Back
सातारा में महिला अधिकारियों ने सशक्तिकरण का संदेश देने के लिए भव्य बाइक रैली निकाली
TTTUSHAR TAPASE
Mar 13, 2026 05:48:18
Satara, Maharashtra
सातारा -सातारा शहरातील विविध शासकीय कार्यालयांमधील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी भव्य बाईक रॅली काढली. गांधी मैदान येथून सकाळी १० वाजता या रॅलीला सुरुवात करण्यात आली.जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले.या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी पारंपरिक नऊवारी साडी आणि डोक्यावर फेटा परिधान करून बाईक चालवत शहरातून फेरी काढली. या पारंपरिक वेशभूषेमुळे रॅली विशेष आकर्षण ठरली. शहरातील विविध भागातून जात असताना रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात या महिलांचे स्वागत केले.महिला आज सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सक्षमपणे काम करत आहेत, हा संदेश समाजापर्यंत पोहोचावा या उद्देशाने ही रॅली काढण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले. तसेच विविध क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या आणि काम करणाऱ्या विद्यार्थिनी व महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गांधी मैदान येथून सुरू झालेली ही रॅली राजवाडा परिसरातून पुढे जात मोती चौक, राजपथ रोड आणि पोवई नाका मार्गे शहरात काढण्यात आली. या रॅलीत शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश दिला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowMar 13, 2026 06:22:290
Report
JMJAVED MULANI
FollowMar 13, 2026 06:19:370
Report
JMJAVED MULANI
FollowMar 13, 2026 06:01:430
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 13, 2026 05:32:030
Report
ABATISH BHOIR
FollowMar 13, 2026 05:31:240
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 13, 2026 04:50:010
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 13, 2026 04:49:210
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 13, 2026 04:45:350
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 13, 2026 04:34:410
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 04:34:210
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 04:32:450
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 13, 2026 04:20:150
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 13, 2026 04:19:590
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 13, 2026 04:19:110
Report