Back
कल्याण डोंबिवली महापालिका चुनाव: भाजपा-शिवसेना समन्वय समिति की स्थापना
ABATISH BHOIR
Dec 26, 2025 06:54:58
Kalyan, Maharashtra
केडीएमसी निवडणुकीपूर्वी भाजप और शिवसेने कडून समन्वय समिती स्थापना. भाजपचे 7 तर शिवसेनेचे 6 सदस्य समितीत सहभागी...आतापर्यंत दोन महत्त्वाच्या बैठका संपन्न. मात्र जागावाटपावर तणाव कायम कल्याण–डोंबिवली : आगामी 2025–26 मधील कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना युतीकडून महत्त्वाचं संघटनात्मक पाऊल उचलण्यात आलं आहे. निवडणुकीतील नियोजन, जागावाटप आणि दोन्ही पक्षांतील समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी भाजप–शिवसेना समन्वय समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीमार्फत आतापर्यंत दोन बैठका पार पडल्या मात्र बदलापूर आणि अंबरनाथ येथील निवडणुकांतील विजयानंतर भाजप अधिक आक्रमक झाल्याचं चित्र दिसून येत आहे. शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या कल्याण–डोंबिवली महापालिकेत भाजपने पाच वर्षांचे महापौर पद आणि 83 नगरसेवकांच्या जागांची मागणी केल्याने युतीत अंतर्गत तणाव वाढल्याचं दिसत आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले की, ही समन्वय समिती प्रामुख्याने युतीबाबतच्या चर्चांसाठी स्थापन करण्यात आली आहे. युती झाली तर तिचा फॉर्म्युला काय असावा आणि युती झाली नाही तरी पुढील रणनीती काय असावी, यावर चर्चा सुरू आहे. भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेनुसार पक्षाच्या 80 पेक्षा अधिक जागा निवडून येतील असा दावा करण्यात आला आहे. तसेच गेल्या टर्ममध्ये भाजपला महापौर पद न मिळाल्यामुळे यावेळी संपूर्ण पाच वर्षांचे महापौर पद भाजपला देण्यात येावे, अशी ठोस भूमिका पक्षाने मांडली आहे. तसेच भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी भाजपच्या समितीत पाच सदस्य आणि दोन निमंत्रित सदस्यांचा समावेश असून शिवसेनेकडे दोन बैठका झाल्या आहेत. पहिल्या बैठकीत दोन्ही पक्षांच्या सध्याच्या नगरसेवक संख्येवर चर्चा झाली, तर दुसऱ्या बैठकीत भाजपने 83 जागांची अधिकृत मागणी केली आहे. 2015 मध्ये भाजपला महापौर पद न मिळाल्यामुळे त्या आधारे आता पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ भाजपला मिळावा हा प्रस्ताव शिवसेनेकडे आम्ही ठेवला असून शिवसेनेला तो मान्य असल्याचा दावा त्यांनी केला. meanwhile, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी समन्वय समितीच्या स्थापनेचे स्वागत करत सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे. चर्चा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झाल्याचं त्यांनी सांगितलं. सध्याच्या स्थितीत शिवसेनेकडे अंदाजे 70 ते 72 नगरसेवक, तर भाजपकडे 53 ते 57 नगरसेवक असल्याचं त्यांनी नमूद केलं. अंतिम निर्णय हा दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून घेण्यात येईल आणि तो सर्वांना मान्य असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एकीकडे वरिष्ठ पातळीवर समन्वय वाढवण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी दुसरीकडे तळागाळातील कार्यकर्त्यांकडून युतीविरोधात दबाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowDec 26, 2025 08:46:290
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 26, 2025 08:46:190
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 26, 2025 08:16:590
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 26, 2025 07:52:200
Report
ABATISH BHOIR
FollowDec 26, 2025 07:36:370
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 26, 2025 07:00:160
Report
HPHARSHAD PATIL
FollowDec 26, 2025 06:55:270
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 26, 2025 06:53:590
Report
PNPratap Naik1
FollowDec 26, 2025 06:32:130
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 26, 2025 06:15:380
Report
AKAMAR KANE
FollowDec 26, 2025 06:03:130
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 26, 2025 06:00:260
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 26, 2025 05:46:270
Report
AKAMAR KANE
FollowDec 26, 2025 05:17:040
Report