Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाल के मारेगांव में संत गदाजी महाराज यात्रा में गोटमार होली धूम

SRSHRIKANT RAUT
Mar 03, 2026 12:51:30
Yavatmal, Maharashtra
यवतमाळ च्या मारेगाव तालुक्यातील बोरी येथील संत गदाजी महारांच्या यात्रेत गोटमार होळी रंगली. फाल्गुन पौर्णिमेपासून या यात्रेला प्रारंभ होतो. येथील गोटमार होळी विदर्भात प्रसिद्ध आहे. धुलिवंदनाच्या दिवशी सकाळी सर्व जण मंदिरासमोरील मैदानात जमा होतात. या ठिकाणी गावकरी दोन चमू तयार करून हुतुतू खेळतात. या खेळात शेवटी आऊट होणाऱ्या खेळाडूंची प्रेतयात्रा काढण्यात येते. ही यात्रा संपूर्ण गावातून वाजतगाजत फिरल्यावर पुन्हा मंदिराच्या परिसरात येते. नंतर गोटमारला सुरुवात होते. गावातीलच एक व्यक्ती मंदिरासमोर असलेल्या उंच जागेवर बसून गावकऱ्यांवर दगड मारत असतो, तर गावकरी त्याच्यावर दगड मारत असतात. एखादा गावकरी दगड लागून मूर्च्छित पडला की ही गोटमार थांबते. या संपूर्ण खेळात गावकरी गदाजी महाराजांचा जयजयकार करीत असतात. नंतर मूर्च्छित झालेल्या गावकऱ्याला मंदिरात नेण्यात येते. त्या ठिकाणी मंदिराचा पुजारी त्याला अंगारा लावतो. काही वेळाने हा व्यक्ती बरा होतो. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आजही सुरू आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Mar 03, 2026 14:32:13
Shirdi, Maharashtra:पॉलकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील बाईट पॉईंटर ऑन आखाती देशात अडकलेले नागरिक - जिह्यातील जवळपास 16 नागरिक आखाती देशांमध्ये अडकल्याची प्राथमिक माहिती... राज्य सरकार सर्वांच्या संपर्कात आहे... भारत सरकारने नागरिकांना सुरक्षित परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत... आम्ही सर्व परिस्थितीवर नजर ठेऊन आहोत... आपल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्याला आमचे प्राधान्य... ऑन् सोनिया गांधी - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत... मोदींमुळे जागतिक राजकारणात भारताचा प्रभाव वाढला... काँग्रेसच्या काळात देशाच्या परराष्ट्र धोरणाची अधोगती झाली होती... आज प्रधानमंत्र्यांचे आग्रहाने स्वागत होते... सोनिया गांधी जेष्ठ नेत्या, मी त्यांच्यावर टीका टिपण्णी करणार नाही... मात्र अशा परिस्थितीत राजकारण करण्याऐवजी देशातील नागरिकांच्या सुरक्षेला महत्त्व देणे गरजेचे...
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 03, 2026 14:01:49
Chandrapur, Maharashtra:भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण, आज देशातून खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार ह्या वर्षी जगातून २ सूर्य आणि २ चंद्र ग्रहणे दिसत असली तरी भारतातून केवळ एकच चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतातून आज संध्याकाळी चंद्र उगविताच अरुणाचल प्रदेशातून खग्रास तर महारास्ट्रातून खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुप , चंद्रपूर चे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे ह्यांनी दिली आहे. खरं तर भारतातून चंद्र अदृष्य असताना दुपारी ०३.२० वाजता खंडग्रास ग्रहणाला सुरवात होईल. तर ४.३४ वाजता खग्रास चंद्रग्रहण दिसेल आणि ५. ३२ मिनिटांनी खंडग्रास ग्रहण संपेल. भारतातूंन केवळ अरुणाचल प्रदेशातून खग्रास चंद्रग्रहण दिसेल. कोलकाता येथून ९० %, टक्के ,गडचिरोली येथून ३० टक्के, चंद्रपूर, नागपूर येथून चंद्र उगवताना २५ टक्के ,पुणे येथे १० टक्के तर मुंबई येथे उंचीवर केवळ १ टक्के खंडग्रास ग्रहण दिसेल. विदर्भात संध्याकाळी ६.१८ ते ७.३३ वाजता अल्प ग्रहण दिसेल. हे ग्रहण पाकिस्तान,अफगाणिस्तान पासून भारतासहीत पुर्वेकडील देश आष्ट्रेलिया, आशिया, अमेरिका येथे दिसेल.ह्यापूर्वी जगातील काही स्थळी १७ फेब्रुवारी ला कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले होते तसेच पुढे १२ ऑगस्ट रोजी खग्रास सूर्यग्रहण तर २८ ऑगस्ट रोजी खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. महाराष्ट्रातून केवळ १ तास ३५ मिनिटेच अल्प ग्रहण दिसेल.आणि हे ग्रहण पूर्व क्षितिजावर असल्याने फारसे सुंदर दिसणार नाही. घरावरून किंवा टेकडीवरून हे ग्रहण थोडे चांगले दिसेल. ग्रहण दुर्बिणीने फारसे चांगले दिसत नसल्याने साध्या डोळ्याने ते पाहिले पाहिजे.ग्रहणे ही वैज्ञानिक घटना असल्यामुळे त्यांचा वैज्ञानिक दृष्ट्या निरीक्षण आणि अभ्यास केला पाहिजे असे प्रा सुरेश चोपणे ह्यांनी सांगितले आहे.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 03, 2026 13:30:58
Dharashiv, Maharashtra: धाराशिव धाराशив जिल्हा परिषद सत्ता स्थापनेत नवा ट्विस्ट, प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही; पालकमंत्री प्रताप सरनाईकांचा भाजपला इशारा आमदार तानाजी सावंत यांना वेगळे ठेवून शिवसेनेत मतभेद असल्याचा आभास निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न दबाव, अमिष आणि अफवांच्या आधारे शिवसेनेची एकजूट ढळणार नाही; सत्ता ध्येय असलं तरी तत्वांशी तोडजोड नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात धाराशिव जिल्ह्यात शिवसेना अखंड, अभेद्य आणि सशक्त; कोणत्याही अफवांना बळी पडू नका शिवसेनेतील एक गट आमच्या सोबत आहे असे चित्र निर्माण करून पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न सहन करणार नाही, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा भाजपसोबत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सत्ता स्थापनेच्या बैठक होत असताना तानाजी सावंत गट दूर असल्याने सुरू झाली होती चर्चा भाजप शिवसेना एकत्र निवडणूक लढवली त्यामुळे सत्ता स्थापनेची चर्चा सुरू , असं असताना दिशाभूल केली जात असल्याचा सरनाईकांचा प्रसिद्धी पत्रकातून आरोप
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 03, 2026 13:01:05
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:ग्रहण काळामध्ये गर्भवतींना पाळायला लावणाऱ्या अनिष्ट रुढींना छेद देण्यासाठी सांगलीमध्ये अंनिसने "सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण" हा उपक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत एका महिलेने ग्रहण काळामध्ये भाजी चिरली, त्यानंतर फळे खाऊन, जेवणही केले. ग्रहण काळामध्ये गर्भवती महिलेने भाजी चिरली तर बाळाचे ओठ फाटतात. या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या भ्रामक कल्पनेला सांगलीच्या चांदणी प्रफुल थोरात या गर्भवती महिलेने आज छेद दिला. ग्रहणाचे वेध सुरू झाल्यानंतर चांदणी थोरात या गरोदर महिलेने भाजी चिरली, कात्रीने कागद कापले तसेच फळे कापून ती खाल्ली ही, सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण"या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Mar 03, 2026 12:01:35
Nashik, Maharashtra:नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीनंतर आता स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठी तब्बल पाचशे इच्छुकांनी दावेदारी केली असून पक्ष कार्यालयातील रजिस्टर नावांनी भरल्याची माहिती समोर आली आहे. संघटनेतील पदाधिकारी, पराभूत उमेदवार आणि सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे कार्यकर्ते देखील या स्पर्धेत उतरले आहेत. नाशिक महापालालिकेत एकूण दहा स्वीकृत सदस्यांची निवड होणार असून त्यात भाजपच्या वाट्याला सहा जागा मिळण्याची शक्यता आहे. या पदासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि जाणकार व्यक्तींना संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी प्रत्यक्षात राजकीय कार्यकर्त्यांनाच संधी मिळते. स्वीकृत नगरसेवकपदासाठी सामाजिक संस्थांमधील कामाचा अनुभव हा महत्त्वाचा निकष मानला जाते. त्यामुळे अनेक इच्छुकांनी गणेश मंडळे किंवा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अनुभव दाखवत कागदपत्रे सादर केली आहेत. तीन वर्षांचे ऑडिट आणि इतर कागदपत्रे पूर्ण करून इच्छुकांनी दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सुनील केदार भाजप शहराध्यक्ष महापालिका निवडणुकीवेळी भाजपकडे सुमारे एक हजार अर्ज आले होते. त्यापैकी ११८ जणांना उमेदवारी देण्यात आली होती. उमेदवारी न मिळालेल्या अनेक इच्छुकांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याचा काहींचा दावा आहे. त्यामुळे आता इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र त्याची पात्रता म्हणजे तो चांगला असावा अशी कोपरखळी त्यांनी मारलीय गिरीश महाजन नेते भाजपकडून याच महिन्यात स्वीकृत नगरसेवकांची निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी इच्छुकांची मोठी संख्या लक्षात घेता संघर्ष टाळण्यासाठी निवड प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 03, 2026 11:48:26
Dhule, Maharashtra:पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दोंडाईचा येते नागरिकांसोबत रंगापंचमी साजरी केली. यावेळी त्यांनी अहिराणी पारंपरिक गीत आणि होळीच्या गीतांवर ठेका धरला. यावेळी त्यांच्या कुटुंबीय देखील सहभागी झाले होते. दोंडाईचा नगरपरिषदेच्या वतीने आयोजित धुलीवंदन उत्सवात पालकमंत्री रावल यांनी सहभागी होत, होळी आणि रनागपंचमीच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दोंडाईच्या शहराच्या नगराध्यक्षा सौ नयनकुंवरताई रावल तसेच रावल यांच्या पत्नी सभागृह नेत्या सुभद्रादेवी रावल यांच्यासोबत होळीच्या रंगांचा आनंद घेताना दिसून आले.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Mar 03, 2026 11:20:44
Nashik, Maharashtra:नाशिक गिरीश महाजन बाईट पॉईंट feed by live u 51 -> अनेक जण आहेत पत्रक म्हणून गेले आहेत। विमान सेवा बंद झाली म्हणून ते अडकले आहेत, ते सुरक्षित आहेत, सर्व व्यवस्था आपण करून देऊ। ambesy सोबत केंद्र सरकार संपर्कात आहे, आपण देखील त्या लोकांच्या संपर्कात आहात। आज उद्या विमान सेवा सुरळीत होईल तेव्हा सर्व व्यवस्थित होईल। संजय राऊत साठी: संजय राऊत तिकडे जाऊन लढू देखील शकता। जग तिसऱ्या महा युद्धाकडे चालले आहे, बालिश पण का करतात, लोक आपली कीव करतात। प्रकाश आंबेडकर साठी: भयंकर आहे, वाट कसली बघत आहे, अनेक नेते आहेत अशी वल्गना करता। बोलणे टाळले पाहिजे। उत्तर महाराष्ट्र कांदा, द्राक्ष, केळी आदि एक्सपोर्ट साठी: परिस्थिती गंभीर आहे, दुबई वरती देखील अटॅक होत आहे। आख्यायी देशात देखील आपला माल जातो। परिस्थितीच अशी आहे की, काही करू शकत नाही। कांदा अनुदान: कॅबिनेट मध्ये त्या संदर्भात निर्णय घेतील, शेतकऱ्यांची मागणी रास्त आहे। उन्मेष पाटील: आम्ही त्यांना हाकलले आहे, कुठे जाऊद्या, ते बरेच पक्ष फिरतील। पक्ष सोडल्यावर काय होईल हे अनेकांना माहिती आहे; त्यांनी कुठे जाऊद्या परिस्थिती समजेल त्यांना। त्र्यंबकेश्वर भाविक मारहाण: अतिशय गंभीर विषय, चार पाच जणांनी कपडे फाडले; अशा पद्धतीने मारावे मला देखील पटलेले नाही। हे योग्य नाही, म्हणून गुन्हा दाखल झाला पाहिजे। चौकशीचा भाग आहे, भाविक हा पर राज्यातलं होता तो निघून गेला आहे। तुम्ही कसे ठरवणार की तो ड्रग्स पिलेला होता; जग भारतातून लोक येतात वारंवार असे प्रकार होणे चुकीचे। ज्यांनी हा प्रकार केला त्यांनी चांगल्या पद्धतीने शिकवणे लागेल; पोलिसांना सांगावे लागेल त्याला व्यवस्थित समजवा। बैठकीत काय काय सुधारणा केली पाहिजे. अजित पवार accident: मी काही टेक्निकल माणूस नाही; चौकशी सुरू आहे, अहवाल आल्यावर समजेल; त्यावर बोलणे योग्य नाही। स्वीकृत नगरसेवक निवड: एक दोन दिवसात नाव जाहीर होईल; आठवडाभरात आम्ही नाव सांगू। कुंभ: खूप चांगल्या सेवा द्यायच्या आहे, सुंदर नियोजन कराचे आहे; आम्ही आधीच सांगितले होते, थोडा त्रास सहन करावा लागेल; त्यानंतर 35-40 वर्ष खड्डे पडणार नाही असे आम्ही रस्ते करत आहोत। साधू महंत कुंभ काम आरोप: कुठलेही तडजोड नाही; आपली जी मुदत आहे त्याच्या आत आपण ही काम करणार आहोत.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 03, 2026 11:18:51
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 03, 2026 10:33:07
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर शहरात पोलिसांनी एका ट्रक चालकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पंढरपूर शहरातील सांगोला कडे जाणाऱ्या चौकात अवजड वाहतूक करणाऱ्या एक ट्रक चालकाला पोलिस बेदम असल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे. सदर ट्रक चालकाने नो एन्ट्री मध्ये वाहन आणल्याने पोलिसांनी दोन हजार रुपये घेतले तसेच घेतलेल्या रकमेची पावती दिली नाही. असे आरोप ट्रक चालकाने केला आहे. तसेच काही अंतर गेल्यावर चालकाच्या मोबाईल वर एक हजार रुपये दंड आल्याचा मेसेज आला. यानंतर चालकाने दंड कसला याबाबत पोलिसांना विचारणा करण्यासाठी परत आला असता पोलिसांनी वाहन चालकाला बेदम मारहाण केल्याचे त्याचे म्हणणे आहे. हे व्हिडिओ आज समाज माध्यमांवर व्हायरल झाले. हा प्रकार घडत असताना मोहोळचे आमदार राजाभाऊ खरे त्या ठिकाणाहून जात असताना त्यांच्या कडे स्थानिक नागरिकांनी घटना सांगितली असता त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवून असा प्रकार बाबत नाराजी व्यक्त केली आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 03, 2026 10:16:55
Solapur, Maharashtra:SOLAPUR BREAKING - मोबाईल पाहण्यास न दिल्याने तेरा वर्षीय चिमुकल्याची गळफास घेऊन आत्महत्या ( PKG ) - SOLAPUR जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात घडलेल्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला - मोबाईल पाहण्यास न दिल्याने तेरा वर्षीय चिमुकल्याची गळफास घेत आत्महत्या - मोबाईल घेतला चिमुकल्याचा जीव? घटनेला जबाबदार कोण ? - पालकहो सावधान मोबाईलच्या हट्टापायी आपली चिमुकली संपवतायत जीवन - मोहोळ जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील मन सुन्न करणारी घटना घडली आहे. मोबाईल वापरण्यास न दिल्याच्या कारणावरून एका तेरा वर्षीय चिमुकल्याने अक्षरशः गळफास घेत स्वतःला संपवले आहे. यशराज धर्मराज डोके राहणार - पेनुर असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. कोणाचाही विश्वास बसणार नाही अशा पद्धतीची ही दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यात काल घडलीय. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात प्रत्येक जण बदलणं हे गरजेचे आहे मात्र याचाच अतिवापरामुळे लहान मुलांचा जीव जाण्याची वेळ आली आहे. यशराज धर्मराज डोके याचे आई-वडील शेती करून आपली उपजीविका भागवतात. एक मार्च रोजी सायंकाळी सातच्या सुमारास यशराज डोके याने मोबाईल वापरण्यास का दिला नाही? याचा राग मनात धरत राहत्या घरातील पत्राच्या लोखंडी अँगल ला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन स्वतःला संपविले आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्याला तात्काळ मोहोळ येथील शासकीय रुग्णालयासाठी उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच होता असल्याचे घोषित केले. सदर घटनेची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी अधिकची माहिती दिलीय. - बाईट - बाजीराव पोवार ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मोहोळ पोलीस ठाणे ) सदरच्या घटना या केव्हाच अचानकपणे घडत नाहीत. पालकांनी आपल्या पाल्यास योग्य संस्कार केले आणि मर्यादित गोष्टी ठेवल्या की असे प्रसंग टाळता येतात. घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून प्रत्येक गोष्ट आपल्या पाल्याला दिलीच पाहिजे असे नाही. मुलांमध्ये धीर धरण्याची वृत्ती कमी होत चालली आहे त्याच्यामध्ये नक्कीच पालकांचा देखील दोष असल्यास मत मानसोपचार तज्ञ डॉ. नितीन भोगे यांनी म्हटलं आहे. - डॉ. नितीन भोगे ( मानसोपचार तज्ञ ) END P2C मोहोळ मध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेने सर्वत्र खळबळ माजलीय. आज डोके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय मात्र ही वेळ आपल्या कुटुंबावर येऊ नये यासाठी पालकांनी देखील वेळीच जाग होणार गरजेच आहे. अभिषेक आदेप्पा, झी - 24 तास, सोलापूर
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top