Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

डोंबिवली के धामटण में पेडिग्री लैब से सात कुत्तों की मौत: पुलिस जांच

ABATISH BHOIR
Mar 21, 2026 11:47:18
Kalyan, Maharashtra
डोंबिवलीजवळील धामटण गावात धक्कादायक घटना समोर आली आहे। धामटण गावात असलेल्या एकलव्य एनिमल्स पेडिग्री कंपनीच्या कारखान्यात टाकण्यात आलेल्या उंदीर मारण्याच्या औषधामुळे सात श्वानांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत कंपनी मालकासह त्याचा भाऊ आणि कामगाराविरोधात सामाजिक कार्यकर्ता महिलेनं मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे। इतकेच नव्हे तर जाब विचारण्यास गेलेल्या या महिलेला कंपनी मालकाने तुमच्या कुत्र्यांनादेखील मारिन असे धमकी देण्याचा देखील आरोप तक्रारदार सुचिता सुर्वे केला आहे। या तक्रारीनुसार पोलिसांनी एकलव्य ॲनिमल पेडिग्री कंपनीचे मालक वीरेंद्र कुमार निषाद, त्यांचा भाऊ आणि कामगाराविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे。
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
Mar 21, 2026 12:47:32
Vasai-Virar, Maharashtra:मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वसईजवळील ससुपाडा येथे मोठा अपघात घडला आहे. ज्या ठिकाणी सध्या काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे आणि वारंवार वाहतूक कोंडी होत असते, त्याच ठिकाणी सहा वाहनांची साखळी धडक झाली. या अपघातात दोन कार, एक बस, एक टेम्पो, एक कंटेनर आणि एक पिकअप वाहनाचा समावेश आहे. धडकेनंतर टेम्पोमधील एक चालक अडकून पडला होता. स्थानिक नागरिक आणि वसई वाहतूक पोलिसांनी तत्परतेने मदतकार्य करत त्याला सुखरূপ बाहेर काढले. जखमींना तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आले असून घटनास्थळी वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. मात्र, या ठिकाणी सुरू असलेल्या कामामुळेच वारंवार कोंडी आणि अपघात होत असल्याचा आरोप होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, म्हणजेच NHAI, आपली जबाबदारी झटकत असल्याचा गंभीर आरोप भूमिपुत्र संघटनाचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी केला आहे.
723
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 21, 2026 11:50:42
1096
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 21, 2026 11:33:00
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधीपक्ष नेते विजय चौगुले यांनी आणलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदन प्रस्तावावरून मोठा गोंधळ झाला. नवी मुंबईत प्रस्तावित सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला शिखांचे धर्मगुरू गुरु तेग बहादूर साहिब यांचं नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती त्याबद्दल अभिनंदन प्रस्ताव आणण्यात आला होता. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आणत सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडले होते. मात्र सत्ताधारी भाजपने मुख्यमंत्र्यांनी भूखंडाचा उल्लेख केला नसून भूखंडाचा उल्लेख काढून अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर केला. तर विरोधीपक्ष नेते विजय चौगुले यांनी सत्ताधारी भाजपा मुख्यमंत्र्यांनादेखिल खोटं ठराविण्याचे काम करत असल्याची टीका केलीय.
1093
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 21, 2026 11:21:28
960
comment0
Report
UPUmesh Parab
Mar 21, 2026 11:06:37
Ranbambuli, Maharashtra:सिंधुदुर्ग- भोंदूबाबा खरात प्रकरणावर दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण- ​कॅप्टन खरात यांना ज्या गंभीर आरोपाखाली अटक झाली आहे, त्या कृत्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन न्यायालय योग्य तो निर्णय घेईलच. कॅप्टन खरात यांच्याशी माझी ओळख केवळ राजकीय किंवा वैयक्तिक कारणातून नाही, तर सिन्नर येथील ईशानेश्वर मंदिराच्या कामामुळे झाली. या मंदिराच्या रस्त्यासाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आमची भेट झाली होती. खरात यांचा ॲस्ट्रॉनॉमी (खगोलशास्त्र/ज्योतिषशास्त्र) मध्ये चांगला अभ्यास असल्याने माझ्यासारख्या अनेक लोकांची त्यांच्याशी केवळ त्या विषयापुरती ओळख आहे. *​व्हायरल फोटोंवर स्पष्टीकरण-* समाज माध्यमांवर फिरत असलेले फोटो हे ईशानेश्वर मंदिराच्या कामाच्या संदर्भातील किंवा त्यांच्या मुलीच्या लग्नातील आहेत. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या निमंत्रणावरून लग्नाला जाणे किंवा शुभेच्छा देणे हा सामाजिक शिष्टाचार आहे, त्याचा वैयक्तिक प्रकरणांशी संबंध जोडू नये. *​संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर-* संजय राऊत यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. कॅप्टन खरात कधीही माझ्या कार्यालयात आलेले नाहीत, त्यामुळे ते माझे विभाग चालवत होते असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. माझ्या कार्यकाळात शिक्षण आणि मराठी भाषा विभागात जे ऐतिहासिक निर्णय झाले, ते क्वचितच इतर कोणत्याही मंत्र्यांच्या काळात झाले असतील. त्यामुळे विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे आहे. केवळ फोटोंच्या आधारे कोणत्याही राजकीय व्यक्तीचा या प्रकरणाशी संबंध जोडून चुकीची प्रसिद्धी देऊ नये हि विनंती.
1045
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 21, 2026 11:01:45
Akola, Maharashtra:अकोल्यातील डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत किरकोळ कारणावरून झालेल्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. एका चहा टपरीवर झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या सहा तासांत कारवाई करत तीन आरोपींना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथून अटक केली होती.दरम्यान, या घटनेचा रीक्रिएशन करण्यासाठी पोलिसांनी तिन्ही आरोपींना घटनास्थळी आणले आरोपींकडून संपूर्ण घटनेची माहिती घेत घटनाक्रम पुन्हा उभा करण्यात आला. या प्रक्रियेमुळे पोलिसांना पुढील तपासात महत्त्वाची माहिती मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.आरोपींनी नेमक्या कोणत्या कारणावरून हल्ला केला, तसेच हत्येच्या वेळी कोण कोण उपस्थित होते याबाबत सविस्तर माहिती मिळत असल्याचे पोलिस अधिकारी ईशानी आनंद यांनी सांगितले. तसेच या प्रकरणातील सर्व पैलूंवर तपास सुरू असून लवकरच संपूर्ण सत्य समोर येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
1092
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 21, 2026 10:49:27
Chandrapur, Maharashtra:मुनगंटीवार on राऊत-भोंदू बाबाच्या ठिकाणी फडणवीस यांच सरकार उठवण्यासाठी विधी करण्यात आले आणि मग या धाडी पडल्या. अँकर: आम्ही अशा वाह्यात गोष्टींवर कधीही विश्वास ठेवत नाही. आमचा देवावर धर्मावर आणि सेवेवर विश्वास आहे. असा मंत्र टाकल्याने कोणाचेही नुकसान होत नाही हे आम्हाला यांना माहिती आहे. खरात याची जेलमध्ये वरात निघणार आहे हे नक्की. या संदर्भात कायदे अपुरे असतील तर त्यावर काम केलं पाहिजे. चंद्रपुरात अशा घटना घडल्यानंतर मी विधानसभेमध्ये अशासकीय विधेयके मांडली होती. जादूटोणा प्रतिबंधक विधेयक त्यानंतर मंजूर झाले होते. विश्वास आणि अंधविश्वास यातील रेषा धूसर आहे. अशा पद्धतीने पूजा केल्याने कोणी मोठा झाला असता तर काँग्रेस कशाला मागे राहिली असती. काही लोक यावर विश्वास ठेवतात आणि मग देव त्यांना योग्य वेळी शिक्षा देतो. मुनगंटीवार on अंधारे--त्यांनी ४०० ५०० कोटी रुपयाची माया जमवली आहे त्यांच्यावर सुनील तटकरे यांचा आशीर्वाद आहे. अँकर--कोणाच्या आशीर्वादाने कोणी माया जमवत नाही. त्याने माया जमवली असेल तर त्याला दणके दिले पाहिजे. अशा प्रकरणात त्यात फास्टट्रॅक कोर्ट ची निर्मिती देखील केली पाहिजे. आसाराम बापू जेलमध्येच आहे. आपण कायद्यावर विश्वास ठेवला पाहिजे. चूक करणाऱ्याला शिक्षा होणार आहे. फक्त पुराव्या अभावी तो निर्दोष सुटता कामा नये. मुनगंटीवार on मंत्री खरातच्या संपर्कात , त्यांच्याही राजीनामा ची मागणी विरोधक करत आहेत. अँकर कारण नसताना हे भोंदू बाबा धर्माला बदनाम करतात. हे केवळ हिंदू धर्मातच नाही ख्रिश्चन व अन्य धर्मातही आहे. यावर जनजागरण करण्याची गरज असेल तर सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून ते केले पाहिजे. कोणी महाराज आपले जीवन बदलू शकत नाही. देवाला संकटात आणू नका. तीर्थ ,पाणी पिल्याने कोणी मोठा होत असेल तर 288 लोक मंत्री झाले असते. खरात म्हणजे थोतांड आहे. अशांना ठोकले पाहिजे हे नक्की
1072
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 21, 2026 10:46:33
1044
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 21, 2026 10:22:23
Shirdi, Maharashtra:सिन्नर तालुक्यातील मिरगावमध्ये आरोपी कॅप्टन अशोक खरात प्रकरणावरून वातावरण तापलं आहे. गावाची बदनामी झाल्याचा आरोप करत ग्रामस्थ आता आक्रमक झालेत आणि थेट गावबंदीचा इशाराही दिला आहे. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट... महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी कॅप्टन अशोक खरात याच्या विरोधात आता मिरगाव ग्रामस्थ एकवटले आहेत. खरातच्या कथित घृणास्पद कृत्यांमुळे गावाची राज्यभर बदनामी झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. आमच्या गावाचं नाव खराब झालंय, आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो. आता आरोपीला गावात थारा नाही असे ठाम म्हणी ग्रामस्थांनी घेतलीये. या पार्श्वभूमीवर ग्रामसभा बोलावून आरोपी कॅप्टन खरातला गावबंदी करण्याचा ठराव मांडला जाणार असून ग्रामस्थांनी एकमुखी भूमिका घेतली आहे. ग्रामसभेत ठराव घेऊन आम्ही त्याला गावबंदी करणार हा आमचा ठाम निर्णय आहे. दरम्यान मिरगावमधील ईशान्यश्वर महादेव मंदिराबाबतही ग्रामस्थांनी मोठी मागणी केली आहे. हे मंदिर ग्रामस्थांच्या ताब्यात देऊन त्याची सेवा आणि देखभाल आम्ही करू, अशी मागणी सरकारकडे केलीय. मंदिर आम्हाला द्या, आम्हीच महादेवाची सेवा करू आणि मंदिराची निगा राखू असं ग्रामस्थांनी म्हणाले. ग्रामस्थांनी या प्रकरणात गंभीर आरोपही केले आहेत. राज्यातील मोठे अधिकारी आणि मंत्री खरातच्या संपर्कात होते, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. तसेच गावातील काही लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून दबाव आणला जात असल्याचाही आरोप करण्यात आल्याचा उल्लेख केला गेला. मोठे अधिकारी आणि मंत्री यायचे आम्ही छोटे माणसं, आमची पोहोच कुठपर्यंत जाणार. या सर्वांमध्ये ग्रामस्थांनी शिवनिका संस्थानच्या मंदिरातूनच या सर्व प्रकारांची सुरुवात होत होती आणि त्यानंतर महिलांना नाशिकच्या कार्यालयात बोलावलं जात होतं, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मिरगाव ग्रामस्थांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासन आणि सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
1022
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 21, 2026 09:33:44
Ambernath, Maharashtra:बदलापुरात व्यवसायिक सिलेंडरचा काळाबाजार ?\n\nलहान हॉटेल व्यवसायिकांचा आरोप\n\nउन्हात चुलीवर जेवण बनवताना  कामगार पडतायेत आजारी\n\nAnchor शासनाने व्यावसायिक सिलेंडर बंद केल्याने बदलापूर मधील अनेक लहान हॉटेल व्यवसायिक संकटात सापडलेत, मात्र मोठ्या हॉटेल सुरू झाले त्यांना  व्यवसायिक सिलेंडर दिले जात असल्याचा आरोप बदलापूर मधील लहान हॉटेल व्यवसायिकांनी केला आहे. एकीकडे व्यवसायिक सिलेंडर बंद केल्याने या लहान हॉटेल व्यवसायिकांनी पर्याय म्हणून चुलीवर अन्नपदार्थ करण्यास सुरुवात केली आहे. मात्र सध्या उन्हाचा पारा हा 40 पार गेला असल्याने या तळपत्या उन्हात बसून चुलीवर जेवण बनवणे शरीराला त्रासदायक ठरत आहे, त्यामुळे  कामगार आजारी पडत आहेत, त्यामुळे  शासनाने हा सिलेंडरचा काळा बाजार रोखावा असा आरोप लहान हॉटेल व्यवसाय कमी केला आहे .\n\nByte लहान हॉटेल व्यवसायिक\n\nचंद्रशेखर भुयार, बदलापूर
1037
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 21, 2026 09:20:48
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरकरांच्या पसंतीचे आणि स्वादिष्ट समोसा- जिलेबी नाष्टा सेवा देणारे मामा जलेबीवाला दुकान बंद होण्याच्या मार्गावर, सिलेंडर तुटवड्याने मोडले कंबरडे, कोळसा भट्टी वापरून कसाबसा सुरू आहे व्यवसाय अँकर:चंद्रपूरकरांच्या पसंतीचे आणि स्वादिष्ट समोसा- जिलेबी नाष्टा सेवा देणारे मामा जलेबीवाला दुकान बंद होण्याच्या मार्गावर आहे. सिलेंडर तुटवड्याने या प्रसिद्ध व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. सध्या व्यावसायिक सिलिंडर उपलब्धता होत नसल्याने कोळसा भट्टी वापरून हा व्यवसाय कसाबसा सुरू आहे. युद्ध किती काळ चालेल?, संकट मर्यादित काळासाठी आहे का? या प्रश्नाची उत्तर कुणाकडेही नाहीत. मात्र गॅस सिलेंडरचे संकट असेच चालू राहिल्यास नाईराजाने मामा जलेबीवाला कुलूपबंद होण्याची भीती आहे. नाश्त्याची प्रति प्लेट किंमत देखील 5 रुपयांनी वाढविण्यात आली आहे. एरवी खवय्यांच्या गर्दीने ओसंडून वाहणारे, चंद्रपुरातील तीन पिढ्यांपासूनचे रुचकर नाश्त्याचे दुकान संकटात आल्याने सिलेंडर तूटवड्याची गंभीर स्थिती पुढे आली आहे.
1054
comment0
Report
Advertisement
Back to top