Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423101

चांदवड बाजार समिति के किसान आमरण उपोषण तीसरे दिन, चिकित्सा टीम पहुँची

SKSudarshan Khillare
Feb 25, 2026 15:52:30
Chandwad, Maharashtra
चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विविध मागण्यांसाठी कांदा व मका उत्पादक शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस असून, तिघा उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडल्याने चांदवड ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय पथकाने घटनास्थळी भेट देत सर्वांची वैद्यकीय तपासणी केली तपासणीनंतर डॉक्टरांनी संबंधित उपोषणकर्त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला दिला मात्र, आपल्या मागण्यांवर ठाम राहत आंदोलनकर्त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला असता शेतकऱ्यांनी विलास भवर यांना बळजबरीने रुग्णवाहिनीकेत उचलून नेत उपचार घेण्यासाठी पाठवले
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Feb 25, 2026 17:16:40
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 25, 2026 15:48:34
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात मोठी घडामोड, 2 मोठे काँग्रेस नेते भाजपच्या वाटेवर, मुख्यमंत्री फडणवीस यांची घेतली भेट चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणातली मोठी घडामोड पुढे आली आहे. जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस नेते आणि चिमूर विधानसभा क्षेत्रातील महत्त्वाचे काँग्रेस नेते माजी आमदार अविनाश राजूरकर आणि माजी जि. प. अध्यक्ष सतीश राजुरकर यांनी याच क्षेत्राचे भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. आगामी काळात या दोघांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील महत्त्वाचे दोन काँग्रेस नेते भाजपच्या तंबूत दाखल होणार असल्याने या भेटीला महत्व आहे. आगामी काळात हा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आ. बंटी भांगडिया यांनी सतीश वारजूरकर यांना पराभूत केले होते.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Feb 25, 2026 15:47:45
Satara, Maharashtra:साताऱ्यात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. शहरातल्या गजबजलेल्या करंजे पेठ नाका परिसरात 'कोयता गॅंग'ने भरदिवसा धुमाकूळ घातला असून एका गॅरेज मधील तरुणावर अज्ञात हल्ले खोराने धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला केला आहे. अक्षय रामदास गाडे हा तरुण यामध्ये गंभीर जखमी झाला असून हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. यातील एका हल्लेखोराला जखमी अक्षय गाडे याने दुकानातच डांबून ठेवल्यामुळे त्या आरोपीला शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी येऊन ताब्यात घेतले. मात्र त्याचा दुसरा साथीदार या घटनेनंतर फरार झाला आहे. हा हल्ला कोणत्या कारणातून झाला याचा तपास पोलीस करत आहे. जखमी अक्षय गाडेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 25, 2026 15:47:21
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 25, 2026 13:36:20
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील शिवभोजन केंद्रांचे अनुदान 10 महिन्यापासून रखडले आहे. अनुदान वारंवार थकीत राहत असल्याने शिवभोजन केंद्र संचालकांची अडचण झाली आहे. दहा रुपये namomatra दरात एक वेळचे पोटभर जेवण देणारी ही योजना नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. मात्र अनुदानात सातत्य नसल्याने केंद्र संचालक कर्जबाजारी झाले. ही योजना अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज व्यक्त होत आहे. मविआ सरकारच्या काळात राज्यात महत्वाकांक्षी शिवभोजन थाळी योजना सुरू करण्यात आली होती. मात्र सध्या या योजनेसाठी अनुदान सातत्याने थकीत होत असल्याने केंद्र संचालकांची अडचण झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 60 वर शिवभोजन केंद्रे असून ती मुख्यत्वे कामगार वसाहती -बसस्थानक व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांच्या वस्त्यांमध्ये आहेत. ही केंद्र आधार कार्ड व ॲप नोंदणी या तत्त्वावर चालते. नाममात्र दरात एक वेळ पोटभर जेवण देणारी ही योजना सध्या घरघर लागलेल्या अवस्थेत आहे. किराणा- स्वयंपाकी- मदतनीस यासह शिवभोजन केंद्र चालवण्यासाठीचा खर्च परवडेनासा झाल्याने अनेक केंद्र संचालक याबाबत आता नकारात्मक विचार करत आहेत. सातत्याने अनुदान थकीत राहत असल्याने हे ओझे कुठवर वागवायचे असाही विचार आहे. शासनाने योजनेच्या अनुदानात सुरळीतपणा आणण्याची मागणी केंद्र संचालकांनी केली आहे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Feb 25, 2026 13:31:47
Baramati, Maharashtra:ऑन_रोहित पवार गुन्हा दाखल करणार* सखोल चौकशी झाली पाहिजे. रोहित दादा असतील किंवा जय असेल वहिनी पार्थ दादा किंवा मी असेल महाराष्ट्रात दादांवर प्रेम करणारी सर्व जनता आहे त्या सर्वांची इच्छा आहे सखोल चौकशी झाली पाहिजे. लवकरात लवकर ही चौकशी व्हावी अशी जनतेची इच्छा आहे. *ऑन_घातपात?* चौकशी होऊ द्या मुख्यमंत्र्यांनी ही चौकशी सीबीआय कडे दिली आहे. डीजीसीएच ऑडिट कालच आलो आहे. त्यामध्ये व्ही एस आर कंपनीचे लेयर जेट आहेत त्याच्या उड्डाणाला बंदी घातली आहे माझा असं मत आहे त्यांच्या सर्वच विमानांच्या उड्डाणाला बंदी घातली पाहिजे पूर्ण चौकशी व्हावी. सीआयडी चौकशी करत आहे पुरोहित पवारांनी देखील प्रायव्हेट एजन्सी नेमली आहे. तयावेळी कळेल की नक्की घातपात झालाय की काय. *ऑन_ब्लॅक बॉक्स* परवा जायचं ट्विट तुम्ही पाहिले असेल. ब्लॅक बॉक्स डिझाईनच त्या पद्धतीने केला जातो, त्या ब्लॅक बॉक्स ला काहीही होत नाही. त्या ब्लॅक बॉक्सचं कामच डेटा रेकॉर्ड करून असतं. एवढं सहजासहजी त्यात काय होत नसतं. त्यात काय झालं असेल असं मला वाटत नाही. जरी ब्लॅक बॉक्स ला काय झालं असेल तरी अमेरिकेत ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे ती टेक्नॉलॉजी आहे की ब्लॅक बॉक्स मधील ती सर्व माहिती शोधून काढू शकतात. मला विश्वास आहे किती संपूर्ण माहिती आपल्याला समजेल *ऑन_घटनास्थळी आपण काय पाहिलं* या घटनेला आता एक महिना होत आला आहे. तरीपण मन मानायला तयार नाही असं काहीतरी झाल आहे. एवढी भयानक घटना झाली आहे कोणाच्याच कुटुंबावर अशी वेळ येऊ नये अशी वेळ आमच्या कुटुंबावर आली आहे. मी तेव्हा बारामतीत होतो. दुसऱ्या कार्यक्रमासाठी मी निघालोलो. मला ८:५५ मिनिटांनी एक फोन आला अजित पवारांच्या विमानाचा अपघात झालाय. या कंपनीची जी विमान आहेत त्याचे रिपोर्टेशन नेहमीच खराब होतं. असंच एक विमान मुंबईमध्ये क्रॅश झालं होतं. त्यामुळे मलाही वाटलं क्रॅश लँडिंग झालं असेल त्यामुळे मी लगेच पहिल्यांद्या बारामती एअरपोर्टवर पोहोचलो. बारामती एअरपोर्टवर गेलो मला तिथे काहीच दिसलं नाही. मि माझी गाडी रनवे वरती घेतली. अकरा नंबर रनवे वरती मी पोहोचलो. 50 फूट खोल मला दादांचे विमान दिसलं. त्यावेळी विमान जळून खाक झालं होतो. विमानाची मागची बाजू फक्त दिसत होती. *ऑन_अतिरिक्त इंधन* असं माझ्याही कानावर आलं आहे. ते विमान बारामती ला आले नंतर लगेच ते मुंबईला जाणार होतं. मी असही ऐकलं आहे की पैसे वाचवण्यासाठी VSR कंपनीने त्यामध्ये अतिरिक्त इंधन टाकलं होतं. कंपनीचे पैसे वाचले पाहिजेत, त्या कंपनीचा मेंटेनन्स रेकॉर्ड खूप काही चांगला नव्हता आता या संदर्भातील डीजीसीए ने त्या संदर्भातील स्पेशल ऑडिट केलं आणि त्याचा रिपोर्ट देखील काल आला आहे. *ऑन_रोहित पवार* त्यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला तिथे त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला नाही. उद्या ते बारामती पोलीस ठाण्यात जाणार आहेत मी ही त्यांच्यासोबत जाणार आहे. VSR कंपनीच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत. हा अपघात आहे की घातपात आहे.आमची किंवा महाराष्ट्राच्या जनतेचे एवढीच इच्छा आहे सत्य लवकरात लवकर बाहेर यावं. *ऑन_राष्ट्रवादी विलीनीकरण* आपला पक्ष एक होणार होता आहे खर आहे. नगरपालिकेत जरी आपण वेगळं होतो तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र आले. पुणे जिल्ह्यासह बाहेरच्या जिल्ह्यातही आपले बरेच उमेदवार तुतारी सोडून घड्याळ चिन्हावर लढले. दादांची ती इच्छा होती. साहेबांसाठी आपण ते केलं पाहिजे सर्व ठरलं होतं. बारामती मध्ये देखील आपण एकत्र आलो. घड्याळ चिन्हावर आपले सर्व उमेदवार निवडणुकीत होते. आपण एकत्र येणार नसतो तर असं हे सगळं झालं असतं का. *आमचे जे ज्येष्ठ नेते असतील किंवा या चर्चेत असणारे लोक तुम्हाला उत्तर देतील* *कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आले पाहिजे दोन्ही पक्षांनी पण एकत्र आले पाहिजे ही फक्त युगेंद्र पवार यांचीच इच्छा नाही तर पवार कुटुंबाची पण इच्छा आहे आणि महाराष्ट्र मधील अनेक लाखो कार्यकर्त्यांची इच्छा आहे जनतेची इच्छा आहे, एकत्र येणं ही काळाची गरज आहे आपल्या पक्षाला गरज आहे दोन्ही पक्षाला त्याचा फायदा होणार आहे आणि ती माझी वैयक्तिक इच्छा आहे जो निर्णय होईल त्या निर्णयाशी आम्ही सहमत असू* *ऑन_शरद पवार प्रकृती* मी कालच त्यांना भेटलो ते काल मुंबईच्या शोक सभेला येऊ शकले नाहीत. डीहायड्रेशन झाल्यामुळे ते त्या ठिकाणी येऊ शकले नाही. साहेबांची तब्येत खूप चांगली आहे. त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय थोडी त्यांना विश्रांतीची गरज आहे *ऑन_पार्थ पवार राज्यसभा* तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे कोणाला राज्यसभेवर पाठवायचं. पार्थ पवार हे माझे मोठे भाऊ आहेत त्यांना जर पक्षाकडून संधी मिळेल तर मला आनंदच होईल. *ऑन_शरद पवार राज्यसभा* फॉर्म भरण्याची वेळ आणखीन दहा-बारा दिवस आहेत. बहुतेक आज साहेब मुंबईला जातील. पुढे काय होतंय आपले तिन्ही पक्ष आहेत महाविकास आघाडीचे एकत्र बसतील आणि ठरवतील. राजकारण बाजूला ठेवलं तरी आपल्या countryला साहेबांची गरज आहे, साहेबां एवढा अनुभव दुसऱ्या कुठल्याच नेत्याला नाही. परवाच साहेबांची 60 वर्ष राजकारणात पूर्ण झाली. एवढा मोठा अनुभव असणारा नेता आपल्या भारतात नाही. त्यामुळे सर्वच पक्षांना साहेबांसारख्या नेतृत्वाची गरज आहे. जर तिथे गेले तर आपल्या देशाला फायदा होईल आणि त्यांनी तिथे जावं. बाईट - युगेंद्र पवार
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Feb 25, 2026 13:03:58
Manchar, Maharashtra:ब्रेकींग न्युज\nमंचर पुणे...\nपुणे जिल्ह्याच्या मंचर येथे भिषण आग...आगीत MSEB कार्यालया सह आजूबाजूच्या दुकांनां भिषण आग... आगीचे लोट मोठ्या प्रमाणात असल्याने आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना येत आहेत अडथळे... बाजूला सीएनजी पंप असल्याने सीएनजी पंपावरील वाहने केली खाली सीएनजी पंप ही केला बंद... आगीत MSEB कार्यालयातील ट्रांसफार्मर सह अनेक वस्तू जळाल्याने परिसरातील विद्युत पुरवठा ठप्प... बाजूला असलेल्या शेतकऱ्याने ऊसाचे पाचट पेटवल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती.. आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण...\n\nप्रतिनिधी हेमंत चापुडे\nझी मिडीया मंचर पुणे...
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Feb 25, 2026 12:52:20
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 25, 2026 12:35:18
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Feb 25, 2026 12:34:41
Baramati, Maharashtra:इंदापूरच्या भिगवण प्रकरणात मोठी अपडेट... मुलीने न्यायालयासमोर व्यक्त केली आई आणि मामासोबत जाण्याची इच्छा... तत्पूर्वी बारामती न्यायालयासमोर आईसोबत जाण्यास दिला होता नकार. Anchor पुण्याच्या भिगवण प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. भिगवण अपहरणात प्रकरणातील तरुणीने इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर आपल्याला आईकडे आणि मामाकडे जायची इच्छा व्यक्त केली आहे. यावर कोर्टाने संबंधित मुलीचा ताबा आई आणि मामाकडे देण्यासंदर्भात आदेश पारित केला आहे. 20 फेब्रुवारी रोजी बारामती सत्र न्यायालयासमोर या तरुणीने आपण आईसोबत जाणार नसून जहीर शेख सोबतच जाणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आज इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयात व्हीसीद्वारे या प्रकरणातील सुनावणी पार पडली. पुन्हा आज इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयाने संबंधित तरुणीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे काही प्रश्न विचारले. यावेळी संबंधित तरुणींना आई आणि मामा सोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली. मुलगी काय म्हणाली कोर्टात? मुलीची आई बारामती पोलीस स्टेशनला आली होती. मात्र, मुलगी आई सोबत जाण्यास तयार नव्हती. त्यामुळे भिगवण घटनेतील मुलीला सुधार गृहात तिची रवानगी करण्यात आली होती. सुधारगृहात पाच दिवस राहिल्यानंतर आज इंदापूर कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने मुलीला कोणाकडे जायचे असे विचारले असता मुलीने आई आणि मामाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 25, 2026 11:37:59
Nashik, Maharashtra:*नंबर ब्लॉक केल्याचा राग; प्रियकराकडून युवतीवर मिरची पूड फेकत अपहरणाचा प्रयत्न!* *पालकांनी लग्नास नकार दिल्याने संताप; सातपूर पोलिसांकडून मुख्य संशयित अटकेत, तिघांचा शोध सुरू* अँकर नाशिकमधील कामगार नगर परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याचा राग मनात धरून प्रियकराने थेट अपहरणाचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. युवतीच्या डोळ्यात मिरची पूड टाकत तिला जबरदस्तिने पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य संशयित आनंद राजभर याला अटक करण्यात आली आहे. आनंद राजभर आणि संबंधित युवती यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, युवतीच्या पालकांनी लग्नास नकार दिल्यानंतर तिने संबंध तोडत त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला.याचाच राग मनात धरून संशयिताने ‘माझी नाही तर दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही’ या विकृत मानसिकतेतून तीन मित्रांना युवतीच्या मागावर पाठवले. दुचाकी देत पाळत ठेवण्याचे आदेश दिले होते. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या sुमारास युवती कामगारनगर येथील किराणा दुकानात आली असता, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी तिला रस्त्यात अडवले. तिच्या डोळ्यात मिरची पूड टाकून हल्ला केला आणि अपहरणाचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी शिवीगाळ करत पळ काढला. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास करत मुख्य संशयित आनंद राजभर याला अटक केली असून इतर तिघांचा शोध सुरू आहे. बाईट - भाऊसाहेब दहिफळे -तपास अधिकारी मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, काही व्यक्तींमध्ये तीव्र मालकीभाव, नकार सहन न होणे आणि त्वरित अपेक्षा पूर्ण न झाल्यास आक्रमक वर्तन दिसून येते. Indian Psychiatric Society च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, भावनिक परिपक्वतेचा अभाव आणि राग नियंत्रण न होणे यामुळे काही तरुण अतिशय टोकाची पावले उचलतात. तरुण पोरांमध्ये हे प्रमाण अतिशय वेगाने वाढत आहे कारण हवे ते गोष्टी लगेच मुलांना लगेच मिळतात आणि त्यामुळे ती गोष्ट न मिळाल्या कारणाचा राग मनात येतो आणि यामुळे अतिशय टोकाचे पावलं हे मुलं उचलतात.... मुलांना भावनिक दृष्ट्या समजून सांगणे महत्त्वाचे आहे... त्यांची काउन्सलिंग करायला महत्त्वाचा आहे एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली नाही म्हणजे आयुष्य संपत नाही.... अशा पद्धतीच्या गोष्टी आई-वडिलांनी समजून सांगितल्या पाहिजे... बाईट - नकूल कोळी (मानस रोग तज्ज्ञ) याशिवाय नाशिकमध्ये घडलेली ही घटना पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणते आहे. प्रेमसंबंधातील मतभेद इतके टोकाचे रूप धारण करणे ही चिंतेची बाब आहे..
0
comment0
Report
Advertisement
Back to top