Back
एनसीएल का डीएमई इंधन: एलपीजी का देशी विकल्प, 250 किलो/दिन प्रायोगिक उत्पादन शुरू
CFChandrakant Funde
Mar 14, 2026 09:51:05
Pune, Maharashtra
एलपीजी’ला पर्यायी इंधनाची स्वदेशी तंत्रज्ञानातून निर्मिती… स्वयंपाकापासून वाहनांपर्यंत वापर शक्य
पुणे : आखातातील युद्धामुळे देशात एलपीजीचा तुटवडा निर्माण झालेला असताना एलपीजीला पर्याय ठरू शकणारे ‘डायमिथिल इथर’ (डीएमई) हे इंधन संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानातून तयार करण्याची कामगिरी पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने (एनसीएल) केली आहे. ‘डीएमई’च्या रासायनिक प्रक्रियेसाठी आवश्यक संप्रेरक (कॅटलिस्ट) ‘एनसीएल’ने विकसित केला आहे. ‘डीएमई’चा इंधन म्हणून स्वतंत्रपणे, तसेच ‘एलपीजी’मध्ये मिश्रण करून वापर शक्य असून, ‘डीएमई’च्या प्रायोगिक तत्त्वावरील व्यावसायिक उत्पादनासाठी पिरंगुटनजीक प्रतिदिन २५० किलो क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येत आहे.
‘एनसीएल’चे संचालक डॉ. आशिष लेले यांनी याबाबतची माहिती दिली. शास्त्रज्ञ डॉ. थिरुमलाईस्वामी राजा, उद्योग भागीदार राजेश दाते, टेक्सॉल इंजिनीअरिंगचे व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार या वेळी उपस्थित होते. भारतात एलपीजी मोठ्या प्रमाणात आयात करावा लागतो. २०२४ मध्ये भारताने २.१ कोटी टन एलपीजी आयात केला. जगभरात ‘डीएमई’चा वापर केला जातो. आता देशात स्वदेशी तंत्रज्ञानातून ‘डीएमई’चे उत्पादन करणे शक्य झाले आहे.
डॉ. लेले म्हणाले, ‘डॉ. राजा यांच्या नेतृत्वाखाली ‘डीएमई’च्या संशोधनाला २००४मध्ये सुरुवात झाली होती. आता २०२६मध्ये सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होऊन उत्पादन होण्याच्या स्थितीपर्यंत आले आहे. या दरम्यान ६ एकस्व अधिकार (पेटंट) नोंदवण्यात आले. ‘बायोमास’पासून (जैवइंधन) मिथेनॉल तयार करून त्यावर पुढे रासायनिक प्रक्रियेतून ‘डीएमई’ मिळते. या रासायनिक प्रक्रियेसाठीचा विशेष घट ‘एनसीएल’मध्ये विकसित करण्यात आला. त्यानंतर ‘एनसीएल’मध्ये १२ किलोग्रॅम प्रतिदिन उत्पादन प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आले. आता हे तंत्रज्ञान उद्योगाला हस्तांतरित करून व्यावसायिक पद्धतीने उत्पादन शक्य होणार आहे. त्याची सुरुवात २५० टनांच्या प्रकल्पापासून होत आहे. डीएमई हे एलपीजीला पूर्णपणे पर्याय ठरू शकते. डीएमई एलपीजीच्या तुलनेत दीडपट अधिक कार्यक्षम आहे।
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 14, 2026 11:07:550
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 14, 2026 11:07:130
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 14, 2026 11:05:200
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 14, 2026 10:49:51106
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 14, 2026 10:46:1046
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 14, 2026 10:34:04134
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 14, 2026 10:24:38124
Report
AKAMAR KANE
FollowMar 14, 2026 10:04:47110
Report
KJKunal Jamdade
FollowMar 14, 2026 09:25:55166
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 14, 2026 09:24:47150
Report
PNPratap Naik1
FollowMar 14, 2026 09:23:39107
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 14, 2026 09:23:26125
Report
MAMILIND ANDE
FollowMar 14, 2026 09:20:22173
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 14, 2026 09:04:58211
Report