Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001
छत्रपती संभाजीनगर में युति की घोषणा करीब, उम्मीदवार सूची पर चर्चा जारी
VKVISHAL KAROLE
Dec 26, 2025 07:00:16
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर.. मंत्री संजय शिरसाठ यांची पत्रकार परिषद पॉइंटर ऑन संभाजीनगर युती. - मनपा युतीची बैठक अंतिम टप्प्यात आहे. दोन चार जगामुळे अडलेले आहे.मात्र आज युतीची घोषणा होईल, जागा वाटपाचा फॉर्म्युला आज जाहीर करण्याचा प्रयत्न राहील. - सन्मानपूर्वक दोन्ही पक्षांना जागा मिळतील त्याशिवाय युती होणार नाही. सन्मानजनक तोडगा काढू. ऑन घोसाळकर फोटो घेऊन फिरू नये. - नवऱ्याचे छायाचित्र वापरू नये मग कुणाचा वापरावा, असे खालच्या पातळीवरील राजकारण ubt आणि संजय राऊत करू शकतो. राजकारणाच्या साठी कोणत्याही थरावर जातील, ऑन नवाब मलिक, मुंबई राष्ट्रवादी एकत्र. - पुण्यामध्ये राष्ट्रवादी एकत्र येणार अशी बातमी होती. त्याच पद्धतीने मुंबईमध्ये होत असेल तर त्याची दखल देवेंद्र फडणवीस यांनी घेतले पाहिजे. आम्हाला नवाब मलिक चालणार नाही. म्हणून आम्ही युतीत नाही. - दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर ते त्यांच्या अंतर्गत विषय आहे. मात्र असे झाले तेंव्हा निर्णय घेऊन. - जर शरद पवार यांना आमच्या युतीमध्ये येत असेल तर निर्णय घेतील. भविष्यात शरद पवार काहीही करू शकता. ते एक बाजूने राहतील हे चुकीच आहे. त्यांनी अनेकवेळा त्यांची भूमिका बदलेला आहे. पक्ष देखील विलीन केला आहे. ऑन उद्धव ठाकरे जगताप फोन. - आता उद्धव ठाकरे यांना पक्षात घेण्याची लय घाई झाली मात्र कुणीही यायला तयार नाही. डूबईच्या जहाजात कोणीही बसत नाही. ऑन पुणे - पुण्यात आमची ताकद कमी जरी असली तरी आम्ही निवडणूक चांगली लढू. ऑन प्रचार यादीत मलिक नाव. - अजित दादांच्या स्टार प्रचारक यादीत नवाब मलिक आहे म्हणून युती होणार नाही. - Ubt फुटू नये पक्षात जाऊ नये म्हणून रचना आहे मात्र ubt उमेदवार मिळणार नाही. - ठाणे मुंबई कल्याण डोंबिवली मध्ये येत्या दोन दिवसात युती होईल. सकारात्मक बैठका चालू आहे. युती होईलच. ऑन संजय राऊत, गोगावले पुत्र गुन्हा. - प्रकरणाचा तपास सुरू आहे. न्यायालयीन प्रक्रिया करू नये असे नाही. जेवढे कायदेशीर बाजू आहे. त्याचा अवलंब केला जात आहे. दबावतंत्र राहिला असतात तर त्याचा मुलगा फिरताना दिसला असता, जमीन मिळाली असती. - ढगात गोळी मारण्याचा प्रयत्न संजय राऊत करीत असते. काही तरी स्फोटक बोलले तर त्याची बातमी होते म्हणून असे विधान केले जातात. ड्रग्स प्रकारात रेड पडली ती मुंबई क्राइम ब्रँचने टाकली. गुन्हेगारांना वाचवले जाणार नाही. - ते निवडणूक आयोगाला मनात नाही, कोर्टाला मनात नाही. उगाच आरोप करणे आणि चर्चेत राहणे हे संजय राऊतचा अजेंडा आहे. त्या स्वायत्तात संस्था आहे. पक्ष कसा वाचेल असा प्रयत्न असतो. - ठाकरेमुळे मुख्यमंत्री व्हायचे असते तर २०१९ मधे झाले असते. पक्षाची वाताहत, बंडखोरी, आलेली सत्ता सर्वांना माहिती. ऑन युतीसाठी सावे - शिरसाठ बैठक - दिवसभर कार्यकर्त्यांचा रेटा असतो म्हणून रात्री बैठक केली. संवेदनशील शहर असल्याने युतीची बोलणी कशी सफल होईल याचा.... ऑन आदित्य ठाकरे रॅलीवर टीका... - आजही आदित्य ठाकरेंचा प्रचंड दौरा आहे. अवघे दीड किलोमीटर चा दौरा करून टाटा करतील आणि भेटूया १६ तारखेला असे होईल. माझा दौरा झाला असा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न राहील....
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Dec 26, 2025 08:46:29
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 26, 2025 08:46:19
Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यात महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये दहशत आणि नाद या वाक्यावरून चांगलीच जुंपली आहे .फलटण येथे झालेल्या भाजपच्या विजयी सभेत मंत्री जयकुमार गोरे यांनी दाढीवर हात फिरवत कोणतरी फलटण मध्ये आलं आणि शिवसेना दहशत खपवून घेणार नाही असं म्हणाले त्यांना मला सांगायचे आहे दहशत आम्हाला पण चालत नाही आणि मला पण दाढी आहे असं सांगत आमच्या नादाला लागायचे नाही असा इशारा दिला होता. ज्यांनी ज्यांनी माझा नाद केला त्यांना मी सोडत नाही अशी नाव न घेता टीका मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर केली होती.या टीकेला मंत्री शम्भूराज देसाई यांनी देखील उत्तर देत माझा नाद करायचा नाही असं जयकुमार गोरे म्हणतायत याचाच अर्थ दहशत कोणाची आहे हे समजून जावं आणि मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे त्यामुळे दहशत खपवून घेणार नाही.निवडणुका असो नसो मोकळ्या वातावरणामध्ये सगळ्यांनी काम केलं पाहिजे.नाद नाही करायचा असे गोरे मंत्री म्हणत असतील तर अप्रत्यक्ष त्यांनी मान्य केले आहे की दहशत त्यांची आहे.दहशत हा जिल्हा कधीच खपवून घेणार नाही .त्यामुळे इथून पुढे दादागिरी,दमदाटी,दहशतीची भाषा केली तर त्याला जशाच तसे उत्तर दिलं जाईल अशा शब्दात शंभूराज देसाई यांनी गोरे यांना उत्तर दिलं आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 26, 2025 08:16:59
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे पॉइंटर्स भाजप सेना युती ही अंतिम टप्प्यात आहे उद्या रात्रीपर्यंत सर्व निर्णय होतील आज आम्ही बसणार आहोत, मराठवाड्यातील सर्वच महानगरपालिका बद्दल अतुल जी आणि आम्ही बसणार आहोत मला असं वाटतं खूप काही अडचणी नाही निर्णय होऊन जाईल ज्या ज्या जागेवर आमची ताकद किती आहे ते बघून आम्ही असे चार-पाच पॅरामीटरवर आम्ही चर्चा करत आहोत आज रात्रीपर्यंत मी अतुल सावे यांच्याबरोबर बसणार आहे त्याचबरोबर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत देखील चर्चा करू आणि अंतिम करू एकनाथ जी आणि देवेंद्रजी यांनी बसून युतीची संकेत दिले आहे आणि त्या पद्धतीने काम सुरू झाले आहे मुंबईतला तिढा सुटलेला आहे लवकरच आम्ही त्या ठिकाणच्या उमेदवार जाहीर करू काही ठिकाणी थोडं राहील त्या ठिकाणी चर्चा करू, मात्र 90 ते 95 टक्के जागांवर काही तिढा नाही त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी करायचा आमच्या पक्षाचा निर्णय आम्ही करणार आहोत त्यांच्या पक्षाचा अधिकार आम्हाला नाही त्यामुळे त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी केला आहे २ राष्ट्रवादी एकत्र त्यांच्यासाठी त्यांनी कोणाला सोबत घ्यायचं याचा सर्व अधिकार त्यांना आहे काही ठिकाणी भाजपसोबत येत आहेत अकोल्यामध्ये भाजपसोबत येत आहेत तीन ते चार ठिकाणी अजित पवार साहेब हे आमच्या सोबत आहेत एनडीए चे अधिकार घेण्याचा निर्णय तुम्हाला नाही तो फक्त केंद्रीय भाजपाला आहे माझे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी, नड्डाजी आमचे वरिष्ठ हे ठरवतील महाराष्ट्र मध्ये आम्ही स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये भाजप सेना तर एकत्रित लढत आहोत नगरपालिकेत आम्ही वेगवेगळे लढलो त्या त्या स्थानिक लेवलला काय परिस्थिती निर्माण होईल, याचे जास्त अधिकार आम्ही स्थानिक लेवलला दिले आहेत याचा अर्थ राज्यातील महायुतीवर काहीच परिणाम होणार नाही काही नाराज नाहीत, त्यांच्याबद्दल चुकीचे गैरसमज निर्माण करतात त्यांच्या मनातही काही नाही आणि आमच्या मनातही काही नाही, ते-amचे नेते आहे त्यांच्या नेतृत्वात आम्ही विदर्भ आणि चंद्रपूरच्या महानगरपालिका लढत आहोत काही पक्ष होत असल्यामुळे काही नवीन काही जुने असे करताना जुने कार्यकर्ते काही प्रमाणात नाराज होतात भाजपाचा डीएनए असा आहे कुणी भाजपमध्ये आले तर त्यांना सामावून घेतो आणि आमचं काम चालू ठेवतो १३ मित्र पक्षांची चर्चा सुरू आहे, त्यामुळे आम्ही आरपीआयशी आणि आमच्या गटात पक्षांची चर्चा करत आहोत नागपूरला योगेंद्र कवाडेजी आहे त्यांच्याशी देखील आम्ही चर्चा करत आहोत मुंबईत देखील चर्चा सुरू आहे त्यामुळे त्या त्या पक्षाची चर्चा करून ज्यांची क्षमता आहे, त्यावर निर्णय घेतोय ज्या ठिकाणी आमच्या कोट्यातून शक्य आहे त्या ठिकाणी आमच्या, जिथे एकनाथ शिंदेंच्या शक्य तिथे त्यांच्या पोलिसांच्या चौकशीचा हा भाग आहे त्यावर मी टिप्पणी करणे योग्य नाही मला ते बघावे लागेल न बघता बोलणे योग्य नाही पंधरा वर्ष भाजप माहिती सोडून जाणार नाही त्यांच्याकडे जेवढे काही कार्यकर्ते शिल्लक आहेत ते आता एकनाथ शिंदे कडे जात आहे उबाठा आता क्षमताही नव्हती लढण्याची, पुढच्या काळातही असेच राहील
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 26, 2025 07:52:20
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 26, 2025 07:36:37
Kalyan, Maharashtra:कल्याणमध्ये सतराव्या मजल्यावर क्रेन अंगावर कोसळून भीषण अपघात. अपघातात एका मजुराचा मृत्यू, तर दुसरा गंभीर जखमी. या दुर्घटनेमुळे बांधकाम क्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कल्याण शहरात इमारत बांधकामाच्या ठикाणी घडलेल्या भीषण अपघाताने खळबळ उडवली. कल्याणमधील विकास डेव्हलपर्सच्या ‘रिट्स’ इमारतीच्या सतराव्या मजल्यवर काम सुरू असताना क्रेन अचानक कोसळून दोन मजुरांच्या अंगावर पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे. मृत मजुराचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताचा पंचनामा करण्यात आला आहे. या दुर्घटनेनंतर मृत मजुराच्या नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून, संबंधित बांधकाम व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. योग्य सुरक्षात्मक साधने उपलब्ध करून न देता मजुरांकडून धोकादायक काम करून घेतले जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मृत कामगाराला न्याय मिळावा, यासाठी त्यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार देत दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे बांधकाम क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उंच इमारतींवरील काम करताना आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन होते का?, याबाबत प्रशासन आणि कामगार विभागाकडून चौकशी होण्याची आवश्यकता आहे. सध्या पोलिसांकडून अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे. परिणामी निष्काळजीपणा, सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि बेजबाबदारी विरोधात मृताच्या नातेवाईकांचा आक्रोश उफाळून आला आहे.
0
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Dec 26, 2025 06:55:27
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 26, 2025 06:54:58
Kalyan, Maharashtra:केडीएमसी निवडणुकीपूर्वी भाजप और शिवसेने कडून समन्वय समिती स्थापना. भाजपचे 7 तर शिवसेनेचे 6 सदस्य समितीत सहभागी...आतापर्यंत दोन महत्त्वाच्या बैठका संपन्न. मात्र जागावाटपावर तणाव कायम कल्याण–डोंबिवली : आगामी 2025–26 मधील कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना युतीकडून महत्त्वाचं संघटनात्मक पाऊल उचलण्यात आलं आहे. निवडणुकीतील नियोजन, जागावाटप आणि दोन्ही पक्षांतील समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी भाजप–शिवसेना समन्वय समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीमार्फत आतापर्यंत दोन बैठका पार पडल्या मात्र बदलापूर आणि अंबरनाथ येथील निवडणुकांतील विजयानंतर भाजप अधिक आक्रमक झाल्याचं चित्र दिसून येत आहे. शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या कल्याण–डोंबिवली महापालिकेत भाजपने पाच वर्षांचे महापौर पद आणि 83 नगरसेवकांच्या जागांची मागणी केल्याने युतीत अंतर्गत तणाव वाढल्याचं दिसत आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले की, ही समन्वय समिती प्रामुख्याने युतीबाबतच्या चर्चांसाठी स्थापन करण्यात आली आहे. युती झाली तर तिचा फॉर्म्युला काय असावा आणि युती झाली नाही तरी पुढील रणनीती काय असावी, यावर चर्चा सुरू आहे. भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेनुसार पक्षाच्या 80 पेक्षा अधिक जागा निवडून येतील असा दावा करण्यात आला आहे. तसेच गेल्या टर्ममध्ये भाजपला महापौर पद न मिळाल्यामुळे यावेळी संपूर्ण पाच वर्षांचे महापौर पद भाजपला देण्यात येावे, अशी ठोस भूमिका पक्षाने मांडली आहे. तसेच भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी भाजपच्या समितीत पाच सदस्य आणि दोन निमंत्रित सदस्यांचा समावेश असून शिवसेनेकडे दोन बैठका झाल्या आहेत. पहिल्या बैठकीत दोन्ही पक्षांच्या सध्याच्या नगरसेवक संख्येवर चर्चा झाली, तर दुसऱ्या बैठकीत भाजपने 83 जागांची अधिकृत मागणी केली आहे. 2015 मध्ये भाजपला महापौर पद न मिळाल्यामुळे त्या आधारे आता पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ भाजपला मिळावा हा प्रस्ताव शिवसेनेकडे आम्ही ठेवला असून शिवसेनेला तो मान्य असल्याचा दावा त्यांनी केला. meanwhile, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी समन्वय समितीच्या स्थापनेचे स्वागत करत सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे. चर्चा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झाल्याचं त्यांनी सांगितलं. सध्याच्या स्थितीत शिवसेनेकडे अंदाजे 70 ते 72 नगरसेवक, तर भाजपकडे 53 ते 57 नगरसेवक असल्याचं त्यांनी नमूद केलं. अंतिम निर्णय हा दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून घेण्यात येईल आणि तो सर्वांना मान्य असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एकीकडे वरिष्ठ पातळीवर समन्वय वाढवण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी दुसरीकडे तळागाळातील कार्यकर्त्यांकडून युतीविरोधात दबाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 26, 2025 06:53:59
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 26, 2025 06:15:38
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर मनपा संबंधी भाजपच्या नागपुरातील बैठकीबाबत चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांची प्रतिक्रिया, सर्वांना कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा असे वाटते, मुनगंटीवार आणि जोरगेवार असा जिल्ह्यात सीमावाद नाही, आम्ही एकदिलाने निवडणूकीला सामोरे जाऊ आणि जिंकू अँकर:--चंद्रपूर मनपा संबंधी भाजपच्या नागपुरातील बैठकीबाबत चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बैठक वादळी झाली असे म्हणता येणार नाही. हा वारांचा आणि वाघांचा जिल्हा असून हा नैसर्गिक आवाज आहे. आम्हा सर्वांना कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा असे वाटते. मुनगंटीवार आणि जोरगेवार असा जिल्ह्यात सीमावाद नाही. आम्ही एकदिलाने निवडणूकीला सामोरे जाऊ आणि जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बाईट १) किशोर जोरगेवार, आमदार ,चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 26, 2025 06:03:13
kolhapur, Maharashtra: Vidarbha में नागपूर, चंद्रपूर, अमरावती और अकोला चार महापालिकाओं में भाजपा-शिवसेना की युति तय हो गई है। चारों शहरों के प्रमुख पदाधिकारियों के साथ भाजपा-शिवसेना नेत्रियों से चर्चा के बाद महायुति के साथ लड़ने का निर्णय लिया गया है। चंद्रपूर और अकोला में महायुति में राष्ट्रवादी कांग्रेस का समावेश रहेगा, वहीं नागपूर और अमरावती में राष्ट्रवादी कांग्रेस महायुति के बाहर रहकर स्वतंत्र चुनाव लड़ेंगे। अमरावती में भाजपा-शिवसेना और युवा स्वाभिमान पार्टी की युति होगी। नागपूर में भाजपा और शिवसेना के वरिष्ठ नेताओं की बैठक में विदर्भ के चारों शहरों में भाजपा-शिवसेना की युति तय होने पर सहमति बनी; किन नेताओं को किते स्थान मिलेगा, इसकी औपचारिक घोषणा बाद में होगी। चारों महापालिका में महायुति के पक्ष अपने-अपने उम्मीदवार घोषित करेंगे, उसके बाद ही स्पष्ट होगा कि महायुति में कौन-कौन सा दल कितने स्थान लड़ेगा। इन चारों नगरों में शिवसेना को मान-सम्मान रखने का आश्वासन भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुले ने दिया है। मंत्री उदय सामंत ने इसकी पुष्टि की। बूढ़े-भूरे नहीं, चारों महापालिकाओं में भाजपा ही बड़ा भाई की भूमिका निभाएगी।
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 26, 2025 06:00:26
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Dec 26, 2025 05:46:27
Malegaon, Maharashtra:- नाशिकच्या सटाणा तालुक्यातील पिंपळदर येथे बिबट्याचा हल्ला - हल्ल्यात एक वासरू ठार, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आज सकाळी नाशिकच्या सटाणा तालुक्यातील पिंपळदर येथे बिबट्याने हल्ला करत एक वासरू ठार केले आहे. पिंपळदर येथील शेतकरी पोपट बुधा बोरसे यांच्या स्वतःच्या शेतात एक गाय व दोन वर्षाचे वासरू एका पत्र्याच्या शेड मध्ये बांधलेले असतात. आज सकाळी पोपट बोरसे हे शेतात गेले असता त्यांना वासरू जागेवर नसल्याचे लक्षात आले, त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता तांना वासरू बाजूचे शेतकरी सुनील पवार यांच्या डाळिंबाच्या बागेत अर्धवट खाललेल्या अवस्थेत आढळून आले. घटनास्थळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी येऊन तत्काळ पंचनामा केला. गेल्या अनेक दिवसांपासून पिंपळदर परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून दिवसाडवळ्या सुद्धा बिबट्याचे दर्शन होत आहे. या बिबट्यांना पकडण्यासाठी शेतकऱ्यांकडून वारंवार पिंजरा लावण्याची मागणी वन विभागाकडे केली जाते.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 26, 2025 05:17:04
kolhapur, Maharashtra:नागपूर *नागपुरात काँग्रेस पक्षाने महापालिकेच्या १५१ पैकी बहुतांशी जागांवर उमेदवारांचे नाव निश्चित केल्याची माहिती आहे... नागपुरात विधानसभेचे सहा मतदारसंघ असून नितीन राऊत यांच्या उत्तर नागपूर या एका मतदारसंघातील प्रभागांसाठीचे नाव वगळता इतर पाचही विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या प्रभागांमध्ये काँग्रेसने आपल्या उमेदवारांचे नाव निश्चित केल्याची खात्रीलायक माहिती आहे..* या सर्व जागांसाठी एक किंवा दोनच इच्छुकांचे नाव काँग्रेसकडे होते.. काल मुंबईत झालेल्या बैठकीत उत्तर नागपूर वगळता इतर सर्व पाचही विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या प्रभागांची नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे.... * दरम्यान काँग्रेसची नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच शिवसेना ठाकरे गटासोबत बोलणी सुरू आहे... * सध्या तरी काँग्रेसने सर्व जागांवर आपले नाव निश्चित करणे सुरू केले आहे.. * आज आणि उद्या मित्र पक्षांसोबत होणाऱ्या बोलणीनंतर जेवढ्या जागा मित्र पक्षांना देण्यासाठी काँग्रेस तयार होईल.. * त्यानंतर काँग्रेस कडून उर्वरित जागांसाठीचे नाव निश्चित करून जाहीर केले जाईल.. * दरम्यान उत्तर नागपूर मधील प्रभागांवर काँग्रेस पक्षाकडून नितीन राऊत यांच्याशी बोलणी करून नाव निश्चित केले जाणार आहे.. (काल मुंबईत झालेल्या बैठकीत काही कारणास्तव नितीन राऊत उपस्थित राहू शकले नाही त्यामुळे उत्तर नागपूरचे नाव निश्चित होऊ शकले नसल्याची माहिती आहे..)
0
comment0
Report
Advertisement
Back to top