Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

राजसभा के लिए रामदास आठवले का दावा पक्का

VBVAIBHAV BALKUNDE
Feb 26, 2026 09:06:06
Latur, Maharashtra
राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी निश्चित... रामदास आठवले यांचा दावा...उमेदवारीबाबत कोणतीही शंका नाही...आठवले यांची स्पष्टीकरण... राजसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. एनडीएचा घटक पक्ष म्हणून मंत्रिमंडळात असल्यामुळे माझी उमेदवारी निश्चित असल्याचा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. अनेकांची नावे चर्चेत असली तरी माझ्या उमेदवारीबाबत कोणतीही शंका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एप्रिल महिन्यात माझा कार्यकाळ संपत असून, काही दिवसांतच मी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले त्यांनी लातूर मध्ये दिली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Feb 26, 2026 10:54:25
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : छत्रपती संभाजी नगरात फेरीवाल्यांचा उन्माद वाढला आहे आणि त्यातूनच बुधवारी एका दांपत्याला मारहाण झाली , महापालिकेने तातडीने याची गंभीर दखल घेतली आणि आज सकाळी शहागंज भागात अतिक्रमणांची तोडफोड सुरू केली. फेरीवाल्यांचा उन्माद आता यापुढे सहन करणार नाही असा इशाराच या कारवाईतून महापालिकेने दिला... किरकोळ करणातून फेरीवाल्यांनी बुधवारी शहागंज भागात एक दाम्पत्याला मारहाण केली, कारण फक्त दुचाकी काढण्यासाठी हातगाडी वाल्याला बाजूला व्हायला सांगितले इतकाच त्यातून या फेरीवाल्यांनी घोळका करून दाम्पत्याला मारहाण केली, त्यातील काही मंडळींनी तर थेट चाकू काढून मारण्याचा प्रयत्न केला तर 5 महिन्यांच्या गर्भवतीला सुद्धा या मंडळींनी सोडले नाही.. या सगळ्याची गंभीर दखल महापालिकेने घेतली, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी फेरीवाल्यांचा उन्माद सहन करणार नाही असा इशारा देत पोलिसांनी दोशींवर कारवाई करावी आणि अतिक्रमनावर महापालिका कडक कारवाई करणार असा इशारा दिला.. राजेंद्र जंजाळ , उपमहापौर लागलीच शहागंज परिसरात आज सकाळी महापालिकेचे पथक धडकलं आणि परिसरातील अतिक्रमण निष्कासित करण्यास त्यांनी सुरुवात केली.. या भागात आता फेरीवाल्यांनाही राहू देणार नाही आणि दुकानांचेही अतिक्रमण ठेवणार नाही असं सांगत थेट अतिक्रमण पाडायला सुरुवात केली. यापुढे असं काहीही सहन करणार नाही आणि जर यात विरोध करायला नगरसेवक आलेत तर त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा यावेळी महापालिकेने दिला.. संतोष वाहूळे, अतिरिक्त आयुक्त मनपा गेली काही दिवस शहरातील सर्वच भागात फेरीवाले पाहिजे तिथे गाड्या लावतात आणि व्यवसाय करतात यामुळे सर्वसामान्यांना त्रास होतोय.. महापालिकेने अनेक वेळा यावर कारवाई केली आहे मात्र थातूरमातूर कारवाईनंतर ही मंडळी पुन्हा येतात मात्र बुधवारच्या घटनेनंतर आता महापालिका आणि लोकप्रतिनिधी सगळेच आक्रमक झाले आणि इथून पुढे फेरीवाल्यांवर कडक कारवाई सुरू राहणार असे संकेत महापालिकेने आजच्या कारवाईतून दिले आहे.. विशाल करोळे छत्रपती संभाजी नगर...
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 26, 2026 10:45:33
Kalyan, Maharashtra:डोंबिवली में रहने वाली 19 वर्षीय निधी तिवारी के बैंक खाते में लगभग अडीच करोड़ की गैरव्यवहार का मामला सामने आया। पुलिस ने संबंधितों पर कार्रवाई न होने पर छात्रा उपोषण पर उतरने का इशारा किया। मनसे नेते अविनाश जाधव से मुलाकात हुई। निधी ने बताया कि मेरे वडील के मित्र की बेटी चांदनी सिंह ने निजी बैंक में काम करते हुए मुझे दस्तावेज मांगे, जिनका गलत इस्तेमाल कर मेरे बैंक खाते से लगभग 2 करोड़ 60 लाख का गैरव्यवहार किया गया। इसके बाद मैंने तीन दिसंबर 2025 को थाने में शिकायत दर्ज कराई, पर पुलिस ने चांदनी को बुलाकर पूछताछ कर छोड़ दिया। मैं कई बार थाने गई, पर कोई कार्रवाई नहीं हुई। अंततः मैं मनसे के अविनाश जाधव के पास गई और उन्होंने पुलिस को जवाब देने में मदद की। पुलिस ने उक्त गैरव्यवहार के खिलाफ कठोर कार्रवाई की मांग की है। रामनगर पुलिस स्टेशन میں इसकी चौकसी चल रही है।
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 26, 2026 10:40:04
Ambernath, Maharashtra:अंबरथड में वनविभागाच्या जागेत रस्त्याचं काम सुरू वनविभागाची परवानगी न घेताच अनधिकृतपणे काम पालिकेनं ठेकेदाराला अर्ध बिलही दिलं अंबरनाथमें वनविभागाची कोणतीही एनओसी या परवानगी न घेता जावसई ठाकूरपाडा परिसरातील वनविभागाच्या जागेत पालिकेकडून रस्ता बांधण्यात येत असल्याचा प्रकार समोर आलाय. धक्कादायक बाब म्हणजे पूर्ण काम न करताही या ठेकेदाराला पालिकेने रस्त्याच्या कामाचं अर्ध बिल सुद्धा अदा केलंय. त्यामुळे याप्रकरणी संबंधित ठेकेदारांसोबतच अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी केली जातेय. सुरेश वाघे यांच्या घरापासून जिल्हा परिषद शाळेपर्यंत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा विषय मंजूर करण्यात आला होता. Yासाठी एक कोटी ६३ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. या रस्त्याचा अर्ध्यापेक्षाही जास्त भाग हा वनविभागाच्या जागेत येत असून उर्वरित भाग हा आदिवासी जागेतून जातो. आदिवासी जागेतून जाणाऱ्या रस्त्याचं काँक्रिटीकरण निवडणुकीपूर्वी करण्यात आलं असून ते देखील अद्याप पूर्ण करण्यात आलेलं नाही. वनविभागाच्या जागेतला उर्वरित रस्ता करण्याचा प्रयत्न मागील वर्षी याच ठेकेदाराने केला असता वनविभागाने अंबरनाथ नगर परिषदेसह संबंधित ठेकेदारावर देखील गुन्हा दाखल केला होता. तसंच वनविभागाची जागा जिथून सुरू होते तिथे मार्किंग म्हणून दगडही बसवले होते. मात्र तरीही आता पुन्हा एकदा वनविभागाला अंधारात ठेवून त्यांची कोणतीही एनओसी न घेता परस्पर या रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. या ठेकेदाराला ७ नोव्हेंबर २०२५ रोजी ८१ लाख ४२ हजार ६७७ रुपयांचं बिल सुद्धा अंबरनाथ नगरपालिकेने अदा केलं आहे. मात्र सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या जिल्हा परिषद शाळेपर्यंत हा रस्ता जातो, ती शाळा कल्याण तालुक्यात है. त्यामुळे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार करणं अपेक्षित असतानाही जो भाग अंबरनाथ नगरपरिषदेच्या हद्दीतच येत नाही, तिथे रस्ता तयार करून ठेकेदाराचे उखळ पांढरे करण्याचा आणि अंबरनाथच्या जनतेला चुना लावण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका आता होऊ लागत आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 26, 2026 10:35:27
Kalyan, Maharashtra:डोंबिवली ते नोटरी करारावातील घर घेतलेल्या मालकांच्या नावे टॅक्स लावून द्या.. महानगरपालिकेचे उत्पन्नात भर पडेल..नगरसेवक दीपेश म्हात्रे डोंबिवलीत नोटरी करारावर विक्री झालेल्या हजारो खोल्यांचा कर नवीन मालकाकडे हस्तांतरित करण्यास परवानगी भाजपा चे नगरसेवक दिपेशक म्हात्रे यांनी केडीएमसी आयुक्ता कडे केली आहे नोटरी वरील घरे विकल्यानंतर नवी मालकाच्या नावे टॅक्स हस्तांतरण होत नाही नोटरी वरील घराना त्यांच्या नावे टॅक्स हस्तांतरण करा जेणेकरून कोट्यवधीची थकबाकी वसूल होऊन KDMC च्या उत्पन्नात भर पडेल- भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी आयुक्तांची भेट घेत केली मागणी केडीएमसी आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद - दिपेश म्हात्रे यांची माहिती
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 26, 2026 10:17:27
Beed, Maharashtra:बीड: जातीय तेढ निर्माण करणाऱ्यावर पोलिसांची करडी नजर, नोटीस नव्हे आता थेट होणार फौजदारी गुन्हा दाखल..! ANC - कधीकाळी पुरोगामी म्हणून घेणारा बीड जिल्हा आता दोन जातीच्या तेढाचा केंद्रबिंदू बनला आहे. मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलकांच्या एकमेकांविरोधी पोस्ट मुळे जातीय संघर्ष टोकाला गेले आहे. सोशल माध्यमाच्या प्लॅटफॉर्मवर जातीय तेढ निर्माण करणारे पोस्ट व्हायरल करणाऱ्यावर आता बीड पोलिसांच्या सायबर सेलची करडी नजर आहे. आता नोटीस नाही तर थेट फौजदारी कारवाई करण्याचाच बडगा पोलिसांनी उगारला आहे. बीड जिल्ह्यात सध्या दोन जातीच्या समूहातील संघर्ष विकोपाला गेला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची जातीय तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर विपरीत परिणाम करणारा ठरला. बीडमध्ये याचा सर्वात जास्त प्रचार झाला आणि त्यातूनच मराठा विरुद्ध वंजारी या जातीमध्ये द्वेषाची आग पसरली गेली. यातच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर थेटपणे वंजारी आणि मराठा समाजातील काही समाजकंटकांनी सोशल मिडियाचा वापर करून हा विकोप टोकालाच नेऊन ठेवला. त्यामुळे बीड जिल्ह्यातील सामाजिक अस्वस्थता पूर्णपणे बिघडली. जिल्ह्यात सामाजिक समतोल राखला जावा यासाठी सोशल मीडियावर ऑडिओ, व्हिडिओ आणि द्वेष पसरणारे पोस्ट करण्यावर आता बीड पोलिसांच्या सायबर सेलची करडी नजर आहे. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी आता थेट फौजदारी कारवाई करून अटक करण्याचाच बडगा उगारला आहे. बाईट: नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक बीडमधील जातीपातीच्या भिंती पाडून सामाजिक समतोल राखण्यासाठी बीड पोलिस प्रशासनाने स्वतःच्या नेमप्लेट वरील आडनाव काढून थेट नाव ठेवले होते. मात्र याच पोलिसांना बीडमधील दोन समाजातील जातीय तेढ कमी करता आले नाही. पूर्वी भांडण तंटे मिटवण्यासाठी सर्व समाजातील ज्येष्ठ एकत्रित यायचे, गावात बैठक बसायची आणि सामाजिक दरी कायमची मिटवून जातीय समीकरणातील रथाची चाके पुर्नरत चालायची. मात्र सध्या तशी परिस्थिती राहिली नाही. कधीकाळी पुरोगामी म्हणून ओळखला जाणारा हा बीड जिल्हा सध्या जातीय संघर्षाचा जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागलाय. द्वेष निर्माण करणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई झाली पाहिजे असे मत जाणकार व्यक्त करतायेत... बाईट: नामदेवराव चव्हा़ण, ज्येष्ठ समाजसेवक बीड जिल्ह्यातील जातीय संघर्ष कायम उध्वस्त करण्यासाठी बीड पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यावर प्रतिबंधक कारवाई म्हणून नोटीस देण्यात येत होती. मात्र सामाजिक परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिस प्रशासनाने कारवाईचा बडगा तीव्र केला आहे. पोलिसांच्या या निर्णयाचे बीडमधून स्वागत होतेय. तर दुसरीकडे कारवाईचा फास आवळण्यासाठी कठोर शिक्षा झालीच पाहिजे असा पवित्रा सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतला आहे. बाईट: डॉ. प्रदीपकुमार उजेगर, सामाजिक कार्यकर्ते बीडची ओळख जातीय संघर्षाची नव्हे, तर पुरोगामी विचारांची आणि सामाजिक ऐक्याची राहिली आहे. तीच ओळख पुन्हा प्रस्थापित करण्याची जबाबदारी प्रशासनाइतकीच सर्वसामान्य नागरिकांचीही आहे. द्वेषाला नाही, तर संवादाला होकार देत सामाजिक समतोल राखणे हाच काळाचा संदेश आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Feb 26, 2026 10:05:42
Nanded, Maharashtra:गांव में तात्पूरती शाळा बंद पडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधारात सापडले आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील रामदास पवार तांडा येथील हा प्रकार आहे. हा भाग बंजारा बहुल भाग असून अनेक तांडे या भागात आहेत. या ठिकाणी प्राथमिक शाळा सुरु करावी यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्यानंतर 2017 साली रामदास पवार तांडा येथे जिल्ह्या परिषदेने तात्पूरती शाळा दिली होती. पवार यांनी दान दिलेल्या जागेत सांभामंडपात ही शाळा सुरु होती. पण काही महिने एक शिक्षक आला. पण सहा महिन्यानंतर ही शाळा बंद पडली. सध्या इथे प्राथमिकचे जवळपास 35 विद्यार्थी आहेत. पण शाळा नसल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण बुडत आहे. सात ते आठ किलोमीटर दुरावर असलेल्या शाळेत कधी विद्यार्थी जातात कधी नाही. शाळा नसल्याने बहुतांश वेळा विद्यार्थी आपल्या उसतोड आई वडिलांसोबत कामाला जातात.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Feb 26, 2026 09:47:21
Shirur, Maharashtra:बारा ज्योतिर्लिंग एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराचा ऐतिहासिक सभामंडप आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला जाणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला हा प्रकल्प पारंपारिक साहित्य व तंत्रज्ञानाचा वापर करून, कुशल कारागिरांच्या साहाय्याने केवळ चार महिन्यांत पूर्ण केला जाणार आहे. सुमारे पावणे तीन हजार चौरा-स फूटांचे हे दगडी बांधकाम देशात पहिल्यांदाच पुरातत्त्व विभागामार्फत होत असून, जिल्हा प्रशासनाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली असुन कमी वेळेत पारंपारिक तंत्रातून पूर्ण होणारा हा सांस्कृतिक व स्थापत्यदृष्ट्या महत्त्वाचा प्रकल्प जागतिक स्तरावर आदर्श ठरणार आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 26, 2026 08:34:07
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - द्राक्ष वेलीवर भला मोठा नाग.. प्राणी मित्राकडून सुटका.. अँकर - सद्या उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने मुक्या जीवांची तडफड जाणवू लागली आहे. सांगलीच्या कवलापूर येथे द्राक्ष बागेत काम करताना शेतकरी गणेश पाटील यांना वेलीवर साडे पाच फुट लांबीचा नाग आढळून आला. उन्हाचा तडाख्यापासून बचाव करण्यासाठी वेलीला वेटोळे घालून बसलेला हा नाग सहज दिसून येत नव्हता. यावेळी पाटील यांनी सर्पमित्र याना बोलावून घेतले. घटनास्थळी सर्पमित्र गजानन जाधव आणि त्यांचे सहकारी ओकार कुपाडे यांनी नागाला पकडून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये झुडпе, पाण्याची ठिकाणे आणि अडगळीच्या जागा याठिकाणी काम करताना शेत करते नी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन जाधव यांनी केले.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Feb 26, 2026 08:30:47
Dhule, Maharashtra:धुले जिलेाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी भूमफायांच्या बाजूने निकाल देत त्यांना कोट्यावधी रुपयांचा आर्थिक लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप माजी आमदार शिवसेना उबाठाचे नेते अनिल गोटे यांनी केलेला आहे. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी भूसंपादनाच्या दराबाबतीतील शेतकऱ्यांचे अपील फेटाळून लावले, मात्र भूमाफी यांचे अपील स्वीकारत त्यांच्या बाजूने निकाल दिल्याचाही आरोप अनिल गोटे यांनी केलेला आहे. या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांच्या भूसंपादनाला काही लाख रुपयांचा मोबदला दिला जात असताना, भूमाफियांना मात्र कोट्यावधी रुपयांची मोबदला मंजूर केली जात असल्याचा आरोप गोटे यांनी केलेला आहे. यात प्रशासनासह सर्वेच सहभागी असल्याचा नुकसानाची चर्चा ही गोटे यांनी केली आहे. जो न्याय राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासाठी लावण्यात आलेला आहे तोच न्याय मनमाड इंदोर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी लावण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. भूमाफियांच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या या कटकारस्थानाबद्दल केंद्रीय मंत्र्याकडे तक्रार केल्याचं ही अनिल गोटे यांनी स्पष्ट केले आहे. अनिल गोटे यांच्या तक्रारीची काय दखल घेतली जाते आणि जिल्हाधिकाऱ्यांसह दोषींवरती काय कारवाई होते? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top