Back
बुलढाणा नगरपालिका चुनाव: पती-निष्ठा की होड़ में नेताओं की पत्नियाँ मैदान में
MNMAYUR NIKAM
Nov 18, 2025 07:03:13
Buldhana, Maharashtra
बुलढाणा जिल्ह्यातील आगामी नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि शिवसेना(शिंदे गट) आमदारांनी कार्यकर्त्यांच्या निष्ठेपेक्षा आणि मेहनतीपेक्षा 'बायको प्रेम' जास्त महत्त्वाचे असल्याचे दाखवून दिले आहे. या निवडणुकीचे सर्वात मनोरंजक आणि कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे चित्र बुलढाणा शहरात पाहायला मिळत आहे. भाजपचे माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी स्वतःच्य पत्नी अर्पिता शिंदे यांना उमेदवारी देऊन कार्यकर्त्यांना सरळ संदेश दिला आहे की, 'तुम्ही केवळ झेंडे घेऊन फिरा, खुर्चीवर बसण्याचे काम घरच्यांचे आहे.' विशेष म्हणजे, या शिंदे यांच्या विरोधात शिवसेना(शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनीदेखील निष्ठेने काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून स्वतःच्य पत्नी पूजा गायकवाड यांनाच रिंगणात उतरवले आहे.
या 'पती-निष्ठा' स्पर्धेत दोन्ही पक्षांचे नेते विजयी झाले असले तरी, कार्यकर्ते मात्र 'पायघड्या' आणि 'भांडवल' म्हणून वापरले गेल्याची भावना तीव्र आहे. आता बुलढाण्यात 'बायको विरुद्ध बायको' अशी लढत होत असताना, 'कार्यकर्त्याची बायको' आणि 'नेत्याची बायको' यांच्यातील फरक जिल्ह्यातील सामान्य कार्यकर्त्यांना स्पष्टपणे कळून चुकला आहे.. तर जिल्ह्यातील खामगाव येथे देखील हाच 'परिवार प्रथम' नियम पाळला गेला आहे. मंत्री आकाश फुंडकर यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि इच्छुकांना वाटाण्याच्या अक्षता लावून मोठे बंधू सागर फुंडकर यांच्या पत्नीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवून दिली आहे. मंत्र्यांनी 'घरचा आहेर' देत सत्तेची खुर्ची कुटुंबातच कशी राहील याची दक्षता घेतल्याने, भाजपमध्ये आता मंत्री फुंडकर यांचे कार्यालय आणि त्यांचे निवासस्थान यात कोणताही फरक उरलेला नाही, अशी चर्चा रंगू लागली आहे
157
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
APAMOL PEDNEKAR
FollowNov 18, 2025 08:18:5935
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 18, 2025 08:17:14105
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 18, 2025 08:16:2546
Report
AKAMAR KANE
FollowNov 18, 2025 08:02:2074
Report
JMJAVED MULANI
FollowNov 18, 2025 08:02:0981
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 18, 2025 08:01:4634
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 18, 2025 08:01:2699
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 18, 2025 07:30:3247
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 18, 2025 07:30:1579
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 18, 2025 07:11:12Navi Mumbai, Maharashtra:सीएनजी च्या तुटवड्याचा फटका प्रवाशांना ही बसतो आहे. रिक्षा स्टेंड वर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची रांग पाहायला मिळत आहे. कुर्ला रेल्वे स्थानकाच्या बाहेर ही अशीच स्थिती आहे.
82
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 18, 2025 07:10:41160
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 18, 2025 07:04:06157
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 18, 2025 07:03:31167
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 18, 2025 07:02:47154
Report