Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423203

नाशिक के बागलाण में शिवचरित्र व्याख्यान ने हजारों लोगों को जोश से भरा

VNVishal Nagesh More
Mar 04, 2026 01:15:53
Malegaon, Maharashtra
नाशिक की जमीन ऐतिहासिक, साहित्यिक और आध्यात्मिक है... छत्रपति शिवराय का इस भूमि पर विशेष प्रेम रहा - नितीन बांडगुळे पाटील सामाजिक कार्यकर्ता सुनील महाजन और उनके मित्र परिवार ने नाशिक बागलाण की आराई में नितीन बानगुडे पाटील के शिवचरित्र व्याख्यान का आयोजन किया।
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Mar 04, 2026 02:46:16
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:महानगरपालिकेच्या सत्तेचे केंद्र मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांसह विविध पाच विषय समित्यांच्या निवडीसाठी छत्रपती संभाजी नगरात ५ मार्च रोजी विशेष सभा आयोजितण्यात आली आहे. महापालिकेतील ११५ नगरसेवकांच्या पक्षनिहाय तौलनिक संख्याबळानुसार या समित्यांचे गठन केले जाणार आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार भाजप हा ५७ नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष असल्याने स्थायी समितीत त्यांना सर्वाधिक ८ जागा मिळणार आहेत. त्यापाठोपाठ ३३ नगरसेवक असलेल्या एमआयएमला ४, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला २, तर उद्धवसेनेला आणि लोकसेवा विकास आघाडीला प्रत्येकी १ जागा मिळणार आहे. ५ मार्चच्या या सभेत सर्व राजकीय पक्षांच्या गटनेत्यांना आपापल्या सदस्यांची नावे द्यायची आहेत...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 04, 2026 02:45:56
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इस्राईल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात इंधनदर वाढीची चर्चा रंगू लागली असून, त्याचे पडसाद छत्रपती संभाजीनगर शहरात उमटले आहेत. युद्धामुळे कच्च्या तेलाची आयात ठप्प होणार, पेट्रोल पंप बंद पडणार अशा अफवांनी शहरात वेग घेतल्याने मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पेट्रोल पंपांवर vehicleधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. रविवार आणि धुलीवंदनमुळे काही ठिकाणी पेट्रोल आले नसल्याने पेट्रोल पंप बंद होते. त्यामुळे अफवा अधिक मोठ्या प्रमाणात पसरली. काही ठिकाणी पोलिसांना बोलवावे लागले. परंतु सध्या युद्धाचे कोणतेही परिणाम पेट्रोलबाबत जाणवत नसून, मुबलक साठा उपलब्ध असल्याने लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन छत्रपती संभाजीनगर पेट्रोल पंप डीलर असोसिएशनचे अध्यक्षांकडून सांगण्यात आले आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 04, 2026 02:45:24
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आपले नशीब आजमावणाऱ्या उमेदवारांपैकी बहुतांश जणांनी निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केला असला तरी नऊ पराभूत उमेदवारांनी या नियमाचे उल्लंघन केले आहे. निवडणूक रिंगणातील एकूण ८५८ उमेदवारांपैकी ८४९ जणांनी, ज्यात निवडून आलेल्या ११५ नगरसेवकांचाही समावेश आहे, आपला खर्चाचा तपशील प्रशासनाकडे वेळेत जमा केला आहे. मात्र, वारंवार सूचना देऊनही टाळाटाळ करणाऱ्या उर्वरित नऊ उमेदवारांना आता महानगरपालिका प्रशासनाने अधिकृत नोटिसा बजावल्या आहेत. या नोटीसमध्ये पुढील १५ दिवसांत खर्चाचा संपूर्ण तपशील सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून तसे न केल्यास त्यांच्यावर कडक प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 04, 2026 02:31:20
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 04, 2026 02:30:51
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेला गतवर्षीपासून एक रुपयाचाही निधी आला नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. परिणामी, जिल्हा जलसंधारण विभागाने प्रस्तावित केलेली २ हजार ७२८ कामे रखडली आहेत. मराठवाड्याच्या भूजलपातळीत वाढ व्हावी, यासाठी नाला बांध, भूजल पुनर्भरण इ. कामे होतात. जलयुक्त शिवार योजनेत वन विभाग, कृषी विभाग, भूजल सर्वेक्षण विभाग आणि जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी कार्यालय आदी विभागांकडून स्वतंत्र कामे करण्यात येतात. पहिला टप्पा राबविल्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने ही योजना बंद केली होती. नंतर एकनाथ शिंदे सरकारने जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा २०२२ पासून सुरू केला होता. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ११९ गावे या योजनेसाठी निवडण्यात आलेली आहे. विविध विभागाने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी तब्बल २ हजार ७२८ कामे प्रस्तावित केली होती. गतवर्षी मार्च नंतर भूजल सर्वेक्षण आणि अन्य काही विभागाने एकूण १८० कामे केली होती.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 04, 2026 02:30:22
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या बिडकीन औद्योगिक पट्टयात सध्या गुंतवणुकीचा महापूर आला असून, अडीच हजार एकरपेक्षा अधिक जमिनीची तातडीने गरज निर्माण झाली आहे. सद्य:स्थितीत ३० पेक्षा अधिक नामांकित ऑटो आणि ऑटो अॅन्सilluरी ( उद्योग जमिनीच्या प्रतीक्षेत आहेत. हजारो कोटींची गुंतवणूक आणि रोजगार जागेअभावी सध्या अधांतरी आहेत. बिडकीन परिसरात प्रामुख्याने पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेवर भर देणाऱ्या व्हेइकल उत्पादक कंपन्यांनी मोठी पसंती दर्शवली आहे. मात्र, उद्योगांना हवी असलेली सलग जमीन उपलब्ध करून देणे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे. जमीन संपादनासोबतच पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी लागणाऱ्या निधीची अडचणही प्रकषनि जाणवत आहे. दरम्यान, विविध उपाययोजनांनंतरच पुढील टप्यातील जमीन संपादन आणि पायाभूत सुविधांचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. उद्योग रांगेत असतानाही केवळ जागेअभावी हे प्रकल्प इतरत्र जाऊ नयेत. यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 03, 2026 17:31:59
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 03, 2026 15:46:06
Satara, Maharashtra:सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणखी एका नव्या नर वाघाची नोंद झाली असून त्याला STR T9 असा सांकेतिक क्रमांक देण्यात आला आहे. हा तरुण नर वाघ गेल्या दोन महिन्यांपासून चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसरातील विविध कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसून आला आहे. त्याचे फोटो व व्हिडिओ वन विभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. सध्या हा T9 वाघ ‘तारा’ (T5) या वाघिणीच्या क्षेत्रात फिरताना आढळून आला आहे. स्थानिक गाईड मंडळींनी त्याचे नामकरण ‘शिलेदार’ असे केले आहे. या नव्या नोंदीमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या आता ७ झाली आहे. सध्या प्रकल्पातील वाघांची संख्या: T1 – सेनापती, T2 – सुभेदार, T3 – बाजी, T4 – चंदा, T5 – तारा, T6 – हिरकणी आणि T9 – शिलेदार. sध्या T5 (तारा) हिच्या क्षेत्रात T1, T2 आणि नव्याने दाखल झालेला T9 असे तीन नर वाघ वावरत आहेत. त्यामुळे तारा कोणत्या नराची निवड करते, याकडे वन्यजीव अभ्यासकांचे लक्ष लागले आहे. राधानगरी, तिलारी-दोडामार्ग या जंगल क्षेत्रांमधील कॉरिडॉर वाघांच्या स्थलांतर आणि प्रजननासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. ही नोंद सह्याद्रीतील वाढत्या जैवविविधतेसाठी आनंददायी ठरत आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 03, 2026 15:00:37
Navi Mumbai, Maharashtra:नशा मुक्त नवी मुंबईचा दणका होळीच्या मुहूर्तावर 18.63 कोटींचे अमली पदार्थ भस्मसात! navi mumbai २ रिपोर्टर: swati naik Navi Mumbai anchor- समाजातील अमली पदार्थांच्या वाईट प्रवृत्तीचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने, नवी मुंबई पोलिसांनी होळीच्या मुहूर्तावर तब्बल 18 कोटी 63 लाख 34 हजार रुपये किमतीच्या अंमली पदार्थाची सोमवारी तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीमध्ये शास्रोक्त पद्धतीने नष्ट करुन त्याची विल्हेवाट लावली. नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थामध्ये एमडी, हेरॉइन, कोकेन, गांजा, चरस, अफीम यासारख्या घातक अमली पदार्थाचा समावेश आहे. नवी मुंबईला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सुरु केलेल्या नशा मुक्त नवी मुंबई अभियानात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने अमली पदार्थांविरोधात सातत्यपूर्ण आणि कठोर भूमिका घेतली आहे. 26 सफ्टेंबर 2025 पर्यंत पोलिसांनी 114 गुह्यांतील 38 कोटी 45 लाख रुपयांचा मुद्देमाल आधीच नष्ट केला होता. त्याच मोहिमेचा पुढचा टफ्पा म्हणून सोमवारी होळीच्या दिवशी 55 गुह्यांतील जफ्त करण्यात आलेला अमली पदार्थाचा साठा नष्ट करण्यात आला.
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top