Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410502

जुन्नर में शिवनेरी किले के पास मधुमक्खी हमला: 10–12 घायल

HCHEMANT CHAPUDE
Mar 21, 2026 09:33:11
Junnar, Pune, Maharashtra
ब्रेकिंग न्यूज़ जुन्नर पुणे... किल्ले शिवनेरी वरती आलेल्या शिवप्रेमी वरती मधमाशांचा हल्ला.... अचानक आग्या मोळाच्या मधमाश्या उठल्याने दहा ते बारा जणांवर केला हल्ला... सर्व जखमींवरती जुन्नर शहरातील खाजगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार सुरू... सध्या तापमानाचा पारा वाढत चालल्याने मधमाशांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Mar 21, 2026 10:22:23
Shirdi, Maharashtra:सिन्नर तालुक्यातील मिरगावमध्ये आरोपी कॅप्टन अशोक खरात प्रकरणावरून वातावरण तापलं आहे. गावाची बदनामी झाल्याचा आरोप करत ग्रामस्थ आता आक्रमक झालेत आणि थेट गावबंदीचा इशाराही दिला आहे. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट... महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी कॅप्टन अशोक खरात याच्या विरोधात आता मिरगाव ग्रामस्थ एकवटले आहेत. खरातच्या कथित घृणास्पद कृत्यांमुळे गावाची राज्यभर बदनामी झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. आमच्या गावाचं नाव खराब झालंय, आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो. आता आरोपीला गावात थारा नाही असे ठाम म्हणी ग्रामस्थांनी घेतलीये. या पार्श्वभूमीवर ग्रामसभा बोलावून आरोपी कॅप्टन खरातला गावबंदी करण्याचा ठराव मांडला जाणार असून ग्रामस्थांनी एकमुखी भूमिका घेतली आहे. ग्रामसभेत ठराव घेऊन आम्ही त्याला गावबंदी करणार हा आमचा ठाम निर्णय आहे. दरम्यान मिरगावमधील ईशान्यश्वर महादेव मंदिराबाबतही ग्रामस्थांनी मोठी मागणी केली आहे. हे मंदिर ग्रामस्थांच्या ताब्यात देऊन त्याची सेवा आणि देखभाल आम्ही करू, अशी मागणी सरकारकडे केलीय. मंदिर आम्हाला द्या, आम्हीच महादेवाची सेवा करू आणि मंदिराची निगा राखू असं ग्रामस्थांनी म्हणाले. ग्रामस्थांनी या प्रकरणात गंभीर आरोपही केले आहेत. राज्यातील मोठे अधिकारी आणि मंत्री खरातच्या संपर्कात होते, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. तसेच गावातील काही लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून दबाव आणला जात असल्याचाही आरोप करण्यात आल्याचा उल्लेख केला गेला. मोठे अधिकारी आणि मंत्री यायचे आम्ही छोटे माणसं, आमची पोहोच कुठपर्यंत जाणार. या सर्वांमध्ये ग्रामस्थांनी शिवनिका संस्थानच्या मंदिरातूनच या सर्व प्रकारांची सुरुवात होत होती आणि त्यानंतर महिलांना नाशिकच्या कार्यालयात बोलावलं जात होतं, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मिरगाव ग्रामस्थांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासन आणि सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
887
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 21, 2026 09:33:44
Ambernath, Maharashtra:बदलापुरात व्यवसायिक सिलेंडरचा काळाबाजार ?\n\nलहान हॉटेल व्यवसायिकांचा आरोप\n\nउन्हात चुलीवर जेवण बनवताना  कामगार पडतायेत आजारी\n\nAnchor शासनाने व्यावसायिक सिलेंडर बंद केल्याने बदलापूर मधील अनेक लहान हॉटेल व्यवसायिक संकटात सापडलेत, मात्र मोठ्या हॉटेल सुरू झाले त्यांना  व्यवसायिक सिलेंडर दिले जात असल्याचा आरोप बदलापूर मधील लहान हॉटेल व्यवसायिकांनी केला आहे. एकीकडे व्यवसायिक सिलेंडर बंद केल्याने या लहान हॉटेल व्यवसायिकांनी पर्याय म्हणून चुलीवर अन्नपदार्थ करण्यास सुरुवात केली आहे. मात्र सध्या उन्हाचा पारा हा 40 पार गेला असल्याने या तळपत्या उन्हात बसून चुलीवर जेवण बनवणे शरीराला त्रासदायक ठरत आहे, त्यामुळे  कामगार आजारी पडत आहेत, त्यामुळे  शासनाने हा सिलेंडरचा काळा बाजार रोखावा असा आरोप लहान हॉटेल व्यवसाय कमी केला आहे .\n\nByte लहान हॉटेल व्यवसायिक\n\nचंद्रशेखर भुयार, बदलापूर
973
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 21, 2026 09:20:48
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरकरांच्या पसंतीचे आणि स्वादिष्ट समोसा- जिलेबी नाष्टा सेवा देणारे मामा जलेबीवाला दुकान बंद होण्याच्या मार्गावर, सिलेंडर तुटवड्याने मोडले कंबरडे, कोळसा भट्टी वापरून कसाबसा सुरू आहे व्यवसाय अँकर:चंद्रपूरकरांच्या पसंतीचे आणि स्वादिष्ट समोसा- जिलेबी नाष्टा सेवा देणारे मामा जलेबीवाला दुकान बंद होण्याच्या मार्गावर आहे. सिलेंडर तुटवड्याने या प्रसिद्ध व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. सध्या व्यावसायिक सिलिंडर उपलब्धता होत नसल्याने कोळसा भट्टी वापरून हा व्यवसाय कसाबसा सुरू आहे. युद्ध किती काळ चालेल?, संकट मर्यादित काळासाठी आहे का? या प्रश्नाची उत्तर कुणाकडेही नाहीत. मात्र गॅस सिलेंडरचे संकट असेच चालू राहिल्यास नाईराजाने मामा जलेबीवाला कुलूपबंद होण्याची भीती आहे. नाश्त्याची प्रति प्लेट किंमत देखील 5 रुपयांनी वाढविण्यात आली आहे. एरवी खवय्यांच्या गर्दीने ओसंडून वाहणारे, चंद्रपुरातील तीन पिढ्यांपासूनचे रुचकर नाश्त्याचे दुकान संकटात आल्याने सिलेंडर तूटवड्याची गंभीर स्थिती पुढे आली आहे.
967
comment0
Report
SKShubham Koli
Mar 21, 2026 07:47:26
Thane, Maharashtra:ठाणे जिल्ह्याची आरोग्य सेवा बळकट करणारे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे धक्कादायक वास्तविक समोर आले आहेत. रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांनाच आता स्वतःच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. रुग्णालयात शिक्षण घेत असलेल्या डॉक्टरांनी अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचे सांगितले आहे. हॉस्टेलमध्ये झोपण्यासाठी अपुरी बेड व्यवस्था, पिण्यासाठी व आंघोळीकरिता नळाद्वारे येणारे दूषित पाणी, विजेची अपुरी सुविधा तसेच वाढत्या चोरीच्या घटनांमुळे डॉक्टर त्रस्त झाले आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना आजारांना सामोरे जावे लागल्याचेही समोर आले आहे, तर चोरीमुळे आर्थिक नुकसानही सहन करावे लागले आहे. या सर्व समस्यांमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी संजय केळकर यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली होती. आणीकारांनी तात्पुरती दखल घेत रुग्णालय व हॉस्टेलला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना केळकर यांनी रुग्णालयाची कुणालाही काळजी नाही फक्त भ्रष्टाचार सुरू आहे असा गंभीर आरोप करत येत्या काळात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, डॉक्टरांसारख्या आरोग्य सेवकांनाच मूलभूत सुविधा मिळत नसल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.
977
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 21, 2026 07:36:22
Nagpur, Maharashtra:RSS के नागपुर स्थित डॉक्टर हेडगेवार स्मारक परिसर में आयोजित हो रही भारतीय युवा संसद का उद्घाटन किया उपराष्ट्रपति राधाकृष्णन ने, पूरे भारतवर्ष से लगभग 800 युवा प्रतिभागी हो रहे हैं इसमें शामिल। भारतीय संस्कृति आधारित जीवन शैली भारतीय भाषाएं, पंच परिवर्तन के साथ 2047 के विकसित भारत की संकल्पना को पूरा करने के लक्ष्य पर जैसे विधिक विषय के विशेषज्ञ चार दिन करेंगे मार्गदर्शन। भारतीय युवा संवाद का 29 वां चार दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन का शुभारंभ उपराष्ट्रपति CP राधाकृष्णन के अभिभाषण के साथ शुरू हुआ, यह अधिवेशन नागपुर के रेशम बाग स्थित RSS के डॉक्टर हेडगेवार स्मारक परिसर में आयोजित किया गया है, आयोजन का संचालन भारतीय युवा संसद न्यास द्वारा केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय और मीडिया फाउंडेशन के सहयोग से किया जा रहा है, केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान, महाराष्ट्र विधानसभा के अध्यक्ष राहुल नार्वेकर, उत्तराखंड विधानसभा के अध्यक्ष रितु खंडूरी सहित 800 युवा प्रतिभागी और 50 देश के प्रतिनिधि शामिल हो रहे हैं, 21 से 23 मार्च तक इसका आयोजन हो रहा है, भारतीय संस्कृति आधारित जीवन शैली भारतीय भाषाएं, पंच परिवर्तन के साथ 2047 के विकसित भारत की संकल्पना को पूरा करने के लक्ष्य पर जैसे विधिक विषय के विशेषज्ञ मार्गदर्शन करेंगे, चार दिन तक चलने वाली अधिवेशन में अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय और क्षेत्रीय मुद्दों के साथ-साथ स्थानीय विश्व पर भी गहन चर्चा होगी, विशेष बात यह है कि युवाओं में महिला और पुरुष प्रतिभागियों का अनुपात सामान रखा गया है,
1018
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 21, 2026 07:33:23
Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash पालकमंत्री विखे यांनी घेतली ॲसिड हल्यात जखमी झालेल्या चिमुकलीचा भेट.. ॲसिड हल्ल्यानंतर उपचाराचा सर्व खर्च प्रवरा ग्रामीण रुग्णालय करणार... अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांची देखील केली यावेळी चर्चा... जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील बाईट पॉइंटर बाईट ऑन संगमनेर ॲसिड हल्ला प्रकरण ऍसिड हल्ला झालेली चिमुकलीची प्रकृती आता स्थिर.. तिच्या जीवाला कोणताही धोका नाही.. सुदैवानं तिचा डोळा वाचला आहे.. उपचाराचा सर्व खर्च प्रवरा मेडिकल कॉलेज करेल.. आरोपी शोध सुरू.. मात्र सगळेच संभ्रमात.. अनेकांची चौकशी केली मात्र अद्याप धागेदोरे मिळाले नाही.. कितीही वेळ गेला तरी आरोपीच्या मुसक्या बांधल्याशिवाय गप्प बसणार नाही.. बाईट ऑन शिवनिका संस्थान पाणी... एखाद्या देवस्थानला थेट धरणातून पाणी सोडावं लागतं.. यावरूनच किती उच्च पदस्थ लोकांच्या संपर्कात तो होता हे समोर आलं.. हे सगळं प्रकरण समोर आणण्यात शिर्डी पोलिसांचं मोठं काम.. शिर्डीत गुन्हा दाखल झाला नसता तर प्रकरण समोर आले नसते... त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी लुक आऊट नोटीस जाहीर केल्यामुळे आरोपीला पळून जाता आलं नाही.. शिर्डी पोलिसांच्या तत्परतेमुळे समोर आलं नाही तर आरोपी आजही मोकाट फिरत असता... नाशिक मध्ये एवढे घडत असताना नाशिक क्राईम ब्रँच जबाबदारी काय... शिर्डी पोलिसांच्या पुराव्यामुळे तुम्हाला कारवाई करता आली.. आपल्या नाकाखाली हे प्रकार घडत असताना तिथल्या गुप्तचर यंत्रणा स्थानिक गुन्हे शाखा काय करत होती.. शिवनिका संस्थानला दिलेल पाण्याचे आरक्षण तात्काळ रद्द करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.. त्यावेळी जीआर का काढण्यात आला... नोटिंग फाईलवर कोणाच्या सह्या आहेत याची चौकशी केली जाईल... बाईट ऑन संजय राऊत टीका खरंतर आरोपी पकडला आहे मात्र विरोधक त्याचा राजकारण करताय.. त्यांच्याच काळात त्याला डोक्यावर घेतलं गेलं पाणी दिलं गेलं.. आपल्या काळातील पापाचा प्रादेशिक करण्याऐवजी आपलं पाप दुसऱ्याच्या गळ्यात घालायला तुम्ही निघाला.. खरंतर राउतांकडे अजून काही पुरावे असतील तर ते दिले पाहिजे.. एवढं पाणी तर सोडलं होतं याशिवाय अजून काय काय सोडलं ते देखील सांगावं.. बाईट ऑन रुपाली चाकणकर राजीनामा त्यावर भाष्य करणे उचित नाही मात्र त्यांनी दिलेला राजीनामा स्वागतार्ह.. वास्तविक अगोदरच राजीनामा द्यायला हवा होता.. संशयाचे वातावरण त्यांच्या भोवती निर्माण झाल आहे.. त्यामुळे त्यांनी दिलेला राजीनामा योग्यच.. बाईट ऑन विखे पूजा व्हायरल फोटो एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना ते शिर्डी दौऱ्यावर आले होते.. मी पालकमंत्री असल्यानं त्यांचं स्वागत केलं.. दौऱ्यात नसताना त्यांनी अचानक निर्णय घेतला की तिकडे जायचं आहे.. दीपक केसरकर हे बरोबर होते.. मी दर्शन घेऊन बाहेर आलो त्यांची आत पूजा सुरू होती.. मुख्यमंत्री आल्यानंतर त्यांच्याबरोबर जाणं माझं कर्तव्य.. खरात आणि आमचा संपर्क देखील नाही.. त्याच्या कर्तुत्वाबद्दल मी नंतर कधीतरी बोलेल.. कारण तो राजकीय सल्ले देत होता.. आता ते गजाआड झाले त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करणे योग्य नाही.. एका कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याकडे आता तपास... आता त्यांनी निपक्षपणे चौकशी करावी.. बाईट ऑन दीपक केसरकर निकटवर्तीय चौकशी आता चौकशीत सगळे समोर येईल.. कोण दलाल होते.. कोण त्यांना मदत करत होते.. या सगळ्या भानगडीत कोण होतं हे सगळं समोर येईल.
1061
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Mar 21, 2026 07:32:22
Pune, Maharashtra:Headline : मावळात बैलगाडा शर्यतीच्या घाटावर रुक्मिणी घोडीचा वाढदिवस साजरा मावळ तालुक्यातील बैलगाडा शौकीनांचा नाद खरंच भन्नाट म्हणावा लागेल…! तळेगाव दाभाडे येथील डोळसनाथ महाराज उत्सवातील बैलगाडा स्पर्धा ही पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. याच स्पर्धेदरम्यान एक आगळावेगळा क्षण पाहायला मिळाला… ‘रुक्मिणी’ या घोडीचा वाढदिवस घाटात जल्लोषात साजरा करण्यात आला. केक कापून तिचं तोंड गोड करण्यात आलं, पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढत अनोखा उत्सव रंगला. शेतकरी राजाने आपल्या मुक्या प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत, बैल-घोडा हा खरा सखा असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित केलं…!
971
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 21, 2026 07:18:44
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर मनपाचा २०२६-२७ चा अंदाजित अर्थबंक स्थायी समितीपुढे सादर. चंद्रपूर महानगरपालिका स्थायी समितीची अर्थसंकल्पीय सभा स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आयुक्त अकुनुरी नरेश यांनी चंद्रपूर शहर महानगरपालिकेचा सन २०२५-२६ चा सुधारित तसेच सन २०२६-२७ चा अंदाजपत्रकीय अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर केला. या अर्थसंकल्पात नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, शहराचा सर्वांगीण विकास साधणे तसेच आर्थिक शिस्त राखणे या उद्दिष्टांवर विशेष भर देण्यात आला आहे. या अर्थसंकल्पावर सदस्यांनी मुद्देनिघाय सखोल चर्चा करत विविध सूचनाही मांडल्या. अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेस मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. नगरसेवकांनी स्वेच्छा निधी 20 लाख करण्याची मागणी केली मात्र आर्थिक स्थिती लक्षात घेता सभापतींनी तो निधी ७.५० लाख रुपये करण्यास मंजूरी दिली. मनपाच्या इमारती व गाळ्यांच्या भाडेदनाचे २०१८ पासून फेरमूल्यांकन झाले नसल्याने हा विषय सर्वसाधारण सभेत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला。
1002
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 21, 2026 07:06:35
Shirdi, Maharashtra:आरोपी कॅप्टन अशोक खरातच्या विरोधात मिरगाव ग्रामस्थ आक्रमक... आरोपी कॅप्टन खरातच्या घृणास्पद कारनाम्यामुळे आमच्या गावची नाहक बदनामी... काही दिवसातच ग्रामसभा घेऊन आम्ही आरोपी कॅप्टन खरातला गावबंदी करणार... मिरगाव ग्रामस्थांची झी २४ तासशी बोलतांना माहिती... ग्रामसभेत ठराव घेऊन कॅप्टन खरातला आम्ही गावबंदी करणार , ग्रामस्थांची प्रतिक्रिया... ईशान्यश्वर महादेवाचे मंदिर ग्रामस्थांच्या ताब्यात द्या.. आम्ही महादेवाची सेवा करून मंदिराची निगा राखू , मिरगाव ग्रामस्थांची सरकारकडे मागणी... ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाबाबत ग्रामस्थांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी....
1028
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 21, 2026 07:05:08
1018
comment0
Report
Advertisement
Back to top