Back
इरान-अमेरिका युद्ध के डर से डोंबिवली में गैस लाइन अपडेट के नाम पर ठगी
ABATISH BHOIR
Mar 13, 2026 05:31:24
Kalyan, Maharashtra
युद्ध इराण–अमेरिकेचे, लूट डोंबिवलीकरांची!
गॅस टंचाईच्या भीतीचा फायदा घेत ‘गॅस लाईन अपडेट’च्या नावाखाली सायबर भामट्यांचा डाव; दोन दिवसांत दोन महिलांना ४ लाखांचा गंडा
अज्ञात आरोपीविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; पोलिसांचा तपास सुरू
अमेरिका–इराण–इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईची भीती निर्माण झाली असताना सायबर भामट्यांनी त्याचाच गैरफायदा घेण्यास सुरुवात केली आहे. डोंबिवलीत ‘गॅस लाईन अपडेट’च्या नावाखाली दोन महिलांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या दोन दिवसांत भामट्यांनी भामट्यांनी दोन महिलांकडून तब्बल चार लाख रुपये उकळले असून या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे जागतिक गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याच्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये आधीच चिंतेचे वातावरण आहे. गॅस टंचाईच्या भीतीने अनेक ठिकाणी नागरिक गॅस एजन्सीबाहेर रांगा लावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र याच परिस्थितीचा फायदा घेत सायबर भामट्यांनी आता नवा डाव आखला आहे.डोंबिवलीतील सुनीलनगर परिसरात राहणाऱ्या 45 आणि 56 वर्षीय दोन महिलांना ‘गॅस लाईन अपडेट’ करण्याच्या नावाखाली भामट्यांनी लक्ष्य केले. दोन दिवसांपूर्वी एका 45 वर्षीय महिलेला “गॅस कनेक्शन बंद होईल” अशी भीती दाखवत 10 रुपयांचे ई-चलन भरण्याची लिंक पाठवण्यात आली. त्या लिंकवर क्लिक करताच तिच्या खात्यातून तब्बल 2 लाख 99 हजार 500 रुपये लंपास करण्यात आले. यानंतर अशाच प्रकारे त्याच परिसरातील 56 वर्षीय महिलेलाही गॅस लाईन बुक अपडेट करण्यासाठी APK लिंक पाठवण्यात आली. त्या लिंकवरून माहिती भरल्यानंतर तिच्या खात्यातून जवळपास 1 लाख रुपये काढून घेण्यात आले. अशा प्रकारे अवघ्या दोन दिवसांत दोन्ही महिलांकडून सायबर भामट्यांनी एकूण चार लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.या प्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित महिलांनी डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना इशारा देत अनोळखी नंबरवरून येणारे मेसेज, लिंक किंवा APK फाइल उघडू नये असे आवाहन केले आहे. तसेच गॅस बिल, कनेक्शन अपडेट किंवा इतर कोणतेही काम असल्यास ते अधिकृत गॅस एजन्सी किंवा अधिकृत संकेतस्थळावरूनच करावे, अन्यथा सायबर फसवणुकीला बळी पडण्याची शक्यता असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowMar 13, 2026 06:22:290
Report
JMJAVED MULANI
FollowMar 13, 2026 06:19:370
Report
JMJAVED MULANI
FollowMar 13, 2026 06:01:430
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 13, 2026 05:48:180
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 13, 2026 05:32:030
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 13, 2026 04:50:010
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 13, 2026 04:49:210
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 13, 2026 04:45:350
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 13, 2026 04:34:410
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 04:34:210
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 04:32:450
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 13, 2026 04:20:150
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 13, 2026 04:19:590
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 13, 2026 04:19:110
Report