Back
मीरा-भाईंदर में ट्रैफिक पुलिस अधिकारी पर भीड़ का हमला; 20-25 लोग मारपीट कर रहे
PTPRATHAMESH TAWADE
Mar 13, 2026 05:32:03
Mira Bhayandar, Maharashtra
मीरा-भाईंदरमध्ये पोलिसावर प्राणघातक हल्ला कायद्याचा धाक संपला? कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला २०-२५ जणांच्या जमावाकडून बेदम मारहाणी. मीरा-भाईंदर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. काशीमीरा परिसरात वाहतूक नियमन करणाऱ्या एका पोलीस हवालदारावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. दोन दुचाकीस्वारांमध्ये सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या हवालदारालाच या वादाचा फटका बसला. रस्त्याच्या मध्यभागी दोन दुचाकीस्वारांमध्ये जोरदार भांडण सुरू होते, ज्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. कर्तव्यावर असलेल्या हवालदाराने ही भांडणे सोडवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा राग आल्याने एका दुचाकीस्वाराने थेट पोलिसावर हात उचलला आणि फोन करून आपल्या २० ते २५ मित्रांना घटनास्थळी बोलावून घेतले. या हिंसक जमावाने मिळून हवालदाराला बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच काशीमीरा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत सर्व हल्लेखोर पसार झाले होते. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचा शोध घेतला जात आहे. काही दिवसांपूर्वीच एका महिला वाहतूक पोलिसाचा व्हिडिओ चर्चेत असताना, आता थेट पोलिसावरच हल्ला झाल्याने शहरातील पोलीस दलात संतापाचे वातावरण आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowMar 13, 2026 06:22:290
Report
JMJAVED MULANI
FollowMar 13, 2026 06:19:370
Report
JMJAVED MULANI
FollowMar 13, 2026 06:01:430
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 13, 2026 05:48:180
Report
ABATISH BHOIR
FollowMar 13, 2026 05:31:240
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 13, 2026 04:50:010
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 13, 2026 04:49:210
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 13, 2026 04:45:350
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 13, 2026 04:34:410
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 04:34:210
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 04:32:450
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 13, 2026 04:20:150
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 13, 2026 04:19:590
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 13, 2026 04:19:110
Report