Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

डार्ट चूक से ग्रामस्थ घायल, उमरखेड़ भवानी गांव में पिसाळलेल्या माकड बंदोबस्त कोशिश

SRSHRIKANT RAUT
Mar 18, 2026 03:51:09
Yavatmal, Maharashtra
पिसाळलेल्या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाच्या पथकाने माकडावर मारलेला डार्ट निशाणा चुकल्याने ग्रामस्थाला लागला. त्यामुळे माकडा ऐवजी ग्रामस्थ बेशुद्ध पडले. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील भवानी या गावात ही घटना घडली. गावात एक माकड काही दिवसांपासून धुमाकूळ घालत आहे, ग्रामस्थांवर हल्ले करीत आहे त्यामुळे या पिसाळलेल्या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाचे पथक गावात पोहोचले. त्यांनी माकडाला बेशुद्ध करण्यासाठी ट्रॅन्क्विलायझर गन मधून डार्ट सोडला, मात्र निशाणा चुकल्याने तो डार्ट थेट गर्दीत उभे असलेल्या सदानंद खराटे यांना लागला. माकडा ऐवजी ग्रामस्थच बेशुद्ध झाल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. जखमी सदानंद खराटे यांना तातडीने कोरटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्या प्रकृती स्थिर आहे. पिसाळलेल्या माकडाला जेरबंद करण्यासाठी आता वन विभागाने पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Mar 18, 2026 04:46:16
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात सहा शेतकरी जखमी अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याने एका मागून एक केलेल्या हल्ल्यात सहा शेतकरी जखमी झाले आहेत. ब्रह्मपुरी तालुक्यातील चिखलगाव आणि पिंपळगाव भोसले या गावातील ही घटना असून जखमींमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. ही दोन्ही गावं वैनगंगा नदीच्या लगत असून काल दुपारच्या दरम्यान हे सर्व शेतकरी आपल्या शेतात काम करत होते. याच दरम्यान बिबट्याने शेतात काम करणाऱ्या या शेतकऱ्यांवर हल्ले केले. हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या सर्व शेतकऱ्यांना ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालय आणि गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वनविभागाने घटनेची माहिती मिळताच या भागात ट्रॅप कॅमेऱ्याच्या माध्यमातून हल्ला करणाऱ्या बिबट्याचा शोध सुरू केलाय.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 18, 2026 04:30:39
Bhandara, Maharashtra:जुन्या वैरातून तलवारीने रक्तरंजित हल्ला! युवकाची निर्घृण हत्या.... आरोपीचा थेट सरेंडर.... परिसरात भीतीचं सावट. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा हेटी येथे जुन्या वैरातून एका २४ वर्षीय युवकाची तलवारीने निर्दयी हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत युवकाचे नाव देवेंद्र चुन्नीलाल ताराम (२४) असे असून, तो काही दिवसांपूर्वीच जामिनावर कारागृहातून सुटून गावात परतला होता. त्याच्यावर हल्ला करणारा आरोपी सुनील आसाराम कांबले (२५) याने जुन्या वैरातून ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी देवेंद्र ताराम याच्याविरुद्ध आरोपीच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर, त्याला अटक करून भंडारा कारागृहात पाठविण्यात आले होते. मात्र, आठ दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून गावात आला होता. दरम्यान, वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याच्या उद्देशाने आरोपी सुनील कांबळे यांनी संधीच्या शोधात होता. देवेंद्र गावात परतल्याची माहिती मिळताच, रात्री त्याच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात देवेंद्रच्या गळा, मान, हात, पाय आणि पोटावर गंभीर जखमा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर आरोपीने थेट पोलीस पाटलासमोर आत्मसमर्पण केले. त्याच्याकडे हत्येसाठी वापरलेले शस्त्रही आढळून आले. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून पुढील तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, तपासादरम्यान आरोपीचा मोठा भाऊ हंसराज कांबले (४३) यालाही संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.
197
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 18, 2026 04:18:48
Washim, Maharashtra:अँकर: वाशिमच्या मालेगाव तहसील कार्यालयातील चेकबुक चोरी प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. पाच दिवसांपूर्वी चोरी गेलेले चेकबुक अचानक नायब नाझर कार्यालयात सापडल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चोरी केलेल्या चेकद्वारे पाच जणांच्या खात्यात तब Dell 5 लाख 58 हजार रुपये जमा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी मालेगाव पोलिसांत तक्रार दाखल असून तपास सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी कार्यालय उघडताना खिडकीखाली पिशवीत चेकबुकचा बंडल आढळून आला. यातील 12 चेकवर सही व शिक्के असून उर्वरित चेक कोरे असल्याचे आढळले. पोलिसांनी पंचनामा करून चेकबुक जप्त केले आहे. या प्रकरणात अद्याप कुणालाही ताब्यात घेण्यात आले नसून, तहसील कार्यालयाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले आहे.
1009
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 18, 2026 04:16:50
Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिल्ह्यातील लोहारा, उमरगा, तुळजापूरला गारपिटीचा तडाखा. वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. नळदुर्ग परिसरात महामार्गावर बर्फासारखी गारांची चादर. द्राक्ष, कांदा, केळी, ज्वारी, मका पिकांचे अतोनात नुकसान धाराशिव जिल्ह्यात सोमवारी रात्री निसर्गाचा कहर पाहायला मिळाला. लोहारा, उमरगा आणि तुळजापूर तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या तुफान गारपिटीने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काल सायंकाळी अचानक वातावरणात बदल होत विजेचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळला. उमरगा-नळदुर्ग परिसरात गारपीट इतकी तीव्र होती की महामार्गावर अक्षरशः बर्फ पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. द्राक्ष, केळी, आंबा, कलिंगड आणि कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काढणीच्या उंबरठ्यावर असलेले पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. हवामान विभागाने १७ आणि १८ मार्चदरम्यान पावसाचा अंदाज वर्तवला होता, त्यानुसारच ही गारपीट झाली. मात्र या अवकाळी पावसाने काढणीस आलेल्या शेती पिकाचा अतोनात नुकसान केलं.
924
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 18, 2026 04:05:45
Washim, Maharashtra:अकंर:राज्यातील हवामानात सध्या मोठे चढउतार पाहायला मिळत असून,हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी अवकाळी इशारा दिला आहे.एकीकडे तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले असताना, हवामान विभागाकडून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.वाशिम जिल्ह्यासह परिसरात 20 मार्चदरम्यान अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यां मध्ये चिंतेचे वातावरण आहे.रब्बी हंगामातील हरभरा,गहू पालन पिके काढणीच्या टप्प्यात असून,तर हळद काढणीला सुरुवात झाली आहे.अवकाळी पावसामुळे मोठ्या नुकसानाची भीती व्यक्त केली जात आहे.त्यामुळे शेतकरी सध्या पिकांची कापणी व काढणी करण्याची धावपळ सुरु आहे.या बदलत्या वातावरणा मुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
1008
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 18, 2026 04:04:50
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. ANC- राज्यात दोन दिवस वादळी वा-यासह पावसाचे असणार आहेत... कोकण, मराठवाड्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात 20 मार्चपर्यंत वादळी वा-यासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे... तर मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये तुरळकठिकाणी हलक्या सरीचंचा अंदाज वर्तवण्यात आलाय... पावसाळी वातावरणामुळे तापमानात घट झाली आहे... त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळालाय.. मात्र दुसरीकडे पावसाच्या शक्यतेने बळीराजाची चिंता मात्र वाढलीये... वादळी पावसाच्या शक्यतेने काढणीला आलेलं पीक अडचणीत सापडलंय...
956
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 18, 2026 03:47:12
Nagpur, Maharashtra:नागपुर - नागपुरात दुर्दैवी घटना, सांडपाण्याच्या खड्ड्यात पडून ६ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शारदा नगर परिसरातील दुर्दैवी घटना. मृत बालकाचे नाव दानिश अयाज अन्सारी अस सहा वर्षीय चिमुकल्याच नाव. घराजवळील मोकळ्या मैदानात खेळताना तोल जाऊन खड्ड्यात पडल्याच बोललं जातं आहे. घाणेरडे पाणी नाक-तोंडात गेल्याने गुदमरून जागीच मृत्यू. बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांकडून शोध सुरू, सुमारे दोन तासांनी खड्ड्यातून मृतदेह आढळला. घटनेमुळे परिसरात हळहळ, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर. पोलिसांकडून पंचनामा, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शहरात उघडे खड्डे आणि सांडपाणी व्यवस्थेचा अभाव गंभीर समस्या. यापूर्वीही उघड्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू झाल्याची घटना झाल्या आहेय.. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, नागरिकांची मागणी केली जात आहे...
1038
comment0
Report
Advertisement
Back to top