Back
भारत-पाक टी20 मैच पर उग्र विरोध, हिंदुत्व संगठन प्रशासन के समक्ष प्रदर्शन कर रहे
JJJAYESH JAGAD
Feb 14, 2026 06:15:22
Akola, Maharashtra
सीमेवर भारतीय जवानांचे रक्त सांडत असताना आणि पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद सुरू असताना त्यांच्या देशासोबत क्रिकेट खेळणे हा देशप्रेमी जनतेचा अपमान असल्याची ठाम भूमिका घेत अकोल्यात हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून तीव्र निदर्शने करण्यात आली. हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र समन्वय समिती यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ICC Men's T20 World Cup मध्ये भारत-पाक सामन्यावर बंदी घालावी, अशी मागणी करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. या वेळी कार्यकर्त्यांनी पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी केली. “रक्ताचे डाग क्रिकेटच्या जर्सीने लपवता येत नाहीत,” असे म्हणत, केवळ हस्तांदोलन टाळणे हा निषेधाचा पुरेसा मार्ग नसून जोपर्यंत आतंकवाद पूर्णपणे थांबत नाही, तोपर्यंत कोणतेही क्रीडा किंवा राजनैतिक संबंध ठेवू नयेत, अशी भूमिका संघटनांनी मांडली. ‘रक्त आणि खेळ एकत्र नको’ अशी भावना व्यक्त करत, जसे ‘सिंधू जल करार’च्या वेळी “पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही” अशी भूमिका भारताने घेतली होती, त्याच धर्तीवर क्रिकेटबाबतही कठोर निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowFeb 14, 2026 08:45:450
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 14, 2026 08:32:220
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 14, 2026 08:32:060
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 14, 2026 08:08:040
Report
PNPratap Naik1
FollowFeb 14, 2026 08:01:010
Report
PNPratap Naik1
FollowFeb 14, 2026 07:52:520
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 14, 2026 07:52:310
Report
AKAMAR KANE
FollowFeb 14, 2026 07:17:430
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 14, 2026 07:01:550
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 14, 2026 07:01:410
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 14, 2026 06:17:060
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 14, 2026 04:51:420
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 14, 2026 04:46:470
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 14, 2026 04:38:250
Report