Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Wardha442001

वर्धा में गैस सिलिंडर के लिए कतारें, आपूर्ति कम होने की अफवाह से हड़बड़ी

MAMILIND ANDE
Mar 14, 2026 09:20:22
Wardha, Maharashtra
वर्धा ब्रेकिंग - वर्ध्यात गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा - तुटवड्याच्या भीतीने सकाळपासून सिलेंडर बुकिंगसाठी गर्दी - उन्हात तासन्‌तास उभे ग्राहक; गॅस एजन्सीबाहेर किलोमीटरपर्यंत रांग वर्धा शहरासह जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्याची भीती निर्माण झाल्याने ग्राहकांमध्ये मोठी धावपळ सुरू झाली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा पुरवठा कमी होईल, या अफवांमुळे अनेक नागरिकांनी एकाच वेळी सिलेंडर बुकिंग करण्यासाठी गर्दी केली आहे. परिणामी आज सकाळी सात वाजल्यापासूनच विविध गॅस एजन्सी आणि बुकिंग केंद्रांबाहेर ग्राहकांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी तर ही रांग तब्बल एक किलोमीटरपर्यंत पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उन्हाच्या तानातास उभे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य ग्राहक तासन्‌तास उभे राहून सिलेंडर मिळण्याची वाट पाहत आहेत. सिलेंडरचा तुटवडा होणार की काय, या भीतीमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Mar 14, 2026 10:46:10
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:अँकर - आखाती देशात युद्ध स्थितीमुळे गॅसचा निर्माण झालेला तुटवडा, त्यामुळे ग्राहकांनी आता इलेक्ट्रिक शेगडी चा पर्याय स्वीकारला आहे,मात्र अचानक वाढलेल्या मागणीमुळे इलेक्ट्रिक शेगड्यांचा देखील तुटवडा सांगली जिल्ह्यात निर्माण झाला आहे.इलेक्ट्रिक शेगडीचा खप अवघ्या तीन दिवसात प्रचंड वाढल्याने,उपलब्ध असणाऱ्या सर्व इलेक्ट्रिक शेगड्याची विक्री झाली आहे, मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक शेगड्या खरेदी केल्याने,अनेक दुकानांमध्ये इलेक्ट्रिक शेगड्या शॉर्टेज झाल्या आहेत.त्यामुळे आता शेगड्यांची बुकिंग घेण्यात येत असून दहा दिवसांच्यासाठी वेटिंग असल्याचं दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे, इलेक्ट्रिक शेगड्यांच्या दुकानातून आढावा घेतला आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Mar 14, 2026 10:34:04
Nanded, Maharashtra:नांदेड मध्येही गॅस साठी काही ठिकाणी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. गॅस सिलेंडर घेण्यासाठी एजंसी बाहेर नागरिक गर्दी करताहेत. ऑनलाईन बुकिंग चा फोन नंबर बंद आहे तर बुकिंग होऊनसुद्धा ओटीपी मिळत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान नांदेड जिल्ह्याला होणाऱ्या गॅस पुरवाठ्यावर कुठलाही परिणाम नाही. नागरिकांनी विनाकारण आगाऊ बुकिंग करू नये असे आवाहन पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे. गॅस सिलेंडर चा काळा बाजार रोखण्यासाठी सर्व तालुका स्तरावर 16 ठिकाणी पथक स्थापन करण्यात आले आहे. काळा बाजार होत असल्यास नागरिकांनी त्याची माहिती द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवण्यात येईल असे पुरवठा विभागाने सांगितले.
87
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 14, 2026 10:24:38
57
comment0
Report
CFChandrakant Funde
Mar 14, 2026 09:51:05
Pune, Maharashtra:एलपीजी’ला पर्यायी इंधनाची स्वदेशी तंत्रज्ञानातून निर्मिती… स्वयंपाकापासून वाहनांपर्यंत वापर शक्य पुणे : आखातातील युद्धामुळे देशात एलपीजीचा तुटवडा निर्माण झालेला असताना एलपीजीला पर्याय ठरू शकणारे ‘डायमिथिल इथर’ (डीएमई) हे इंधन संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानातून तयार करण्याची कामगिरी पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने (एनसीएल) केली आहे. ‘डीएमई’च्या रासायनिक प्रक्रियेसाठी आवश्यक संप्रेरक (कॅटलिस्ट) ‘एनसीएल’ने विकसित केला आहे. ‘डीएमई’चा इंधन म्हणून स्वतंत्रपणे, तसेच ‘एलपीजी’मध्ये मिश्रण करून वापर शक्य असून, ‘डीएमई’च्या प्रायोगिक तत्त्वावरील व्यावसायिक उत्पादनासाठी पिरंगुटनजीक प्रतिदिन २५० किलो क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. ‘एनसीएल’चे संचालक डॉ. आशिष लेले यांनी याबाबतची माहिती दिली. शास्त्रज्ञ डॉ. थिरुमलाईस्वामी राजा, उद्योग भागीदार राजेश दाते, टेक्सॉल इंजिनीअरिंगचे व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार या वेळी उपस्थित होते. भारतात एलपीजी मोठ्या प्रमाणात आयात करावा लागतो. २०२४ मध्ये भारताने २.१ कोटी टन एलपीजी आयात केला. जगभरात ‘डीएमई’चा वापर केला जातो. आता देशात स्वदेशी तंत्रज्ञानातून ‘डीएमई’चे उत्पादन करणे शक्य झाले आहे. डॉ. लेले म्हणाले, ‘डॉ. राजा यांच्या नेतृत्वाखाली ‘डीएमई’च्या संशोधनाला २००४मध्ये सुरुवात झाली होती. आता २०२६मध्ये सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होऊन उत्पादन होण्याच्या स्थितीपर्यंत आले आहे. या दरम्यान ६ एकस्व अधिकार (पेटंट) नोंदवण्यात आले. ‘बायोमास’पासून (जैवइंधन) मिथेनॉल तयार करून त्यावर पुढे रासायनिक प्रक्रियेतून ‘डीएमई’ मिळते. या रासायनिक प्रक्रियेसाठीचा विशेष घट ‘एनसीएल’मध्ये विकसित करण्यात आला. त्यानंतर ‘एनसीएल’मध्ये १२ किलोग्रॅम प्रतिदिन उत्पादन प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आले. आता हे तंत्रज्ञान उद्योगाला हस्तांतरित करून व्यावसायिक पद्धतीने उत्पादन शक्य होणार आहे. त्याची सुरुवात २५० टनांच्या प्रकल्पापासून होत आहे. डीएमई हे एलपीजीला पूर्णपणे पर्याय ठरू शकते. डीएमई एलपीजीच्या तुलनेत दीडपट अधिक कार्यक्षम आहे।
117
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 14, 2026 09:25:55
Shirdi, Maharashtra:प्रसाद लाडू वितरणानंतर साई संस्थानचा आणखी एक मोठा निर्णय... साई प्रसादालयातील भोजन मेनूतही मोठा बदल... दोन भाज्यांऐवजी मिळणार आता एक भाजी, डाळ भाताऐवजी आता खिचडी... प्रसादાલયातील भोजन मेनुटून डाळ भात झाला गायब... आता मिळणार फक्त एक भाजी, चपाती और तांदळाची खिचडी... गैस टंचाईच्या पार्श्वभूमीवर साईसंस्थानचा मोठा निर्णय... उपलब्ध गॅस काटकसरीने वापरण्यावर भर... प्रसाद भोजन बनवताना साई संस्थानचा सोलर प्लांट देखील ठरतोय मोठा आधार... साई संस्थानने घेतलेल्या दोन्ही महत्त्वाच्या निर्णयाबाबत साई संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्याशी बातचीत केलिए आमचे कुणाल जमदाडे यांनी....
166
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 14, 2026 09:24:47
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सांगलीच्या आटपाडीचे सुपुत्र प्रवीण कोळपे यांची हत्तीवरून जंगी मिरवणूक काढण्यात आली आहे. आयपीएस बनलेल्या प्रवीण कोळपेची हत्तीवरून मिरवणूक काढत साखर वाटण्यात आली आहे,विशेष म्हणजे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये आटपाडी शहरातून हे हत्तीवरून मिरवणूक निघाली. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वतः नागरिकांना साखर वाटत जल्लोष साजरा केला आहे. पारंपारिक वाद्यांच्या गजरात आणि हजारो आटपाडीकरांच्या साक्षीने अशी ऐतिहासिक हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली आणि प्रवीण कोळपे यांनी मिळवलेल्या यशाचं आनंद साजरा करण्यात आला.
147
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 14, 2026 09:23:26
Akola, Maharashtra:वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्टेट ऑफ होर्मुझच्या सामुद्रमार्गे भारतीय जहाज सुरक्षितपणे भारतात पोहोचल्याचा केंद्र सरकारचा दावा फेटाळून लावला आहे. हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचा आरोप त्यांनी केला. होर्मुझ परिसरात भारताची सुमारे ३५ जहाजे अद्याप अडकून असल्याचे ते म्हणाले. तसेच खाडी देशांमध्ये जवळपास ११०० भारतीय नागरिक अडकले असून त्यांना तातडीने भारतात आणावे, अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. ते पुढे म्हणाले की हे युद्ध लवकर संपेल असे वाटत नाही. युद्ध सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायल दौऱ्यावर गेले होते, त्या दौऱ्यात नेमकी काय चर्चा झाली याची माहिती देशाला द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. याशिवाय एआय संमेलनात भारताची प्रतिमा खराब झाल्याची टीकाही त्यांनी केली. दरम्यान, अमेरिका या युद्धातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असून सध्या अमेरिका बॅकफूटवर गेल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले.
125
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 14, 2026 09:04:58
211
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Mar 14, 2026 09:03:01
Mumbai, Maharashtra:मुंबई पोलिसांच्या परिमंडळ सात च्या वतीने आज भव्य मालमत्ता प्रदान कार्यक्रम मुलुंड मध्ये पार पडला. अपर पोलीस आयुक्त महेश पाटील, उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांच्यासह या झोन मधून सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या हस्ते या मालमत्ता त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आल्या. यात १०८७ मोबाईल, २३ तोळे सोने, चांदी, दुचाकी आणि रोख रक्कम असे एक कोटी ९२ लाख रुपयांचा ऐवज परत करण्यात आला. अत्याधुनिक पद्धतीने तपास करून हजारो मोबाईल पोलिसानी परत मिळविले आहेत. हे मोबाईल आणि चोरीला गेलेले, हरवलेले हे ऐवज पोलिसानी परत केले. या वेळी पोलिसानी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले तर नागरिकांनी ही पोलिसांचे आभार मानले.
168
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 14, 2026 08:48:36
Satara, Maharashtra:सातारा - भारत चीन सीमेवर कर्तव्य बजावताना ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान 120 इंजिनिअरिंग ग्रुप मध्ये कार्यरत असणारे भारतीय सैन्य दलाचे जवान बाळकृष्ण निकम यांना वीरमरण आले .शहीद जवान बाळकृष्ण निकम यांची पाटण शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली.शहीद जवान अमर रहे च्या घोषणा देत रस्त्याच्या दुतर्फा उभे राहुन नागरिकांकडून शहीद बाळकृष्ण निकम यांना अखेर चा निरोप दिला .त्यांचे पार्थिव त्यांच्या घरी कुटुंबीयांना अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश करत त्यांचं अंतिम दर्शन घेतलं.त्यांच्या मूळ पाटण पिंपळोशी गावी शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.सातारा पोलीस दल आणि लष्करांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली.हजारोंच्या उपस्थिती अश्रू पुर्ण नयनांनी त्यांनी अंतिम निरोप देण्यात आला
144
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 14, 2026 08:12:38
Navi Mumbai, Maharashtra:नेरूळ सेक्टर 26 येथील बामणदे मैदानावर नियोजित 'Formula 4' कार रेसिंग ट्रॅक उभारण्याच्या प्रकल्पा विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आपला विरोध दर्शविलाय. सदर मैदानावर रेसिंग ट्रॅक बनविणे हे स्थानिक खेळाडूंच्या अधिकारावर गदा आणून मैदान नष्ट करण्याचा डाव असून फॉर्मुला वन रेसिंग ट्रॅकचे काम तात्काळ थांबवून पर्यायी जागेचा विचार करावा अशी मागणी शिवसेना नगरसेवक अनिकेत म्हात्रे यांनी केलेय. यासंदर्भात शिवसेना नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने महापौर सुजाता पाटील यांची भेट घेत सकारात्मक निर्णय न झाल्यास नेरुळ ग्रामस्थ्यांच्या सहकार्याने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. नेरूळ येथील ज्या मैदानात हा कार रेसिंग ट्रॅक बनवला जाणार आहे त्या मैदानाचे शोभाभूमीकरण करून स्पर्धा झाली की तो ट्रॅक बुजवणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.
176
comment0
Report
Advertisement
Back to top