Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Wardha442001

वर्धा एक्सप्लोसिव कंपनी में चार सौ कर्मियों ने रात भर किया प्रदर्शन

MAMILIND ANDE
Mar 15, 2026 10:39:24
Wardha, Maharashtra
वर्धा वर्ध्याच्या एक्सप्लोजीव्ह कंपनीत कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला. जवळपास चारशे च्या जवळपास महिला व पुरुष कामगारांनी रात्रभर कंपनीत ठिय्या धरला. काम बंद करत कंपनीतच मांडला ठिय्या, पुरुष व महिला कामगार गेटवरच गेले झोपी. अर्धे कामगार गेट बाहेर तर अर्ध्या कामगारांनी गेटच्या आत ठिय्या दिला. आंदोलन अजूनही सुरूच. विविध मागण्यांसाठी कंपनीच्या विरोधात प्रहार कामगार संघटनेचा एल्गार. घटनास्थळी तळेगांव पोलीसांचा ताफा दाखल. रात्रीपासूनचे आंदोलन अजूनही सुरूच.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
Mar 15, 2026 11:32:52
Bhandara, Maharashtra:पवनीत सिलेंडरवर चालणाऱ्या ओमनी वॅनला अचानक आग लगली; नागरिकांच्या प्रयत्नांनी अनर्थ टळला. भंडारा जिल्ह्यातील पवनी शहरातील गांधी चौकात रविवारी दुपारी सिलेंडरवर चालणाऱ्या एका ओमनी वॅनला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. आग वेगाने पसरत असताना नागरिकांनी तत्परता दाखवत पाणी व अन्य साधनांच्या मदतीने अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अवैधरित्या गॅस सिलेंडरवर चालवली जाणारी वाहने किती धोकादायक ठरू शकतात, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
55
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 15, 2026 11:19:57
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार जवळपास निश्चित सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार जवळपास निश्चित सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी दिपक वैद्य यांचे नाव जवळपास निश्चित झालेय दिपक वैद्य हे बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे येथून निवडून आले आहेत. दिपक वैद्य हे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे कट्टर समर्थक मानले जातात अतिशय सर्वसामान्य शेतकरी कुटुुंबातील व्यक्तिमत्व म्हणून दिपक वैद्य यांची ओळख आहे माजी आमदार राजेंद्र यांच्या नेतृत्वाखाली बार्शी तालुक्यातील सर्वच्या सर्व 8 झेडपी गट आणि 16 पंचायत समिती गणात भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत तर सोलापूर जिल्हा परिषदेत 68 पैकी 38 जागा जिंकत भाजपने एकहाती सत्ता मिळवलीय त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाबाबत मोठी चूरस पाहायला मिळाली होती. मात्र अखेर बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी बाजी मारत झेडपी अध्यक्षपद बार्शी तालुक्याकडे खेचून आणले आहे
166
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 15, 2026 11:16:24
Beed, Maharashtra:सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाठ यांच्या हस्ते आज परळीतील श्री साई मंदिराचे लोकार्पण करण्यात आले यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. संजय सिरसाठ बाईट पॉइंटर्स श्री साई मंदिराचे लोकार्पण केल्यानंतर आज श्रद्धा सबुरीचा संदेशाचा प्रत्यय आला. ऑन बीड मधील महिला अत्याचार बीड मधल्या महिला अत्याचाराच्या घटना संताप जनक आणि चिंताजनक आहेत. अशा नराधमाला चौकामध्ये फाशी दिली पाहिजे. अशा प्रकारच्या अत्याचार करणाऱ्याला कुठल्याही प्रकारची दयामाया दाखवू नये. महिलेला बांधल्याचा प्रकार ऐकूनच अंगावर शहारे येतात. अशा लोकांना सोडता कामा नये त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. अशा घटना पुन्हा घडून येण्यासाठी ही सरकार काम करेल. ऑन पुण्यातील घटना पुण्यातील प्रकार मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीकडून झालेला आहे. यावर पोलीस कारवाई करत आहे. अशा घटना आपल्यावर सुद्धा कलंक आहे. ऑन ॲट्रॉसिटी कायदा ॲट्रॉसिटी बद्दल तुमच्या काही लोकांचे काही गैरसमज झाले आहेत. मी उद्या विधानसभेत त्याच्यावर निवेदन करणार आहे. ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये कुठेही बदल झालेला नाही. मला कायद्यात बदल करायचे अधिकार नाहीत. चुकीचे गैरसमज पसरवले जात आहेत. मी यावर समिती नाहीतर आयोग नियमाचे म्हणालो आहे. केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे आम्ही आयोग स्थापन करणार आहोत. त्या आयोगामध्ये अध्यक्ष आयपीएस अधिकारी अशी ती कमिटी असणार आहे जे दलित बांधावावर अत्याचार होतात आणि जे प्रकरण पेंडिंग आहेत त्याबाबत काम करेल. आयोगाची निर्मिती समाजाच्या हितासाठी असेल. ऑन राज्यातील गुन्हेगारी पोलिसांना कुठलाही दोष देता येणार नाही पोलिसांनी जलद गतीने काम करायला सुरुवात केली आहे. कुठलाही गुन्हा झाला तर 24 तासाच्या आत सर्व घटनेचा तपास केला जात आहे. आरोपीला तात्काळ अटक सुद्धा केली जाते. ऑन नितेश राणे यांचे वक्तव्य कुंभमेळ्यात कोणी स्टॉल लावायचे हे तिथल्या प्रशासनाचा प्रश्न आहे. स्टॉल लावायला एखाद्याला बंदी घालणं योग्य होणार नाही. ऑन अबू आझमींच्या इफ्तार पार्टीला संजय राऊत यांची उपस्थिती संजय राऊत कुठेही जातील उद्या ओबीसी ने इफ्तार पार्टी दिली तरी जातील त्याचं काय. त्यांना पक्ष राहिला ना धर्म राहिला ना नीतिमत्ता राहिली. अशा पद्धतीचे त्यांनी कितीही चांगुलपणा केला तरी मुस्लिम मत त्यांना मिळणार नाहीत. बाईट - संजय सिरसाठ, सामाजिक न्याय मंत्री
215
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 15, 2026 10:49:43
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये अद्यापही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नासल्येची धक्कादायक बाब समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणं अनिवार्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला, तरी प्रत्यक्षात जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये त्याची अंमलबजावणी झालेली नाही. जिल्हा परिषदेसह काही खासगी शाळांमध्येही कॅमेऱ्यांची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यात वाढत असलेल्या विद्यार्थ्यांवरील अत्याचार आणि शाळांमधील घटनांच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज अधिक अधोरेखित होत आहे. जिल्ह्यात सुमारे हजारो सरकारी व खासगी शाळा असतानाही अनेक ठिकाणी कॅमेरे नसल्याने शाळांमधील घडामोडींवर नियंत्रण ठेवणे कठीण होत आहे. शासनाने जिल्हा नियोजनाच्या निधीतून सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश दिले असले, तरी काही ठिकाणी प्रशासनाचे दुर्लक्ष आणि नियोजनाच्या अभावामुळे हा प्रश्न अद्यापही कायम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पालकांकडून होत आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाशी संपर्क केला असता त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला त्यामुळे शासनाच्या आदेशांचे पाय मल्ली केली जात आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
165
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 15, 2026 10:49:29
109
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 15, 2026 10:35:21
128
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 15, 2026 10:34:25
Vasai-Virar, Maharashtra:वसईत घरगुती गॅसचा हॉटेल मध्ये वापर; लजिज हॉटेलवर पुरवठा विभागाची कारवाई वसई पूर्वेच्या नवजीवन परिसरात असलेल्या लजिज हॉटेलवर वसई पुरવठा विभागाने कारवाई केली आहे. सध्या सुरू असलेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमिरवर हॉटेलमध्ये घरगुتی गॅस सिलिंडरचा वापर करून खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याची माहिती पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी पथकासह हॉटेलवर धाड टाकून तपास केला असता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात पेट्रोलियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हॉटेल मालकाला अटक करण्यात आली आहे. गॅस टंचाईच्या काळात कोणीही घरगुंत गॅस सिलेंडरचा गैरवापर करत असल्यास तत्काळ पुरवठा विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
118
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 15, 2026 10:04:14
Akola, Maharashtra:अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे मोठी गुन्हेगारी घटना टळली आहे. दरोड्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात टोळीला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून पिस्तूल, चाकू, शस्त्रसामग्रीसह महिंद्रा XUV 500 कार असा सुमारे 10 लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अकोला शहरातील वाशीम बायपासजवळील अंबिका नगर परिसरात संशयास्पदरीत्या उभी असलेल्या महिंद्रा XUV 500 कारवर पोलिसांनी कारवाई केली. पोलिस पथक घटनास्थळी पोहोचताच तीन आरोपींना अटक करण्यात आली, तर दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. अटक केलेल्या आरोपींकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, एक चाकू, लोखंडी सरी, चेहरा झाकण्यासाठी मास्क, हँडग्लोव्हज, मोबाईल फोन आणि बनावट नंबर प्लेट असा सुमारे 10 लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस तपासात या आरोपींवर अपहरण, खंडणी, चोरी, घरफोडी आणि दंगा यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी जुने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
153
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 15, 2026 09:36:50
Beed, Maharashtra:बीड मधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून गावाबाहेर नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. यानंतर तिला गावामध्ये आणून गावच्या चावडीवर खांबाला बांधून ठेवले गेले.. मी माझ्या पत्नीचा घरात शोध घेतला मला वाटलं तिने तिच्या जीवाचं काही बरं वाईट केलं का या भीतीने मी तिच्या आईकडे गेलो... तेवढ्यात गावातील लोकांनी तिला बांधलेल्या अवस्थेतून सोडवलं होतं... भयभीत झालेल्या माझ्या पत्नीला तिच्या आईच्या घरी नेलं.. पुन्हा पोलिसात तक्रार दिली.. पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली आहे.. मात्र या आरोपीला पाठबळ देणाऱ्यांना अटक करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी पीडित महिलेच्या पतीने केली आहे...
176
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 15, 2026 09:36:19
111
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 15, 2026 09:05:40
180
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 15, 2026 08:54:26
Shirur, Maharashtra:भीमाशंकर मंदिर सध्या चालू असलेल्या बांधकामामुळे अडीच महिन्यापासून सामान्य भाविकांच्या दर्शनासाठी बंद आहे. मात्र झारखंडातील भाजपा खासदार डॉ. निशिकांत दुबे यांच्या दुर्दैवाने प्रशासनाने नियम पायदळी त क्राल्यासारखे वागले. भाजप खासदार दुबे कुटुंबीय व नातेवाईक हेलिकॉप्टरने मंदिरात प्रवेश करून विशेष दर्शन घेतले, ज्यामुळे प्रशासनाच्या दुजाभावाबद्दल संताप व्यक्त होत आहे. मंदिराच्या सभामंडप व पायऱ्यांच्या बांधकामामुळे ९ जानेवारी ते ९ एप्रिल २०२६ या कालावधीत मंदिर बंद ठेवण्याचे आदेश होते. महाशिवरात्री उत्सवातही भक्तांना दर्शन बंदच होते. पत्रकारांनाही प्रवेश नाकारला गेला होता. स्थानिक नेतेने या कृतीची निषेध केली. थेट हेलिकॉप्टरने आलेल्या खासदारांसाठी प्रशासन नियम धाब्यावर बसेल तेव्हा मंदिराचे दरवाजे उघडले गेल्याने खळबळ उडाली. भाजप खासदारांच्या या व्हीआयपी दर्शनाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी सुरू आहे. जिल्हाधिकारी व स्थानिक तहसिलदारांशी संपर्क केलेला नाही; त्यामुळे कोणाच्या दबावाखाली हा निर्णय घेतला गेला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. खासदार डॉ. निशिकांत दुबे झारखंडमधील गोड्डा मतदारसंघाचे असतात आणि मोदीजींचे निकटवर्ती मानले जातात. या प्रकरणाची शिवसेना udhava बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या विजय शिंदे यांनी निषेध केला आणि पारदर्शकपणे चौकशीची मागणी केली. राष्ट्रवादी नेते, मनसे कार्यकर्ते व शिवभक्तांनीही या घटनेवर प्रश्न उपस्थित केला. एकूणच या घटनेमुळे भीमाशंकर मंदिरात नियमांच्या दुजाभावाबद्दल राजकीय व जन सामान्यात प्रचंड चर्चा सुरू झाली.
187
comment0
Report
Advertisement
Back to top