Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444601

अमरावती में रबी सीजन: दो लाख हेक्टेयर में हरभरा बोने की संभावना

ADANIRUDHA DAWALE
Nov 07, 2025 06:18:01
Amravati, Maharashtra
अमरावती जिल्ह्यात रब्बी हंगामात यंदा पहिल्यांदाच दोन लाख हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी; पाणी प्रकल्पात मुबलक पाणी साठा असल्याने शेतकऱ्यांचा निर्णय यावर्षी जमीनीत पुरेशी आद्रता व पाणी प्रकल्पात मुबलक पाणी असल्याने रब्बी हंगामाच्या पथ्यावर पडला आहे. अमरावती जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगामात दोन लाख हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी 1.60 लाख हेक्टरवर रब्बीचा हंगाम आटोपला होता. मात्र त्या तुलनेत यावर्षी रब्बी हंगामात जिरायती हरभऱ्याची उच्चांक क्षेत्र राहण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात पावसाची रिप रिप सुरूच आहे. त्यामुळे जमिनीचे पुनर्भरण झाले असून जिल्ह्यातील पाणी प्रकल्पामध्ये सुद्धा पाण्याचे मोठ्या प्रमाणात संचयन झाले आहे. त्यामुळे जमिनीत आधीच आद्रता व पिकांना देण्यासाठी मुबलक पाणी असल्याने यावर्षी शेतकरी रब्बी हंगामाकडे वळताना दिसून येत आहे.
13
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Nov 07, 2025 08:36:29
1
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 07, 2025 08:33:42
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - कोरेगाव प्रकरणात जर काही चुकीचं असेल किंवा अनियमितता असेल तर कारवाई केली जाईल - मंत्री जयकुमार गोरे. जयकुमार गोरे, पालकमंत्री. ऑन वंदे मातरम. वंदे मातरम मधून देश प्रेमाची प्रेरणा मिळते. पंतप्रधान मोदी यांनी मन की बात मधून आव्हान केलं. सोलापुरातील दयानंद महाविद्यालयाने सुंदर प्रकारे वंदे मातरम गायनाचं काम केलं. महाविद्यालयातील विद्यार्थिनी चांगल्या प्रकारे भारताची प्रतिकृती तयार करून हातात तिरंगा घेऊन वंदे मातरम गायले. ऑन अबू आझमी. देशप्रेम नसलेल्या प्रवृत्ती देशात आहे त्यांच्याकडे जास्त न लक्ष देता, देशाचा समान कसा वाढेल, देशाप्रती कसं प्रेम वाढेल याकडे लक्ष दिले पाहिजे. ऑन जरांगे पाटील. यासंदर्भात कल्पना नाही मात्र काही घटना घडली असेल तर माहिती घेऊन बोलू. ऑन सुप्रिया सुळे वक्तव्य. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम करत आहेत त्यामुळे राज्यात चुकीच्या कामाला पाठबळ मिळणार नाही. या चुकीचं काम असेल तर त्यात नक्की कारवाई केली जाईल आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कोरेगाव प्रकरणात जर काही चुकीचं असेल किंवा अनियमितता असेल. तर कारवाई केली जाईल. प्रथमदर्शनी काही गोष्टी लक्षात आल्यानंतर तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं. आणखीन काही असेल तर चौकशी करून कारवाई करण्याची भूमिका मुख्यमंत्री महोदय घेतली. कोण काय म्हणते, याकडे लक्ष न देता मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून चौकशी सुरू आहे. कुणी दोष असेल त्यावर कारवाई होणार. ऑन अजित पवार राजीनामा. काही लोकांना सातत्याने राजीनामा मागायची सवय असते. या प्रकरणी पहिली चौकशी होऊ द्यावी त्यानंतर जे निष्पन्न होईल, डायरेक्ट आणि इन डायरेक्ट त्यांचा हात होता नव्हता. यावरून त्यावर निर्णय झाला पाहिजे. चौकशी न करता एखाद्याला शिक्षा देणे उचित ठरणार नाही. ऑन कोरेगाव प्रकरण ॲट्रॉसिटी. मुख्यमंत्री याबाबत चौकशीच्या आदेश दिले आहेत.. यात काय घडलं असेल तर 100 टक्के मुख्यमंत्र्यांनी कारवाईची भूमिका बजावली आहे.. ऑन दिलीप माने प्रवेश. आता फक्त ऑपरेशन लोटची सुरुवात झाली आहे.. आगे आगे देखो होता है क्या.. आपण एवढ्या लवकर निष्कर्षापर्यंत येऊ नये, ही सातत्याने चालणारी प्रोसेस आहे.. योग्य वेळी योग्य बटन दाबलं की इनफॅक्ट चांगला होतो. एकाच वेळी वेगवेगळे बटन दाबून चालणार नाही. स्थानिक लोकांना विचारात घेऊन पक्षाचा विस्तार करताना प्रत्येकालाच गोष्ट चांगली वाटते असं नाही. परंतु पक्ष वाढवत असताना किंवा पक्षाचा विस्तार होत असताना आवडणारे किंवा न आवडणारे निर्णय घ्यावे लागतात. याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, तो निर्णय मलाही मान्य करावा लागणार आहे.. तो कुणालाही मान्य करावा लागेल.. पक्षश्रेष्ठीने निर्णय घेईपर्यंत यावर बोलणं उचित होणार नाही, आपली जी भूमिका आहे ती मांडण्यासाठी पक्षाचा कार्यालय हे व्यासपीठ आहे. त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठ मुख्यमंत्री भेटतील त्या ठिकाणी आपली भूमिका मांडणी योग्य आहे. पक्ष विस्तारासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी पक्ष नेतृत्व करेल.
4
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 07, 2025 08:32:46
2
comment0
Report
SKShubham Koli
Nov 07, 2025 08:32:20
Thane, Maharashtra:बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेल्या वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला आज, ०७ नोव्हेंबर रोजी १५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने देशभरात सामुहिक वंदे मातरम् गायन करण्यात आले. ठाणे महापालिकेतही अधिकारी आणि कर्मचारी यांनी सामुहिक वंदे मातरम गायनाने या राष्ट्रीय गीताचा स्मरणोत्सव साजरा केला. सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 'वंदे मातरम् ' या गीतास दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने वर्षभराच्या कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. त्याची सुरूवात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये मुख्य सोहळ्याने झाली. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात पाहिले.
1
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 07, 2025 08:25:30
Beed, Maharashtra:परळी, बीड: थोड्याच वेळात धनंजय मुंडे यांची जगमित्र कार्यालयावर पत्रकार परिषद... मनोज जरांगे पाटील यांच्या रूपावर धनंजय मुंडे काय बोलतील याकडे राज्याचे लक्ष.... जेवणात विष देऊन आणि वाहनाने धडक देऊन माझ्या हत्येचा कट रचण्यात आला. हा कट दुसरा तिसरा कोणी नाही तर धनंजय मुंडे यांनी रचल्याचा गंभीर आरोप मराठा आंदोलन म्हणून जरांगे पाटील यांनी आज केला. पाटील यांच्या आरोपानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर मात्र परळीच्या आमदार धनंजय मुंडे हे थोड्याच वेळात आता पत्रकार परिषद घेऊन या सर्व गोष्टीवर खुलासा करणार आहेत. धनंजय मुंडे नुकतेच त्यांच्या नात्रा येथील घराकडून परळी कडे निघाले आहेत. परळी येथील जगमित्र कार्यालयावर त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे नेमकं काय बोलतील याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे..
1
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 07, 2025 08:22:23
Baramati, Maharashtra:फेसबुकवर पोलिस अधिकारी असल्याचे भासवून महिलांची फसवणूक करणारा सराईत गुन्हेगार गजाआड...भिगवण पोलिसांची कारवाई — अकलूज परिसरातून आरोपीला अटक... 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत... फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून महिलांशी ओळख करून त्यांची फसवणूक करणारा सराईत गुन्हेगार अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे...भिगवण पोलिसांनी संगणकीय विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे अकलूज परिसरातून या आरोपीला अटक केली आहे... आरोपीचे नाव गणेश शिवाजी कारंडे असे असून, तो फेसबुकवर ‘संग्राम पाटील’ आणि ‘पृथ्वीराज पाटील’ या नावाने बनावट प्रोफाइल तयार करून स्वतःला पोलिस अधिकारी म्हणून दाखवायचा आणि महिलांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेत असे...एका महिलेला व्यावसायिक मदत करण्याचे आमिष दाखवून तिच्याकडून दागिने व पैसे घेऊन फसवणूक केल्याचा आणि तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा गंभीर गुन्हा त्याच्यावर नोंदवण्यात आला आहे...भिगवण पोलिसांनी या आरोपीकडून सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्याच्यावर यापूर्वी अकलूज, मंगळवेढा, पंढरपूर आणि लोणंद पोलीस ठाण्यांमध्ये महिलांवरील अत्याचार व फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे... ही कारवाई भिगवण पोलिस ठाण्याचे पथकाने केली आहे...
3
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 07, 2025 08:21:09
Nagpur, Maharashtra:नागपूर - बाईट - चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री On जरांगे आरोप - - पोलीस तपास करतील आणि जे काही पोलिसांना मिळेल त्यांनी कारवाई केली पाहिजे, शेवटी जरांगे असं बोलले असतील तर पोलिसांनी यावर तातडीने कारवाई केली पाहिजे - मला बद्दल फार माहिती नाहीये पण ज्यांनी हे केलं असेल किंवा त्यांच्याकडे जी काही माहिती असेल त्यावर पोलीस कारवाई करतील असं मला वाटते - जरांगेंनी एवढा मोठा विस्फोट आरोप केला आहे तर पोलिसांनी तातडीने कारवाई केली पाहिजे - पोलिसांनी लक्ष दिले पाहिजे आणि तातडीने कारवाई केली पाहिजे कोण कोण आहे मागे आहेत याची चौकशी केली पाहिजे On पार्थ पवार - - अजित दादांनी जे म्हटलं ते त्यांना माहिती, पण राहिला महसूल खात्याचा प्रश्न तर महसूल खात्याने प्राथमिक अहवाल आला त्या आधारे तहसीलदार, आमचा मुद्रांक अधिकारी, मुद्रांकाचे डॉक्युमेंट्स तयार करणारे, कंपनीचा मालक असेल खरेदी विक्री करणारे असतील - नोंदणीच्या वेळी ज्यांनी सही केल्या ते पहिल्या टप्प्यात जे आम्हाला आढळला त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, आणि सखोल चौकशी केल्यावर गुन्हे दाखल होतील - आता प्राथमिक चौकशीत जे दोषी वाटले त्यावर निलंबनाची कारवाई आणि गुन्हे दाखल केले आहेत, आता चौखल चौकशी आमचा महसूल खातं करतील खारगे समितीचा रिपोर्ट आल्यावर कारवाई करणार - पुढच्या टप्प्यात समितीचा अहवाल आल्यावर कारवाई करेल - विकास खारगे यांच्या अध्यक्षतेत पाच सदासीय समिती झाली आहे आणि एक महिन्याच्या आत अहवाल सादर करेल - ज्या काही आरोप झाले त्याची सविस्तर चौकशी करून मग अंतिम निर्णय करू ऑन पार्थ पवार आरोपी नाही - - प्राथमिक चौकशीत रजिस्टर कार्यामध्ये जे लिहून घेणारे आणि लिहून देणाऱ्या पार्थ पवार नाही - लिहून घेणारे आणि देणारे, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत - अजितदादांनी स्पष्ट केला आहे त्यामुळे त्या आरोपावर पत्र करण्यापेक्षा चौकशी होऊ द्यावी चौकशीचा रिपोर्ट महिनाभरात येईल On अण्णा हजारे - - अण्णा हजारे जे बोलले आहे किंवा विरोधक जे काही बोलले आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आमच्याकडे जी प्राथमिक अहवाल आहे नंतर समितीचा रिपोर्ट आल्यावर कारवाई होईल On जय पवार - - जे बोलणारे आहेत त्यांनी आरोप सिद्ध करावे On खाते हेअरिंग - - मी महसूलमंत्री झालो तेव्हा १९१२-१३ पासून १३ हजार हेअरिंग महसूल खात्यात पेंडिंग आहेत, मी मंत्री झाल्यावर 800 हियरिंग पूर्ण केल्या आणि 700 ते 800 क्लोज फॉर ऑर्डर केले आहेत, पुढच्या तीन वर्षात महसूल खात्यातील संपूर्ण हेअरिंग संपल्या पाहिजे - आम्ही प्रत्येक जिल्ह्यात लोक अदालत घेऊन त्याच लेवलवर प्रश्न सुटला पाहिजे असे प्रयत्न आहेत On शीतल तेजवाणी - - कोणा कोणाचा काय रोल आहे प्राथमिक दृष्ट्याच आढळला त्यावर आम्ही कारवाई केली On अजितदादा - - अजितदादांनी स्पष्ट केला आहे, चौकशी समिती कोणालाही सोडणार नाही शंभर टक्के चौकशी होईल
1
comment0
Report
KPKAILAS PURI
Nov 07, 2025 08:15:53
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पुणे शहरातील आणखी एक मोठा जमीन घोटाळा समोर राज्याच्या कृषी विभागाच्या जमिनी बाबत अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल सरकारी जमिनीवर bекаयदेशीर ताबा मिळवल्यापलब्द तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह शितल तेजवानी, दिग्विजय पाटील यांच्यावर आणखी गुन्हा दाखल खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल सूर्यकांत येवले, कुलमुखत्यारधारक हेमंत गवंडे, राजेंद्र विध्वंस, ऋषिकेश विध्वंस, मंगल विध्वंस, विद्यानंद पुराणिक, जयश्री एकबोटे, शितल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल नायब तहसीलदार प्रवीणा चव्हाण यांनी केली तक्रार दाखल १२ फेब्रुवारी २०२४ ते १ जुलै २०२५ पर्यंत घडला प्रकार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चा महानगरपालिका क्षेत्रात लागू नसतानाही बोपोडी येथील ९ हेक्टर जमीन सन १८८३ पासून अॅग्रीकल्चर डिपार्टमेंट खात्याकडे म्हणजेच शासनाच्या ताब्यात व वहिवाटीत असतानाही, तसेच सदर जमीनीचे मालक व कब्जेदार सदरी अॅग्रीकल्चर डिपार्टमेंट यांचे नाव असल्याबाबत वरिष्ठांनी स्पष्ट आदेश पारित केलेले असतांनाही, सदर जमीनीचा अपहार केला या जमीनीवर व्हिजन प्रॉपर्टी तर्फे अर्जदार हेमंत गवंडे, राजेंद्र रामचंद्र विध्वंस, रुषीकेश माधव विध्वंस, मंगल माधव विध्वंस, विदयानंद अविनाश पुराणिक, जयश्री संजय एकबोटे, शितल किसनचंद तेजवाणी, दिग्विजय अमरसिंह पाटील संचालक मेसर्स अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपीचेशी हातमिळवणी व संगनमत करुन सरकारी मिळकतींवर या लोकांच्या मालकी हक्क दिसून आला. बेकायदेशीर आदेश आणि पत्र तयार करुन अशाप्रकारे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल kailas wkt+ vis
2
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 07, 2025 08:15:03
Amravati, Maharashtra:खडसेंच्या नावाने बोंबाबोंब झाल्यावर त्यांना राजीनामा द्यावा लागला मग अजितदादा का राजीनामा देत नाही; यशोमती ठाकूर यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल अँकर :– पुणे येथील जमीन घोटाळा प्रकरण झी 24 तास ने बाहेर काढल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पार्थ पवार चांगलेच अडचणी आले आहे. यावर यशोमती ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून हा सगळा मिलाजूला कार्यक्रम असल्याचा म्हटला आहे. पार्थ हे अजित पवारांचे सुपुत्र आहेत तर चॅरिटी कमिशनर हे मुख्यमंत्र्यांचे बंधू आहे. अमेडियात एक टक्का पार्टनर असणाऱ्या दिग्विजय पाटलांवर एफ आय आर होते पण 99 टक्के पार्टनर असणाऱ्या पार्थ पवारांवर एफ आय आर दाखल होत नसल्याचाही गंभीर प्रश्न यशमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. खडसेंच्या नावाने बोंबाबोंब झाल्यावर त्यांना राजीनामा द्यावा लागला मग अजितदादा का राजीनामा देत नाही. असा सवाल याच्यामध्ये ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपस्थित केला आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा हा मिलाजूला कार्यक्रम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार दोघांनीही राजीनामा द्यायला पाहिजे असेही ठाकूर म्हणाले आहे. पार्थ पवार हे अजित पवार यांचे पुत्र आहे अजितदादा यांचा संबंध का नाही? आपला मुलगा काय करतो हे अजित पवारांना माहित नाही का? शेतकऱ्यांचे हाल करायचे व पुत्राला सर्व माफ करायचं तर पार्थ पवारांचे नाव एफ आय आर मध्ये का नाही दरम्यान कमळ आणी घड्याळ यांचं लग्न झालं आहे. हे सगळे बदमाशी करत आहे हे राज्य चालवण्यासाठी करत नाही तर हे सगळं कुटुंब चालवण्यासाठी व स्वतःची मालमत्ता वाढवण्यासाठी हे लोक सत्तेत आहे असा गंभीर आरो यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
1
comment0
Report
SKShubham Koli
Nov 07, 2025 08:01:01
Thane, Maharashtra:मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी मंगळवारी होणार निर्णयाची शक्यता मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी अभियंत्यांच्या अंतरिम जामीन अर्जावर आज sunavhali पार पडली. न्यायालयाने अर्ज फेटाळला नसून मंगळवारी सर्व पुरावे तपासल्यानंतर निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे. न्यायाधीश जी. टी. पवार यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत तपास अधिकाऱ्यांना मंगळवारी सर्व पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांचा आणि रेल्वे पोलिसांचा अहवाल दोन्ही तपासले जाणार आहेत. आरोपींचे वकीل बलदेव राजपूत यांनी सांगितले की, पाच वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालात अपघाताचे कारण अतिरिक्त गर्दी असल्याचे नमूद केले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, “हा अहवाल जर आधीच पोलिसांकडे दिला असता तर एफआयआर दाखल झाला नसता.” राजपूत यांनी पुढे दावा केला की, “जीआरपीचे काम होते पायदानावरील अतिरिक्त प्रवाशांना हटवणे, परंतु त्यांनी आपले कर्तव्य बजावले नाही. त्यामुळे ही चूक जीआरपीची आहे.” तसेच, आरोपींच्या वकिलांनी हेही नमूद केले की आरोपी गेली २४ वर्षे नोकरीत असून प्रवाशांची काळजी फुलासारखी घेतात. १ नोव्हेंबर २०२५ पासून पोलिसांनी त्यांच्या मागे ससेमिरा लावल्याचा आरोपही त्यांनी केला. “त्या दिवशी सुमारे २०० गाड्या त्याच पटरीवरून धावल्या, जर काही तांत्रिक बिघाड असता तर आणखी अपघात झाले असते,” असेही वकिलांनी सांगितले. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज, छायाचित्रे आणि अपघाताचा संपूर्ण अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात आला असून, मंगळवारी या सर्व पुराव्यांच्या तपासणीनंतर न्यायालय आपला निर्णय देणार आहे.
3
comment0
Report
Advertisement
Back to top