Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane401105

मिरा-भायंदर महापौर की लाइव प्रक्षेपण बैन: लोकतंत्र पर सवाल उठे

PTPRATHAMESH TAWADE
Feb 21, 2026 05:45:16
Mira Bhayandar, Maharashtra
मिरा भाईंदर ब्रेक मिरा-भाईंदर पालिकेत 'लाईव्ह' प्रक्षेपणावर महापौर डिंपल मेहेताची बंदी लोकशाहीचा आवाज दाबल्याचा मनसेचा आरोप "मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेचे थेट प्रक्षेपण आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यावर महापौरांनी बंदी घातल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. या निर्णयाला भाजप नगरसेविका नीला सोन्स यांनी कडाडून विरोध केला असून, जनतेचे प्रश्न जनतेसमोर येणे हा त्यांचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. पारदर्शकतेचा दावा करणाऱ्या पालिकेने हा गोपनीयतेचा घाट का घातला, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. या निर्णयामुळे लोकशाही मूल्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शहरात नवा वाद पेटला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VNVishal Nagesh More
Feb 21, 2026 08:50:20
Malegaon, Maharashtra:*Breaking पॅकेज स्टोरी... विशाल मोरे, मालेगाव* अखेर दादा भुसेंनी संजय राऊत यांच्याविरुद्धचा खटला घेतला मागे. संजय राऊत यांनी मालेगावकरांची व शेतकऱ्यांची केली दिलगिरी व्यक्त. संजय राऊत यांनी दिला माफीनामा. मंत्री दादा भुसे यांनी गिरणा साखर कारखाना प्रकरणी संजय राऊत यांच्यावर बदनामीकारक फौजदारी खटला दाखल केला होता. मालेगाव कोर्टात ते गैरहजर राहिल्याने त्यांना दोन वेळा 1 हजार तर दोन वेळा 5 हजार असा दंड ठोठावण्यात आला होता. त्यामुळे आज ते मालेगाव कोर्टात हजर झाले. मात्र या प्रकरणात वेगळा ट्विस्ट निर्माण झाला असून संजय राऊत यांनी मालेगाव करांची आणि शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त केल्याने दादा भुसे यांनी खटला मागे घेतला. मंत्री दादा भुसे आम्हाला दोघांना न्यायालयाने पहिले आणि विषय संपला आहे. ज्यांच्यामुळे हा विषय आला ते अद्वय हिरे दुसऱ्या पक्षात गेले. दादा भुसे आणि माझे चांगले संबंध आहेत. माझ्याकडून चुकीच्या आधारावर वक्तव्य केलं आहे. अद्वय हिरे यांनी चुकीची माहिती दिली. आता आम्हाला हे संपवायचे आहे. गिरणा सहकारी कारखान्याच्या शेअर्समध्ये 178 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप खा.संजय राऊत यांनी केला होता.. तशी बातमी सामना या वृत्तपत्रातून छापली होती.. या बातमीने मंत्री दादा भुसे यांची बदनामी झाल्याने मंत्री भुसे यांनी राऊत यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता.. मात्र या बातमीची खा.संजय राऊत यांनी सत्यता पडताळून बघितली त्यात चुकीचा आधार होता.. म्हणून आज मा.न्यायालयात संजय राऊत यांनी माफीनामा लिहून देत समस्त मालेगावकर जनता, शेतकरी व सभासद यांची दिलगिरी व्यक्त केल्याने मंत्री दादा भुसे यांनी अब्रुनुकसानीचा खटला आज न्यायालयात मागे घेतला असल्याची ॲड. सुधीर अक्कर यांनी याबाबत माहिती दिली.. जेव्हा खटला दाखल केला होता त्यावेळचे लेख बघा, आता शेपटी घालायचे काम सुरू आहे. संजय राऊत नाक घासून माफी मागणार आईं अशा प्रकारचे आरोप त्यांनी दादा भुसे यांच्यावर केले होते. संजय राऊत तुम्हाला अशीच माफी मागावी लागणार आहे. राऊत तुम्हाला रोज माफी मागावी लागणार आहे. मालेगाव कोर्टात त्यांना माफी मागावी लागते. तुम्ही तिथे गेले आहात तर एक काम करा तिथे टिपू सुलतान यांचा जय जय कार करणारे आहे एकंदरीत आता हे प्रकरण बरेच दिवस चर्चेत राहील आणि सर्वच राजकीय स्तरातून यावर आता प्रतिक्रिया आल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 21, 2026 08:48:40
Shirdi, Maharashtra:Anc - शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरात दर अर्ध्या तासाने कपडे बदलून भाविकांच्या गर्दीत मिसळून चोरीचा डाव आखणाऱ्या आंध्र प्रदेशातील टोळीचा शिर्डी पोलिसांनी पर्दाफाश केलाय. दोन महिला, एक पुरुष आणि एका बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींकडून महागड्या कंपनीचे मोबाइल आणि रोख रक्कम जप्त केली आहे.. V/O - साई मंदिर परिसरात एका भाविकाची पर्स ब्लेडने कापली गेल्याची tक्रार दाखल झाल्यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत असताना पोलिसांना चक्रावून टाकणारी माहिती समोर आली.. काही महिला आणि पुरुष साई मंदिर परिसरात संशयास्पदरीत्या फिरताना सीसीटीव्हीत दिसून आले.. संशयितांना ताब्यात घेतले असता एक पुरुष आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला.. उर्वरित एक पुरुष, दोन महिला आणि एक अल्पवयीन बालक यांना ताब्यात घेण्यात आले.. झडतीदरम्यान त्यांच्याकडून 10 मोबाइल फोन, 1170 रुपये रोख रक्कम, ब्लेड्स आणि कटर तसेच अल्पवयीन बालकाकडूनही एक मोबाइल हस्तगत करण्यात आलाय.. बालकाला तातडीने चिल्ड्रन होममध्ये दाखल करण्यात आले आहे.. ही टोळी भाविकांसारखाच वेश परिधान करून गर्दीत मिसळत होती.. महिलांनी सुरुवातीला पंजाबी ड्रेस घातला होता, तर नंतर साडी परिधान करून पुन्हा परिसरात वावरल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले.. चोरट्यांची ही पद्धत पाहून पोलिसही अचंबित झाले.. या वेशांतराच्या माध्यमातून पोलिस आणि मंदिर सुरक्षारक्षकांची दिशाभूल करण्याचा त्यांचा डाव होता.. मात्र पोलिसांच्या चाणाक्ष नजरेमुळे शिर्डीत या परप्रांतीय टोळीचा पर्दाफाश झालाय..
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 21, 2026 08:38:00
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली में शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान के पाचव्या वर्धापन दिनानिमित्त किल्ले संवर्धन मोहीम यांचा शुभारम्भ करण्यात आला आहे. सांगलीतील इतिहास कालीन राजवाडा परिसरातील गणेश दुर्ग किल्ल्याचा स्वच्छता मोहीम राबविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारम्भ करण्यात आला. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आणि गणपती पंचांयतन संस्थांनच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी गड संवर्धन करण्याची सामूहिक शपथ घेण्यात आली, त्याचबरोबर जिल्ह्यातील बारा गड संवर्धन आणि स्वच्छता करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 21, 2026 08:35:46
Beed, Maharashtra:बीड: देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे आतापर्यंत त्याच्या गावी तीन वेळा येऊन गेल्याचा दावा धनंजय देशमुख यांनी केलाय. कृष्णा आंधळे गावी आल्याची माहिती त्यांनी सीआयडीला देखील दिल्याचं सांगितले. कृष्णा आंधळे मोबाईल वापरत नाही. मात्र त्याला जेल बंद कसे करायचे याचा विचार गरजेचा आहे. आमच्या कुटुंबाला या आरोपी पासून धोका आहे. हे आरोपी शैतानी वृत्तीचे असून कृष्णा आंधळेला अटक करून त्याची दिंड जिल्हाभरात काढावी अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली. आज बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात देशमुख हत्या प्रकरणात सुनावणी पार पडली. याच सुनावणी वेळी धनंजय देशमुख यांनी माध्यमांना याबाबत माहिती दिलीय. तर सुप्रीम कोर्टात येत्या 26 तारखेला वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. याबाबत कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. आमचे म्हणणे आम्ही न्यायालयात देणार असल्याचं देशमुख यांनी यावेळी म्हटलं. मागील दीड वर्षांपासून देशमुख कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 21, 2026 08:32:48
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:चंद्रकांत पाटील... ऑन डिपेक्स उद्घाटन. - यामुळे अनेक तरुण तरुणींना मार्ग मिळतो. आज त्या उद्घाटनासाठी आलो होतो, लोकांना आवाहन करतो की प्रोत्साहन द्यायला पाहिजे. इतरांचे शोध आपण वापरत होतो, मात्र आपले तरुण तरुणी प्रोत्साहन मिळत असल्याने शोध लावत आहे. मोदींचे स्वप्न आहे. देश आर्थिक परिस्थितीत एक नंबरवर आले पाहिजे . त्याचे प्रोत्साहन dipex आहे. ऑन सभागृह - विरोधीपक्ष नेता रिक्त. सरकारने सुचवायचं असत ,टेक्निकल अडचणी आहे. बरेच दिवस निर्णय करत नाही. मात्र या आदिवेशनात मार्ग निघेल आशिवापेक्षा... नेता असावा की नाही माहीत नाही मात्र विरोधी पक्ष असावा.आता तर दुर्बिण घेऊन विरोधी पक्ष शोधावा लागतोय. दुपार होत होता सभागृह रोडवतो, मंत्र्याला विषय मांडायला उत्साह नसतो... विरोधी पक्ष नेता लोकांचे प्रश्न मांडतो. -------- ऑन भुजबळ राज्यसभा... - तुमच्याकडे काही माहिती असेल तर मला द्या, मला माहिती नाही. ऑन प्राध्यापक भरती. - प्राध्यापक भरतीसाठी निर्णय झाला आहे. - 4500 प्राध्यापकांची भरती होईल. --------- Ai समिट - राहुल गांधी हल्लागुल्ला करून देशाची प्रतिमा खराब करीत आहे. एवढे मोठे इव्हेंट होते. त्यात आपण काय दाखवले.? जेवढे करता येईल तेवढे निषेध.अशाप्रकारे जगातील रिक्वायरमेंट पूर्ण केल्यास भारत पुढे जाईल. ऑन सरन्यायाधीश - ते मोठे व्यक्तिमत्व आहे. ऑन मराठी शाळा बंद पडत आहेत. - पालकांनी पाहिले ठरविले पाहिजे, वेळ पडली तर घरी शिकवेल पण मराठी शाळेत शिकवेल. मी स्वत मुंबई महानगर पालिकेत शिकलो, अशा भाषण करणी उद्धव ठाकरे सहित आपली मुले कुठे शिकतात ते पाहावे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 21, 2026 08:18:51
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अनाधिकृत बॅनर्स काढताना मुकुंदवाडीत महापालिका कर्मचाऱ्यांचा शॉक लागून मृत्यू अमोल दिनकर जाधव (वय 27 रा. मुकुंदवाडी, संजयनगर ) असे मृत कर्मचार्याचे नाव आहे. जखमी रवी रणधीर रिडलाॅन (वय 38) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कुटुंबीयांचा आक्रोश; मुकुंदवाडी येथील हनुमान मंदिरावर असलेले अनाधिकृत होर्डिंग्ज काढत असताना सकालीत साडेनऊ वाजता ही घटना घडली. होॉर्डिंगला लोखंडी फ्रेम होते. होर्डिंग्ज काढल्यानंतर ते 33 केव्ही तारेला लागले अनधिकृत बॅनर संदर्भात मी सातत्याने बोलत आलो आहे हे शहर अनधिकृत बॅनर मुक्त करायचे आहे. अनधिकृत बॅनर काढताना एकाचा मृत्यू होणं हे अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेचे मला दुःख आहे सकाळपासून या घटनेमुळे मी व्याकुळ आहे. आपण अशी जीवघेणी स्पर्धा का करतो आहे मी आयुक्तांना स्पष्ट सांगितलं या बॅनर संदर्भात कोणताही मोजा ठेवायचा नाही. बॅनर संदर्भात एक धोरण निश्चित केल्या गेले पाहिजे, आताची जी घटना घडली त्या संदर्भात सर्व माहिती घेऊन प्रशासनाने गुन्हा दाखल करावा अशी अशी प्रतिक्रिया या संपूर्ण प्रकारावर शहराचे महापौर समीर राजूरकर यांनी दिली.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Feb 21, 2026 08:18:21
Jalna, Maharashtra:बुलडाणा जिल्ह्यातील चिखला गावात माजलेल्या लाभार्थी टोळीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली, जरांगे पाटील. चिखला प्रकरणातील आरोपीला पळून जाण्यासाठी मदत करण्यात आली, जरांगे. शिवाजी महाराजांचा पुतळा उखडून टाकण्याचा त्यांचा डाव होता, जरांगे. सुनेत्रा पवार मध्ये मध्ये करणाऱ्यांना थारा देणार नाहीत, अशी टीका जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा मोडून तोडण्याचा त्यांचा उद्देश होता असा आरोपदेखील त्यांनी केला. सत्य परिस्थिती तिथे जाऊन पाहणार असल्याचं सांगत आधी जिजाऊच्या लेकीला मारले, त्यांचे मारताना व्हिडीओ व्हायरल करण्याचे सांगण्यात आले असाही आरोप जरांगे यांनी केला. या प्रकरणातील आरोपी पळून जाण्यासाठी मदत करण्यात आली आणि चिखला गावात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचंही जरांगे म्हणाले. फडणवीसांच्या शहरातील विधवा महिलेवर अन्याय झाला असेल तर तिला न्याय देणं त्यांची जबाबदारी असल्याचं जरांगे म्हणालेत. सारथीच्या योजना का राबवल्या जात नाहीत? कुणबी प्रमाणपत्र वाटप का केलं जातं नाही असा सवाल जरांगे यांनी केला.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Feb 21, 2026 08:02:01
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथील सारिका लोहार या महिलेचे गावातीलच शेखर चंदनशिवे याच्याशी अनैतिक संबंध होते. या प्रकरणाची कुणकुण सासूला लागली होती यावरून सासू सुनेचा वाद होत होता.दरम्यान सारिकाचा प्रियकर शेखर याने विषारी औषध असलेले बाटली सारिकाकडे दिली. यानंतर ही बाटली सासू पाणी पिते त्या पाणी भरलेल्या काळशीत सारिका ने ओतली. अशाच्या प्रकारे सासूला मारण्यासाठी सुनेने कट रचला. रात्री सासूने कळशीतील पाणी पिले मात्र चव कडू लागल्याने पाण्याचा तांब्या जेवण करत असलेल्या मुलगा समाधान जवळ ठेवला. त्याने ते पाणी पिले यानंतर समाधान यास रात्री उलट्या होऊ लागल्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता. त्याचा मृत्यू झाला. सासूला मारण्यासाठी सुनेने केलेला विष प्रयोगात नवऱ्याचा जीव गेल्याची घटना झाली. या प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी सारिका लोहार हिला अटक केली आहे.
0
comment0
Report
CFChandrakant Funde
Feb 21, 2026 08:00:58
Pune, Maharashtra:दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची क्रोनोलॉजी वाईज नोव्हेंबर 2024- खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना अजितदादांचा फोन येतो, नागपुरात दोन्हीमध्ये एकञ येण्यासंबंधी प्राथमिक चर्चेला प्रारंभ...सुप्रिया सुळे यांना चर्चेची माहिती दिली जाते...दोन्ही बाजूंकडून Go Ahead चा सिग्नल ... 12 डिसेंबर 2024 रोजी अजित पवार party split नंतर पहिल्यांदा शरद पवारांना वाढदिवसांच्या शुभेच्छा द्यायला दिल्ली निवासस्थानी पुष्प गुच्छ घेऊन जातात पण तिथे प्रफुल पटेल असल्याने फक्त सदिच्छा भेट होते ... पुढे 16 मे 2025 रोजी... भवानीनगर साखर कारखाना इलेक्शन प्रचारसभेनंतर अजित ताफा सोडतात आणि डॉ. अमोल कोल्हे सोबत बारामती ते पुणे असा एकञ प्रवास करतात, त्यात बऱ्यापैकी पुणे जिल्ह्यातील एकञिकरणावर चर्चा होते... 21 मे रोजी जयंत पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानी सुप्रिया सुळे, अजितदादा, जयंत पाटील आणि कोल्हे यांच्यात पुन्हा एकञ बैठक...ताई आणि दादा पहिल्यांदा इथे एकञ येतात... राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनालाच विलिनीकरण करायचं का? इथपर्यंत ही चर्चा जाते...पण बिहार इलेक्शन मुळे भाजप पक्ष श्रेष्ठीकडून रेड सिग्नल मिळाल্যामुळे सगळंच पुन्हा थांबते....पुण्यातच दोन्ही राष्ट्रवादीचे स्वतंत्र वर्धापन दिन साजरे होतात...पवार गटाचा वर्धापन दिन तर अगदी ऐनवेळी ठरतो...यातून ही एकञिकरणाची चर्चा कुठपर्यंत गेलती हे स्पष्ट होते... पुढे मग 5 ऑक्टोबर 2025 रोजी प्रवरानगरच्या प्रोग्रामला अजित पवार हे अमिक शहा यांच्याकडे पुन्हा एकदा राष्ट्रवादी विलीनीकरणाचा विषय काढतात...त्यावर दिल्ली त बोलू असं ठरतं... त्यानुसार शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला अजित पवार पुन्हा दिल्लीला जातात और एकटेच अमित शाह यांना भेटतात...तिथूनच फडणवीस यांना राष्ट्रवादी विलिनीकरणाची कल्पना दिली जाते त्यावर ते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होऊ द्या असं सांगतात. 14 नोव्हेंबर 2025 रोजीच्या अमित शाह यांना भेटल्याचे ट्वीट पण अजित पवार 16 नोव्हेंबर रोजी आपल्या अकाउंट वरून करतात... 16 जानेवारी 2015 @प्रेमकोर्ट, मुंबई अजित पवार यांच्या घरी अजित पवार, सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे यांच्यात एकञित बैठक होते, त्यात तटकरे यांना विलीनीकरणाबाबत दोन्ही बहिण-भाऊ तटकरेंना पूर्व कल्पना देतात 17 जानेवारी 2025 गोविंद बाग
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 21, 2026 08:00:39
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर ते इंजिनिअरिंग कॉलेज परिसराला जोडणाऱ्या मुख्य मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. अपघाताचा धोका देखील वाढला आहे. गेल्या काही वर्षांपासून या भागात नगरसेवक नसल्याने नागरिकांना महानगरपालिकेसोबत संवाद साधण्याचा प्रभावी मार्ग नव्हता. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था बिकट होत गेली. आता नव्याने स्थापन झालेल्या चंद्रपूर महानगरपालिकेने या मार्गाची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित व सुरळीत प्रवासाची सुविधा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 21, 2026 07:31:56
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 21, 2026 06:48:29
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर.. ऑन दोन्ही सभागृह विरोधीपक्ष नेता. - असणार नाही, घटनेने दिलेले नियम म्हणजे 10 टक्के संख्याबळ कुठल्याही पक्षाकडे नाही. करायचं तर अध्यक्षांकडे अधिकारी आहे. ऑन दानवे सुरक्षा काढली. - सुरक्षा देणे किंवा काढणे ही भूमिका सरकारची नाही. सुरक्षा कुणाला द्यायची याची कमिटी आहे जैन त्यांचे अध्यक्ष आहे. जितेंद्र आव्हाड यांना एक्सट्रा सुरक्षा दिली. Ubt च्या किती लोकांना दिली. तो विधान परिषदेचा सदय नाही. विरोधी पक्ष नेता नाही. पद गेल्याकंतर 4 महिन्यांनी काढले आहे. - संजय राऊत का अस्मिता हा शब्द कळतो का? दरवेळेस मराठीचा मुद्दा काढायचं... महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे ubt, संजय राऊत. का? हा ढोंग कळलेला आहे. राज ठाकरे यांनी कुठे जावे किंवा नाही ही संजय rाऊत यांनी ठरवावे का? डुबलेल्या पक्षाच्या प्रवक्त्याने सांगू नये.... ऑन विलीनीकर. - विलीनीकरांचा मुद्दा मागे पडत चालला आहे. भुजबळ मागें राज्यसभेत जाण्यासाठी तयार होते. आता भाष्य करणे गैर आहे. Icu ऑन राज ठाकरे. - महाराष्ट्र ubt च्या राज्यात icu मधे होता, त्यातून महायुतीने महाराष्ट्राला बाहेर काढले आहे. कोस्टल रोड, नवी मुंबई विमानतळ अनेक कामे केली. सूज उतरविण्याचा काम महायुतींने केलं.. राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार.... ऑन हिरे खटला. - जेव्हा खटला दाखल केला होता त्यावेळचे लेख बघा, आता शेपटी घालायचे काम सुरू आहे. ऑन अनिकेत तटकरे चालक. - एकतर शासकीय वाहन वापरताना, शासकीय चालक असणे गरजेचे आहे. नियम आहे. उत्साहाच्या भरात काही अघटीत घडले तर त्याला जबाबदार कोण? सर्वांनी भान ठेवले पाहिजे. ऑन राहुल गांधी न्यायालयात हजर. - त्यांनी जे बेताल वक्तव्य केले होते त्यावर हा खटला दाखल केला. कायद्याच्या पुढे कितीही मोठा असला तरी यावेच लागेल. - राहुल गांधी हा अपयशी माणूस आहे. सत्ताधारी पक्षाने काळे झेंडे दाखवायला नको, काँग्रेसनेच काळे झेंडे दाखवायला पाहिजे. ऑन मराठी शाळा.... - ज्या शाळेत विद्यार्थी नाही. शाळेच्या नावाखाली कुणी उखळ पांढरे करीत असेल तर ते खपवून घेणार नाही मात्र मराठी शाळा बंद होऊ देणार नाही.... ऑन काँग्रेस - विजय वड्डेटीवर यांनी माफी मागितली की नाही हे गुलदस्त्यात आहे. मात्र काँग्रेस मध्ये दोन तीन गट आहे. त्याचा परिणाम निवडणुकीत झाला.. ऑन भूषण गवई भाष्य. - भूषण गवई यांनी काही तत्वे पाळली आहे. सर्वोच्च न्यायमूर्तीने जो खटला वर्ग केला. त्यावेळी इतर निकाल त्यांनी घेतला नाही. या प्रकरणात त्यांचा अभिनंदन केले पाहिजे. ऑन रोहित पवार pc - त्यांच्या कडे अनेक प्रश्न, अनेक शंका, या सर्व पत्रकार परिषदेची दाखल तपास यंत्रणा घेतलं असेल पत्रकार परिषदे घेणे चुकीचे नाही... ऑन संभाजीनगरमधे बिबट्यांचा वावर वाढला. - अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर वाढला आहे. वन अधिकाऱ्यांना आता विशेष अधिकार देण्यात आला आहे. आता वावर कमी झाला आहे. अशी प्रकार घडू नये म्हणून उपाययोजना ऑन विद्रुपीकरण - शहरातील विद्रुपीकरण होऊ देणार नाही आयुक्तांनी तातडीने बॅनर काढले पाहिजे. बॅनर काढताना एकच शॉक लागून जीव गेला आहे. कुणाचीही पर्वा न करता कारवाई झाली पाहीज. एक दोन दिवस मोठ्या उत्सव वेळी ठीक आहे. ज्यांचे बॅनर त्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करावा.. ऑन संभाजीनगर शहर पाणीपुरवठा. - न्यायालयामध्ये सर्व माहिती आयुक्तांनी दिली आहे. शहर वासियाना मुबलक पाणी पुरवठा केला जाईल. महिनाभरात पाणी कसे मिळेल याचं प्रयत्न सुरू आहे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Feb 21, 2026 06:30:27
Baramati, Maharashtra:अजित पवार यांच्या अभिमान अपघाताची पारदर्शक निपक्षपाती चौकशी करा. बारामतीच्या सोमेश्वर येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रपती पंतप्रधान मोदींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची पारदर्शक, निःपक्षपाती आणि सखोल चौकशी व्हावी यासाठी बारामती तालुक्यातीन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शेकडोंच्या सह्या असणार पत्र देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान यासोबत केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री तसेच राज्यपाल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना पाठवल आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे पत्र पाठवलं आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 21, 2026 06:19:04
Chandrapur, Maharashtra:टायटल: काँग्रेसवाली झालेले भाजपचे माजी नगरसेवक वसंत देशमुख यांची आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घर जाऊन भेट घेतली; या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. अँकर: चंद्रपूर शहर मनपा मध्ये भाजप सुधीर मुनगंटीवार यांनी करून दाखवलेला करिष्मा राज्याने बघितला. केवळ एका मताने भाजपच्या महापौर संगीता खांडेकर निवडून आल्या. भाजपचे जुने कार्यकर्ते आणि विद्यमान काँग्रेस नगरसेवक वसंत देशमुख यांनी सुधीर मुनगंटीवार यांनी थेट घर जाऊन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. वसंत देशमुख हा मनपा वर्तुळातील महत्त्वाचा बहुजन चेहरा आहे. सतत भाजपमधून निवडून येत असलेल्या वसंत देशमुख यांनी दोन वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर धानोरकर- वडेट्टीवार वादात त्यांचे तिकीट कापले जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा भाजपचे दार ठोठावले होते. मात्र त्यात यश आले नाही. अखेर काँग्रेसचे तिकीट घेत त्यांनी निवडणूक जिंकली. आता मनपात उबाठा शिवसेनेला कबूल करण्यात आलेले स्थायी समिती अध्यक्षपद असो वा झोन समित्यांचे गठन अशा सर्व निर्णयांमध्ये भाजपला सहकार्याची गरज आहे. फक्त एका मताच्या फरकाने अस्थिर असलेल्या सत्तेला वसंत देशमुख यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर काही बळ मिळते ka? याची चर्चा होत असून भेटीकडे राजकीय चष्म्यातून बघितली जात आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top