Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

घरानेदारी के सहारे रिश्तेदारों को टिकट, नगरपालिका चुनावों में उठे सवाल

GMGANESH MOHALE
Nov 18, 2025 06:31:50
Washim, Maharashtra
वाशिम जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘घराणेशाही’चा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. सर्वच अनेक वरिष्ठ नेत्यांनी आपल्या घरातील सदस्यांनाच उमेदवारी दिल्यामुळे राजकीय वातावरण तापलय. कुठे पत्नी, कुठे सून,तर कुठे मुलगा निवडणुकीत उतरवल्यामुळे अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर मात्र अन्याय झाल्याचे चित्र दिसून येत आहे नेमकी कोणत्या नेत्यांनी आपल्या नातेवाईकांना उमेदवारी दिली आहे..
102
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ADANIRUDHA DAWALE
Nov 18, 2025 07:30:15
Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यातील धामणगाव नगरपरिषदेवर भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या बहिण अर्चना रोठे या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहे. अर्चना रोठे यांचे वडील अरुण अडसड हे आमदार होते त्यानंतर त्यांचे बंधू प्रताप अडसड हे सध्या विद्यमान आमदार आहे. 2) भाजपचे आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या पत्नी नलिनी भारसाकडे या दर्यापूर नगर परिषदेमधून नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहे. तर भारसाकडे कुटुंबातील आमदार प्रकाश भारसागडे यांचे चुलत भाऊ काँग्रेस नेते सुधाकर भारसाकडे यांच्या पत्नी मंदाबाई भारसाकडे या काँग्रेस पक्षाकडून दर्यापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणीच्या रिंगणात उभे आहे त्यामुळे ही निवडणूक जाऊ विरुद्ध जाऊ अशी होणार आहे. 3) दर्यापूर विधानसभेचे ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे हे अंजनगाव सुर्जी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 18, 2025 07:10:41
Akola, Maharashtra:राज्यभरात नगरपरिषद आणि पंचायत निवडणुकीचा धडाका सुरू झालाय… आणि नेहमीप्रमाणे प्रचारापेक्षा जास्त धामधूम घराघरातील उमेदवारांची.सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून पक्षांनी कितीही घोषणा केल्या तरी, “कुटुंब” नावाची गोष्ट राजकारणात अजूनही व्हीआयपी पास घेऊन येते हे पुन्हा सिद्ध झालंय. बाळापुरमध्ये ‘खतीब कुटुंब’ पुन्हा एंट्री..बाळापुर नगरपरिषद अध्यक्षपदासाठी वंचित बहुजन आघाडीने रजिया बेगम खतीब यांचं नाव जाहीर केलं आहे.आणि हो… या नावामागे एक महत्त्वाचा “कुटुंबीय ट्विस्ट” आहे..रजिया बेगम म्हणजे वंचितचे नेते नतिकोद्दीन खतीब यांच्या सौभाग्यवती. नतिकोद्दीन खतीब हे काँग्रेसचे माजी आमदार… नंतर वंचितमध्ये प्रवेश… आणि आता पत्नीला दुसऱ्यांदा चीफ पोस्टवर पाठिंबा.रजिया बेगम आधीही नगराध्यक्ष राहिल्यात. आता पुन्हा एकदा त्या “किस्मत की चाबी” वळवण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत.तर दुसरीकडे मुर्तीजापुरमध्ये ‘पिंपळे बंधूंचे ' राजकारण.मुर्तीजापुरचे भाजपचे विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांचे मोठे भाऊ भूपेंद्र पिंपळेही मागे नाहीत.नगरसेवक पदाकरिता तेही रिंगणात उतरले असून - होय - हेही त्यांचं दुसरं इनिंग आहे.निवडणुकांची घोषणा झाली की पक्षकार्यकर्त्यापेक्षा जास्त धावपळ होते कुटुंबातील स्पर्धकांची,राजकारणात घराणेशाही संपली म्हणतात… पण उमेदवारांच्या याद्या मात्र उलटच सांगताहेत,“राजकारण बदललंय, पण उमेदवार अजूनही घरातूनच येतो”अशी टीका सर्वसामान्यांकडून आता होत आहे.
72
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 18, 2025 07:04:06
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर|मराठवाड्यातील नेत्यांचं फॅमिली पॉलिटिक्स,छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोणत्या राजकीय नेत्यांचे नातेवाईक राजकीय रिंगणात आहेत ? अँकर : सध्या राज्यात नगर परिषद आणि नगर पालिका निवडणूकीची धामधूम पाहायला मिळत आहे.या निवडणुकीत अनेक नेत्यांचं फॅमिली पॉलीटिक्स देखील जोरात सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.अनेक नेत्यांनी आपापल्या नात्यातील उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.पाहूया कोणत्या नेत्यांचे कोणते नातेवाईक निवडणूक रिंगणात उतरले आहेत सिल्लोडमध्ये आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी चिरंजीव समीर सत्तार यांना नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरविले आहे.त्यांना शिवसेना शिंदे पक्षाने उमेदवारी दिली आहे. वैजापुरात आमदार रमेश बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. पैठणमध्ये माजी आमदार चंद्रकांत घोडके यांचा मुलगा माजी नगराध्यक्ष अनिल घोडके हे नगरसेवक पदासाठी रिंगणात आहेत. गंगापूरचे माजी आमदार कैलास पाटील यांचे चिरंजीव ऋषीकेश हे नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरले आहे.त्यामुळे नेत्यांचे फॅमिली पॉलिटिक्स सध्या निवडणुकीत पाहायला मिळत आहे. फोटो समीर सत्तार, सिल्लोड, हसरा चेहरा असलेला फोटो पांढरा शर्ट गोरा रंग संजय बोरणारे,वैजापूर, गळ्यात शिवसेनेचा रुमाल ऋषीकेश पाटील,चष्मा लावलेला दाढी असलेला तरुण अनिल घोडके,हाफ व्हाईट शर्ट, खिशात हात घातलेले
156
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 18, 2025 07:03:31
Jalna, Maharashtra:जालना : अंबड नगर परिषद में भाजप आमदार नारायण कुचे के पुतने उज्वऱ देविदास कुचे को भाजप से उम्मीदवार बनाया गया है. जालना में अंबड नगर परिषद चुनाव में बदनापूर के भाजप आमदार नारायण कुचे के पुतने उज्ज्वल देविदास कुचे को उमेदवारी दी गई है. उज्ज्वल कुचे अंबड की माजी नगराध्यक्षा संगीता कुचे के चिरंजीव हैं. इस से पहले चुनाव में भाजप ने नारायण कुचे की बहन संगीता कुचे को नगराध्यक्ष बनाया गया था. अंबड नगर परिषद की चुनावों में दिवंगत भालचंद्र कुलकर्णी के परिवार के देवयानी कुलकर्णी को अध्यक्ष पद के लिए, केदार कुलकर्णी और सविता कुलकर्णी को नगरसेवक पद के लिए, तथा माजी आमदार विलासराव खरात के चिरंजीव विश्वजीत खरात को नगरसेवक पद की उमेदवारी दी गई है. परतूर नगरपालिका चुनाव में राष्ट्रवादी कांग्रेस अजितदादा गट के माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया की पत्नी और माजी नगराध्यक्ष विमलताई जेथलिया ने नगरसेवक पद के लिए उमेदवारी दर्ज कराई है.
167
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Nov 18, 2025 07:03:13
Buldhana, Maharashtra:बुलढाणा जिल्ह्यातील आगामी नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि शिवसेना(शिंदे गट) आमदारांनी कार्यकर्त्यांच्या निष्ठेपेक्षा आणि मेहनतीपेक्षा 'बायको प्रेम' जास्त महत्त्वाचे असल्याचे दाखवून दिले आहे. या निवडणुकीचे सर्वात मनोरंजक आणि कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे चित्र बुलढाणा शहरात पाहायला मिळत आहे. भाजपचे माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी स्वतःच्य पत्नी अर्पिता शिंदे यांना उमेदवारी देऊन कार्यकर्त्यांना सरळ संदेश दिला आहे की, 'तुम्ही केवळ झेंडे घेऊन फिरा, खुर्चीवर बसण्याचे काम घरच्यांचे आहे.' विशेष म्हणजे, या शिंदे यांच्या विरोधात शिवसेना(शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनीदेखील निष्ठेने काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून स्वतःच्य पत्नी पूजा गायकवाड यांनाच रिंगणात उतरवले आहे. या 'पती-निष्ठा' स्पर्धेत दोन्ही पक्षांचे नेते विजयी झाले असले तरी, कार्यकर्ते मात्र 'पायघड्या' आणि 'भांडवल' म्हणून वापरले गेल्याची भावना तीव्र आहे. आता बुलढाण्यात 'बायको विरुद्ध बायको' अशी लढत होत असताना, 'कार्यकर्त्याची बायको' आणि 'नेत्याची बायको' यांच्यातील फरक जिल्ह्यातील सामान्य कार्यकर्त्यांना स्पष्टपणे कळून चुकला आहे.. तर जिल्ह्यातील खामगाव येथे देखील हाच 'परिवार प्रथम' नियम पाळला गेला आहे. मंत्री आकाश फुंडकर यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि इच्छुकांना वाटाण्याच्या अक्षता लावून मोठे बंधू सागर फुंडकर यांच्या पत्नीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवून दिली आहे. मंत्र्यांनी 'घरचा आहेर' देत सत्तेची खुर्ची कुटुंबातच कशी राहील याची दक्षता घेतल्याने, भाजपमध्ये आता मंत्री फुंडकर यांचे कार्यालय आणि त्यांचे निवासस्थान यात कोणताही फरक उरलेला नाही, अशी चर्चा रंगू लागली आहे
134
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 18, 2025 07:02:47
Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यातील फलटण येथील माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या दरम्यानचा वाद फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत समोर आला आहे. या दोघांनीही आपल्या नातेवाईकांच या नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरले आहे. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या चिरंजीव अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून फलटण नगराध्यक्ष पदा साठी उमेदवारी अर्ज भरला आहे तर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण नगराध्यक्ष पदा साठी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे फलटण नगरपालिका निवडणुकीत चांगलीच चुरस पहायला मिळणार आहे.
154
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 18, 2025 06:49:33
Shirur, Maharashtra:शिक्रापुर, शिरूर तालुक़े में एक चार पैर वाली मुर्गी देखने को मिली, जिसके कारण पूरे इलाके में हैरानी का माहौल बन गया है। सिकंदर शेख के चिकन व्यवसाय के बारे में बताया गया है कि उनकी दुकान पर हर सुबह बॉयलर नस्ल की कुकड़ियाँ बिकती हैं और आज सुबह उन्होंने एक चार पैर वाली मुर्गी देखी जिसके कारण लोग तहलका मचा बैठे। सिकंदर शेख ने कहा कि उन्होंने पहली बार ऐसी चार पैर वाली मुर्गी देखी है और लोग इसे देखने के लिए भीड़ लगा रहे हैं... इसके बाद कहा गया कि वे इस मुर्गी का पालन करेंगे और काटने के लिए नहीं, बल्कि एक आश्चर्य के तौर पर इसका पालन करेंगे। खास बात यह है कि मुर्गी का पूरा विकास हो चुका है और चारों पैर अलग-अलग नखाओं से जुड़े दिख रहे हैं, जिससे एक जन्मजात जनुकीय बदलाव की संभावना बताई जा रही है। सेवानिवृत्त सहायक पशुवैज्ञानिक आयुक्त राजेंद्र त्र्यंबके ने कहा कि यह पॉलिमेलिया नामक जन्मजात स्थिति हो सकती है। प्रत्यक्षदर्शी और स्थानीय लोग इस पर चर्चा कर रहे हैं, लेकिन फिलहाल चार पैर वाली मुर्गी क्षेत्र में चर्चा का विषय बनी हुई है।
92
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 18, 2025 06:45:41
Navi Mumbai, Maharashtra:वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारा विरोधातील याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटकर यांनी दाखल केली होती जनता दरबार विरोधात जनहित याचिका. स्वतःचा पालघर जिल्हा सोडून ठाणे मीराभायंदर आणि नवी मुंबईत घेत असलेल्या जनता दरबाराला शिवसेना शिंदे गटाचा विरोध. वनमंत्री गणेश नाईक शासकीय यंत्रणेला वेठीस धरतात, इतर खात्यात ढवळाढवळ करतात असवा आरोप याचिकेत करण्यात आलेला. याचिके वरून शिवसेना शिंदे गटा विरोधात नवी मुंबईकरांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे चित्र. जनता दरबाराला मिळणारा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून ही याचिका केली असून न्यायालय याचिकाकर्त्यांना खडेबोल सुनावेल असा भाजपाला विश्वास. आज काय सुनावणी होते हे पाहणे महत्वाचे.
105
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 18, 2025 06:33:53
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:नगरपरिषद निवडणुकीत माजी मंत्री व माजी आमदारांच्या मुलांना उमेदवारी देण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातल्या नगरपरिषदा निवडणुकांमध्ये माजी मंत्री व माजी आमदारांच्या सुपुत्रांना उमेदवारी देण्यात आली आहे. उरुण ईश्वरपूर आणि आष्टा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. ईश्वरपूर नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र विश्वनाथ डांगे यांना महायुतीमधून भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याच बरोबर आष्टा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी आमदारांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार स्वर्गीय विलासराव शिंदे यांचे सुपुत्र विशाल शिंदे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिरळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये देखील माजी आमदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे नातेवाईक असणारे अभिजीत नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अभिजीत नाईक माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या चुलत भावाचे पुत्र लागतात. विशेष म्हणजे याच नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये मानसिंगराव नाईक यांचेच सख्खे चुलत बंधू भगतसिंग नाईक यांचे सुपुत्र पृथ्वीसिंग नाईक हे महायुतीतील शिवसेना शिंदे पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. त्यामुळे या ठिकाणी काका-पुतणा मध्ये लढत होणार आहे.
185
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Nov 18, 2025 06:04:38
Virar, Maharashtra:झाडू मारताच निघतेय डांबर, खडीपालिकेचे पॅच वर्कचे काम निकृष्ट दर्जाचे नागरिकांमध्ये संतापाची लाट उशिरा काम सुरू केले तरी कामाचा दर्जा नाही अँकर - वसई विरार महानगर पालिकेने यंदाच्या पावसाळ्यानंतर पहिल्यांदाच खड्डेमय रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे उशिरा सुरू केली असली, तरी या कामांच्या दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विरार पूर्व येथील जीवदानी रोडवर रात्री उशिरा पॅच वर्क करण्यात आले. मात्र रात्रीच्या अंधारात केले जाणारे हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. पॅच वर्कसाठी टाकलेले डांबर झाडू मारताच निघत असून, अशा कामाचा टिकाव किती राहील, याबाबत शंका व्यक्त होत आहे. जनतेच्या पैशातून होणाऱ्या या दुरुस्ती कामांमध्ये गुणवत्ता नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पावसाळ्यात खड्ड्यांनी त्रस्त झालेल्या परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती तातडीची असली, तरी पालिकाेच्या अशा निकृष्ट कामपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.पालिका प्रशासनाकडून या तक्रारींवर कोणती कारवाई केली जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
126
comment0
Report
Advertisement
Back to top