Back
Shinde की शिवसेना में आंतरिक टकराव, धाराशिव जिला परिषद अध्यक्ष पद पर घमासान
DPdnyaneshwar patange
Feb 14, 2026 04:33:57
Dharashiv, Maharashtra
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून शिंदेसेनेत मतभेद; महायुतीतील सत्ता समीकरणे अधिक गुंतागुंतीची.
सावंत अध्यक्ष पदासाठी आग्रही तर माजी खासदार रवींद्र गायकवाड भाजपा बरोबर जाण्यात उत्सुक.
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून शिंदेच्या शिवसेनेत अंतर्गत मतभेद उघड झाल्याची चर्चा रंगली आहे. अध्यक्षपदाच्या निवडीवरून वेगवेगळे दावे आणि राजकीय हालचालींना वेग आला आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या शिवसेनेत मतभेद समोर येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
माजी मंत्री तानाजी सावंत अध्यक्षपदावर ठाम असल्याचे सांगितले जाते, तर माजी खासदार रवींद्र गायकवाड भाजपसोबत जाण्याच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, शिंदेची शिवसेना आणि ठाकरेसेना एकत्र येण्याच्या चर्चांना रवींद्र गायकवाड यांनी स्पष्टपणे फेटाळले आहे.
महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे गेलो, त्यामुळे महायुतीचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
अध्यक्षपद भाजपकडे जाणार की शिवसेनेकडे, हे अद्याप निश्चित नसून त्यावर चर्चा सुरू असल्याची माहितीही गायकवाड यांनी दिली.
अध्यक्षपदासाठी भाजपकडून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे.
तर शिवसेनेकडून रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा गायकवाड यांचे नाव चर्चेत आहे.
निकालानंतर सर्व प्रमुख नेते मुंबईत तळ ठोकून सत्ता स्थापनेच्या वाटाघाटींमध्ये व्यस्त असल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे, आमदार तानाजी सावंत यांनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नीच्या अध्यक्षपदाला विरोध दर्शविल्याची चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणुकीपूर्वी तानाजी सावंत महायुतीत नव्हते, त्यामुळे सावंतांना वगळून सत्ता स्थापन करण्याची भाजपची रणनीती असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowFeb 14, 2026 07:01:550
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 14, 2026 07:01:410
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 14, 2026 06:17:060
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 14, 2026 06:15:220
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 14, 2026 04:51:420
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 14, 2026 04:46:470
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 14, 2026 04:38:250
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 14, 2026 04:33:320
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 14, 2026 04:20:270
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 14, 2026 04:15:340
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 14, 2026 04:00:510
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 14, 2026 03:51:070
Report
PNPratap Naik1
FollowFeb 14, 2026 03:48:250
Report
PNPratap Naik1
FollowFeb 14, 2026 03:33:070
Report