Back
नगर परिषद चुनाव: पूर्व मंत्री व पूर्व सांसद के बच्चों को उम्मीदवार घोषित
SMSarfaraj Musa
Nov 18, 2025 06:33:53
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
नगरपरिषद निवडणुकीत माजी मंत्री व माजी आमदारांच्या मुलांना उमेदवारी देण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातल्या नगरपरिषदा निवडणुकांमध्ये माजी मंत्री व माजी आमदारांच्या सुपुत्रांना उमेदवारी देण्यात आली आहे. उरुण ईश्वरपूर आणि आष्टा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. ईश्वरपूर नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र विश्वनाथ डांगे यांना महायुतीमधून भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याच बरोबर आष्टा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी आमदारांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार स्वर्गीय विलासराव शिंदे यांचे सुपुत्र विशाल शिंदे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिरळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये देखील माजी आमदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे नातेवाईक असणारे अभिजीत नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अभिजीत नाईक माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या चुलत भावाचे पुत्र लागतात. विशेष म्हणजे याच नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये मानसिंगराव नाईक यांचेच सख्खे चुलत बंधू भगतसिंग नाईक यांचे सुपुत्र पृथ्वीसिंग नाईक हे महायुतीतील शिवसेना शिंदे पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. त्यामुळे या ठिकाणी काका-पुतणा मध्ये लढत होणार आहे.
185
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowNov 18, 2025 07:30:320
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 18, 2025 07:30:150
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 18, 2025 07:11:12Navi Mumbai, Maharashtra:सीएनजी च्या तुटवड्याचा फटका प्रवाशांना ही बसतो आहे. रिक्षा स्टेंड वर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची रांग पाहायला मिळत आहे. कुर्ला रेल्वे स्थानकाच्या बाहेर ही अशीच स्थिती आहे.
80
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 18, 2025 07:10:4172
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 18, 2025 07:04:06156
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 18, 2025 07:03:31167
Report
MNMAYUR NIKAM
FollowNov 18, 2025 07:03:13134
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 18, 2025 07:02:47154
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 18, 2025 06:49:3392
Report
SNSWATI NAIK
FollowNov 18, 2025 06:45:41105
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 18, 2025 06:34:49150
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 18, 2025 06:31:50102
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 18, 2025 06:04:38126
Report
SNSWATI NAIK
FollowNov 18, 2025 06:04:17136
Report