Back
नवी मुंबई महासभा में मंदा म्हात्रे के ड्रीम प्रोजेक्ट पर बहस, रुग्णालय संकट में
SNSWATI NAIK
Feb 14, 2026 04:15:34
Navi Mumbai, Maharashtra
Anchor: नवी मुंबई महानगरपालिकेची पहिलीच महासभा मोठी विस्फोटक होण्याची शक्यता आहे. कारण आमदार मंदा म्हात्रे यांचा ड्रीम प्रकल्प असलेल्या बेलापूर येथील प्रस्तावित शासकीय सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी प्रस्तावित जागेत फेरबदल अथवा सदर प्रकल्प रद्द करण्यासंबंधीचा ठराव पहिल्याच महासभेत मांडला जाणार आहे.
Vo1: वनमंत्री गणेश नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे यांच्यातील वैर आता नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात पहायला मिळणार आहे. मनपाच्या पहिल्याच महासभेत आमदार मंदा म्हात्रे यांचा ड्रीम प्रकल्प असलेल्या बेलापूर येथील प्रस्तावित शासकीय सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी प्रस्तावित जागेत फेरबदल अथवा सदर प्रकल्प रद्द करण्यासंबंधीचा ठराव मांडण्यात येणार आहे. या ठरावा विरोधात आमदार मंदा म्हात्रे यांच्यासाठी शिवसेना शिंदे गट मैदानात उतरलाय. शिवसेना जिल्हाध्यक्ष किशोर पाटकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहत सदर ठराव रद्द करण्याची मागणी केली असून महासभेत हा ठराव पारित करूनच दाखवा आम्ही 4 दिवसात हा ठराव विखंडित करू असा आव्हान किशोर पाटकर यांनी दिलाय.
Byte: किशोर पाटकर (शिवसेना जिल्हाध्यक्ष)
Vo2: हे रुग्णालय गोरगरीब जनतेसाठी आणले होते. नवी मुंबईच्या जनतेने एकहाती सत्ता दिली त्याच हे गिफ्ट देत आहात काय रुग्णालय रद्द करुन असा सवाल उपस्थित करत शेरनी लंगूर का शिकार नही करती हे लक्षात ठेवून माझ्या नादी लागा असा सज्जड दम आमदार मंदा म्हात्रे यांनी भरलाय.
Byte: मंदा म्हात्रे (आमदार)
Vo3: 20 तारखेला होणाऱ्या महासभेत या ठरावा वरून सभागृहात मोठा गदारोळ होणार असून याला वनमंत्री गणेश नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे यांच्यातील राजकीय वैराची किनार आहे. त्यामुळे महासभेत रुग्णालय रद्द करण्याचा ठराव संमत होतो का आणि झाल्यास हा राजकीय संघर्ष किती टोकाला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowFeb 14, 2026 07:01:550
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 14, 2026 07:01:410
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 14, 2026 06:17:060
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 14, 2026 06:15:220
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 14, 2026 04:51:420
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 14, 2026 04:46:470
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 14, 2026 04:38:250
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 14, 2026 04:33:570
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 14, 2026 04:33:320
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 14, 2026 04:20:270
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 14, 2026 04:00:510
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 14, 2026 03:51:070
Report
PNPratap Naik1
FollowFeb 14, 2026 03:48:250
Report
PNPratap Naik1
FollowFeb 14, 2026 03:33:070
Report