Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210

नवी मुंबई में महिला अत्याचार और साइबर अपराध बढ़े; पुलिस ने खुलासे का दावा किया

SNSWATI NAIK
Feb 06, 2026 17:01:05
Navi Mumbai, Maharashtra
Anchor -: नवी मुंबई पोलीसांची वार्षिक पत्रकार परिषद आज संपन्न झालेय. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत वर्षभरात 7835 गुन्हे दाखल झाले असून यातील 6276 म्हणजेच तब्बल 80% गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलेय. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे आणि सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून अमली पदार्थ विरोधी गुन्हे रोखण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये विशेष पथकाची स्थापना करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी व्यक्त केलेय.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ADANIRUDHA DAWALE
Feb 06, 2026 16:47:49
Amravati, Maharashtra:एमआयएमच्या नगरसेविकेचे भाजपला मतदान; मिराबाई कांबळेंची पक्षातून हकालपट्टी. नगरसेवक पद रद्द करण्यासाठी अमरावती महानगरपालिका आयुक्तांना एमआयएमचे पत्र. अमरावती महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकांमध्ये एमआयएमच्या नगरसेविका मिराबाई कांबळे यांनी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन भाजपच्या महापौर उमेदवाराला आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या उपमहापौर पदाच्या उमेदवाराला मतदान केल्याने या कृतीची गंभीर दखल घेत एमआयएम पक्षाने तडकाफडकी पक्षातून निष्कासित करण्याचा निर्णय घेतला आहे. गटनेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या सर्व 12 नगरसेवकांसाठी अधिकृत व्हीप (पक्षादेश) जारी करण्यात आला होता. मात्र कांबळे यांनी विचारधारेच्या विरोधात जाऊन भाजपला मतदान केले. पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई अटळ असल्याचे सांगत गटनेत्यांनी त्यांच्या हकालपट्टीची अधिकृत घोषणा केली आहे. तर मीराबाई कांबळे यांचा नगरसेवक पद रद्द करा यासाठी एमआयएमच्या वतीने अमरावती महानगरपालिका आयुक्तांना पत्रदेखील देण्यात आलं आहे.
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 06, 2026 16:45:59
Thane, Maharashtra:भिवंडी भाजपमध्ये महापौर पदासाठी रस्सीखेच सुरु ; भाजपचे अनेक नगरसेवक अज्ञातस्थळी महानगरपालीकेच्या निवडणुकांचा निकाल लागून 20 दिवस उलटूनही भिवंडी महानगरपालिकेत महापौर पदासाठी अजूनही कोकण आयुक्तानाकडून कार्यक्रम जाहीर न झाल्याने भिवंडी भाजपचे 22 नगरसेवकांमध्ये दोन गट तयार झाल्याने भाजपचे काही नगरसेवक केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पाटील यांना महापौर पदासाठी पाठिंबा देत आहेत तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून अधिकृत पत्र जाहीर करून नारायण चौधरी यांचे नाव अधिकृत केल्याचे पत्र देण्यात आले आहे. भिवंडी पालिकेत 30 सदस्यांसह मोठा पक्ष असलेल्या काँग्रेस सह भाजपा व शिवसेना यांनी सुद्धा महापौर पदावर दावा केला असून त्यांना मॅजिक फिगर 46 जमवण्यासाठी समाजवादी पक्षाच्या 6 कोणार्क विकास आघाडीच्या 4 व भिवंडी विकास आघाडीच्या 3 नगरसेवकांची गरज आहे.त्यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीत घोडेबाजार होणार अशी चिन्हे आहेत. तर भाजपतील अंतर्गत गटबाजी दिसून येत आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 06, 2026 13:01:31
Nagpur, Maharashtra:नागपूर - चंद्रपूर काँग्रेसमधील दोन गट नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात एकत्र पोहचले आहे... विजय वडेट्टीवार गट आणि धानोरकर गटाचे सर्व मिळून 27 नगरसेवक गट नोंदणी करता विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले आहे - चंद्रपूर महानगरपालिकेचा निकाल लागल्यापासून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात सत्ता संघर्षातून दोन गट पडले..... दोघांमधील वाद गल्ली ते दिल्लीपर्यंत गाजला अखेर आता तोडगा निघाला. दोन्ही गटाचे नगरसेवक आज नागपुरात विभागीय कार्यालयात एकत्र आलेत. गट नोंदणी करता उपस्थित आहे. - काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी गटनेता म्हणून राजेश अडूर असणार आहे
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Feb 06, 2026 12:52:03
Pandharpur, Maharashtra:सोलापूर भाजप जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एक गंभीर बाब उघडकीस आली आहे. भाजपचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार यांचे सांगोला नगरपालिका क्षेत्रातील मतदान यादीत नाव आहे. त्यांच्या कडे UFM 6597926 या क्रमांकाचे ओळख पत्र आहे. सध्या त्यांनी चोपडी जिल्हा परिषद गटातून भाजप कडून उमेदवारी दाखल केली आहे. त्यांचे नाव सांगोला तालुक्यातील वासुद गावातील मतदार यादीत आहे. तिथे त्यांचे UFM 8404121 क्रमांकाचे ओळखपत्र आहे. याबाबत शिवसेना उबाठाचे नेते आर वाय घुटुकडे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान हा प्रकार उघडकीस आणल्याने शिवसेना संघटक आर वाय घुटुकडे यांना सावंत यांच्या समर्थकांनी धमक्या दिल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदान पूर्वी मोठी खळबळ उडाली आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 06, 2026 12:37:34
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपति संभाजीनगर में आज महापौर और उपमहापौर पद के लिए आवेदन भरने का अंतर्नयन दिन था। शिवसेना के नाटकीय घटनाक्रम में एकनाथ शिंदे ने भाजपा को सीधे फोन कर उपमहापौर पद के उम्मीदवार का नाम बताया, जिससे संजय शिरसाठ और कुछ नगरसेवक नाराज हुए और उन्होंने शिंदे के विरोध में आवेदन भरने का निर्णय लिया। दोपहर चार बजे तक यह नाटक चला और भाजपा ने शिंदे के उम्मीदवार का नाम पत्रकार परिषद में घोषित किया। पालकमंत्री संजय शिरसाठ और उनकी टीम में भी असहमति नजर आई; शिरसाठ और राजेंद्र जंजाल के बीच चुनावी फूट से शिवसेना को नुकसान हुआ। इसके बावजूद शिरसाठ के समर्थक नाराजगी दिखाते रहे, पर पार्टी के अनुसार उन्हें व्यस्त होने का हवाला देकर स्थिति स्पष्ट हुई। अंत में एकनाथ शिंदे ने शिरसाठ और समर्थक को कड़ा संदेश देकर अर्ज भरने से रोका और बहस पर विराम लगा। संभाजीनगर में दिनभर मौजूदा नाट्यचर्चा बनी रही।
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 06, 2026 12:08:28
Navi Mumbai, Maharashtra:मुंबईत शरद पवारांचा एकमेव नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देणार आहेत यामुळे ठाकरे च्या शिवसेनेला धक्का बसला असून , रावराणे आज कोकण भवन मद्ये आले होते निवडणूकीत सोबत असणारी शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादी- शरद पवारांचे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठींबा मुंबई महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी शिंदेंना पाठींबा देण्याकरता एकत्र प्रभागातील निधीकरता, विकासाकरता महायुतीसोबत जात आहे । याबाबत सध्या पवार घराण्यामध्ये दुःख असल्यामुळे त्यांच्याशी बोलणं झालं नाहीये मात्र येत्या सात तारीख नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मुंबईत आल्यावर त्यांचाशी बोलणार आहे。
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 06, 2026 11:35:06
Washim, Maharashtra:विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावणारी व मानवी शरीराच्या अद्भुत रचनेचे रहस्य उलगडणारी ‘कुतूहल’ विज्ञान प्रदर्शनी आजपासून वाशीम येथे सुरू झाली है. विज्ञान भारती नागपूर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,वाशीम यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते ८ फेब्रुवारीदरम्यान या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनीत हृदय, मेंदू, फुफ्फुसे यांसह मानवी अवयवांची रचना व कार्यपद्धती प्रत्यक्ष मॉडेल्सद्वारे समजावून सांगण्यात येणार आहे. तसेच सीटी स्कॅन,एमआरआय, हृदयशस्त्रक्रिया व हार्ट अटॅकसारख्या आजारांबाबत माहिती देण्यात येत आहे.विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे व विज्ञान जन सामान्यांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा उद्देश असून सुमारे ५० हजार विद्यार्थी या प्रदर्शनीला भेट देणार आहेत.आज मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनीला भेट देत आहेत.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 06, 2026 11:04:34
Kalyan, Maharashtra:महापौर निवासस्थानाची दुरवस्था; केडीएमसी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुन्हा जनतेच्या करोडो रुपयांची उधळपट्टी. महापौर बगल्याला लागली वाळवी.. नवनिर्वाचित महापौर बंगल्यात राहणार की पूजा करूनच जाणार... ANC- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर निवासस्थानाची दुरवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. २०१० साली जनतेचे लाखो रुपये खर्च करून हे महापौर निवासस्थान बांधण्यात आले होते. मात्र, रस्त्यांच्या वादग्रस्त कारणांमुळे हे निवासस्थान सुरुवातीपासूनच चर्चेत राहिले. बांधकामानंतर अनेक वर्षे हा बंगला वापराविना ओस पडून होता. यानंतर पुन्हा लाखो रुपये खर्च करून बंगल्याची डागडुजी करण्यात आली. मात्र, तत्कालीन महापौरांनी केवळ बंगल्याची पूजा करून त्यामध्ये वास्तव न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा हा बंगला वापरात आला नाही. कोरोना काळापासून तर हा बंगला पूर्णपणे बंद अवस्थेत असून, देखभालीअभावी त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. सध्या बंगल्यातील संपूर्ण लाकडी फर्निचर खराब झाले असून, अनेक ठिकाणी वाळवीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. नियमित देखभाल व संरक्षण न केल्यामुळे महापौर निवासस्थानाची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली आहे. केडीएमसी प्रशासनाने या बंगल्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने पुन्हा एकदा दुरुस्तीसाठी जनतेच्या लाखो रुपयांची उधळपट्टी होणार आहे आढावा घेतला आहे आतिश भोईर यांनी
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 06, 2026 11:03:35
Nashik, Maharashtra:लोकनेते अजित दादा यांच्या कार्याची महती आणि जीवनप्रवास भावी पिढीला प्रेरणादायी ठरावा, यासाठी नवीन नाशिक येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे त्यांचे भव्य स्मृती स्थळ उभारण्यात यावे, अशी मागणी अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांनी केली आहे. महासभेच्या पहिल्या दिवशी शहाणे यांनी हा प्रस्ताव मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले. मुकेश शहाणे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, अजित दादांना खरी श्रद्धांजली वाहायची असेल, तर त्यांचे काम पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. दादांच्या बालपणापासूनचा प्रवास, त्यांची शिस्तबद्ध कार्यशैली आणि विकासकामांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हे स्मृती स्थळ महत्त्वाचा दुवा ठरेल. या प्रस्तावात दादांचा पूर्णाकृती किंवा अर्धाकृती पुतळा उभारण्यात यावा, यासाठी तज्ज्ञ आर्किटेक्ट आणि मंत्री छगन भुजबळ, महापौर, आयुक्त यांच्याशी चर्चा करून आराखडा तयार करण्याची विनंती करण्यात आली आहे. येणाऱ्या महासभेत हा ठराव तातडीने मंजूर होऊन राज्य शासनाकडे पाठवला जाईल आणि लवकरच या कामाला सुरुवात होईल, असा विश्वासही शहाणे यांनी व्यक्त केला आहे. या स्मृती स्थळासाठी महापौर, आयुक्त आणि राज्य शासनाने लवकरात लवकर मंजुरी देऊन घोषणा करावी, अशी शहाणे यांची मागणी आता जोर धरत आहे. यामुळे अजित दादांसारख्या एका लोकनेत्याच्या आठवणींना कायमस्वरूपी उजाळा मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 06, 2026 10:50:43
Nagpur, Maharashtra:नागपूर ऍडव्हाटेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सव उदघाट्न आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनात झालेल्या एडवांटेज विदर्भ औद्योगिक महोत्सवाच्या माध्यमातून विदर्भाच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे सामान्य करार करण्यात आले. आज उद्घाटन सोहळाला नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, पंकज भोयर उपस्थित होते, 23 देशाचे विशेष प्रतिनिधी आले आहेत. नागपूर - (अडवांटेज विदर्भ- खासदार औद्योगिक महोत्सव उद्घाटन समारंभ) नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री - भाषण - विदर्भाचा सर्वांगीण विकास व्हावा या कल्पनेतून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही कार्य करत आहोत - समाजाच्या सर्वच क्षेत्रात कार्य करत असताना सर्वात मोठं जे क्षेत्र आहे त्यात रोजगार मिळतात ते उद्योग आणि व्यापार हे क्षेत्र आहे - विदर्भात लोह खनिज, कोळसा, आणि मँगनीज खनिज आहे - आणि संत्रा आणि कापूस शेतकऱ्यांवर लक्ष दिलं आहे - येत्या पाच वर्षात ए आय चा वापर करून संत्र्याचे तंत्रज्ञानाला आम्ही बदललेले आहे - येत्या पाच वर्षात आमच्या संत्र्याचे उत्पादन पाचपट वाढेल असा विश्वास आहे - विदर्भातील पर्यटन हे महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे त्यासाठी महाराष्ट्र सरकार यांचा धन्यवाद देतो - मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात जी टुरिझम पॉलिसी बनली ते शंभर टक्के मंजूर करण्यात आले आहेत - गडचिरोली मध्ये असलेल्या लोहखनिजाचा उत्खनन होत नव्हतं मात्र तिथे नक्षलवाद फोफावला होता - लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या वतीने आम्ही गडचिरोली मध्ये एकल विद्यालय गेल्या 27 वर्षापासून चालवत आहोत - उद्योगपती हे संपत्ती नाही वाढवत तर ते रोजगार वाढवतात - विदर्भात आलेल्या उद्योग हे विदर्भाचा विकास करतील - विदर्भात दहा हजारावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे, शेतकऱ्यांच्या तरुणांना रोजगार नाही, सिंचनाची सुविधा नव्हती, रस्ते आता चांगले झाले, विजेची कमतरता नाही, आता टेलीकम्युनिकेशनची सुविधा झाली आहे - हा जो बदल झालेला आहे तो विदर्भाच्या विकासासाठी, विदर्भाच्या पोटेन्शिअल साठी गती देणारी आहे आणि हाच विदर्भाचा विकास आहे - मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळे विदर्भाच्या विकासाला आणखी गती आली आहे - बिझनेस मॅनेजमेंटच्या स्टुडन्ट असल्यामुळे मानतो उद्योगात पैसा आणि टेक्नॉलॉजी पेक्षा जुगाडू माणसाची गरज असते - विदर्भाची मानसिकता आता बदलत चालली आहे अगोदर येथे कोणताही व्यक्ती आला तर मी म्हणायचं की तुमची मनोवृत्तीच भुक्कड आहे - विदर्भात हजार कोटींच्या वर उद्योग टाकणारे शंभर उद्योजक नाही भेटणार तोपर्यंत विदर्भात बदल शक्य नाही - सत्यनारायण नुवाल रेल्वे स्टेशनवर झोपायचे, आज ते जगात प्रसिद्ध झाले आहे, त्यांच्यामुळे भारत जगात डिफेन्समध्ये सामोर जाणार आहे - प्रभाकरन यांनी स्टील मध्ये फार हिंमतीने काम केलं आहे, गडचिरोली मध्ये मी फार इंटिरियर मध्ये जायचो, - आता गडचिरोली महाविद्यालयापासून रुग्णालय येत आहे सकाळी तिथे चालण्याची सोय नव्हती - जगातील सर्वात चांगलं लोहखनिज हे गडचिरोलीत मिळतं - जगाचा सर्वात चांगला स्टील हब हे गडचिरोली बनत आहे - गडचिरोली साठीचे मॅनपावर लागणार आहे ते विदर्भातील सर्व जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे हे आमचं मिशन आहे - विदर्भाचा विकास म्हणजे केवळ नागपूरचा विकास नाही - ट्रेन मॅन पॉवर साठी देखील आणि प्रयत्न करत आहोत - अदानी इथे आले आहेत, ते इंटरनॅशनल एअरपोर्ट करत आहेत त्यासाठी दहा हजार स्किल मॅनपावर लागेल - ते विमानांचा एम आर ओ संचालित करत आहेत - जर स्किल मॅन पॉवर मिळणार नाही तर ते कुठून आणायचे यासाठी नागपूर विद्यापीठाने प्रयत्न करायला हवे नागपुर मुख्यमंत्री फडणवीस भाषण - अधिक गती आणि उर्जेने आपण विदर्भाच्या विकासासाठी एकत्रित आलो आहे - गडकरींच्या नेतृत्वाखाली विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्न केले - पण एक दुःख आमच्या मनात होत ऑटोमोबाइल इंडस्ट्री विदर्भात यावी यासाठी आम्ही अनेक प्रयत्न केले - अखेर महिंद्रा अँड महिंद्रा विदर्भात आले मी त्यांना धन्यवाद देतो - नागपूरात ऑटोमोबाईल इंडस्ट्रु मध्ये मोठा करार झाला - नेक्स्ट जनरेशन EV जे ग्लोबल मार्केट साठी देखील महत्वाची असेल - नागपुरातील पहिली ऑटोमोबाईल इंडस्ट्री महिंद्रा अँड महिंद्रा - ऑटोमोबाइल इंडस्ट्री मध्ये पुणे लीडर होता त्याचा विस्तार नागपूर, नाशिक, संभाजी नगर पर्यंत होत है - महिंद्रा 2028 मध्ये नागपुर मध्ये प्रत्यक्ष प्रोडक्शन ला सुरुवात करणार, आम्ही सरकार म्हणून त्यांना पूर्ण सहकार्य विद्युत वेगाने करू - 10 दिवसात 10 कोटींची इन्व्हेस्टमेंट असलेला MOU झाला - गिगा कास्टिंग टेक्नॉलॉजी नागपूर मध्ये येणार त्याचा MOU काही मिनिटात करण्यात आला - 3 व्हीलर EV साठी रिबुशनैज करणारी गुंतवणूक - 2500 करोड गुंतवणूक 35 लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार मिळेल - एका काळात आम्ही जे बोलायचो ते आज प्रत्यक्षात करत आहे - 2014 नंतर सगळं प्रत्यक्षात उतरत असल्याने नागपूर, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर देशाचं स्टील हब होत आहे - भविष्यात आम्ही गडचिरोली मध्ये नॅचरल गॅस घेऊन जाऊ - गडचिरोली उद्योगिक विकासाचा परिणाम चंद्रपूर वर्धा मध्ये दिसतोय - अमरावती मध्ये टेक्सटाईल पार्क तयार केले - एशिया मधील सगळ्यात आधुनिक एव्हीएशन स्कुल अमरावती मध्ये तयार केलं जातंय त्याचा फायदा बाजूच्या जिल्हानांना होतो - अमरावती, अकोला विमानतळ विस्तार होतोय, गडचिरोलीचा रण वे फुलस्केल रनवे असणार - रेल, एयर दोन्ही दळणवळण क्षेत्रात विदर्भ समोर येतोय - टियर दोन सिटी मध्ये नागपूर संभाजी नगर मध्ये लॉजीस्टिक, जिजीसी क्षेत्रात गुंतवणूक कशी येईल यासाठी प्रयत्न केले जात आहे - ज्या क्षेत्रात उद्योग नाही त्या भागात उद्योग आणण्यावर भर आहे - डाओस मधून त्या भागासाठी उद्योग आणण्यात यश मिळालं - गडचिरोली, धुळे, नंदूरबार मध्ये उद्योग आणण्यात यश आलं - वाशीम मध्ये उद्योग आणायचे आहेत - महाराष्ट्रात नदी जोड प्रकल्प हाती घेतला आहे, नळगंगा वैनगंगेला जोडण्यासाठी 500 किमीची नदी तयार केली जाणार - दुष्काळ प्रवण भागात समृद्ध भाग तयार करून उद्योगांना देखील पाणी देणार - औद्योगिक विकासासाठी उद्योजकांची महत्वाची भूमिका असते - संभाजी नगर च्या विकासात तिथल्या उद्योजकांची महत्वाची भूमिका - (मुख्यमंत्री बोलत असताना अचानक लाईट आणि माईक बंद झालेत, काही काळ भाषण थांबले) - ऊर्जा मंत्राच्या भाषणात ऊर्जा गेली,पण आमची ऊर्जा गेली नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणा दरम्यान व्यासपीठवर लाईट गेले.. माईक पण थोडा अवधी बंद होता मात्र लाईट आल्यावर फडणवीस बोलले की ऊर्जा मंत्री के भाषण मे ऊर्जा चली जाये --लेकिन हमारी ऊर्जा चल रही है
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 06, 2026 10:46:58
Chendhare, Alibag, Maharashtra:जयंत पाटील यांच्या सुनेत्रा पवारांवरील टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर   महाराणी येसुबाईंच्या कर्तव्याची करून दिली आठवण   अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी तातडीने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावरून शेकापचे सरचिटणीस जयंत पटेल यांनी टीका केली होती. ते काही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान पद नव्हतं. १५ दिवसांनी शपथ घेतली असती तर काय बिघडलं असतं असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्त्या सायली दळवी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. दळवी यांनी यावेळी महाराणी येसूबाई यांची आठवण करून दिली. संभाजी राजांच्या निधनानंतर दुःख बाजूला ठेवत येसूबाईनी रायगड झुंजत ठेवला होता. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पोरका झाला होता. पक्ष सावरण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना काळ कधीच माफ करणार नाही, असं सायली दळवी म्हणाल्या.
0
comment0
Report
Advertisement
Back to top