Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421506

दिल्ली बम धमाकों के मुंबई लिंक पर ATS के सर्च ऑपरेशन की जरूरत

CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 13, 2025 01:17:35
Ambernath, Maharashtra
मुंब्र्यात ATSकडून सर्च ऑपरेशन करण्याची गरज दिल्ली बॉम्बस्फोटाच्या मुंब्रा कनेक्शनवर खा. श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया दिल्ली बॉम्बस्फोटाच्या मुंब्रा कनेक्शनवर वक्तव्य तपासानंतर स्फोटाचे धागेदोरे समोर येतील असंही शिंदे यांनी म्हंटलंय.
154
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Nov 13, 2025 03:03:56
Nagpur, Maharashtra:नागपूर - गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात क्षमतेपेक्षा जास्त वाघ आणि बिबटे आहे. आठ वाघ आणि सहा बिबट्यांच्या स्थलांतराचा प्रस्ताव केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडे (सीझेडए) वन विभागाकडून पाठविण्यात आलेला प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही.. - मात्र अद्यापही त्याला हिरवा कंदील न दिल्याने दोन्ही वन्यप्राण्यांचे स्थलांतरण रखडले आहे.. - एकीकडे वन्यप्राणी आणि मानव संघर्ष वाढला आहे... दुसरीकडे हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू होत आहे... बिबट आणि वाघ यांना केंद्रात आणले जाते... - गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात सध्या २४ वाघ आणि ३० बिबटे आहेत. प्राणी संग्रहालयाची क्षमता १० आणि २० वाघ आणि बिबट ठेवण्याची आहे. - यात इतर राज्यातून सुद्धा केंद्रीय वाघ आणि।बिबट्याची मागणी प्रलंबित आहे.. - गोरेवाडा रेस्क्यू सेंटर नागपूरसह महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे वन्यजीव पुनर्वसन केंद्र मानले जाते. मात्र क्षमतेपेक्षा जास्त संख्या असल्यानं प्राण्यांची योग्य पुनर्वसन प्रक्रिया वेळेत पार पडणे अत्यावश्यक आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 13, 2025 03:03:39
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्यांवरील खड्यांच्या विरोधात दाखल याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनासह छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना याचिकेत प्रतिवादी करण्याचे निर्देश दिले. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काय प्रयत्न केले यासंबंधीची विचारणा करण्यात आली. या काळात किती अपघात झाले यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्यशासनाला नोटीस बजावताना दिले. नेवासा ते अहिल्यानगर प्रवासासाठी ३ ते ४ तास वेळ लागत असल्याने वाहनधारकांसह बसने प्रवास करणाऱ्यांची मोठी अडचण होत असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 13, 2025 03:03:08
Nashik, Maharashtra:मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर, महापालिकेकडून रात्री खड्डे बुजवण्याचे काम सुरू... नाशिकमध्ये अनेक दिवसांपासून खड्ड्यांचा प्रश्न प्रलंबित असून आता आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामाचे उद्घाटन आणि भूमिपूजना साठी नाशिक दौऱ्यावर येणार आहे...आता महानगरपालिकेला रात्रीची जाग आली आहे... ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे त्या रस्त्यावरील खड्डे हे रात्रीच्या वेळेस बुजवण्याचं काम महापालिकेकडून केले जाताय.... नाशिकच्या खड्ड्यांचा प्रश्न हा अनेक दिवसांपासून प्रलंबित असून प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नव्हती मात्र मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर येणार असल्याने आता प्रशासनाला जाग आल्याच चित्र बघायला मिळतंय.... स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधी यांनी खड्ड्यांसंदर्भात अनेक वेळा मोठे आंदोलन देखील उभे केले आणि वारंवार महापालिकेकडे खड्ड्यांचा प्रश्न मांडला... मात्र तरी देखील याचा काही तोडगा निघाला नाही... पण मुख्यमंत्री हे नाशिक दौऱ्यावर येणार असून आता महापालिकेला जाग आली असून रात्रीच्या वेळेस खड्डे बुजवण्याचे काम महापालिकेकडून केले जाताय....
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 13, 2025 03:02:51
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:नगरपरिषद नगरपंचायतीसाठी 2 दिवसात फक्त 5 नामनिर्देशन पत्र, नगराध्यक्ष पदासाठी तर एकही अर्ज नाही मागील काही वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. निवडणुका येताच इच्छुक मोठ्या संख्येने समोर येतील अशी शक्यता वर्तवल्या जात होती; मात्र प्रत्यक्षात नामनिर्देशक पत्र भरण्याची दोन दिवस उलटून गेले तरीसुद्धा उत्साह पाहायला मिळत नसून आतापर्यंत फक्त कन्नड, पैठण या दोन नगर परिषदेसाठी 2 अर्ज दाखल झालेत तर वैजापूर नगर परिषदेसाठी 3 अर्ज असे एकूण 5 अर्ज दाखल झाले आहेत. हे पाचही अर्ज नगरसेवक पदासाठी आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी अजून पर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे युती आघाडीचे समीकरण बघूनच इच्छुक समोर येतील अशी शक्यता वर्तवल्या जात आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 13, 2025 02:48:20
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यात बिबट्यांचा धुमाकूळ; दहा शेळ्यांचा बळी, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात बिबट्यांचे हल्ले आता मानवी वस्त्यांबरोबरच पशुधनावरही वाढले आहेत. सततच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. वाघाळे परिसरातील शेतकरी बाळासाहेब थोरात यांच्या शेळ्यांच्या गोठ्यात घडलेल्या घटनेत बिबट्याने तब्बल दहा शेळ्यांचा प्राणघात केला. या घटनेमुळे थोरात यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. ग्रामीण भागात अशा घटनांमुळे नागरिक आणि शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी वन विभागाच्या अधिकारी वर्गाला घेराव घालत बिबट्याला आता ठार मरावं नाहीतर पुन्हा एकदा पिंपरखेड घटनेला सामोरे जावे लागेल अशी तक्रार येथील ग्रामस्थांनी केली.
20
comment0
Report
MKManoj Kulkarni
Nov 13, 2025 02:37:04
Navi Mumbai, Maharashtra:अँकर -- मुलुंड येथे वैधारित्य सुरु असलेल्या  आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर मुलुंड पोलिसांनी उध्वस्त केलं.. बँकेचे अधिकारी असल्याची बतावणी करुन कर्जाच्या आमिषाने ही टोळी Америка आणि कॅनडा देशातील नागरिकांची फसवणुक करत होती. याच गुन्ह्यांत एका मुख्य आरोपीसह इतर चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. सागर राजेश गुप्टा, अभिषेक सूर्यप्रकाश सिग, तन्मयकुमार रजनीश दादसिंग, शैलेश मनोहर शेट्टी आणि रोहन मोहम्मद अन्सारी अशी या पाचजणांची नावे आहेत. या टोळीने कर्जाच्या आमिषाने आतापर्यंत अनेक विदेशी नागरिकांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले असून त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. अटकेनंतर पाचही आरोपींना मुलुंड. यायलयाने   पोलीस कोठडी सुनावली आहे.मुलुंडच्या मुलुंड कॉलनीत काहीजण बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी नागरिकांची कर्जाच्या आमिषाने फसवणुक करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांना मिळाली होती. ही माहिती काढताना या पथकाने मंगळवारी मुलुंड कॉलनीतील एका निवासी इमारतीच्या फ्लॅटमध्ये छापा टाकलाद होता. यावेळी तिथे सागर गुप्ता हा त्याच्या इतर चार सहकाऱ्यांसोबत उपस्थित होता. या फ्लॅटमध्ये त्याने एक बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर सुरु केल्याचे दिसून आले. लेंडीग पाईट या संस्थेचे पदाधिकारी असल्याचे भासवून, त्यांच्याकडील आंतरराष्ट्रीय ई-सिमकार्डचा वापर करुन सागर गुप्तासह इतर चौघेजण अमेरिका आणि कॅनडा देशातील नागरिकांना कॉल करत होते. तयांना पे डे तत्त्वावर तात्काळ कर्ज देण्याचे आमिष दाखविले जात होते. त्यासाठी त्यांना प्रोसेसिंग फी म्हणून नव्वद, शंभर आणि दिडशे डॉलर रक्कम जमा करण्यास सांगण्यात येत होते. मात्र ही रक्कम बँक खात्यात ट्रान्स्फर होताच त्यांना कुठलेही कर्ज न देता त्यांची फसवणुक केली जात होती. या कारवाईत पोलिसांनी दोन लॅपटॉप, अकरा मोबाईल, दोन राऊटर, 76 हजाराची कॅश असा मुद्देमाल जप्त केला आहे. घटनास्थळी पोलिसांना कर्ज मंजुरीचे काही कागदपत्रे सापडले असून या कागदपत्रांवरुन त्यांनी अनेक विदेशी नागरिकांना कर्जाच्या आमिषाने गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या कर्ज प्रकरणात एकच अॅप्लिकेशन क्रमांक सापडला आहे. या टोळीचा सागर गुप्ता असून त्याच्याकडे इतर चौघेही कामाला होते. सागरने कॉल सेंटर चालविणयासाठी आवश्यक असलेले कोणतेही अधिकृत परवानगी घेतली नव्ती. तो त्याच्या अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर चालवून कर्जाच्या आमिषाने विदेशी नागरिकांची फसवणुक करत होता. त्यांच्याकडून प्रोसेसिंग फी घेऊन या पैशांचा अपहरण करत होता. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्यांना कर्ज मंजुरीचे पत्र पाठविले जात होते.
19
comment0
Report
KPKAILAS PURI
Nov 13, 2025 02:32:20
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड़च्या दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अलंकापुरमचौकात एकाची त्याच्याच मित्रांनी गोळ्या घालून हत्या केल्याची घटना बुधवारी संध्याकाळी घडली आहे. नितीन शंकर गिलबिले या 37 वर्षीय व्यक्तीचा या गोळीबारात मृत्यू झाला आहे. व्यावसायिक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अमित जीवन पठारे, विक्रांत ठाकूर अशी संशयित आरोपींची नावे असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अलंकापुरम 90 फुटी रोडवर श्री साई रोड कॅरिअर या ठिकाणी येऊन ब्लॅक रंगाची फॉर्च्यूनर गाडी नंबर एम एच 14 LL 8900 यामध्ये बसलेले असताना त्यांच्या वैयक्तिक वादातून मयत इसम नामे नितीन गिलीबिले याच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. वरील दोन्ही संशयित इसमाचा शोध घेणे सुरू असून अधिक तपास चालू आहे.
65
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 13, 2025 02:16:08
Junnar, Pune, Maharashtra:*ब्रेकिंग* *ओतूर/जुन्नर/पुणे* - कल्याण नगर महामार्गावर ओतूर येथे बिबट्याची दहशद - रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याची दुचाकीवर झडप - चालत्या दुचाकीवर बिबट्याने झडप घातल्याने परिसरात भीतीचे सावट - खताची गोण घेऊन जाणारा शेतकरी गंभीर जखमी - त्याच्यावर आळेफाटा रुग्णालयात उपचार सुरू - सिताराम निलेश डोके असे. जखमी शेतकऱ्याचे नाव - संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित - दुचाकीला धडक दिल्यानंतर बिबट्या तेथून पसार झाल्याची माहिती - कल्याण नगर महामार्गावर बिबट्यांचा वावर वाढला - अनेकवेळा मोठ्या वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याच्या घटना अधोरेखित प्रतिनिधी
110
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 13, 2025 02:15:55
101
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 13, 2025 01:17:16
Ambernath, Maharashtra:युती करताना कार्यकर्त्यांची भावना समजून घेणं आवश्यक पालिका निवडणुकीतल्या युतीबाबत श्रीकांत शिंदे यांची सावध प्रतिक्रिया अंबरनाथ-बदलापुरात महायुतीवर अद्यापही प्रश्नचिन्ह स्थानीय स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. त्यामुळे युती करताना कार्यकर्त्यांची भूमिका महत्वाची आहे अशी सावध प्रतिक्रिया खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिलीय. अंबरनाथ-बदलापुरात शिवसेना-भाजप युती होणार की नाही यावरून वरिष्ठ पातळीवर खलबतं सुरू आहेत. स्थानिक पातळीवर मात्र युती होऊ नये अशीच दोन्ही पक्षांमधल्या कार्यकर्त्यांची भावना आहे. 2014 नंतर तब्बल 10 वर्षांनी निवडणूक होत असल्यानं सगळेच जण नगरसेवकपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज आहेत. मात्र युतीचा निर्णय होत नसल्यानं दोन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांची अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. 17 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत युतीचा निर्णय न झाल्यास दोन्ही शहरांमध्ये शिवसेना-भाजप स्वतंत्रपणे लढणार असंच चित्र सध्यातरी पाहायला मिळतंय.
94
comment0
Report
Advertisement
Back to top