Back
उबेर कार चालक की हत्या: इंजीनियरिंग विद्यार्थी गिरफ्तार
ABATISH BHOIR
Mar 09, 2026 07:06:28
Kalyan, Maharashtra
टिटवाळा जवळ रस्त्यावर उभी असलेल्या रक्ताने माखलेली कारचा रहस्य उलगडला. मैत्रिणीला भेटण्यासाठी निघाला आणि कारचा रहस्य समोर आला. ANC- कल्याण टिटवाळ्यात गोवेली रस्त्यालगत उबेर कार मध्ये रक्ताच्या दागाने माखलेली कार सापडली होती. मात्र गाडीत कोणी नव्हते टिटवाळा पोलिसांनी गाडी चालक चा शोध घेतला अखेर चालकाचा मृतदेह पुणे जिल्ह्यातील ओतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडला आहे. या प्रकरणाच्या तपासात अतिशय धक्कादाय माहिती समोर आली आहे. एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने उबेर कार बुक केली. पुण्याला जात असताना गणेश खिंड परिसरात चालकाने अचानक गाडी थांबविली. चाकू दाखवित प्रवासी विद्यार्थ्याकडून पैसे मागितले. या वरुन दोघांचा वाद झाला. प्रतिकार करताना चाकू प्रवासी विद्यार्थीच्या हातून चालकाचा गळा चिरला गेला. ठाणे ग्रामीण पोलिसांनी आदर्श भालेराव या इंजिनिरिंगच्या विद्यार्थ्याला उबेर चालक नासीर अन्सारी याच्या हत्ये प्रकरणी अटक केली आहे. चालकाची हत्या करण्याचा कोणताही उद्देश नव्हता. मात्र नियतीने डाव आखला आणि एका चालक जीवानिशी गेला तर विद्यार्थ्याचे आयुष्य उद्धवस्त झाले. Vo..टिटवाळा येथील गोवेली रोडवर रक्ताच्या दागाने माखलेली एक उबेर कार आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. टिटवाळा पोलिस या प्रकरणाचा तपास करीत होते. नक्की या गाडीचा चालक कुठे आहे. त्याच्यासोबत काय घडले आहे याचा तपास पोलिसांनी सुरु केला. टिटवाळा पोलीलांसह ठाणे एलसीबी देखील तपास करीत आहे. ठाणे एलबीसीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संदीप गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी भाऊसाहेब गायकवाड यांच्या पथकाने हा तपास सुरु केला. पोलिस अधिकारी भाऊसाहेब गायकवाड यांच्या पथकाने उबेर कंपनीची ही कार असल्याने राेड म’प आणि शेवटचा प्रवासी कोण आहे. याचा शोध लावला. पोलिसांना माहिती मिळाली की, आदर्श भालेराव नावाच्या व्यक्तीने ही गाडी पुण्याला जाण्यासाठी बुक केली होती. आदर्श हा इंजिनिरिंगच्या द्वितीय वर्षला आहे तो त्याच्या मैत्रीणीला भेटण्यासाठी पुण्याला निघाला होता. त्यासाठी उबेर कार बुक केली. गाडी चालक नासीर अन्सारी आला. त्याने प्रवासी आदर्शला घेऊन पुण्याच्या दिशेने प्रवास सुरु केला. गाडी गणेश खिंडीजवळ आली असता नासीर याने गाडी थांबविली. नासीरला चाकूचा धाक दाखवून आदर्शकडे पैशाची मागणी केली. तुझ्याकडे पैसे बऱ्या बोलाने दे. यावेळी आदर्शने प्रतिकार केला. त्यांच्यात जोरदार झटापट झाली. या झटापटीत नाशीरच्या हातीतील चाकू आदर्शनच्या हाती आला. तो नासीरच्या गळ्याला लागल्याने नासीरचा गळा चिरला गेला. त्याचा जागीच मृत्यू झाला. नासीरचा मृतदेह तिथेच टाकून आदर्शने उबेर गाडी टिटवळ्याला आणली. गाडी टिटवळा गोवेली रस्त्यावर टाकून पळून गेला. पोलिस तपास हे उघड झाले की, नासीरला पैशाची गरज होती. त्याने चार पाच जणांकडून पैसे मागितले होते. आदर्शचा हेतू नासीरची हत्या करण्याचा नव्हता. मात्र हा गुन्हा घडला. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे. या प्रकरणी ओतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKShubham Koli
FollowMar 09, 2026 14:01:120
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 09, 2026 13:32:32Latur, Maharashtra:लातूरमध्ये पार्षद पद के नाम रद्द होने पर भाजप नेता ने आत्मदहन का प्रयास
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 09, 2026 13:18:500
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 09, 2026 13:01:390
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 09, 2026 12:50:270
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 09, 2026 12:32:080
Report
KPKAILAS PURI
FollowMar 09, 2026 12:31:490
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 09, 2026 12:31:180
Report
JMJAVED MULANI
FollowMar 09, 2026 12:15:330
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 09, 2026 11:51:140
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 09, 2026 11:35:370
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 09, 2026 11:35:240
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 09, 2026 11:35:000
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 09, 2026 11:30:290
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 09, 2026 10:34:470
Report