Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

बीड में सहयोगी आरोपी गिरफ्तार करने की मांग, पति ने न्याय की अपील की

MMMahendrakumar Mudholkar
Mar 15, 2026 09:36:50
Beed, Maharashtra
बीड मधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून गावाबाहेर नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. यानंतर तिला गावामध्ये आणून गावच्या चावडीवर खांबाला बांधून ठेवले गेले.. मी माझ्या पत्नीचा घरात शोध घेतला मला वाटलं तिने तिच्या जीवाचं काही बरं वाईट केलं का या भीतीने मी तिच्या आईकडे गेलो... तेवढ्यात गावातील लोकांनी तिला बांधलेल्या अवस्थेतून सोडवलं होतं... भयभीत झालेल्या माझ्या पत्नीला तिच्या आईच्या घरी नेलं.. पुन्हा पोलिसात तक्रार दिली.. पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली आहे.. मात्र या आरोपीला पाठबळ देणाऱ्यांना अटक करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी पीडित महिलेच्या पतीने केली आहे...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Mar 15, 2026 10:49:43
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये अद्यापही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नासल्येची धक्कादायक बाब समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणं अनिवार्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला, तरी प्रत्यक्षात जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये त्याची अंमलबजावणी झालेली नाही. जिल्हा परिषदेसह काही खासगी शाळांमध्येही कॅमेऱ्यांची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यात वाढत असलेल्या विद्यार्थ्यांवरील अत्याचार आणि शाळांमधील घटनांच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज अधिक अधोरेखित होत आहे. जिल्ह्यात सुमारे हजारो सरकारी व खासगी शाळा असतानाही अनेक ठिकाणी कॅमेरे नसल्याने शाळांमधील घडामोडींवर नियंत्रण ठेवणे कठीण होत आहे. शासनाने जिल्हा नियोजनाच्या निधीतून सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश दिले असले, तरी काही ठिकाणी प्रशासनाचे दुर्लक्ष आणि नियोजनाच्या अभावामुळे हा प्रश्न अद्यापही कायम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पालकांकडून होत आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाशी संपर्क केला असता त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला त्यामुळे शासनाच्या आदेशांचे पाय मल्ली केली जात आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
77
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 15, 2026 10:49:29
46
comment0
Report
MAMILIND ANDE
Mar 15, 2026 10:39:24
17
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 15, 2026 10:35:21
110
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 15, 2026 10:34:25
Vasai-Virar, Maharashtra:वसईत घरगुती गॅसचा हॉटेल मध्ये वापर; लजिज हॉटेलवर पुरवठा विभागाची कारवाई वसई पूर्वेच्या नवजीवन परिसरात असलेल्या लजिज हॉटेलवर वसई पुरવठा विभागाने कारवाई केली आहे. सध्या सुरू असलेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमिरवर हॉटेलमध्ये घरगुتی गॅस सिलिंडरचा वापर करून खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याची माहिती पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी पथकासह हॉटेलवर धाड टाकून तपास केला असता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात पेट्रोलियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हॉटेल मालकाला अटक करण्यात आली आहे. गॅस टंचाईच्या काळात कोणीही घरगुंत गॅस सिलेंडरचा गैरवापर करत असल्यास तत्काळ पुरवठा विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
82
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 15, 2026 10:04:14
Akola, Maharashtra:अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे मोठी गुन्हेगारी घटना टळली आहे. दरोड्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात टोळीला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून पिस्तूल, चाकू, शस्त्रसामग्रीसह महिंद्रा XUV 500 कार असा सुमारे 10 लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अकोला शहरातील वाशीम बायपासजवळील अंबिका नगर परिसरात संशयास्पदरीत्या उभी असलेल्या महिंद्रा XUV 500 कारवर पोलिसांनी कारवाई केली. पोलिस पथक घटनास्थळी पोहोचताच तीन आरोपींना अटक करण्यात आली, तर दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. अटक केलेल्या आरोपींकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, एक चाकू, लोखंडी सरी, चेहरा झाकण्यासाठी मास्क, हँडग्लोव्हज, मोबाईल फोन आणि बनावट नंबर प्लेट असा सुमारे 10 लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस तपासात या आरोपींवर अपहरण, खंडणी, चोरी, घरफोडी आणि दंगा यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी जुने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
153
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 15, 2026 09:36:19
106
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 15, 2026 09:05:40
139
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 15, 2026 08:54:26
Shirur, Maharashtra:भीमाशंकर मंदिर सध्या चालू असलेल्या बांधकामामुळे अडीच महिन्यापासून सामान्य भाविकांच्या दर्शनासाठी बंद आहे. मात्र झारखंडातील भाजपा खासदार डॉ. निशिकांत दुबे यांच्या दुर्दैवाने प्रशासनाने नियम पायदळी त क्राल्यासारखे वागले. भाजप खासदार दुबे कुटुंबीय व नातेवाईक हेलिकॉप्टरने मंदिरात प्रवेश करून विशेष दर्शन घेतले, ज्यामुळे प्रशासनाच्या दुजाभावाबद्दल संताप व्यक्त होत आहे. मंदिराच्या सभामंडप व पायऱ्यांच्या बांधकामामुळे ९ जानेवारी ते ९ एप्रिल २०२६ या कालावधीत मंदिर बंद ठेवण्याचे आदेश होते. महाशिवरात्री उत्सवातही भक्तांना दर्शन बंदच होते. पत्रकारांनाही प्रवेश नाकारला गेला होता. स्थानिक नेतेने या कृतीची निषेध केली. थेट हेलिकॉप्टरने आलेल्या खासदारांसाठी प्रशासन नियम धाब्यावर बसेल तेव्हा मंदिराचे दरवाजे उघडले गेल्याने खळबळ उडाली. भाजप खासदारांच्या या व्हीआयपी दर्शनाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी सुरू आहे. जिल्हाधिकारी व स्थानिक तहसिलदारांशी संपर्क केलेला नाही; त्यामुळे कोणाच्या दबावाखाली हा निर्णय घेतला गेला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. खासदार डॉ. निशिकांत दुबे झारखंडमधील गोड्डा मतदारसंघाचे असतात आणि मोदीजींचे निकटवर्ती मानले जातात. या प्रकरणाची शिवसेना udhava बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या विजय शिंदे यांनी निषेध केला आणि पारदर्शकपणे चौकशीची मागणी केली. राष्ट्रवादी नेते, मनसे कार्यकर्ते व शिवभक्तांनीही या घटनेवर प्रश्न उपस्थित केला. एकूणच या घटनेमुळे भीमाशंकर मंदिरात नियमांच्या दुजाभावाबद्दल राजकीय व जन सामान्यात प्रचंड चर्चा सुरू झाली.
187
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 15, 2026 08:47:49
275
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 15, 2026 08:47:26
Nashik, Maharashtra:युद्धाचा परिणाम थेट पिण्याच्या पाण्यावर... पिण्याच्या पाण्याच्या बॉक्स च्या किमतीत 30 रुपयांनी वाढ... आखाती देशांमध्ये निर्माण झालेला युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता देशभर मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे...युद्धजन्य परिस्थितीमुळे रॉ मटेरियल मध्ये वाढ झाल्यामुळे पाणी बॉटलच्या बॉक्सच्या किमतीमध्ये जवळपास 25 ते 30 रुपयाची वाढ झाली आहे... त्यामुळे युद्धाचा फटका थेट जनसामान्यांना बसताना दिसून येत आहे.. खरंतर उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे.... उन्हात पिण्याच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असते...आता थेट पाण्याच्या बॉटलच्या किमती वाढत असल्याने थेट परिणाम सामान्य नागरिकांमध्ये जाणू लागलाय....आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी...
240
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 15, 2026 08:47:16
Jalna, Maharashtra:जालना :धनगर आंदोलक दिपक बो-हाडे मुंबईकडे रवाना मुंबईतल्या आझाद मैदानात सकाळी 10 वाजल्यापासून करणार आमरण उपोषण धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी वनवा पेटला आहे आता विझवणं अवघड- दिपक बो-हाडे आंदोलनाला परवानगी मिळाली- बो-हाडे जालन्यातील धनगर आंदोलक दीपक बो-हाडे आंदोलकांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. सोमवार रोजी सकाळी 10 वाजल्यापासून दिपक बो-हाडे मुंबईतल्या आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार आहेत.. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी बो-हाडे आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिल्याचंही बो-हाडे यांनी सांगितलं.. मात्र जोपर्यंत एसटी आरक्षणाची अमंलबजावणी होणार नाही. तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असं बो-हाडे यांनी म्हंटलं असून वनवा पेटला आहे आता विझवणं अवघड आहे असा इशाराही दिलाय. बाईट- दिपक बो-हाडे, धनगर समाजाचे आंदोलक
157
comment0
Report
Advertisement
Back to top