रश्न सुटला नाही तर दिल्लीला जावू उपोषण सोडण्याआधी बो-हाडे यांनी त्यांच्या शिष्टमंडळाची बैठक घेतली. आणि बैठकीत उपोषण सोडण्यासाठीचा निर्णय झाला.. सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे. हा लढा टिकला पाहिजे, सरकारकडून आम्ही आशावादी आहोत.. उपोषण सोडल्यानंतर राज्यभरात दौरा करणार असून गाव खेड्यातला धनगर एकत्र आणणार आहे.. त्यामुळं मुंबईत प्रश्न सुटला नाही तर दिल्लीला जाऊ. असा इशारा यावेळी दिपक बो-हाडे यांनी सरकारला दिलाय..
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Oct 02, 2025 11:50:04
Kalyan, Maharashtra:मी आलोय... आता तरी रस्ते बनवा !! "सण संपले... रस्ते अजूनही खड्ड्यातच! विद्यार्थ्यांची गांधीगिरीतून संतापजनक हाक – कल्याण डोंबिवली परिसरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत संताप व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबला. महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित या अनोख्या रॅलीत विद्यार्थ्यांनी हातात महात्मा गांधींचे फोटो घेत ,मी आलोय ..आता तरी रस्ते बनवण्याची मागणी केली.मांडण्यात आला. या रॅलीत महेश गायकवाड यांनी  सहभाग घेतला . त्यांनी सांगितले की, "गणपती गेले, नवरात्री संपली आणि आता दिवाळी आली... तरीसुद्धा रस्त्यांचे काम सुरू झालेले नाही, शहरातील ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे, चिखल आणि धोकादायक रस्त्यांमुळे नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे, सणवार सगळे संपले तरी रस्ते अजूनही खड्ड्यात आहेत. प्रशासनाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा लवकरच मोठे जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा दिला .गांधी जयंतीच्या दिवशी गांधीगिरीतून विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेला संताप प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार आहे. आता या आंदोलनामुळे महापालिका प्रशासन रस्त्यांच्या कामाला गती देतं का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे
3
comment0
Report
ABATISH BHOIR
Oct 02, 2025 11:49:18
Kalyan, Maharashtra:कल्याण मधून ढोल ताशाच्या gजlord शिवसेनिक nSिघाले शिवाजी park ला.. कल्याण मधून शिवाजी park शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यासाठी कल्याण मधून शेकडो शिवसैनिक शिवाजी पार्कलावर ढोल ताशाच्या गजरात घोषणा देत रवाना झाले आहेत दर वर्षी दसरा मेळाव्याला संपूर्ण राज्यातून शिवसेनिक मुंबई च्या शिवाजी पार्कवर विचारच सोन लुटायला येत असतात आज देखील कल्याण मधून शकडो शिवसैनिक रवाना झाले आहेत ठाकरे कुटुंब एक झाल्याने विरोधकांना धडकी भरली ठाकरे कुटुंब एकत्र येणे ही महाराष्ट्राची गरज येत्या महापालिका निवडणुका एकत्र लढल्या पाहिजेत मात्र उद्धव ठाकरे जो आदेश देतील त्या आदेशाचे आम्ही पालन करणार असल्याचे शहर प्रमुख बाळा परब
3
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Oct 02, 2025 11:36:28
Palghar, Maharashtra:मुंबईतील गोरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी सध्या पालघर मधील शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे रवाना होऊ लागले आहेत . पालघरच्या मनोर आणि ढेकळे येथे हजारो शिवसैनिक जमा झाले असून ते येथून पुढे मुंबईकडे रवाना होतील . 500 पेक्षा अधिक गाड्यांमधून हे शिवसेनिक दसरा मेळाव्यासाठी मुंबईत दाखल होणार असून हिंदुत्वाचे विचार ऐकण्यासाठी आम्ही दसरा मेळाव्याला जात असून एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांसाठी 25 हजार रुपयांचं किट वाटप करण्याचा निर्णय घेतल्याच यावेळी जिल्हाप्रमुखांकडून कुंदन संखे यांच्या कडून सांगण्यात आलं .
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 02, 2025 11:03:35
Baramati, Maharashtra:राज्यातील जनतेबरोबर इंदापूर तालुक्यातील सर्व जनतेला विजयादशमी दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. येणार वर्ष सुखाचा समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो अशा शुभेच्छा मी जनतेला देतो. राज्य सरकारने ऊस बिनातून प्रति टन 15 रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य साखर संघ आणि राज्य सरकारने एकत्रित हा निर्णय केला आहे. शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करणार आहे सरकार आहे. सरकारच्या बाबतीत योग्य तो विचार करेल. शेतकरी आज अडचणीत आहे त्याला मदत केली पाहिजे सहकार्य केलं पाहिजे. शेतकऱ्यांची अवस्था आज अत्यंत बिकट आहे. अशा अडचणीच्या काळात शेतर्यांना मदत करणं राज्य सरकारचा कर्तव्य आहे आमचं कर्तव्य आम्ही निश्चित पार पाडू. शेतकरी अडचणीत आहे तुमची सूचना अत्यंत योग्य आहे. तुटपुंजी मदत नको त्यांना जास्तीत जास्त मदत केली पाहिजे. मात्र भाऊ ऊस पिकवणारा शेतकरी देखील अडचणीत आहे, कारखान्यात काम करणारे कामगार असतील या सर्वांना भाऊंनी पण न करता जास्तीत जास्त राज्यात ऊसाला विक्रमी भाव देऊन सभासदांना कामगारांना चांगल्या प्रकारचा वेळेवर पगार द्यावा आणि राज्यात सर्वाधिक बोनस द्यावा
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Oct 02, 2025 10:50:40
Bhandara, Maharashtra:देशभरातून बाबा साहेबांच्या अस्थी कलसाचे दर्शन घेण्यासाठी उसळला जनसागर ... दीक्षाभूमी परिसरात लाखो अनुयायी. आज 69 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. आपल्या असंख्य अनुयायी सह या ठिकाणी बाबा साहेब आले होते. अंधारात असलेल्या समाजाला जागं करण्याचं काम बाबा साहेबांनी केलं तसेच समानतेचा मार्ग लोकांनी अवलंबला पाहिजे असे बाबा साहेब यांनी सांगितले. आणि आज याच पवित्र दीक्षाभूमीवर बाबा साहेब अमर रहेचे नारे बौद्ध अनुयायी लावत आहेत. तर याच दीक्षाभूमीवर देशभरातून बौद्ध अनुयायी आले असून याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी.
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top