Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिम में गैस-ईंधन की पर्याप्त उपलब्धता, प्रशासन ने साठेबाजी रोकने के लिए पथक बनाये

GMGANESH MOHALE
Mar 15, 2026 07:10:37
Washim, Maharashtra
वाशिम: नागरिक गॅस सिलेंडर खरेदीसाठी गर्दी करीत आहे. मात्र वाशिम जिल्ह्यात गॅस,पेट्रोल आणि डिझेल पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांनी दिली आहे. जिल्ह्यातील प्रमुख तेल कंपन्यांकडे पेट्रोल,डिझेल,घरगुती गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा असून इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे. नागरिकांनी घाबरून साठेबाजी करू नये, तसेच गॅस एजन्सीधारकांना सहकार्य करावे,असे आवाहन प्रशासनाने केले आहे. साठेबाजी रोखण्यासाठी तालुकास्तरावर पथकेही तयार करण्यात आली आहेत. असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी यांनी दिली आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRAFULLA PAWAR
Mar 15, 2026 08:19:04
Varasoli, Maharashtra:स्‍लग – पुन्‍हा एकदा घरोघरी मातीच्‍या चुली गॅस सिलेंडर टंचाईच्‍या भीतीने चुलींची चलती ग्राहकांची मोठी मागणी, पण पुरवठा कमी कुंभारवाडयांमध्‍ये लगबग , चुली बनवण्‍याचे काम सुरू मातीच्‍या टंचाईमुळे कुंभार समाज अडचणीत अँकर - गॅस सिलेंडरच्या संभाव्य टंचाईच्या भीतीमुळे रायगड जिल्ह्यात लोक पुन्हा एकदा पारंपरिक चुलीकडे वळताना दिसत आहेत. त्यामुळे कुंभारवाड्यांमध्ये मातीच्या चुली बनवण्याची लगबग सुरू आहे. व्हिओ 2 - पूर्वीसारखी मागणी नसल्याने अनेक कुंभारांनी हा व्यवसाय सोडला होता. त्यामुळे सध्या अचानक वाढलेल्या मागणीला पुरवठा करणे कठीण झाले आहे. त्यातच चुली बनवण्यासाठी लागणारी योग्य माती सहज उपलब्ध होत नसल्याचीही मोठी अडचण कुंभार समाजासमोर आहे. गावोगावी ग्राहकांकडून चुलीसाठी मागणी वाढत असली तरी त्या प्रमाणात उत्पादन करणे कारागिरांसाठी अवघड ठरत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ग्राहकांना चुलीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. बाईट – रूपाली म्हशीलकर, कारागीर महिला फायनल व्हिओ – घरोघरी मातीच्‍या चुली ही म्‍हण आता कालबाह्य झाली आहे. परंतु वाढत्या मागणीमुळे काही कारागीर पुन्हा या पारंपरिक व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत. त्यामुळे मातीच्या चुलींचा व्यवसाय पुन्हा एकदा जिवंत होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. प्रफुल्‍ल पवार, झी 24 तास रायगड
98
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 15, 2026 08:18:17
Yeola, Maharashtra:राज्यात सध्या व्यावसायिक गॅसची टंचाई निर्माण झाल्यामुळे हॉटेल व्यवसायिकांवर मोठं संकट आलं आहे. मात्र येवला शहरातील एका कारागिराने भन्नाट देशी जुगाड शोधून काढला आहे. ऑईलवर चालणारी शेगडी तयार करत त्याने हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा दिला आहे. पाहूया खास रिपोर्ट. सध्या सर्वत्र व्यावसायिक गॅसची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस उपलब्ध नसल्याने अनेक हॉटेल बंद करण्याची वेळ येत आहे. अशा परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातील कारागीर तुषार लाड यांनी एक अनोखा देशी जुगाड केला आहे. त्यांनी ऑईलवर चालणारी शेगड़ी तयार केली असून सध्या ही शेगडी चर्चेचा विषय ठरत आहे. या शेगडीची खासियत म्हणजे ती टाकावू ऑईलवर चालते आणि त्यावर हॉटेलमधील जवळपास सर्व पदार्थ सहज बनवता येतात. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांसाठी ही शेगड़ी वरदान ठरत आहे. गॅस टंचाईमुळे अडचणीत सापडलेल्या हॉटेल व्यवसायिकांनी या शेगडीचे स्वागत केले असून कमी खर्चात पर्याय उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त केले आहे. गॅस टंचाईच्या काळात येवला शहरातील या कारागिराचा देशी जुगाड अनेक हॉटेल व्यवसायिकांसाठी खऱ्या अर्थाने दिलासा ठरताना दिसत आहे. सुदर्शन खिल्लारे, येवला नाशिक
176
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 15, 2026 08:04:16
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सलग सणांच्या पार्श्वभूमीवर श्री स्वामी समर्थ मंदिर रात्री 12 ते 2 बंद ठेवण्याच्या निर्णय - सलग सणांच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय - श्री स्वामी समर्थ मंदिर दर्शनासाठी रात्री 12 ते 2 यावेळेत राहणार बंद - राज्यभरातून आणि देशभरातून येणाऱ्या स्वामी भक्तांसाठी 22 तास स्वामींचे दर्शन खुले ठेवण्याचा मंदिर समितीचा निर्णय - गुढीपाडवा, स्वामी समर्थ प्रकट दिन, रमजान ईद तसेच साप्तहिक सुट्टीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला बदल - भक्तांची संभाव्य गर्दी लक्ष्यात घेता महिला आणि पुरुष भक्तांसाठी स्वतंत्र रांगेची सोय
123
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 15, 2026 08:00:18
Shirdi, Maharashtra:Rahuri News Flash इथे उपस्थित सर्वांना नमस्कार... राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची मराठीतून भाषणाला सुरुवात... राज्यपाल पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर वर्मा यांचा राज्यात पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थिती... राज्यपालांनी केली पहिल्याच भाषणाची सुरूवात मराठीत.. मी देखील त्रिपुराचा मुख्यमंत्री होतो... देशातील अनेक मुख्यमंत्र्यांचे लक्ष असते, फडणवीस काय करताय... देवेंद्र फडणवीस एक डायनॅमिक नेतृत्व... राज्यपालांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक... आज राज्यपालांच्या हस्ते देवेंद्र फडणवीस यांचा डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देऊन सन्मान... राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या वतीने डॉक्टरेट देऊन सन्मान...
179
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 15, 2026 07:49:00
Shirdi, Maharashtra:ऑन बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणूक - दोन्ही निवडणुका बिनविरोध व्हाव्यात... सर्वांनी एकमताने निर्णय करावा असा आमचा प्रयत्न... मात्र निवडणूक लादली गेली, तर आम्ही लढायला तयार... ऑन मुंबई महापौर लाल दिवा - लाल दिवा गाडीवर नव्हता, तर बोनेटच्या ठिकाणी होता... महापौरांचा यात काहीही दोष नाही... कुणीही लाल दिवे वापरू नये हा जुनाच निर्णय आहे... महापौरांही त्याची कल्पना आहे... महापौरांना विनाकारण टार्गेट करणे योग्य नाही... ऑन इंधन तुटवडा - नागरिकांनी केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे वागले पाहिजे... काही राजकीय पक्ष नागरिकांमध्ये जाणीवपूर्वक भिती निर्माण करताय... पॅनिक सिच्युएशन झाली तर असलेली चांगली परिस्थिती खराब होण्याची संभावना... अशी भिती निर्माण झाली तर लोक साठवणूक करतील... केंद्र सरकार आणि मोदीजी आपल्यासाठी सर्व गोष्टी नीट करताय, त्यावर विश्वास ठेवा... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील नागरिकांना आवाहन....
142
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Mar 15, 2026 07:35:20
Buldhana, Maharashtra:खामगावात ‘पार्ले-जी’ उत्पादन ठप्प; गॅस टंचाईमुळे ५०० कामगारांवर संकट... खामगाव येथील शिवांगी बेकर्स कंपनीतील बिस्किट उत्पादन गेल्या गुरुवारपासून पूर्णपणे बंद पडले आहे. येथे ‘क्रीम’ व ‘ग्लुकोज’ प्रकारातील प्रसिद्ध पार्ले-जी बिस्किटांचे उत्पादन घेतले जाते. ओव्हन गॅसवर चालत असल्याने गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे उत्पादन प्रक्रिया ठप्प झाली आहे. कंपनीत सुमारे ५०० कामगार कार्यरत असून उत्पादन बंद राहिल्यास त्यांच्या रोजगारावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, उत्पादन थांबल्यामुळे कंपनीला दररोज लाखो रुपयांचा फटका बसत असून बाजारात बिस्किटांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे....
68
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 15, 2026 07:32:33
197
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 15, 2026 06:52:19
88
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 15, 2026 06:52:00
Junnar, Pune, Maharashtra:सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता विविध व्यवसायांवर दिसून येत असून बाटलीबंद पाणी व्यवसायही याचा मोठा परिणाम झालाय, बॉटलिंग प्लँटसाठी लागणाऱ्या पेट्रोलियमजन्य कच्च्या मालाच्या आयातीवर मोठा परिणाम झाला असून परिणामी त्यांच्या दरवाढीमुळे आणि उपलब्धतेत घट झाल्याने पाणी व्यवसायिकांसमोर मोठं संकट उभं राहतंय सध्याच्या परिस्थितीत क्रूड ऑइलच्या दरात मोठी वाढ झाली असून त्याची उपलब्धताही कमी होत असल्याने, बाटली बंद पाणी बनवण्यासाठी चा खर्च वाढल्याने बाजारपेठेत हि बाटली बंद मिनरल वॉटर चे दर वाढलेत याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी ... प्रतिनिधी हेमंत चापुडे
131
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 15, 2026 06:34:18
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात वाढत्या उन्हामुळे आगीच्या घटनांची संख्या वाढत असतानाच मूर्तीजापूर तालुक्यातील एका गव्हाच्या शेताला विद्युत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने गावकऱ्यांच्या तत्परतेमुळे ही आग लवकर आटोक्यात आणण्यात यश आले. मूर्तीजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील माजी सरपंच नंदकिशोर पायगन यांच्या शेतातील काढणीस आलेल्या गव्हाच्या पिकाला अचानक आग लागली. शेतातून धुराचे लोट उठताना दिसताच परिसरातील गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाण्याच्या बादल्या तसेच झाडांच्या फांद्यांच्या साहाय्याने गावकाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही आग काही वेळातच आटोक्यात आली. मात्र या आगीत अंदाजे वीस गुंठे गहू जळून खाक झाला. सुदैवाने वारा विरुद्ध दिशेने असल्याने उर्वरित पीक वाचले आणि मोठे नुकसान टळले.
196
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 15, 2026 06:33:32
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर: वाशिम जिल्हा परिषदेचा २०२६–२७ साठी ९८ हजार ९७० रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासक अर्पित चौहान यांनी मंजूर केला. या अर्थसंकल्पात ९ कोटी ५९ लाख ८२ हजार ९७० रुपये उत्पन्न अपेक्षित असून ९ कोटी ५८ लाख ८४ हजार रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण व आरोग्य विभागावर विशेष भर देण्यात आला आहे. शिक्षण विभागाची तरतूद ७८.२५ लाखांवर, तर आरोग्य विभागासाठी ७५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती पूर्वपरीक्षा व शैक्षणिक सहलीसाठी १० लाख, तसेच शिष्यवृत्ती परीक्षा शुल्कासाठीही निधी देण्यात येणार आहे. याशिवाय कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरासाठी १० लाखांची तरतूद करण्यात आली असून महिला व बालकल्याण व समाजकल्याण विभागासाठीही भरीव निधी राखीव ठेवण्यात आला आहे.
172
comment0
Report
Advertisement
Back to top