Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442401

चंद्रपूर में महाकाली मंदिर से इंजिनियरिंग कॉलेज मार्ग की हालत खस्ताहाल, मरम्मत की मांग

AAASHISH AMBADE
Feb 21, 2026 08:00:39
Chandrapur, Maharashtra
चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर ते इंजिनिअरिंग कॉलेज परिसराला जोडणाऱ्या मुख्य मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. अपघाताचा धोका देखील वाढला आहे. गेल्या काही वर्षांपासून या भागात नगरसेवक नसल्याने नागरिकांना महानगरपालिकेसोबत संवाद साधण्याचा प्रभावी मार्ग नव्हता. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था बिकट होत गेली. आता नव्याने स्थापन झालेल्या चंद्रपूर महानगरपालिकेने या मार्गाची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित व सुरळीत प्रवासाची सुविधा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Feb 21, 2026 13:49:54
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 21, 2026 13:47:00
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 21, 2026 13:17:15
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 21, 2026 13:04:16
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर महानगरपालिका मध्ये स्थायी समिती गठीत न झाल्याने काँग्रेस नगरसेवक आक्रमक, आयुक्तांना दिले निवेदन, महापौर संगीता खांडेकर यांच्यावर नियमभंगाचा आरोप, तर महापौरांनी लवकरच सभा बोलविणार असल्याची दिली माहिती ( 2 file sent on 2C) अँकर:-- चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीनंतर नव्याने निवडून आलेल्या महापौरांनी अजेंड्यानुसार विषय न घेतल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नगरसेवकांनी केला आहे. महापौर पदाची निवडणूक पार पडल्यानंतर नियमानुसार स्थायी समितीसाठी सर्व पक्षांच्या नगरसेवकांची नावे मागविणे आवश्यक असताना महापौरांनी ती प्रक्रिया पूर्ण न करता सभागृह सोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, महापौर निवडून येऊन दहा दिवस उलटूनही स्थायी समिती गठीत न झाल्याने महानगरपालिकेचा आगामी आर्थिक अंदाजपत्रक आणि शहर विकासाची कामे अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेस गटनेते राजेश अडूर यांनी महапौर आणि आयुक्तांनी तात्काळ स्थायी समिती गठीत करावी, अन्यथा महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. त्यांनी या संदर्भात आयुक्तांची भेट घेत त्यांना एक निवेदनही दिले आहे. दरम्यान महापौर संगीता खांडेकर यांनी आम्हाला कोणतीही भीती नसून लवकरच या संदर्भात सभा बोलविणार असल्याची माहिती दिली आहे.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Feb 21, 2026 12:49:54
Wardha, Maharashtra:वर्ध्याच्या सिंदी (रेल्वे) येथे ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीसाठी एक हजारावर नागरिकांनी रक्ताने लिहिले पत्र खासदार अमर काळे यांनीही आंदोलन स्थळी येत रक्ताने लिहिले पत्र आंदोलनाला विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी रक्ताने पत्र लिहिलेली पत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार अनोख्या आंदोलनातून मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सरकारने तत्काळ ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्याची मागणी बाईट - अमर काळे, खासदार, वर्धा. बाईट - अतुल वांदिले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, जिल्हाध्यक्ष, वर्धा
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 21, 2026 12:32:30
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Feb 21, 2026 12:21:17
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड -एआयची वर्ल्ड कॉन्फरन्समध्ये राहुल गांधींनी ते देशाच्या विरोधात आहेत, हे जगाला दाखवून दिलं. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कपडे काढण्याची गरज काय? मुळात त्यांचे कपडे मतदारांनी आधीचं फाडलेले आहेत. मात्र हे असलं प्रदर्शन करुन, आपली अक्कल किती छोटी आहे. हे काँग्रेसने दाखवून दिलं. अशा घटनेचा निषेध शिवसेना करत आहे. काँग्रेस पक्ष देशाला बदनाम करणारी आहे. फक्त मोदींचा अपमान नाही तर देशाचा अपमान केलाय. काँग्रेसचा हा चेहरा समोर आणण्यासाठी शिवसेनेकडून आज संध्याकाळी राज्यभर आंदोलन केलं जाणार आहे. -आता काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडतील. -अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व आमदार काँग्रेसच्या कृतीवर नक्कीच जाब विचारला जाईल. -खरं तर हा निर्णय सभागृहाचे अध्यक्ष घेतलीचं. पण असे कपडे काढणारे विरोधी पक्ष नेते कशाला हवेत? -शिवसेने पत्रकार परिषद घेऊन स्वतःची भूमिका जाहीर केली. काँग्रेसला ही शिवसेनेचा उमेदवार असावं हे मान्य आहे. पण रोज सकाळी उठून बोलणारे (संजय राऊत) यांनी मात्र शरद पवारांचे नाव घेतले. खरं तर आधी स्वतःच्या पक्षात समन्वय साधायला हवा, मग मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी काय करावं हे सल्ले द्यावेत. स्वतःच्या दिव्या खाली अंधार किती आहे, हे पहावे. -हे प्रकरण गंभीर आहे, त्यामुळं मी पालकमंत्री असलेल्या जिल्ह्याच्या एसपी यांना आदेश दिलेत. असे हे नवे लाजिरवाणे प्रकार आपल्याकडे घडत असतील तर तातडीनं कारवाई करा. -रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन अजित दादांच्या अपघातानंतर काही प्रश्न उपस्थित करतायेत. यात मी स्वतःचं आकलन करणं योग्य नाही. ब्लॅक बॉक्स बाबतीत असो की अन्य कोणत्या अहवालावर जे बोललं जातंय, त्यात माझं अज्ञान आहे. रोहित पवारांनी ते ज्ञान घेतलं असावं म्हणून ते बोलतायेत. मात्र मी याबद्दल बोलणं उचित नाही.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 21, 2026 11:48:09
Nagpur, Maharashtra:बॉयट --शिवलिंग पटवे उच्च माध्यमिक नागपूर विभाग मंडळ पॉईंटर ----- रसायनशास्त्राच्या पेपरच्या दिवशी 18 तारखेला साधारणता एक साडेदहाच्या नंतर आणि अकराच्या दरम्यान एका मुलीच्या मोबाईलवर प्रश्नपत्रिका सदृश मटेरियल उपलब्ध झालेला आहे. ही मुलगी साडेदहा वाजता स्वतःच्या परीक्षा कक्षामध्ये पेपर द्यायला गेली होती. आणि तो मोबाईल तिच्या बॅगमध्ये होता साडे दहा ते अकराच्या दरम्यान ती आतमध्ये होती. अकरा वाजता तिला प्रश्नपत्रिका दिली,वर्गातील पर्यवेक्षकांनी. आणि तिने उत्तरही लिहिली. साधारणतः बाराच्या सुमारास ती वाशरूमला जायचं म्हणून वर्गातून बाहेर निघाली. नॉर्मली वॉशरूमला गेलेले विद्यार्थी पाच मिनिटांमध्ये परतात. 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतल्यामुळे वर्गातील ज्या परिवेक्षकि़ना होत्या त्यांना लक्षात आलं की ही काहीतरी बाहेरून जाऊन मटेरियल सोबत घेऊन आलेली आहे. त्यांनी तिची जर बॉडी लँग्वेज बघितली आणि तिची तपासणी केली. तिच्या पॉकेटमध्ये मोबाईल आठवण आला त्यानंतर त्या परिवेक्षकांनी आपल्या केंद्र संचालकांच्या निदर्शनाची बाब आणून दिली. त्यानंतर पर्यवेक्षक आणि केंद्र संचालक यांनी तातडीने पुढची कार्यवाही केली. बोर्ड म्हणून आम्ही तातडीने पोलिसांना लेखी आमचं निवेदन दिलं आहे. त्यावर पोलिसांच्या लेव्हलवर ते कार्यवाही करत आहेत. ह्या मुलीन हा पेपर बारा वाजताच्या सुमारास पाहण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे याला आपण विद्यार्थ्यांना पेपर फुटून मिळालेला आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही. एखाद्या वैयक्तिक विद्यार्थ्याला हा 11 च्या नंतर पेपर मिळालेला असण्याची शक्यता आहे. आणि तो अकरा वाजता तसाही पेपर आपल्याला विद्यार्थ्यांना पाहायला मिळतो. तर यामध्ये जे कोणी दोषी आहे त्या सगळ्या दोषींवर आपण मंडळातील नियमावली आहे. सोबतच महाराष्ट्राचा कायदा माल प्रॅक्टिसच्या विरोधात त्या कायद्यानुसार आपण कार्यवाही करत आहोत. आणि कोणीही यामध्ये दोषी विषय असेल त्याला आपण शिक्षा कशी होईल याची काळजी घेतोय. ह्या च्यामध्ये पेपर शाळेमध्य शाळेमधल्या स्टाफने हे पकडून दिले आहे. गैरप्रकार त्यांना दिसून आला. फक्त आपण पर्यवेक्षक यासाठी बदलवले कारण भविष्यामध्ये एक मेसेज यामार्फत देणे आहे त्याच्यातला आपला पार्ट होता. आणि प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून भविष्यामध्ये कोणीही गैरप्रकार करू नये त्यासाठी आपण घेतलेले हे पाऊल आहे. जर मुलीची जी आहे या विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याची बोर्डाची नियमावली आहे. त्या नियमावलीनुसार याच्यामध्ये चौकशी अधिकारी नियुक्त होऊन तो चौकशी करत असतो. यात जर विद्यार्थी दोषी आढळला तर त्याच्यावर तीन वर्षासाठी प्रतिबंध असेल अशा पद्धतीने आपण काम करत असतो. विद्यार्थी दोषी असेल तर त्याच्यावर नक्कीच कारवाई होणार आहे. पोलिसांकडे प्रकरण दिलं आहे मोबाईल नंबर आहे त्यांच्याकडे ते तपास करतील... आणि दोषींवर कारवाई करतील
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 21, 2026 11:46:02
Malegaon, Maharashtra:राऊत साहेबांनी प्रचंड मला मदत केली आहे, त्यामुळे मी त्यांचा ऋणी आहे... त्यांच्यावर जो खटला झाला तो माझ्यामुळेच झाला होता ही वस्तुस्थिती आहे... संजय राऊत यांनी मला शुभेच्छा दिल्या आहेत.. त्यांनी जी मला मदत केली ते मी त्यांचे उपकार कधीही फेडू शकणार नाही.. मंत्री महोदयांनी मोठ्या मनाने ही याचिका मागे घेतली मी त्यांचेही आभार मानतो.. या प्रकरणी केस जी आहे ती न्याय प्रविष्ट आहे.. त्यावेळी या केसचा दूध का दूध पाणी का पाणी होईल.. जर या केसमध्ये तथ्य नसत तर मग ही केस 2017 पर्यंत चालू का होती ? या केसचा निकाल का लागला नाही.. संजय राऊत यांनी सांगितलं की अद्वय हिरे हे आता भारतीय जनता पार्टीत गेले त्यांना या केससाठी शुभेच्छा आहेत... या केसच्या प्रकरणी माझी माहिती जर खोटी असली तर ते निकालात येईल, कोर्ट ठरवेल..
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Feb 21, 2026 11:37:52
Junnar, Pune, Maharashtra:जुन्नर/पुणे Anc:किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात भाजपच्या आशा बुचके यांच्यावर सोशल मीडियातून ट्रोलिंग सुरू आहे. मराठा सेवा संघाच्या अभिवादन सभेत आमदार शरद सोनवणे यांच्याकडून माईक हिसकावून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उभे ठेवत त्यांनी भाषण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शिवरायांच्या पालखीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पालखी घेत असताना बुचके यांनी सुनेत्रा पवार यांना धक्का देऊन पुढे सरसावल्याचे दिसते.याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हे दृश्य राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत घडले असल्याने नेटकऱ्यांनी बुचके यांच्यावरून संताप व्यक्त केला. यामुळे कार्यक्रमाच्या शिस्तीवर आणि राजकीय शिष्टाचारावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जन्मोत्सव सोहळा सुरू असताना "पाळणा" म्हणणाऱ्या महिलेला बाजूला ढकलून बुचके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर फोटो साठी पोझ दिल्याचे दिसते. हे वर्तन शिवजयंतीच्या साजऱ्याला अयोग्य ठरत असून, सोशल मीडियावर मीम्स आणि टीका सुरू आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 21, 2026 11:31:46
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीच्या विटा मध्ये भाजपच्या वतीने राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद पाडण्यात आले आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने राष्ट्रीय महामार्गात काम करण्यात येत असल्याचा आरोप करत भाजपाचे नेते व माजी नगराध्यक्ष वैभव पाटलांच्या नेतृत्वाखाली संतप्त नागरिकांनी गुहागर-कराड राष्ट्रीय मार्गाचे काम बंद पाडले. 30 फूट रस्ता असताना विटा नगरपालिका ने 21 फूट रेखांकन केले आहे, त्या पद्धतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून काम करण्यात येत आहे, मात्र यामुळे विटा शहरातील रस्ता अरुंद होणार असल्याचा आरोप करत माजी नगराध्यक्ष वैभव पाटलांचाLeadershipाखाली रस्त्याचे काम बंद पाडत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Feb 21, 2026 11:19:31
Shirur, Maharashtra:रांजणगाव गणपतीत दिवसाढवळ्या दागिने हिसकावण्याचा प्रयत्न फसलाय. रांजणगाव गणपती येथे दिवसाढवळ्या दागिने हिसकावण्याचा प्रयत्न फसलाय. रांजणगाव येथील नरवडे हॉस्पिटल शेजारी असलेल्या पिसाळ सुपर मार्केटमध्ये दुचाकीवरून तोंड बांधून आलेल्या दोघांनी महिलेला लक्ष्य करत मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित महिलेने धाडसाने प्रतिकार करत चोरट्यांचा डाव हाणून पाडला. या घटनेत मंगळसूत्र सुरक्षित राहिलं असून दोन्ही चोरटे घटनास्थळावरून पसार झाले. हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून स्थानिक नागरिकांनी पोलिस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top