Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

चुनाव तिथि घोषित न होने पर ग्राम पंचायतों में प्रशासक नियुक्ति, सरपंच नाराज़

JJJAYESH JAGAD
Feb 26, 2026 02:45:28
Akola, Maharashtra
Anchor : राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतींची मुदत संपली असून उर्वरित ग्रामपंचायतींची मुदत २८ फेब्रुवारीला संपत आहे. मात्र अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर न झाल्याने राज्य सरकारने २२ फेब्रुवारी रोजी अध्यादेश काढत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून विद्यमान सदस्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करत सांगली, सातारा आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये विद्यमान सदस्यांना प्रशासक म्हणून नेमण्यात आले आहे. दरम्यान, निवडणुका वेळेत घ्याव्यात आणि तोपर्यंत विद्यमान सदस्यांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करावे, अशी याचिका अकोला जिल्ह्यातील २२ सरपंचांनी न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर २४ तारखेला न्यायालयाने सदस्यांच्या बाजूने निर्णय देत सरकारच्या अध्यादेशाला दुजोरा दिला.मात्र, न्यायालय आणि राज्य सरकारची मंजुरी असूनही अकोला जिल्ह्यात अद्याप विद्यमान सदस्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली नाही. यामुळे संबंधित सरपंचांनी नाराजी व्यक्त केली आहे.अकोला जिल्हा परिषद मुख्याधिकारी हे राज्य सरकार आणि न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत असल्याचा आरोपही सरपंचांकडून करण्यात आला आहे. गावाच्या विकासकामांना खीळ बसू नये यासाठी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर तात्काळ विद्यमान सदस्यांनाच प्रशासक म्हणून नेमावे, अशी मागणी सरपंचांनी केली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
Feb 26, 2026 04:19:47
Virar, Maharashtra:वसई विरार मध्ये भाजपला खिंडार पडण्यास सुरवात भाजप नेत्या ऍड साधना धुरी बविआ मध्ये अँकर : निवडणुकीपूर्वी बहुजन विकास आघाडीला लागलेली गळती आता थांबली आहे. मात्र आता चक्क भाजपालाच खिंडार पाडण्यास सुरुवात झाली आहे. वसई शहरातील भाजपच्या फायर ब्रँड नेत्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा एडवोकेट साधना धुरी यांनी बुधवारी बहुजन विकास आघाडी मध्ये प्रवेश केला. बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, महापौर अजीव पाटील, यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. या वेळेला अनेक भाजप कार्यकर्त्यांनी बविआ मध्ये प्रवेश केला. साधना धुरी यांनी नुकतीच भाजप तर्फे महापालिका निवडणुक लढवली होती. बविआ मध्ये प्रवेश करताच धुरी यांनी आंद स्नेहा दुबे पंडित यांच्यावर टीका केली. त्या फक्त रील बनवत असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढील काळामध्ये देखील भाजपाचे अनेकजण बहुजन विकास आघाडीमध्ये येतील आणि आमचा पक्ष अधिक मजबूत होईल असा दावा येथील हितेंद्र ठाकूर यांनी केला. बाईट : माजी आमदार हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडी
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 26, 2026 04:19:03
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Feb 26, 2026 04:18:43
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 26, 2026 04:05:38
Malegaon, Maharashtra:विशाल मोरे, मालेगाव - मालेगाव मनपा कार्यालयात नमाज पठण प्रकरणी अखेर गुन्हा दाखल झाला. मालेगाव किल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लोकसंघर्ष समितीचे लुकमान, सलीम एक्का यांच्या सह चार ते पाच जणांवर मनपाच्या विद्युत विभागाच्या कार्यालयातच नमाज पठण केल्या प्रकरणी मालेगावच्या किल्ला पोलिस ठाण्यात BNS कलम 132, 292, 189(2), 190 सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 37(1)(3) चे कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करणे, शासकीय कामात अडथळा अशा कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला. नमाज पठण प्रकरणी संपूर्ण राज्यात पडसाद उमटले होते, तर विविध राजकीय स्तरातून प्रतिक्रिया येण्यास सुरू झाली होती.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 26, 2026 04:00:09
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 26, 2026 03:49:11
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... लातूरमध्ये अखेर पंचनाम्याला सुरुवात.... अवकाळी पाऊस, गारपीट आणि चक्रीवादळात हजारो हेक्टर पिकांचे नुकसान.... लातूर मध्ये अखेर ZEE 24 TAAS च्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळत आहे. लातूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस , गारपीट आणि चक्रीवादळाच्या तडाख्यात शेती पिकाची प्रचंड नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्याकडून होत असताना कृषी विभागाकडून मात्र लेखी आदेश नसल्याचे सांगून पंचनामे करण्यास टाळाटाळ केली जात होती. अखेर ZEE 24 TAAS ने बातमी दाखवतात कृषी विभागाने बातमीची दखल घेत थेट नुकसानग्रस्ताच्या बांधावर जाऊन पंचनाम्याला सुरुवात केली आहे. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात पाहणी करत पंचनामा प्रक्रिया सुरू केली आहे. थेट बांधावरून कृषी अधीक्षक यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी….
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 26, 2026 03:45:40
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 26, 2026 03:35:42
Chendhare, Maharashtra:इंदापूर येथील बायपासचे काम रखडण्याची शक्यता .... कोकण रेल्वेच्‍या ओव्हरहेड लाईनचा कामात अडथळा.... एकीकडे गेली 13 वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्ग आणि दुसरीकडे या महामार्गावरील वाहतूक कोंडीला पर्याय व्यवस्था म्हणून सुरू असलेला इंदापूर आणि माणगाव बायपासचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र इंदापूर बायपास जवळील सुरू असलेल्या फ्लायओव्हरच्या कामात अडथळा निर्माण झालाय. या फ्लायओव्हर ब्रीज खालून जाणारी कोकण रेल्वे आणि या कोकण रेल्वेच्या विद्युत लाईनचा भाग समोरासमोर असल्याने कामाला उशीर होण्याची शक्यता आहे. एकूण 5 किलोमीटर लांबीच्‍या या कामात बहुतांश काम अंतिम टप्प्यात आहे मात्र रेल्वेचे खांब आणि विद्युत लाइन मुळे येत असलेल्या तांत्रिक अडचणी येत आहेत. यासदंर्भात बैठका होवूनदेखील त्‍यावर अद्याप तोडगा नि घालेला नाही. रेल्वे विभागाने हा वि षय मार्गी लावावा अशी विनंती ठेकदार कंपनीकडून करण्‍यात आली आहे
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 26, 2026 03:34:57
Nashik, Maharashtra:बनावट चेकद्वारे इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करून दोन वर्षांपासून फरार असलेला आरोपी अखेर गुन्हेशाखा यूनिट क्रमांक एकच्या जाळ्यात अडकला आहे. आरोपी अनिल रमेश कोपरे ने मुंबईनाका येथील मॅन्सन व्हिल्स दुकानातून बनावट चेक देऊन इलेक्ट्रिक दुचाकी स्वतःच्या नावावर खरेदी केली होती. चेक बँकेत वटवण्यासाठी सादर केला असता तो बनावट असल्याचे समोर आले… आणि त्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुप्त माहितीच्या आधारे ओझर येथील पगार मळा परिसरात सापळा रचून आरोपीला शिताफीने अटक करण्यात आली. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास मुंबईनाका पोलीस करत आहेत.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Feb 26, 2026 03:34:44
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणीतील लालगुडा येथे बनावट देशी दारूच्या कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही मोठी कारवाई एका आलिशान दुमजली घरामध्ये केली. घरात एक भूमिगत खोली तयार करून त्यात ठेवलेले देशी दारू व निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. ‘रुपेश संत्रा’ ब्रँडचे बनावट स्टिकर लावलेल्या ३६०० निप जप्त करण्यात आल्या. तसेच रिकाम्या बाटल्या, झाकण, काचेच्या बाटल्या, प्लास्टिक ड्रम, वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाईदरम्यान लाकडी दिवाणामध्ये लपून बसलेल्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. तर मुख्य आरोपी श्याम मेश्राम हा कुटुंबासह फरार झाला.
0
comment0
Report
Advertisement
Back to top