Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Buldhana443001

गैस संकट से खामगाव की पार्ले-जी फैक्ट्री में 500 कर्मचारी प्रभावित

MNMAYUR NIKAM
Mar 15, 2026 07:35:20
Buldhana, Maharashtra
खामगावात ‘पार्ले-जी’ उत्पादन ठप्प; गॅस टंचाईमुळे ५०० कामगारांवर संकट... खामगाव येथील शिवांगी बेकर्स कंपनीतील बिस्किट उत्पादन गेल्या गुरुवारपासून पूर्णपणे बंद पडले आहे. येथे ‘क्रीम’ व ‘ग्लुकोज’ प्रकारातील प्रसिद्ध पार्ले-जी बिस्किटांचे उत्पादन घेतले जाते. ओव्हन गॅसवर चालत असल्याने गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे उत्पादन प्रक्रिया ठप्प झाली आहे. कंपनीत सुमारे ५०० कामगार कार्यरत असून उत्पादन बंद राहिल्यास त्यांच्या रोजगारावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, उत्पादन थांबल्यामुळे कंपनीला दररोज लाखो रुपयांचा फटका बसत असून बाजारात बिस्किटांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे....
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SNSWATI NAIK
Mar 15, 2026 08:47:49
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 15, 2026 08:47:26
Nashik, Maharashtra:युद्धाचा परिणाम थेट पिण्याच्या पाण्यावर... पिण्याच्या पाण्याच्या बॉक्स च्या किमतीत 30 रुपयांनी वाढ... आखाती देशांमध्ये निर्माण झालेला युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता देशभर मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे...युद्धजन्य परिस्थितीमुळे रॉ मटेरियल मध्ये वाढ झाल्यामुळे पाणी बॉटलच्या बॉक्सच्या किमतीमध्ये जवळपास 25 ते 30 रुपयाची वाढ झाली आहे... त्यामुळे युद्धाचा फटका थेट जनसामान्यांना बसताना दिसून येत आहे.. खरंतर उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे.... उन्हात पिण्याच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असते...आता थेट पाण्याच्या बॉटलच्या किमती वाढत असल्याने थेट परिणाम सामान्य नागरिकांमध्ये जाणू लागलाय....आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी...
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 15, 2026 08:47:16
Jalna, Maharashtra:जालना :धनगर आंदोलक दिपक बो-हाडे मुंबईकडे रवाना मुंबईतल्या आझाद मैदानात सकाळी 10 वाजल्यापासून करणार आमरण उपोषण धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी वनवा पेटला आहे आता विझवणं अवघड- दिपक बो-हाडे आंदोलनाला परवानगी मिळाली- बो-हाडे जालन्यातील धनगर आंदोलक दीपक बो-हाडे आंदोलकांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. सोमवार रोजी सकाळी 10 वाजल्यापासून दिपक बो-हाडे मुंबईतल्या आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार आहेत.. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी बो-हाडे आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिल्याचंही बो-हाडे यांनी सांगितलं.. मात्र जोपर्यंत एसटी आरक्षणाची अमंलबजावणी होणार नाही. तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असं बो-हाडे यांनी म्हंटलं असून वनवा पेटला आहे आता विझवणं अवघड आहे असा इशाराही दिलाय. बाईट- दिपक बो-हाडे, धनगर समाजाचे आंदोलक
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 15, 2026 08:19:04
Varasoli, Maharashtra:स्‍लग – पुन्‍हा एकदा घरोघरी मातीच्‍या चुली गॅस सिलेंडर टंचाईच्‍या भीतीने चुलींची चलती ग्राहकांची मोठी मागणी, पण पुरवठा कमी कुंभारवाडयांमध्‍ये लगबग , चुली बनवण्‍याचे काम सुरू मातीच्‍या टंचाईमुळे कुंभार समाज अडचणीत अँकर - गॅस सिलेंडरच्या संभाव्य टंचाईच्या भीतीमुळे रायगड जिल्ह्यात लोक पुन्हा एकदा पारंपरिक चुलीकडे वळताना दिसत आहेत. त्यामुळे कुंभारवाड्यांमध्ये मातीच्या चुली बनवण्याची लगबग सुरू आहे. व्हिओ 2 - पूर्वीसारखी मागणी नसल्याने अनेक कुंभारांनी हा व्यवसाय सोडला होता. त्यामुळे सध्या अचानक वाढलेल्या मागणीला पुरवठा करणे कठीण झाले आहे. त्यातच चुली बनवण्यासाठी लागणारी योग्य माती सहज उपलब्ध होत नसल्याचीही मोठी अडचण कुंभार समाजासमोर आहे. गावोगावी ग्राहकांकडून चुलीसाठी मागणी वाढत असली तरी त्या प्रमाणात उत्पादन करणे कारागिरांसाठी अवघड ठरत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ग्राहकांना चुलीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. बाईट – रूपाली म्हशीलकर, कारागीर महिला फायनल व्हिओ – घरोघरी मातीच्‍या चुली ही म्‍हण आता कालबाह्य झाली आहे. परंतु वाढत्या मागणीमुळे काही कारागीर पुन्हा या पारंपरिक व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत. त्यामुळे मातीच्या चुलींचा व्यवसाय पुन्हा एकदा जिवंत होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. प्रफुल्‍ल पवार, झी 24 तास रायगड
183
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 15, 2026 08:18:17
Yeola, Maharashtra:राज्यात सध्या व्यावसायिक गॅसची टंचाई निर्माण झाल्यामुळे हॉटेल व्यवसायिकांवर मोठं संकट आलं आहे. मात्र येवला शहरातील एका कारागिराने भन्नाट देशी जुगाड शोधून काढला आहे. ऑईलवर चालणारी शेगडी तयार करत त्याने हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा दिला आहे. पाहूया खास रिपोर्ट. सध्या सर्वत्र व्यावसायिक गॅसची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस उपलब्ध नसल्याने अनेक हॉटेल बंद करण्याची वेळ येत आहे. अशा परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातील कारागीर तुषार लाड यांनी एक अनोखा देशी जुगाड केला आहे. त्यांनी ऑईलवर चालणारी शेगड़ी तयार केली असून सध्या ही शेगडी चर्चेचा विषय ठरत आहे. या शेगडीची खासियत म्हणजे ती टाकावू ऑईलवर चालते आणि त्यावर हॉटेलमधील जवळपास सर्व पदार्थ सहज बनवता येतात. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांसाठी ही शेगड़ी वरदान ठरत आहे. गॅस टंचाईमुळे अडचणीत सापडलेल्या हॉटेल व्यवसायिकांनी या शेगडीचे स्वागत केले असून कमी खर्चात पर्याय उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त केले आहे. गॅस टंचाईच्या काळात येवला शहरातील या कारागिराचा देशी जुगाड अनेक हॉटेल व्यवसायिकांसाठी खऱ्या अर्थाने दिलासा ठरताना दिसत आहे. सुदर्शन खिल्लारे, येवला नाशिक
224
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 15, 2026 08:04:16
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सलग सणांच्या पार्श्वभूमीवर श्री स्वामी समर्थ मंदिर रात्री 12 ते 2 बंद ठेवण्याच्या निर्णय - सलग सणांच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय - श्री स्वामी समर्थ मंदिर दर्शनासाठी रात्री 12 ते 2 यावेळेत राहणार बंद - राज्यभरातून आणि देशभरातून येणाऱ्या स्वामी भक्तांसाठी 22 तास स्वामींचे दर्शन खुले ठेवण्याचा मंदिर समितीचा निर्णय - गुढीपाडवा, स्वामी समर्थ प्रकट दिन, रमजान ईद तसेच साप्तहिक सुट्टीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला बदल - भक्तांची संभाव्य गर्दी लक्ष्यात घेता महिला आणि पुरुष भक्तांसाठी स्वतंत्र रांगेची सोय
123
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 15, 2026 08:00:18
Shirdi, Maharashtra:Rahuri News Flash इथे उपस्थित सर्वांना नमस्कार... राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची मराठीतून भाषणाला सुरुवात... राज्यपाल पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर वर्मा यांचा राज्यात पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थिती... राज्यपालांनी केली पहिल्याच भाषणाची सुरूवात मराठीत.. मी देखील त्रिपुराचा मुख्यमंत्री होतो... देशातील अनेक मुख्यमंत्र्यांचे लक्ष असते, फडणवीस काय करताय... देवेंद्र फडणवीस एक डायनॅमिक नेतृत्व... राज्यपालांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक... आज राज्यपालांच्या हस्ते देवेंद्र फडणवीस यांचा डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देऊन सन्मान... राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या वतीने डॉक्टरेट देऊन सन्मान...
179
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 15, 2026 07:49:00
Shirdi, Maharashtra:ऑन बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणूक - दोन्ही निवडणुका बिनविरोध व्हाव्यात... सर्वांनी एकमताने निर्णय करावा असा आमचा प्रयत्न... मात्र निवडणूक लादली गेली, तर आम्ही लढायला तयार... ऑन मुंबई महापौर लाल दिवा - लाल दिवा गाडीवर नव्हता, तर बोनेटच्या ठिकाणी होता... महापौरांचा यात काहीही दोष नाही... कुणीही लाल दिवे वापरू नये हा जुनाच निर्णय आहे... महापौरांही त्याची कल्पना आहे... महापौरांना विनाकारण टार्गेट करणे योग्य नाही... ऑन इंधन तुटवडा - नागरिकांनी केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे वागले पाहिजे... काही राजकीय पक्ष नागरिकांमध्ये जाणीवपूर्वक भिती निर्माण करताय... पॅनिक सिच्युएशन झाली तर असलेली चांगली परिस्थिती खराब होण्याची संभावना... अशी भिती निर्माण झाली तर लोक साठवणूक करतील... केंद्र सरकार आणि मोदीजी आपल्यासाठी सर्व गोष्टी नीट करताय, त्यावर विश्वास ठेवा... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील नागरिकांना आवाहन....
142
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 15, 2026 07:32:33
197
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 15, 2026 07:10:37
151
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 15, 2026 06:52:19
88
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 15, 2026 06:52:00
Junnar, Pune, Maharashtra:सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता विविध व्यवसायांवर दिसून येत असून बाटलीबंद पाणी व्यवसायही याचा मोठा परिणाम झालाय, बॉटलिंग प्लँटसाठी लागणाऱ्या पेट्रोलियमजन्य कच्च्या मालाच्या आयातीवर मोठा परिणाम झाला असून परिणामी त्यांच्या दरवाढीमुळे आणि उपलब्धतेत घट झाल्याने पाणी व्यवसायिकांसमोर मोठं संकट उभं राहतंय सध्याच्या परिस्थितीत क्रूड ऑइलच्या दरात मोठी वाढ झाली असून त्याची उपलब्धताही कमी होत असल्याने, बाटली बंद पाणी बनवण्यासाठी चा खर्च वाढल्याने बाजारपेठेत हि बाटली बंद मिनरल वॉटर चे दर वाढलेत याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी ... प्रतिनिधी हेमंत चापुडे
131
comment0
Report
Advertisement
Back to top