Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशीम में भाजपा कोर कमिटी की बैठक, सीट-वार रणनीति पर चर्चा

GMGANESH MOHALE
Nov 13, 2025 11:29:00
Washim, Maharashtra
वाशिम: वाशिम जिल्ह्यातील एक नगरपंचायत आणि चार नगर परिषदेच्या निवडणुकासाठी भाजपकडून पक्षांतर्गत हालचालांना वेग आला आहे.स्थानिक नेत्यांची सलग बैठकांची मालिका सुरू असून,आज जिल्हा वाशिम येथे कोर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत जिल्ह्यातील विविध ठिकाणी निवडणूक लढवण्याच्या रणनीतीवर चर्चा झाली.काही ठिकाणी युतीतून, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण स्वरूपात तर काही ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रभारी खासदार अनुप धोत्रे यांनी दिली.धोत्रे यांनी सांगितले की,भाजपमधील कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची मोठी इच्छा आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळावी असं सर्वांनाच वाटत असलं तरी, युती व्हावी यासाठी पक्ष आग्रही आहे.वाशिम नगरपालिकेसाठी भाजप स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चांनाही यावेळी उधाण आलं आहे.त्यामुळे वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीत युती होते की भाजप एकट्याने मैदानात उतरणार हे पाहणं आता राजकीय वर्तुळात उत्सुकतेचं ठरणार आहे.या बैठकीला भाजप जिल्हाध्यक्ष चिंतामण चितलागे, खासदार अनुप धोत्रे, जिल्हा निवडणूक प्रमुख राजू पाटील राजे, माजी आमदार विजयराव जाधव, पुरुषोत्तम राजगुरू तसेच कोर कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Nov 13, 2025 13:17:13
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : मोहोळ नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांची एकमेकांवर टीका शरद पवार गटाचे माजी आमदार रमेश कदम यांची शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्यावर सडकून टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ खासदार आहेत त्यामुळे त्या पक्षाला कोणाची बी टीम म्हणणाऱ्या त्या मूर्खाच्या बुद्धीची कीव करायला पाहिजे तर विधानसभेवेळी माजी आमदार रमेश कदम यांनी कोणाचे काम केले हे मोहोळच्या जनतेला माहिती लोकसभेवेळी मोहिते पाटील आणि रमेश कदम हे अनगरकरांकडे राम सातपुते यांना पाडण्यासाठी जात होते - त्यामुळे माजी आमदार रमेश कदम हे राजन पाटील यांची बी टीम आहेत बारसकर ऑन अल्पसंख्यांक समाजाला दम: माजी आमदार रमेश कदम यांच्या आरोपांमध्ये तथ्य आहे. काही प्रस्थापित नेते अल्पसंख्यांक समाजाला धमकावत आहेत अल्पसंख्याक समाजाने इतर कोणत्याही पक्षातून निवडणूकीला उभे राहू नये म्हणून त्यांना दम दिला जात आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 13, 2025 12:59:30
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 13, 2025 12:54:36
Akola, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अकोला दौऱ्यात एक वेगळीच घटना घडली. शेतकरी संवाद कार्यक्रमादरम्यान अकोल्यातील एका तरुणाने “माझं लग्न करून द्या” अशी मागणी करत थेट पवार साहेबांना एक भावनिक पत्र दिलं. या पत्रात या युवकाने आपली व्यथा मांडली आहे: “मी वयाने मोठा झालो, पर अजून लग्न जमत नाही. कोणी बघत नाही, समजून घेत नाही. साहेब, तुम्ही काहीतरी करा.” दुसरीकडे या युवकाच्या एकटेपणाची भावना अनेकांच्या मनाला स्पर्शून गेली. या घटनेनंतर एकच प्रश्न सर्वांना पडला — “हा युवक कोण?” तर हा युवक अकोल्यातीलच असून, त्याने आपल्या आयुष्यातील एक अनोखा प्रसंग निर्माण केला आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 13, 2025 12:44:21
Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - आईकडून दुजाभावची वागणूक मिळत असल्याचा आरोप करत सोलापुरात वकिलाची गळफास घेत आत्महत्या - सोलापुरात वकिलाने बेडरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार. - आईकडून दुजाभावाची वागणूक देत असल्यामुळे आत्महत्या करत असल्याची मिळाली चिट्टी - सोलापुरातील सागर श्रीकांत मंद्रूपकर असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव - सागर मंद्रूपकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याचं पोलिसांच्या तपासात आलं समोर - सागरने आपल्य संदर्भात चिट्टी लिहिताना सांगितलं, 'आईकडून होणारा सततचा दुजाभाव यामुळे मी आत्महत्या करत आहे. - माझ्या आत्महत्येला ती जबाबदार, माझ्या मृत्यूनंतर तिला कडक शिक्षा करा, ही नम्र विनंती' असल्याचे दोन पानाची चिट्ठी लिहली. - सागर आणि त्याचे आईचे मंगळवारी रात्री भांडण झाले होते. - सागर यांचे वडील सरकारी नोकरदार तर बहिण विवाहित आहे. - सोलापुरातील सिव्हील पोलीस चौकी येथे नोंद करण्यात आली आहे. - विजापूर नाका पोलीस पुढील तपास करत आहेत.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Nov 13, 2025 12:05:33
Parbhani, Maharashtra:अँकर- हिंगोलीच्या वसमत येथील बस स्थानकातील डीझेल पंपावर बसमध्ये डीझेल भरतांना अचानक आग लागल्याची घटना घडलीय,यामध्ये काळे नामक हेल्पर गंभीर भाजल्या असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना नांदेड येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. एका बस मध्ये डीझेल भरण्यासाठी नोजल बसच्या टॅंकमध्ये टाकले असता नोजल मधून डीझेल ऐवजी आगीचे लोट पसरल्याची माहिती आहे, तेथील कर्मचाऱ्यांनी सिस फायरच्या सिलेंडरव्दारे आग आटोक्यात आणत जखमी महिलेला तातकाळ रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी विभागाचे विभाग नियंत्रक डी एस डफले यांनी दिलीय, तेथील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून सदर डीझेल पंप कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे...
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 13, 2025 11:58:19
Nanded, Maharashtra:पाणी सोडल्यामुळे प्रवाह वाढला और नदीतून जाणाऱ्या 5 महिलाएं और 2 बच्चों पाणी के प्रवाह में फंस गए हैं। उन्होंने एक खड्क पर एक साथ पकड़ बनाए रखी और सुरक्षित रहने की कोशिश कर रहे हैं। यह घटना नांदेड जिले के प्रसिद्ध पर्यटन स्थल सहस्त्रकुण्ड के पास की है। यवतमाल जिले की इन महिलाओं को कपास की बिक्री के लिए तेलंगाना के आदिलाबाद जाना था, वे रेल से इस्लापुर पहुँची थीं। पैनगंगा नदी के सहस्त्रकुण्ड धबध्बे पर पानी कम हो जाने से नदी पार करने का प्रयास कर रहीं थीं, लेकिन इसापूर ध قب से पानी छोड़ा गया और वे उसके प्रभाव में आ गईं। सभी एक दूसरे के हाथ थामकर एक खदान पर खड़े होकर बचने की कोशिश कर रहे हैं। स्थानीय मछुआरे उन्हें बचाने का प्रयास कर रहे हैं। प्रशासन को सूचना मिली है और इन महिलाओं को सुरक्षित निकालने के लिए प्रयास जारी हैं.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 13, 2025 11:56:01
Ambernath, Maharashtra:बदलापूरात आठ पक्षांची महाविकास आघाडी जागावाटपात बहुजन मुक्ती पार्टी वरचढ नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा निर्णय गुलदस्त्यात बदलापूर नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 17 नोव्हेंबर ही अखेरची तारीख आहे. शिवसेना-भाजपने अद्याप आपले उमेदवार जाहिर केलेले नाही. मात्र महाविकास आघाडीने आठ पक्षांची मोट बांधत 45 जागांचं वाटप गेलंय. शिवसेना आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या वाट्याला प्रत्येक 11 जागा आल्या असून, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 6, काँग्रेसला 5 तर मनसेला 3 जागा देण्यात आल्या आहेत. वंचितला 5, आपला 2 आणि आरपीआय आर के गटाला 1 जागा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे बहुजन मुक्ती पार्टीला स्वत:चं चिन्ह नसतानाही काँग्रेस, राष्ट्रवादीपेक्षा दुपट्टीने जागा देण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. मविआनं बहुजन मुक्तीला 11 जागा देत शिवसेना-भाजपला मोकळं रान करून दिलंय का अशीही चर्चा बदलापूरच्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसतीय.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 13, 2025 11:32:11
Chendhare, Alibag, Maharashtra:रायगढ़ में महायुती के टूटने के संकेत सामने आते हैं। मंत्री भरत गोगावले के होम ग्राउंड महाड नगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र आल्यात। शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात दोन्ही पक्षांनी युती केली असून जागावाटपही जाहीर झाले: १५ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला आणि ५ जागा भाजपला. नगराध्यक्षपदाची लढत कोण लढवणार, याची घोषणा सुनील तटकरे करणार आहेत. अँकरने सांगितले की रायगड जिल्ह्यात नगर पालिका निवडणुकांसाठी युती आघाड्यांची चाचपणी सुरू असतानाच ही घोषणा झाली आहे. महाड नगरपालिकेची निवडणूक शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र आल्यामुळे महायुतीच्या फुटीचा नारळ महाडमध्ये फुटला आहे. माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी या बद्दलची घोषणा केली. समाजातील शिंदे गटाला बाजूला ठेवून जागावाटप जाहीर झाले.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 13, 2025 11:29:32
Nashik, Maharashtra:नाशिकच्या कुंभमेळ्याची चर्चा होणार मागील कुंभाची दखल जगाने घेतली अमेरिकेने आपल्या क्रावूड मॅनेजमेंटबाबत चर्चा केली यावेळेसचा कुंभ वेगळा असणार आहे प्रयागराजला खूप गर्दी झाली रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली तिथं लोकं मृत्युमुखी पडले ही वस्तुस्थिती पण आपल्याकडे परिस्थिती वेगळी जागा कमी आहे कुणालाही दुखापत होणार नाही, मृत्यू होणार नाही याची काळजी घ्यायची आहे यासाठी अधिकारी रात्रीचा दिवस करत आहे कामाचा धडाका सुरू आहे मनपाच्या आयुक्त महिला आहे महिला असल्यानं झपाट्याने काम करत आहे त्यांना भान राहील नाही, जेवण करत नाही अतिशय वेगाने काम सुरू आहे कुठेही गुंडगिरी चालणार नाही आता पोलिसांच्या कामगिरीवर समाधानी आहात की नाही मुख्यमंत्री यांनी ताकीद दिली त्यामुळे कारवाई झाली काही लोकं तर पळून गेले खाते श्याम, जम्मूला निघून गेले आम्ही गुंडगिरी खपून घेणार नाही सगळ्या अधिकाऱ्यांचे स्वागत करतो टुरिझम कसे वाढेल यादृष्टीने प्रयत्न करायला हवे साधू संतही उपस्थित आहे कुंभात सगळ्यांनी सहभागी व्हावे येणाऱ्या प्रत्येक भाविकांचे स्वागत करायचे आहेत सगळ्यांनी सज्ज व्हावे
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 13, 2025 11:29:18
Nashik, Maharashtra:नाशिक @ देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री भाषण मुद्दे - - आज अतिशय आनंदाची गोष्ट - कुंभाची विविध विकासकामांचे भूमिपूजन - 75 वर्षानंतर त्रिखंड योग जुळून आला - कुंभाचे पर्व 28 महिने चालणार आहे - 40 ते 42 पर्व स्नान आणि अमृत स्नान होणात आहे - 2 ऑगस्ट 2027 ला पहिले अमृतस्नान होणार - प्रयागराज ला सांस्कृतिक जागरण मोहीम चालू झाली - जगातला आस्थेचा कुंभ प्रयाग राज ला झाला - तिथं गंगेत लोकांनी स्नान केले - नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कुंभ पवित्र मानला जातो - गोदावरी मध्ये स्नान करण्याकरिता मोठ्या प्रमाणात भाविक येतात - प्रयाग राज ला 15 हजार हेक्टर जागा - आपल्याकडे 500 एकर जागा आहे - कमी जागेत आपल्याला व्यवस्थापन करावे लागते - मागील कुंभात काहीही आपत्ती आली नाही - प्रयागराजच्या कुंभपेक्षा पाच पट भाविक येणार - व्यवस्था, सुरक्षा, स्नान व्यवस्थित झाले पाहिजे - कुंभ साधू महंत चालवतात - शासन व्यवस्था करते - आपण खूप मोठी कामे हातात घेतली - केंद्र आणि राज्य सरकार मिळून 6 हजार कोटींपेक्षा अधिकची कामे आज सुरू - 20 हजार कोटींची कामे मंजूर - सगळ्यांनी समनव्यातुन कार्य केले - म्हणून आज मोठ्या प्रमाणात काम करू शकतो - नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या जनतेने मदत केली - रामकालपथ करण्यासाठी लोकं विस्थापित होतील - आमदार राहुल ढिकले यांचे अभिनंदन - त्यांनी पुढाकार घेतला - आम्ही सगळ्यांनी निधीची कमतरता कमी पुढे द्यायची नाही हे ठरविले आहे - रस्त्यांची दुरुस्ती करत आहोत - पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतो - गोदावरी स्वच्छ असली पाहिजे - गोदावरीत स्वच्छ पाणी जाईल असे नियोजन आपण करत आहोत - मंदिरांचे पुनर्निर्मिती करतो आहोत - जुन्या पद्धतीनेच काम केलं जाईल - प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांचे वास्तव्य राहिले आहे - हनुमान जन्मस्थान आहे - त्र्यंबकेश्वरला ज्योतिर्लिंग आहे - कामे करतांना 25 वर्षे काम राहिली पाहिजे - पर्यटन आणि तीर्थस्थान डेव्हलप झाले पाहिजे - जिल्ह्यात काय काय करतोय हे सांगायला लागलो तर जिल्हाधिकारी माईक हातात घेतील - आता सध्या त्यांना अधिकार आहे - आपण रिगरोड करत आहोत - कनेक्टिव्हिटी यानिमित्ताने तयार होणार आहे - एअरपोर्ट, रेल्वेस्टेशन, बसस्टँड करत आहोत - आधुनिक नाशिक आपण तयार करणार आहोत - साधुग्रामची जागा टप्याटप्याने भूसंपादन करणार - 1200 एकर जागा आपल्याला घ्यायची आहे - नाशिकची मदत आम्हाला मिळेल - काही लोकांना त्रास होईल - समाजासाठी त्रास सहन करा - कुणाचेही नुकसान होऊ देणार नाही - माध्यमांनी आम्हाला सहकार्य केले पाहिजे - टेंडरच्या बातम्या जास्त लावतात - ज्याला काम मिळाले नाही तो बातम्या देतो - सगळे कामे चांगले होतील - अधिकारी कामे पारदर्शकता ठेऊन होतील - नेत्यांनी आणि पत्रकारांनी या भानगडीत पडू नये - सगळ्यात मोठी जिल्हा परिषदेची इमारत आपल्याला मिळाली आहे - सुंदर इमारत झाली कामेही सुंदर होतील - लोकाभिमुख कामे झाली पाहीजे - सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करतो - श्रीरामाने आम्हाला आशीर्वाद द्यावे - साधू महंतांनी आमच्या चुका पोटात घाला - चूक सांगा आम्ही ती सुधारू - तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहुद्या
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 13, 2025 11:28:18
Nashik, Maharashtra:नाशिक @ एकनाथ शिंदे भाषण मुद्दे - - विविध विकास कामांचे लोकार्पण करू आलो - कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकचा चेहरा मोहरा बदलणार - नियोजन पद्धतीने विकास होणार - अतिशय उत्तम तयारी होती आहे - पवित्र क्षेत्रात संत महंत यांची पाऊलं उमटताना - नाशिक नगरी श्रीराम, महादेवाच्या जयघोषात दुमदुमून जाणार - महान मंगल कार्यालयाचा सोहळा होईल - जागतिक अध्यात्मिक नकाशावर नेणारा कुंभमेळा ठरेल - नियोजनबद्ध पद्धतीने कुंभमेळा झाला पाहिजे - सुंदर, स्वच्छ आणि आधुनिक शहर करायचे आहेत - साधू महंतांचे नियोजन उत्तम असल्या पाहिजे - दर्जेदार सुविधा असल्या पाहिजे - यासाठी शासन कटिबद्ध राहील - नियोजनात प्रत्येकाचा कस लागणार आहे - कोट्यवधी लोकं इथं येणार आहे - नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा करतांना शासन आणि अधिकारी यांची परीक्षा होणार आहे - ३१ ऑक्टोबरला २०२६ ध्वजारोहण होणार - एकच वर्ष राहिले आहे - २२ महिने हा कुंभमेळा चालणार आहे - केलेल्या सुविधा फार काळ टिकणार आहे - गोदावरीला नाशिकमध्ये गंगा म्हंटल जातं - विकासाची गंगा सुद्धा आज प्रकटली आहे - पाऊणशे वर्षांनंतर अमृतक्षण आला आहे - अनुभवी अधिकारी आहेत - 1400 एकरवर साधुग्राम होणार आहे - त्यालाही वेग द्यायचा आहे - स्वच्छतेला महत्व द्यायचे आहे - मोबाईल टॉयलेटचे नियोजन होते आहे - टीम म्हणून काम करायचे आहे - कुंभमेळा नाशिकची शान आहे - खोट्या बातम्यावर कंट्रोल करता आले पाहिजे - अफवा निर्माण होता कामा नये - कुंभाची पर्वणी महान सोहळा आहे - सगळ्यांनी सज्ज राहावे - पाहुण्यांचा पाहुणचार व्यवस्थित झाला पाहिजे - गल्लीबोळात असलेली जागा मोठी करत आहोत - श्रीरामाचे आशीर्वाद आपल्यासोबत आहे - आमदार, खासदार यांनी सामूहिक जबाबदारी आहे - दृष्ट लागेल असा सोहळा होईल - तसे नियोजन होते आहे
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 13, 2025 10:55:30
Jalna, Maharashtra:जालना : ब्रेकिंग जिल्हाप्रमुख अंबेकरांची शिवसेना उबाठाला सोडचिठ्ठी, उध्दव ठाकरेंनी फोनवरुन साधला जालन्यातील शिवसैनिकांशी संवाद जिल्हाप्रमुख सोडून गेले मात्र संघटनेला कुठेही धक्का लागलेला नाही शिवसेना उबाठाचे नेते अंबादास दानवे यांचा दावा दानवेंनी घेतली पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर शिवसेनेत गेल्याने घेतली बैठक संघटनेत कुणीही उपरा नसतो स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक लढवण्यासाठी महाविकास आघाडीत निवडणूक लढवण्यास आमचं प्राधान्य-दानवे सत्तेतील तिन्हीही पक्ष सोडून आमची दारं सगळ्यांसाठी स्थानिक पातळीवर सर्वांसाठी खुली आहेत अँकर :जालन्यातील शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय.त्यानंतर आज विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज जालन्यात येऊन शिवसेना उबाठाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची बैठक घेतली.या वेळी दानवे यांच्या फोनवरुन पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला."तुम्ही सगळे ठाम आहात का.?ते गेले तर गेले.आपण सगळे सोबत आहोत.आपल्याला निवडणूक लढवायची असून आपणच जिंकणार आहोत काळजी करू नका" असा मंत्र यावेळी फोनवरून ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला. जिल्हाप्रमुख सोडुन गेल्यानं संघटनेला कोणताही धक्का लागला नसल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला.तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक लढवण्यासाठी महाविकास आघाडीतच निवडणूक लढवण्यास आमचं प्राधान्य आहे.मात्र सत्तेतील तिन्हीही पक्ष सोडून आमची दारं सगळ्यांसाठी स्थानिक पातळीवर सर्वांसाठी खुली आहेत असंही दानवे यावेळी म्हणाले. बाईट : अंबादास दानवे, नेते शिवसेना उबाठा पक्ष
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 13, 2025 10:48:34
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर : नगरपरिषद और नगरपंचायतींच्या रणधुमाळीला जोर आला असून,10 नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.अवघे चार दिवस शिल्लक असताना इच्छुक उमेदवार नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी करत आहेत.युती किंवा आघाडीचे चित्र स्पष्ट नसल्याने अनेकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मार्ग स्वीकारला आहे.आज वाशिम नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 13 मधून राजू वानखेडे यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे, त्यांनी अनामत रक्कम म्हणून चक्क 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये आणि 10 नाण्यांच्या स्वरूपात रक्कम सादर केली.त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांची या अनोख्या पद्धतीमुळे थोडीशी दमछाक झाली.माझ्या मुलींनी जमा केलेले पैसे मी उमेदवारी अर्जासाठी अनामत रक्कम म्हणून भरले आहेत.त्यांच्या या अनोख्या कृतीमुळे अर्ज दाखल करताना उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.माझ्या मुलींनी जमा केलेले पैसे मी उमेदवारी अर्जासाठी अनामत रक्कम म्हणून भरले असल्याचे वानखेडे यांनी सांगितले. बाईट: राजू वानखेडे,उमेदवार
83
comment0
Report
Advertisement
Back to top