Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

नांदेड में गैस सिलेंडर के लिए भीड़, ऑनलाइन बुकिंग में मुश्किलें

SMSATISH MOHITE
Mar 14, 2026 10:34:04
Nanded, Maharashtra
नांदेड मध्येही गॅस साठी काही ठिकाणी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. गॅस सिलेंडर घेण्यासाठी एजंसी बाहेर नागरिक गर्दी करताहेत. ऑनलाईन बुकिंग चा फोन नंबर बंद आहे तर बुकिंग होऊनसुद्धा ओटीपी मिळत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान नांदेड जिल्ह्याला होणाऱ्या गॅस पुरवाठ्यावर कुठलाही परिणाम नाही. नागरिकांनी विनाकारण आगाऊ बुकिंग करू नये असे आवाहन पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे. गॅस सिलेंडर चा काळा बाजार रोखण्यासाठी सर्व तालुका स्तरावर 16 ठिकाणी पथक स्थापन करण्यात आले आहे. काळा बाजार होत असल्यास नागरिकांनी त्याची माहिती द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवण्यात येईल असे पुरवठा विभागाने सांगितले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Mar 14, 2026 11:45:24
Shirur, Maharashtra:अमेरिका, इस्रायल और इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता स्थानिक बाजारपेठांपर्यंत उमटू लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील औद्योगिक शहर असलेल्या चाकण परिसरालाही या परिस्थितीची झळ बसू लागल्याचे चित्र आहे. युद्धामुळे आखाती देशांतील वाहतूक व्यवस्थेत अडथळे निर्माण झाल्याने कांद्याची निर्यात ठप्प झाली आहे. त्यामुळे रोजच्या 50 हजार पिशव्यांची आवक बाजार समिती मध्ये असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. चाकण येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात आल्याने कांद्याचे भाव गडगडले आहे. सध्या बाजारात शेतातील काढलेला लाल कांदा मोठ्या प्रमाणात आला आहे मात्र निर्यात होत नसल्याने स्थानिक बाजारात मागणी घटल्याने भाव कमी झाले असल्याने शेतकरी चिंतेत वाढ झाली आहे. 10 ते 12 रुपये किलो बाजारभाव आल्याने शेतकऱ्याचा खर्चही यामध्ये भागत नसल्याने शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे.
20
comment0
Report
UJUmesh Jadhav
Mar 14, 2026 11:32:02
102
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 14, 2026 11:07:13
Khed, Maharashtra:पुणे–नाशिक महामार्गावर चाकण ते खेड दरम्यान शिरोली फाट्याजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. जवळपास तीन ते चार किलोमीटरपर्यंत vehicleांची लांबच लांब रांगा असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू असल्यामुळे पुणे व मुंबईमधून ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे–नाशिक महामार्गावर वाहतुकीचा ताण वाढला असून चाकण ते खेड दरम्यानच्या शिरोली फाट्याजवळ मोठी कोंडी निर्माण झाली आहे. या ठिकANI जवळपास तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा दिसत आहेत. दुपारच्या उन्हात वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रतिनिधी हेमंत चापुडे, झी मिडिया खेड पुणे...
76
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 14, 2026 11:05:20
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या उमरखेड बायपास हायवेवर वाहतूक पोलीस तळ ठोकून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करीत असल्याने या भागाचे खासदार नागेश आष्टीकर यांनी संताप व्यक्त केला आहे. वाहतूक पोलिसांनी चार-पाच वाहनधारकांना विनाकारण अडवून ठेवलेले आढळल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांना जाब विचारला. उमरखेड शहरात वाहतुकची मोठी समस्या असताना तिकडे योग्य नियोजन न करता बायपासवर वाहनधारकांना अडवून त्रास देणे योग्य नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. यावेळी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनवरून संपर्क साधत हा प्रकार बंद करण्याच्या सूचना दिल्या, नागरिकांशी संयमाने व कायद्याच्या चौकटीत वागावे असेही त्यांनी सांगितले.
109
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 14, 2026 10:49:51
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:अँकर - एलपीजी गॅस भरण्यासाठी सांगलीत सध्या रिक्षा चालकांची गेल्या तीन दिवसांपासून झुंबड उडाली आहे. तासन-तास थांबून रिक्षा चालकांना एलपीजी गॅस भरावा लागतोय गॅस पंप वर आता जवळपास रिक्षांच्या दोन दोन किलोमीटर अंतरापर्यंत लांब रांगा लागल्याचे चित्र सांगलीत पाहायला मिळते, मात्र इंधन टंचाई नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. सांगलीत वाहनांच्या एलपीजी गॅसचा तुटवडा! सांगली मिरजेतील तीन पैकी एकच एलपीजी गॅस पंप चालू. एलपीजी गॅस दारात देखील झाली आहे 25 रुपयांची वाढ; तरीही गॅस भरण्यासाठी रिक्षाचालकांच्या दोन किलोमीटर पर्यंत लांबच्या लांब रांगा. पाच ते सहा तासांनंतर गॅस भरण्याचा येतोय नंबर. व्ही लोग - एखादी देशातल्या युद्ध स्थितीमुळे देशातल्या गॅस पुरवठ्यावर परिणाम झालाय अगदी याच्यात झळा आता सांगलीतल्या रिक्षाचालकांना देखील बसत आहेत. वाहनांमध्ये भरला जाणारा एलपीजी गॅसचा तुटवडा होत असल्याने रिक्षाचालक हैराण झालेत. तासनतास थांबून रिक्षामध्ये गॅस भरण्याची वेळ आली आहे गॅसचा तुटवडा होत असल्याने ती परिस्थिती निर्माण झाल्याचा भिक्षाचालकांकडून सांगण्यात येत आहे. बाईट - मेहबुब मुलाणी - रिक्षाचालक, सांगली. व्ही लोग - उदय कोळी - रिक्षाचालक, सांगली. गेल्या तीन दिवसांपूर्वी अर्धा किलोमीटर इतक्याच रिक्षाच्या रांगा होत्या, मात्र आता या रिक्षाच्या रांगा तब्बल दोन किलोमीटर इतक्या लांब लागल्या आहेत. पण तरीदेखील तासं-तास थांबून रिक्षाचालक गॅस भरून घेत आहेत. बाईट - अमीन मुल्ला - रिक्षाचालक, सांगली. बाईट - अल्ताफ शेख - रिक्षाचालक, सांगली. व्ही लोग - गॅस तुटवड्याचा परिणाम रिक्षा चालकांच्या व्यवसायावर होत आहे तितकच नव्हे तर गॅसच्या दरात देखील वाढ झाली आहे 55 रुपये असणारा एलपीजी गॅस आता 80 रुपये इतक्या दराने विक्री चालू आहे, डबल 25 रुपयांची वाढ युद्धाच्या परिस्थितीमुळे झाल्याचं सांगण्यात येतं त्यामुळे त्या एलपीजी गॅस तुटवडा आणि दरवाढीचा फटका रिक्षा चालकांना बसत आहे. व्ही लोग - दरम्यान जिल्ह्यामध्ये इंधनाचा तुटवडा नसून पुरेसा इंधनसाठा आहे. हा पुरवठा सुरळीतपणे ठेवण्यासाठी कंपन्यांचे अधिकारी व प्रशासन यांच्याकडून समन्वय साधून पुरवठा केला जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलय. बाईट - अशोक काकडे - जिल्हाधिकारी - सांगली. व्ही लोग - आखाती देशाच्या युद्धाचा फटका, थेट सांगलीच्या रिक्षा चालकांना बसलाय, रिक्षा चालकांना एलपीजी गॅस भरण्यासाठी दमछाक करण्याबरोबर आर्थिक ताण देखील सोसावा लागतोय त्यामुळे गॅस तुटवड्याचा परिणाम व्यवसायावर सध्या तरी झाल्याचं चित्र पाहायला मिळतय.
143
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 14, 2026 10:46:10
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:अँकर - आखाती देशात युद्ध स्थितीमुळे गॅसचा निर्माण झालेला तुटवडा, त्यामुळे ग्राहकांनी आता इलेक्ट्रिक शेगडी चा पर्याय स्वीकारला आहे,मात्र अचानक वाढलेल्या मागणीमुळे इलेक्ट्रिक शेगड्यांचा देखील तुटवडा सांगली जिल्ह्यात निर्माण झाला आहे.इलेक्ट्रिक शेगडीचा खप अवघ्या तीन दिवसात प्रचंड वाढल्याने,उपलब्ध असणाऱ्या सर्व इलेक्ट्रिक शेगड्याची विक्री झाली आहे, मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक शेगड्या खरेदी केल्याने,अनेक दुकानांमध्ये इलेक्ट्रिक शेगड्या शॉर्टेज झाल्या आहेत.त्यामुळे आता शेगड्यांची बुकिंग घेण्यात येत असून दहा दिवसांच्यासाठी वेटिंग असल्याचं दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे, इलेक्ट्रिक शेगड्यांच्या दुकानातून आढावा घेतला आहे.
62
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 14, 2026 10:24:38
200
comment0
Report
CFChandrakant Funde
Mar 14, 2026 09:51:05
Pune, Maharashtra:एलपीजी’ला पर्यायी इंधनाची स्वदेशी तंत्रज्ञानातून निर्मिती… स्वयंपाकापासून वाहनांपर्यंत वापर शक्य पुणे : आखातातील युद्धामुळे देशात एलपीजीचा तुटवडा निर्माण झालेला असताना एलपीजीला पर्याय ठरू शकणारे ‘डायमिथिल इथर’ (डीएमई) हे इंधन संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानातून तयार करण्याची कामगिरी पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने (एनसीएल) केली आहे. ‘डीएमई’च्या रासायनिक प्रक्रियेसाठी आवश्यक संप्रेरक (कॅटलिस्ट) ‘एनसीएल’ने विकसित केला आहे. ‘डीएमई’चा इंधन म्हणून स्वतंत्रपणे, तसेच ‘एलपीजी’मध्ये मिश्रण करून वापर शक्य असून, ‘डीएमई’च्या प्रायोगिक तत्त्वावरील व्यावसायिक उत्पादनासाठी पिरंगुटनजीक प्रतिदिन २५० किलो क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. ‘एनसीएल’चे संचालक डॉ. आशिष लेले यांनी याबाबतची माहिती दिली. शास्त्रज्ञ डॉ. थिरुमलाईस्वामी राजा, उद्योग भागीदार राजेश दाते, टेक्सॉल इंजिनीअरिंगचे व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार या वेळी उपस्थित होते. भारतात एलपीजी मोठ्या प्रमाणात आयात करावा लागतो. २०२४ मध्ये भारताने २.१ कोटी टन एलपीजी आयात केला. जगभरात ‘डीएमई’चा वापर केला जातो. आता देशात स्वदेशी तंत्रज्ञानातून ‘डीएमई’चे उत्पादन करणे शक्य झाले आहे. डॉ. लेले म्हणाले, ‘डॉ. राजा यांच्या नेतृत्वाखाली ‘डीएमई’च्या संशोधनाला २००४मध्ये सुरुवात झाली होती. आता २०२६मध्ये सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होऊन उत्पादन होण्याच्या स्थितीपर्यंत आले आहे. या दरम्यान ६ एकस्व अधिकार (पेटंट) नोंदवण्यात आले. ‘बायोमास’पासून (जैवइंधन) मिथेनॉल तयार करून त्यावर पुढे रासायनिक प्रक्रियेतून ‘डीएमई’ मिळते. या रासायनिक प्रक्रियेसाठीचा विशेष घट ‘एनसीएल’मध्ये विकसित करण्यात आला. त्यानंतर ‘एनसीएल’मध्ये १२ किलोग्रॅम प्रतिदिन उत्पादन प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आले. आता हे तंत्रज्ञान उद्योगाला हस्तांतरित करून व्यावसायिक पद्धतीने उत्पादन शक्य होणार आहे. त्याची सुरुवात २५० टनांच्या प्रकल्पापासून होत आहे. डीएमई हे एलपीजीला पूर्णपणे पर्याय ठरू शकते. डीएमई एलपीजीच्या तुलनेत दीडपट अधिक कार्यक्षम आहे।
117
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 14, 2026 09:25:55
Shirdi, Maharashtra:प्रसाद लाडू वितरणानंतर साई संस्थानचा आणखी एक मोठा निर्णय... साई प्रसादालयातील भोजन मेनूतही मोठा बदल... दोन भाज्यांऐवजी मिळणार आता एक भाजी, डाळ भाताऐवजी आता खिचडी... प्रसादાલયातील भोजन मेनुटून डाळ भात झाला गायब... आता मिळणार फक्त एक भाजी, चपाती और तांदळाची खिचडी... गैस टंचाईच्या पार्श्वभूमीवर साईसंस्थानचा मोठा निर्णय... उपलब्ध गॅस काटकसरीने वापरण्यावर भर... प्रसाद भोजन बनवताना साई संस्थानचा सोलर प्लांट देखील ठरतोय मोठा आधार... साई संस्थानने घेतलेल्या दोन्ही महत्त्वाच्या निर्णयाबाबत साई संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्याशी बातचीत केलिए आमचे कुणाल जमदाडे यांनी....
166
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 14, 2026 09:24:47
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सांगलीच्या आटपाडीचे सुपुत्र प्रवीण कोळपे यांची हत्तीवरून जंगी मिरवणूक काढण्यात आली आहे. आयपीएस बनलेल्या प्रवीण कोळपेची हत्तीवरून मिरवणूक काढत साखर वाटण्यात आली आहे,विशेष म्हणजे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये आटपाडी शहरातून हे हत्तीवरून मिरवणूक निघाली. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वतः नागरिकांना साखर वाटत जल्लोष साजरा केला आहे. पारंपारिक वाद्यांच्या गजरात आणि हजारो आटपाडीकरांच्या साक्षीने अशी ऐतिहासिक हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली आणि प्रवीण कोळपे यांनी मिळवलेल्या यशाचं आनंद साजरा करण्यात आला.
150
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 14, 2026 09:23:26
Akola, Maharashtra:वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्टेट ऑफ होर्मुझच्या सामुद्रमार्गे भारतीय जहाज सुरक्षितपणे भारतात पोहोचल्याचा केंद्र सरकारचा दावा फेटाळून लावला आहे. हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचा आरोप त्यांनी केला. होर्मुझ परिसरात भारताची सुमारे ३५ जहाजे अद्याप अडकून असल्याचे ते म्हणाले. तसेच खाडी देशांमध्ये जवळपास ११०० भारतीय नागरिक अडकले असून त्यांना तातडीने भारतात आणावे, अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. ते पुढे म्हणाले की हे युद्ध लवकर संपेल असे वाटत नाही. युद्ध सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायल दौऱ्यावर गेले होते, त्या दौऱ्यात नेमकी काय चर्चा झाली याची माहिती देशाला द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. याशिवाय एआय संमेलनात भारताची प्रतिमा खराब झाल्याची टीकाही त्यांनी केली. दरम्यान, अमेरिका या युद्धातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असून सध्या अमेरिका बॅकफूटवर गेल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले.
125
comment0
Report
Advertisement
Back to top