Back
कल्याण में सतरहवीं मंजिल पर क्रेन गिरने से भारी हादसा, एक मजदूर की मौत
ABATISH BHOIR
Dec 26, 2025 07:36:37
Kalyan, Maharashtra
कल्याणमध्ये सतराव्या मजल्यावर क्रेन अंगावर कोसळून भीषण अपघात. अपघातात एका मजुराचा मृत्यू, तर दुसरा गंभीर जखमी. या दुर्घटनेमुळे बांधकाम क्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कल्याण शहरात इमारत बांधकामाच्या ठикाणी घडलेल्या भीषण अपघाताने खळबळ उडवली. कल्याणमधील विकास डेव्हलपर्सच्या ‘रिट्स’ इमारतीच्या सतराव्या मजल्यवर काम सुरू असताना क्रेन अचानक कोसळून दोन मजुरांच्या अंगावर पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे. मृत मजुराचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताचा पंचनामा करण्यात आला आहे. या दुर्घटनेनंतर मृत मजुराच्या नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून, संबंधित बांधकाम व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. योग्य सुरक्षात्मक साधने उपलब्ध करून न देता मजुरांकडून धोकादायक काम करून घेतले जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मृत कामगाराला न्याय मिळावा, यासाठी त्यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार देत दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे बांधकाम क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उंच इमारतींवरील काम करताना आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन होते का?, याबाबत प्रशासन आणि कामगार विभागाकडून चौकशी होण्याची आवश्यकता आहे. सध्या पोलिसांकडून अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे. परिणामी निष्काळजीपणा, सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि बेजबाबदारी विरोधात मृताच्या नातेवाईकांचा आक्रोश उफाळून आला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowDec 26, 2025 09:22:300
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 26, 2025 09:20:550
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 26, 2025 09:20:130
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 26, 2025 08:46:290
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 26, 2025 08:46:190
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 26, 2025 08:16:590
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 26, 2025 07:52:200
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 26, 2025 07:00:160
Report
HPHARSHAD PATIL
FollowDec 26, 2025 06:55:270
Report
ABATISH BHOIR
FollowDec 26, 2025 06:54:580
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 26, 2025 06:53:590
Report
PNPratap Naik1
FollowDec 26, 2025 06:32:130
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 26, 2025 06:15:380
Report
AKAMAR KANE
FollowDec 26, 2025 06:03:130
Report