Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

डोंबिवली में दीपेश म्हात्रे के भाजप प्रवेश के साथ विशाल शक्ति प्रदर्शन

ABATISH BHOIR
Nov 09, 2025 06:05:43
Kalyan, Maharashtra
डोंबिवलीत दीपेश म्हात्रे यांच्या भाजप प्रवेशापूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे आज करणार भाजपमध्ये प्रवेश प्रवेशाआधीच शेकडो कार्यकर्त्यांचा जंगी उत्साह — मोठे गाव येथील निवासस्थानावर जमले कार्यकर्ते म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील भव्य मिरवणूक — डोंबिवली जिमखानापर्यंत जाणार जनसागर ठिकठिकाणी फटाके, बॅनर, ढोलताशांचा गजर — दीपेश म्हात्रे यांची होणार एंट्री थोड्याच वेळात प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार अधिकृत प्रवेश
6
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Nov 09, 2025 08:08:08
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- कुख्यात दुचाकी चोरट्यांच्या चंद्रपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या, ५ मोटारसायकली जप्त , सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे कारवाई अँकर:--चंद्रपूर शहरातील रामनगर पोलिसांनी दोन कुख्यात दुचाकी चोरट्यांना बेड्या ठोकून त्यांच्याकडून तब्बल ५ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या. या कारवाईमुळे शहरात वाढत्या vehicle चोरीच्या घटनांवर मोठा लगाम बसला आहे. गोपाल जीवन मालाकार (३०, रा. बंगाली कॅम्प, चंद्रपूर), आशिष ऊर्फ जल्लाद अक्रम शेख (२२, रा. फुकटनगर, चंद्रपूर) असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. शहरातील विविध भागातून दुचाकी चोरीला गेल्याच्या तक्रारी रामनगर पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या.  पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गोपाल मालाकार व आशिष ऊर्फ जल्लाद शेख याला ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Nov 09, 2025 08:06:55
Palghar, Maharashtra:पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथील नामदेव बाळकृष्ण मेहेर मास्चीमार खलाशी ओखा - पोरबंदर येथील नल नारायण या जयंतीभाई राठोड यांच्या ट्रॉलरवर कामाला आहेत. खोल मासेमारी करत असताना नल नारायण ही ट्रॉलर बोटीने चुकून पाकिस्तानच्या सागरी हद्दीत प्रवेश केला. पाकिस्तानच्या सागरी हद्दीत प्रवेश केल्याने पाकिस्तानने नल नारायण ट्रॉलर व त्यावर असलेल्या मच्छीमार खलाशांना ताब्यात घेतले आहे.याबाबतची माहिती मेहेर यांच्या कुटुंबीयांना मिळाली असून मेजर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान केंद्र सरकारने प्रयत्न करून नामदेव मेहेर यांची सुटका करावी अशी मागणी कुटुंबीय करत आहेत.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 09, 2025 07:49:20
Shirur, Maharashtra:उद्योजक प्रकाश धारीवाल यांनी जाहीर केलेल्या निर्णयामुळे शिरूरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असूनही नगरपरिषद निवडणुकीमध्ये उद्योजक प्रकाश धारिवाल यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविणारी शिरूर शहर विकास आघाडी यंदाची पंचवार्षीक निवडणूक लढणार नाही, मी माझ्या वैयक्तिक व्यवसायाच्या कामामुळे ही निवडणूक लढणार नसल्याचं धारीवाल यांनी स्पष्ट केलं असून गेली अनेक वर्ष शिरूर शहर विकास आघाडीची शिरूर शहरात सत्ता आहे मी निवडणूक लढणार नसलो तरी सामाजिक कामात आणि शिरूरच्या विकासा साठी कटिबध्द असल्याचे यावेळी उद्योजक प्रकाश धारिवाल यांनी झी 24 तास शी बोलताना सांगितलं,याच बाबत त्यांच्याशी बातचित केलीय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 09, 2025 07:48:39
Pandharpur, Maharashtra:प्रक्षाळपूजेनिमित्त आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व गाभाऱ्यात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे प्र. व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली. सजावटीमुळे श्रींचा गाभारा मनमोहक व आकर्षक दिसत आहे. यासाठी पिवळा गोंडा 200 किलो, लाल गोंडा 200 किलो, पांढरी शेवंती 200 किलो, अशोक पाला 100 लडी, कलर गुलाब 300 बंडल, ओर्केट 40 बंडल, अँथेरियम 100 काडी, शेवंती 1500 काडी, सॉंग 25, ड्रेस ना 25, टेबल पॉम 25, रामबाण 40 बंडल, मोच्या 20 बंडल, कारनेशन 150 बंडल इत्यादी दोन टन फुलाचा वापर करण्यात आला आहे. सदरची सजावट विठ्ठल भक्त अमोल शेरे, पुणे यांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत केली आहे.
0
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Nov 09, 2025 07:48:19
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 09, 2025 07:30:58
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - बार्शीतून धक्कादायक प्रकार समोर, चौदा महिल्यांच्या मुलाला विष पाजून आईची देखील आत्महत्या. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून मनाला चटका लावणारी घटना समोर. आपल्या पोटाच्या अवघ्या चौदा महिन्यांच्या चिमुकल्याला विष पाजून आईची देखील गळफास घेत आत्महत्या. बार्शी शहरातील वाणी प्लॉट परिसरातील घटना. अंकिता उकिरडे या आईचा जागीच मृत्यू झाला असून लहान चिमुकला अत्यावस्थेत आहे. हत्या आणि आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट, संपूर्ण बार्शीत मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येतेय. सदर घटनेची नोंद बार्शी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 09, 2025 07:21:26
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यात अहेरी येथे शासकीय महिला-बाल रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांचे लोकार्पण, औद्योगिक विकासासोबत गडचिरोलीची आरोग्य सेवेतील ऐतिहासिक झेप असल्याचे प्रतिपादन अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अहेरी येथे १०० खाटांच्या शासकीय महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण संपन्न झाले. गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक विकासाबरोबर आरोग्य सेवेतही क्रांतिकारक बदल घडत आहेत. अहेरी येथील १०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय हे खाजगी रुग्णालयांनाही लाजवेल इतके अत्याधुनिक बनले असून, येथे मातृत्व, बाल आरोग्य आणि कुपोषणग्रस्त बालकांसाठी सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध झाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यासोबतच भामरागड तालुक्यातील कोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत, जारावंडी व ताडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांचे श्रेणीवर्धन, वेंगनुर उपकेंद्र आणि रेगडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतींचेही लोकार्पण करण्यात आले. तसेच, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, धानोरा, कुरखेडा, कोरची व सिरोंचा या तालुक्यांतील नव्या सार्वजनिक आरोग्य पथकांचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. गडचिरोलीतील रुग्णांना उपचारासाठी नागपूर, पुणे किंवा मुंबई गाठण्याची गरज उरणार नाही. गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासावर बोलताना लोह प्रकल्पांमुळे गडचिरोली जिल्हा देशातील स्टील हब बनत आहे, पण या औद्योगिक विकासासोबतच गडचिरोलीला ग्रीन हब बनवायचे आहे. त्यासाठी पाच कोटी झाडांच्या लागवडीचा निर्णय घेण्यात आला आहे. दळणवळण सुधारण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे रस्ते मंजूर करण्यात आले असून, पूल व नाले बांधकामाची कामेही वेगाने सुरू आहेत.
1
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 09, 2025 07:18:13
Akola, Maharashtra:रायगड जिल्ह्यातील काशीद समुद्रकिनारी अकोल्यातील कोचिंग क्लासच्या सहलीदरम्यान घडलेली एक हृदयद्रावक दुर्घटना समोर आली आहे. सहलीच्या आनंदात न्हाऊन निघालेल्या विद्यार्थ्याचा आणि शिक्षकांचा व्हिडिओ हा त्यांच्या आयुष्यातील शेवटचा क्षण ठरला. शनिवारी सायंकाळी समुद्रात पोहत असताना एका विद्यार्थ्याचा आणि एका शिक्षकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. अकोल्यातील शुअरवीन क्लासेसमधील १२ विद्यार्थी आणि ३ शिक्षक शैक्षणिक सहलीसाठी रायगड जिल्ह्यातील काशीद समुद्रकिनारी गेले होते. समुद्राच्या लाटांशी खेळत, एकत्र सेल्फी घेत, मोबाईलवर आठवणी कैद करत सर्व जण आनंद लुटत होते. मात्र काही क्षणातच हा आनंद दु:खात परिवर्तित झाला. अचानक आलेल्या प्रचंड लाटेमुळे दोन विद्यार्थी आणि एक शिक्षक पाण्याच्या खोल गर्भात ओढले गेले. बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले, मात्र शिक्षक राम कुटे (वय ६०) आणि विद्यार्थी आयुष रामटेके (वय १९) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.मृतदेह बोर्ली आणि मुरूड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आले. या घटनेत आयुष बोबडे (वय १७) हा विद्यार्थी सुखरूप बचावला असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले आहे. शिक्षकाने येथील सुंदर दृश्य मोबाईल मध्ये कायदे करून आपल्या स्टेटस वर शेवटचे ठेवले होते.अकोल्यात या घटनेने शोककळा पसरली असून, विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. शिक्षणासाठी निघालेली ही सहल अखेर जीवघेणी ठरली,आणि अकोल्यातील शिक्षक-विद्यार्थ्याच्या आयुष्याचा शेवटचा अध्याय समुद्राच्या लाटांमध्ये विरला..
4
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 09, 2025 07:09:42
Shirdi, Maharashtra:धनगर आणी बंजारा समाज आदिवासींमध्ये सामावून घेण्यासाठी लढा देताना दिसताहेत मात्र त्यांना हे आरक्षण कधीही मिळू शकत नाही संविधानाने आम्हाला हे आरक्षण दिलेले असून तुमच्या जातीचे नेते त्यांची पोळी भाजून घेण्यासाठी तुमचा वापर करत असल्याची टिका आमदार किरण लहामटे यांनी केलीय. आदिवासी समाजाचे दैवत असलेल्या आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांची जयंती अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर गावात मोठ्या उत्साहात पार पडलीय. दोन दिवस विविध स्पर्धा आणी सांस्कृतिक कार्यक्रमासह आदिवासींचे पारंपारीक नृत्य सर्वांसाठी आकर्षण होते. इंग्रजांविरोधात पहिली सशस्त्र क्रांती करणाऱ्या राघोजी भांगरे यांची राज्यभर मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आलीय. किरण लहामटे आमदार राष्ट्रवादी. एकिकडे आदिवासी समाज आरक्षण असूनही आपल्या उन्नतीसाठी लढत असताना धनगर आणी बंजारा समाज घुसखोरी करून एसटी आरक्षण मिळावं यासाठी लढताहेत मात्र आदिवासींना मिळालं आरक्षण हे संविधानाने दिलं असून कुठल्याही जातीचा त्यात समावेश होवू शकत नाही. धनगर आणी बंजारा समाजाचे नेते तुम्हाला फसवून आपली पोळी भाजत असल्याची टिका आमदार किरण लहामटे यांनी केलीय. किरण लहामटे आमदार राष्ट्रवादी
4
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 09, 2025 07:07:27
4
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 09, 2025 07:06:53
Baramati, Maharashtra:इंदापूरच्या बावड्यातील 290 शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित..... सप्टेंबर- ऑक्टोंबर मधील झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई अद्याप नाही.....कृषिमंत्री भरणेंच्या मतदार संघातील प्रकार......अखिल भारतीय मराठा सेवा संघाचा आंदोलनाचा इशारा..... या वंचित शेतकऱ्यांना शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय मराठा सेवा संघाने दिला आहे.इंदापूरच्या तहसीलदारांना या संदर्भातील निवेदन शेतकरी आणि अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने देण्यात आले आहे. *बावडा महसूल परिसरामधील एकूण 850 ते 900 शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई संदर्भात बावडा तलाठी यांच्याकडे अर्ज केले होते. वरील पंचनामासाठी बावडा तलाठी उपस्थित नव्हते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी 590 शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त झाले आहे.मात्र 290 शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. या वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी तलाठी यांना विचारला असता ते उडवा उडवीच उत्तर देत आहेत. असा आरोप या शेतकऱ्यांचा आहे.* बाईट _ धनंजय घोगरे, शेतकरी बाईट _ उमेश शिंदे,शेतकरी
4
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 09, 2025 07:04:43
Gadchiroli, Maharashtra:टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम सिरोंचा तालुक्यात रुबी हॉस्पीटल अँड वेलनेस प्रा. लि.च्या रुग्णालय आणि कॉलेज कँपसचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते भूमिपूजन,  गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य क्रांती आणण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार या प्रकल्पात केजी ते पीजी शाळा, वैद्यकीय महाविद्यालय ,रुग्णालय, फार्मसी, नर्सिंग असे अनेक शैक्षणिक आयाम असणार आहेत. या प्रकल्पामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागासह सिरोंचा तालुका आणि तीन राज्यांचा सीमावर्ती भाग विकासाच्या प्रवाहात येणार आहे. या भागातील नागरिकांना मोठ्या शहरात अथवा लगतच्या तेलंगणात जावे लागते. मात्र आता या ठिकाणी 300 खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या भागातील जनतेला जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळतील असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. राणा समूहाने गडचिरोली सारख्या मागास भागात सामाजिक भान उभारून केलेल्या या पुढाकाराचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
4
comment0
Report
UJUmesh Jadhav
Nov 09, 2025 06:32:21
Thane, Maharashtra:नीट परीक्षेतील गोंधळाचा फटका भिवंडीतील विद्यार्थिनीला... दोन निकालाने विद्यार्थिनीसह पालक चिंताग्रस्त... वैद्यकीय शिक्षा घेण्याचे स्वप्न देशभरातील लाखो विद्यार्थी बघत असतात. त्यासाठी शैक्षणिक अभ्यासासोबत नीट परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी दिवसरात्र अभ्यासात गढून जातात. त्यातून उत्तम मार्क्स मिळवून वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळावी ही विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची दुर्दैम्य इच्छा. परंतु या नीट परीक्षेतील गोंधळातून भिवंडीतील एका विद्यार्थिनीसह तिच्या पालकांना धक्का बसला असून त्यातून नैराश्यग्रस्त होण्याची वेळ कुटुंबीयांवर आली आहे. मला ४९२ गुण असताना नंतर ते गुण २७५ कैसे झाले असा प्रश्न श्वेता हिला पडला असून माझी नक्की कोणती मार्कलिस्ट खरी आहे हेच कळत नसल्याचे सांगते. यामुळे मी केलेल्या मेहनतीवर नीट परिक्षा मंडळाने पाणी फेरले आहे. मी सतत दो वर्ष वैद्यकीय प्रवेशासाठी अभ्यास केला पण आज माझ्या हाती निराशा आली असून माझे वडील मध्यमवर्गीय आहेत. लाखो रुपये फी भरून मला वैद्यकीय शिक्षण नाही देऊ शकत तर नीट परीक्षा मंडळाच्या गोंधळामुळे माझ्यासह सर्व कुटुंबीय नैराशेत आले आहे, अशी प्रतिक्रिया श्वेता कृष्णा पिनाटे या विद्यार्थिनीने दिली आहे. बाईट:- श्वेता कृष्णा पिनाटे
3
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 09, 2025 06:22:53
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर शहर पोलिसांकडून 35 चोरीच्या दुचाकी जप्त, महागड्या गाड्या चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या सोलापूरात दुचाकी चोरीच्या मालिकेचा पर्दाफाश! जेलरोड पोलिसांच्या डीबी पथकाने लाखोंच्या गाड्या चोरी करणाऱ्या एका सराईत चोराला gजाआड केलं आहे. शंकर भरत देवकुळे असं आरोपीचं नाव असून, त्याच्याकडून तब्बल 35 चोरीच्या दुचाकी असा एकूण 10 लाख 98 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्या आहेत. हा आरोपी लाखोंच्या किंमतीच्या गाड्या फक्त पाच ते दहा हजारांत विकत होता. गाड्या फायनान्समधील असल्याचं सांगून तो ग्राहकांची फसवणूक करत होता.अशी माहिती पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिली. या कारवाईत सोलापूरसह पुणे, मुंबई, ठाणे आणि सांगली येथील चोरीच्या गाड्यांचा समावेश आहे. बाईट - एम.राजकुमार (पोलिस आयुक्त,सोलापूर)
5
comment0
Report
Advertisement
Back to top