Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

सांगली के होटल गैस सिलिंडर संकट से बंद, प्रशासन से राहत की मांग

SMSarfaraj Musa
Mar 13, 2026 06:22:29
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - गैस सिलिंडर अभावी सांगलीत हॉटेल बंद करण्याची वेळ.. अँकर - आखाती देशातल्या युद्धामुळे सांगली जिल्ह्यात व्यवसायिक गैस सिलिंडरवर मोठा परिणाम झाला आहे, गैस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने हॉटेल बंद करण्याची वेळ आता सांगलीतील हॉटेल व्यवसायिकांवर आली आहे. सुरळीत गैस पुरवठा करा, अन्यथा हॉटेल व्यवसाय बंद करावे लागतील, असचा इशारा हॉटेल व्यवसायिकांकडून प्रशासनाला देण्यात आला होता, मात्र आजपासून अनेक हॉटेल्समध्ये गैस सिलिंडर संपल्याने हॉटेल बंद करावे लागत असल्याचे फलक लावण्यात आले आहेत, याचाच आढावा घेतला आहे, आमचे सांगलीचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी..
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Mar 13, 2026 07:06:31
Kolhapur, Maharashtra:वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ बाईट मुद्दे कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष मंगळवारी 17 तारखेला अध्यक्ष और उपाध्यक्ष पदाची निवड आहे लवकरच आमच्या तीनही पक्षाची बैठक होईल आणि निर्णय होईल महानगरपालिकेत जो निर्णय झाला. ज्या पक्षाचे नगरसेवक जास्त त्यांचा महापौर झाला तसा अध्यक्ष पदाबाबत निर्णय व्हावा अशी आमची मागणी आहे. गोकुळ निकाल निकालाची कॉपी न बघता आपण पत्रकार परिषदा घेता हे बरोबर नाही मी या केस मध्ये एक पार्टी आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच मध्ये झालेल्या सुनावणी मध्ये बिन तारखेच्या पत्राचा माझा उल्लेख झाला लंपी आजारामुळे राज्यातील दूध संस्था या 50 लिटरची अट पूर्ण करू शकणार नाहीत आणि त्या अवसयाला जातील आणि शेतकऱ्यांचे नुकसान होईल म्हणून स्थगिती द्यावी अशी विनंती तात्कालीन दुग्धविकास मंत्री विखे पाटील यांना केली होती त्यांनी देखील तात्काळ स्थगिती दिली होती त्यांनी ऑर्डर देताना तारीख घातली नव्हती दोघांच्याही तारखा अनावधानाने राहिल्या होत्या जॉईंट रजिस्टरच्या पत्रावरती तारखा होत्या न्यायालयाच्या प्रक्रियेवरती मतप्रदर्शन करायचं नाही तरीदेखील मला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे रोहित पवार स्टेटमेंट आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि सर्व आमदार त्यांनी अजित दादा पवार यांच्या अपघाताचा तपास हा सीबीआय कडे सोपवावा अशी मागणी केली आहे. मला विश्वास आहे की आता CID चा तपास योग्य प्रकारे सुरू आहे... विमान प्राधिकरण संस्थेमार्फत चौकशी सुरू आहे आणि लवकरच हा तपास सीबीआय कडे जाईल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि देशातील जनतेच्या मनात ज्या शंका आहे त्याचा निरसन होईल रोहित पवारांनी सादर केलेल्या पुराव्यांची दखल तात्काळ घेतली जाईल मुख्यमंत्र्यांनीही त्या संदर्भातला सुतवाच केला आहे. जिल्ला राष्ट्रवादी कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी एक संघ आहे. जिल्ह्यातील सर्व माजी आमदार कार्यकर्ते माझ्या सोबत आहे. या सर्वांच्या जीवावरती राष्ट्रवादीचा अध्यक्ष होईल असा मला विश्वास आहे. गॅस तुटवडा कालच केंद्रीय मंत्र्यांनी गॅसचा तुटवडा होऊ देणार नाही असं सुचवाच केला आहे, तसेच इराण देखील भारताला सहकार्य करत असल्याचे माध्यमांमध्ये वाचला आहे त्यामुळे लवकरात लवकर धोका टळेल.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 13, 2026 06:36:05
Shirdi, Maharashtra:आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे चटके आता उद्योग व्यवसायांसह कर्मचाऱ्यांना देखील बसण्याची शक्यता आहे... अहिल्यानगर जिल्ह्यातील व्यावसायिक गॅस विक्रीला अनेक बंधन टाकण्यात आली.. गेल्या चार दिवसांपासून व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने हॉटेल उद्योगासह एमआयडीसी मधील अनेक उद्योग व्यवसाय अडचणीत आले आहे.. अनेक कंपन्यांमध्ये परप्रांतीय मजूर आहेत त्यांच्याकडे ना गॅस कनेक्शन गॅस टाकी.. त्यांची सगळी मदार कंपनीतील मालकावर.. त्यामुळे कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय.. व्यावसायिक गॅस नसल्याने व्यवसाय ठप्प झालाय तर दुसरीकडे परप्रांतीय कामगारांना स्वयंपाक करण्यासाठी आता चुलीचा आधार घेण्याची वेळ आली आहे... कंपनीत काम ठप्प गॅस नाही तर स्वयंपाक बनवते बनवण्याची देखील अडचण आणि त्यामुळेच अनेक परप्रांतीय कामगार आपल्या घराकडे जाण्याची तयारी करत आहेत तर अनेक जण चुलीचा आधार घेऊन स्वयंपाक करत आहे..
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 13, 2026 06:19:37
Baramati, Maharashtra:महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मानाच्या गदेची उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या हस्ते पूजा.. पुण्यातील वाघोली येथे लवकरच होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाबाबतचे निमंत्रण देण्यासाठी स्पर्धेचे आयोजक उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांची बारामती येथील सहयोग निवासस्थानी भेट घेतलीय... यावेळी वहिनींच्या हस्ते महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील मानाची समजली जाणारी गदा याची पूजा करण्यात आली ... तसेच या प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धेसाठी आयोजकांना शुभेच्छा देत महाराष्ट्रातील समृद्ध कुस्ती परंपरेला सदैव प्रोत्साहन देण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 13, 2026 05:48:18
Satara, Maharashtra:सातारा -सातारा शहरातील विविध शासकीय कार्यालयांमधील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी भव्य बाईक रॅली काढली. गांधी मैदान येथून सकाळी १० वाजता या रॅलीला सुरुवात करण्यात आली.जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले.या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी पारंपरिक नऊवारी साडी आणि डोक्यावर फेटा परिधान करून बाईक चालवत शहरातून फेरी काढली. या पारंपरिक वेशभूषेमुळे रॅली विशेष आकर्षण ठरली. शहरातील विविध भागातून जात असताना रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात या महिलांचे स्वागत केले.महिला आज सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सक्षमपणे काम करत आहेत, हा संदेश समाजापर्यंत पोहोचावा या उद्देशाने ही रॅली काढण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले. तसेच विविध क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या आणि काम करणाऱ्या विद्यार्थिनी व महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गांधी मैदान येथून सुरू झालेली ही रॅली राजवाडा परिसरातून पुढे जात मोती चौक, राजपथ रोड आणि पोवई नाका मार्गे शहरात काढण्यात आली. या रॅलीत शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश दिला.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 13, 2026 05:32:03
Mira Bhayandar, Maharashtra:मीरा-भाईंदरमध्ये पोलिसावर प्राणघातक हल्ला कायद्याचा धाक संपला? कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला २०-२५ जणांच्या जमावाकडून बेदम मारहाणी. मीरा-भाईंदर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. काशीमीरा परिसरात वाहतूक नियमन करणाऱ्या एका पोलीस हवालदारावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. दोन दुचाकीस्वारांमध्ये सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या हवालदारालाच या वादाचा फटका बसला. रस्त्याच्या मध्यभागी दोन दुचाकीस्वारांमध्ये जोरदार भांडण सुरू होते, ज्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. कर्तव्यावर असलेल्या हवालदाराने ही भांडणे सोडवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा राग आल्याने एका दुचाकीस्वाराने थेट पोलिसावर हात उचलला आणि फोन करून आपल्या २० ते २५ मित्रांना घटनास्थळी बोलावून घेतले. या हिंसक जमावाने मिळून हवालदाराला बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच काशीमीरा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत सर्व हल्लेखोर पसार झाले होते. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचा शोध घेतला जात आहे. काही दिवसांपूर्वीच एका महिला वाहतूक पोलिसाचा व्हिडिओ चर्चेत असताना, आता थेट पोलिसावरच हल्ला झाल्याने शहरातील पोलीस दलात संतापाचे वातावरण आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 13, 2026 05:31:24
Kalyan, Maharashtra: युद्ध इराण–अमेरिकेचे, लूट डोंबिवलीकरांची! गॅस टंचाईच्या भीतीचा फायदा घेत ‘गॅस लाईन अपडेट’च्या नावाखाली सायबर भामट्यांचा डाव; दोन दिवसांत दोन महिलांना ४ लाखांचा गंडा अज्ञात आरोपीविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; पोलिसांचा तपास सुरू अमेरिका–इराण–इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईची भीती निर्माण झाली असताना सायबर भामट्यांनी त्याचाच गैरफायदा घेण्यास सुरुवात केली आहे. डोंबिवलीत ‘गॅस लाईन अपडेट’च्या नावाखाली दोन महिलांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या दोन दिवसांत भामट्यांनी भामट्यांनी दोन महिलांकडून तब्बल चार लाख रुपये उकळले असून या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे जागतिक गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याच्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये आधीच चिंतेचे वातावरण आहे. गॅस टंचाईच्या भीतीने अनेक ठिकाणी नागरिक गॅस एजन्सीबाहेर रांगा लावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र याच परिस्थितीचा फायदा घेत सायबर भामट्यांनी आता नवा डाव आखला आहे.डोंबिवलीतील सुनीलनगर परिसरात राहणाऱ्या 45 आणि 56 वर्षीय दोन महिलांना ‘गॅस लाईन अपडेट’ करण्याच्या नावाखाली भामट्यांनी लक्ष्य केले. दोन दिवसांपूर्वी एका 45 वर्षीय महिलेला “गॅस कनेक्शन बंद होईल” अशी भीती दाखवत 10 रुपयांचे ई-चलन भरण्याची लिंक पाठवण्यात आली. त्या लिंकवर क्लिक करताच तिच्या खात्यातून तब्बल 2 लाख 99 हजार 500 रुपये लंपास करण्यात आले. यानंतर अशाच प्रकारे त्याच परिसरातील 56 वर्षीय महिलेलाही गॅस लाईन बुक अपडेट करण्यासाठी APK लिंक पाठवण्यात आली. त्या लिंकवरून माहिती भरल्यानंतर तिच्या खात्यातून जवळपास 1 लाख रुपये काढून घेण्यात आले. अशा प्रकारे अवघ्या दोन दिवसांत दोन्ही महिलांकडून सायबर भामट्यांनी एकूण चार लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.या प्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित महिलांनी डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना इशारा देत अनोळखी नंबरवरून येणारे मेसेज, लिंक किंवा APK फाइल उघडू नये असे आवाहन केले आहे. तसेच गॅस बिल, कनेक्शन अपडेट किंवा इतर कोणतेही काम असल्यास ते अधिकृत गॅस एजन्सी किंवा अधिकृत संकेतस्थळावरूनच करावे, अन्यथा सायबर फसवणुकीला बळी पडण्याची शक्यता असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 13, 2026 04:50:01
Beed, Maharashtra:बीड:सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे अखेर 14 महिन्यानंतर जेल बाहेर पडलाय. जयराम चाटेच्या भावाचे दोन मार्च रोजी निधन झाले होते. त्यानंतर केल्या जाणाऱ्या विधीसाठी जयराम चाटेच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज केला होता. याच अर्जावर अटी शर्ती घालत न्यायालयाने जयराम चाटेला 12 व्याच्या विधीस उपस्थित राहण्याची परवानगी दिली. दुपारी चार वाजेपर्यंत हा वेळ दिला गेलाय. बीड जिल्हा कारागृहातून जयराम चाटे पोलीस बंदोबस्तात बाहेर पडला असून त्याच्या मूळ तांबवा या गावी 12 व्याचा विधी होत आहे. या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता पोलिस प्रशासनाने घेतल्याचे पहायला मिळाले. दरम्यान सायंकाळी पुन्हा त्याला कारागृहात आणण्यात येणार आहे.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 13, 2026 04:49:21
Malegaon, Maharashtra:विशाल मोरे, देवळा (नाशिक) - अपहरण और खंडणी मांगते समय झटप में व्यापारी की मृत्यु की घटना सामने आई है। पुलिस ने आय जी के पथक होने का दावा कर गुटखे से भरी पिकअप वाहन को रोककर 25 लाख रुपये की खंडणी के लिए अपहरण का प्रयास किया। देवळा तालुक्यात व्यापाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू इन्हीं घटनाओं के बीच हो गया। इस प्रकरण में पुलिस ने तीनों संदिग्धों के खिलाफ मामला दर्ज कर गिरफ्तार किया है। मृत व्यापारी का नाम Jabbar Tamboli है, जो पिकअप वाहन द्वारा गुजरात से गुटखा लाकर देवळा-कळवण मार्ग पर आ रहे थे, उसी दौरान तीन लोगों ने उन्हें रोककर खंडणी मांगनी शुरू कर दी। घटना के बाद Jabbar Tamboli बेहोश हो गए और अस्पताल में उनकी मृत्यु हो गई। इस मामले में शामिल तीनों suspects — Vilaas Jagtap, Mohammed Shafiq Mohammed Rafiq, और Mahesh Bhamare — को गिरफ्तार किया गया है और उनके खिलाफ मामला दर्ज किया गया है।
0
comment0
Report
GMGajanan MAchindar
Mar 13, 2026 04:45:35
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 13, 2026 04:34:41
Niphad, Maharashtra:नाशिकच्या निफाड तालुक्यातील लासलगावजवळील विंचूर येथील अल्पभूधारक शेतकरी निलेश गायकवाड व शरद गायकवाड या काका-पुतण्यांनी पारंपारिक कांदा व द्राक्ष शेतीला पर्याय म्हणून फुलशेतीचा यशस्वी प्रयोग राबवत महिन्याला ५० ते ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवत आहे बाजारातील चढ-उतार आणि पारंपारिक पिकांमधील अनिश्चित उत्पन्नामुळे त्यांनी शेतीत वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेत एक एकर क्षेत्रात पिवळा व अष्टगंध झेंडू, गेलडा तसेच सफेद फुलांच्या चार ते पाच विविध जातींची लागवड केली. फुलशेतीसाठी नियोजनबद्ध सिंचन व्यवस्था उभारून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला सुरुवातीला फुले बाजारात विक्रीसाठी पाठविली जात होती मात्र अपेक्षित नफा मिळत नसल्याने त्यांनी व्यवसायात बदल करत फुलांपासून हार-माळा तयार करून घरपोच सेवा सुरू केली या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली असून सध्या या फुलशेतीतून दरमहा सुमारे ५० ते ६० हजार रुपयांचे स्थिर उत्पन्न मिळत आहे या उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुकर झाला असून शेतीत नवनवीन प्रयोग आणि मूल्यवर्धन केल्यास अल्पभूधारक शेतकरीही आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात, असा संदेश गायकवाड काका-पुतणे देत आहेत
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 13, 2026 04:32:45
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर|आखाती देशांतील युद्धाचा फटका शेतकऱ्यांना; टरबूजाचे दर कोसळले,शेतकरी चिंतेत अँकर :आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता थेट शेतकऱ्यांवरही दिसू लागला आहे. इराण-इस्रायल आणि अमेरिकेमधील तणावामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम झाला असून महाराष्ट्रातील टरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड गावातील शेतकरी एकनाथ लेंभे यांनी दोन एकर शेतीमध्ये टरबूजाची लागवड केली होती. या पिकासाठी त्यांना सुमारे एक लाख रुपयांहून अधिक खर्च आला होता. सुरुवातीला टरबूजाला चांगला भाव मिळत होता. मात्र युद्धस्थिती निर्माण झाल्यानंतर निर्यात ठप्प झाल्याने बाजारात दर घसरले.सध्या टरबूजाला अवघा सात ते आठ रुपये प्रति किलो असा भाव मिळत आहे. यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. बाईट- एकनाथ लेंभे , टरबूज उत्पादक शेतकरी,
0
comment0
Report
Advertisement
Back to top