Back
मिरगांव में कैप्टन खरात के आरोपों पर ग्राम सभा ने गावबंदी की मांग
KJKunal Jamdade
Mar 21, 2026 10:22:23
Shirdi, Maharashtra
सिन्नर तालुक्यातील मिरगावमध्ये आरोपी कॅप्टन अशोक खरात प्रकरणावरून वातावरण तापलं आहे. गावाची बदनामी झाल्याचा आरोप करत ग्रामस्थ आता आक्रमक झालेत आणि थेट गावबंदीचा इशाराही दिला आहे. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट... महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी कॅप्टन अशोक खरात याच्या विरोधात आता मिरगाव ग्रामस्थ एकवटले आहेत. खरातच्या कथित घृणास्पद कृत्यांमुळे गावाची राज्यभर बदनामी झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. आमच्या गावाचं नाव खराब झालंय, आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो. आता आरोपीला गावात थारा नाही असे ठाम म्हणी ग्रामस्थांनी घेतलीये. या पार्श्वभूमीवर ग्रामसभा बोलावून आरोपी कॅप्टन खरातला गावबंदी करण्याचा ठराव मांडला जाणार असून ग्रामस्थांनी एकमुखी भूमिका घेतली आहे. ग्रामसभेत ठराव घेऊन आम्ही त्याला गावबंदी करणार हा आमचा ठाम निर्णय आहे. दरम्यान मिरगावमधील ईशान्यश्वर महादेव मंदिराबाबतही ग्रामस्थांनी मोठी मागणी केली आहे. हे मंदिर ग्रामस्थांच्या ताब्यात देऊन त्याची सेवा आणि देखभाल आम्ही करू, अशी मागणी सरकारकडे केलीय. मंदिर आम्हाला द्या, आम्हीच महादेवाची सेवा करू आणि मंदिराची निगा राखू असं ग्रामस्थांनी म्हणाले. ग्रामस्थांनी या प्रकरणात गंभीर आरोपही केले आहेत. राज्यातील मोठे अधिकारी आणि मंत्री खरातच्या संपर्कात होते, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. तसेच गावातील काही लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून दबाव आणला जात असल्याचाही आरोप करण्यात आल्याचा उल्लेख केला गेला. मोठे अधिकारी आणि मंत्री यायचे आम्ही छोटे माणसं, आमची पोहोच कुठपर्यंत जाणार. या सर्वांमध्ये ग्रामस्थांनी शिवनिका संस्थानच्या मंदिरातूनच या सर्व प्रकारांची सुरुवात होत होती आणि त्यानंतर महिलांना नाशिकच्या कार्यालयात बोलावलं जात होतं, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मिरगाव ग्रामस्थांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासन आणि सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowMar 21, 2026 11:33:000
Report
ABATISH BHOIR
FollowMar 21, 2026 11:21:28831
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 21, 2026 11:15:54834
Report
UPUmesh Parab
FollowMar 21, 2026 11:06:37931
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 21, 2026 11:01:451077
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 21, 2026 10:49:27944
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 21, 2026 10:46:331044
Report
JMJAVED MULANI
FollowMar 21, 2026 10:21:361066
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 21, 2026 09:33:441037
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 21, 2026 09:33:11957
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 21, 2026 09:20:481054
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 21, 2026 08:47:191037
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 21, 2026 07:50:421037
Report
SKShubham Koli
FollowMar 21, 2026 07:47:26977
Report