Back
कल्याण पूर्व आनंदवाडी में शून्य कचरा अभियान से सफाई मुहिम तेज
ABATISH BHOIR
Feb 26, 2026 01:45:42
Kalyan, Maharashtra
कल्याण पूर्व येथील आनंदवाडी परिसरात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने राबवली शून्य कचरा मोहीम. कचरा उचलायला आले नाही तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे फोन नंबर जाहीर फालकावर कल्याण पूर्व येथील आनंदवाडी परिसर अत्यंत दाटीवाटीचा आणि चाळवजा परिसर आहे, या आनंदवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा रस्त्यावर टाकला जात असल्याने मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली होती. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे. आणि शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद पिंगळे. यांनी या प्रभागात शून्य कचरा मोहीम, कचराकुंडी मुक्त प्रभाग ही संकल्पना सुरू केली. गेल्या आठवडाभरापासून केडीएमसी घनकचरा विभागातील कर्मचारी तसेच शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद पिंगळे यांच्या कार्यकर्ते घरोघरी जाऊन जनजागृती करत आहेत, कचरा वर्गीकरण करा, कचरा रस्त्यावर कचरा टाकू नका. घंटागाड्यामध्ये कचरा टाका. असं आवाहन केडीएमसी कडून नागरिकांना केलं जात आहे या पार्श्वभूमीवर या प्रभागांमध्ये दिवसभरात दोन वेळा घंटागाड्यांचा नियोजन करण्यात आलं आहे. तसेच घकचरा अधिकारी कर्मचाऱ्यांचे फोन नंबर देखील फलक वर लावण्यात आले आहेत. या उपक्रमाला नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला आहे. वारंवार आवाहन करूनही रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईदेखील सुरू करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात हा प्रभाग कचराकुंडी मुक्त दिसेल आणि शून्य कचरा मोहीम या प्रभागात आम्ही यशस्वी करू असा दावा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी केला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 26, 2026 02:46:370
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 26, 2026 02:46:070
Report
PNPratap Naik1
FollowFeb 26, 2026 02:45:490
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 26, 2026 02:45:280
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 26, 2026 02:32:530
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 26, 2026 02:31:010
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 26, 2026 02:18:040
Report
AKAMAR KANE
FollowFeb 26, 2026 02:16:390
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 26, 2026 02:16:24Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा विभाग घेते सुपर एन्ट्री... अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांकडून अवैध वसूल घेत असल्याचा राष्ट्रवादी पक्षाचा आरोप... पोलिसांनी सर्व आरोप फेटाळले...
0
Report
PNPratap Naik1
FollowFeb 25, 2026 17:16:400
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 25, 2026 15:52:300
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 25, 2026 15:48:340
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 25, 2026 15:47:450
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 25, 2026 15:47:210
Report