Back
एमआईएम की नगरसेविका ने भाजपा को मतदान किया, मिराबाई कांबळे को पार्टी से निष्कासित
ADANIRUDHA DAWALE
Feb 06, 2026 16:47:49
Amravati, Maharashtra
एमआयएमच्या नगरसेविकेचे भाजपला मतदान; मिराबाई कांबळेंची पक्षातून हकालपट्टी. नगरसेवक पद रद्द करण्यासाठी अमरावती महानगरपालिका आयुक्तांना एमआयएमचे पत्र. अमरावती महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकांमध्ये एमआयएमच्या नगरसेविका मिराबाई कांबळे यांनी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन भाजपच्या महापौर उमेदवाराला आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या उपमहापौर पदाच्या उमेदवाराला मतदान केल्याने या कृतीची गंभीर दखल घेत एमआयएम पक्षाने तडकाफडकी पक्षातून निष्कासित करण्याचा निर्णय घेतला आहे. गटनेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या सर्व 12 नगरसेवकांसाठी अधिकृत व्हीप (पक्षादेश) जारी करण्यात आला होता. मात्र कांबळे यांनी विचारधारेच्या विरोधात जाऊन भाजपला मतदान केले. पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई अटळ असल्याचे सांगत गटनेत्यांनी त्यांच्या हकालपट्टीची अधिकृत घोषणा केली आहे. तर मीराबाई कांबळे यांचा नगरसेवक पद रद्द करा यासाठी एमआयएमच्या वतीने अमरावती महानगरपालिका आयुक्तांना पत्रदेखील देण्यात आलं आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowFeb 06, 2026 17:01:050
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 06, 2026 16:45:590
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 06, 2026 16:34:310
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 06, 2026 15:31:060
Report
AKAMAR KANE
FollowFeb 06, 2026 13:01:310
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 06, 2026 13:01:190
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 06, 2026 12:52:030
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 12:37:340
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 06, 2026 12:08:280
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 06, 2026 11:35:060
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 06, 2026 11:04:340
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 06, 2026 11:03:350
Report
AKAMAR KANE
FollowFeb 06, 2026 10:50:430
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 06, 2026 10:46:580
Report