Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421506

अंबरनाथ में MNS के 14 उम्मीदवार मशाल चिन्ह पर चुनाव लड़ेंगे

CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 18, 2025 01:16:39
Ambernath, Maharashtra
अंबराठमध्ये मनसेनेचे उमेदवार मशाल चिन्हावर निवडणूक लढणार... अंबराठमध्ये मनसेला खिंडार पडले होते. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंबराठमध्ये डॅमेज कंट्रोल केले होते. मात्र नगरपरिषद निवडणूकीत मनसेने एबी फॉर्म दिलेचं नाही अशी चर्चा सुरु झालीये. तर मनसेचे 14 उमेदवार आता मशाल चिन्हावर निवडणूक लढणार असून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. याबाबत मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांनी सांगितले की मनसे कडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून मनसेचे 14 उमेदवार हे मशाल चिन्हावर लढणार आहेत. नागरिकांमध्ये संभ्रम व्हायला नको म्हणून आम्ही मशाल चिन्हावर लढतोय. प्रत्येक पॅनल मध्ये आमचा एक उमेदवार आणि ठाकरे गटाचा एक उमेदवार असणार आहे.
312
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Nov 18, 2025 03:02:31
Dhule, Maharashtra:धुळ्यात कडाक्याच्या थंडीचा चोरही लाभ घेत आहेत. धुळे शहरात सध्या कडाक्याची थंडी पडलेली असताना, धुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या घरात जवळ अवघ्या शंभर फुटावरती हनुमान मंदिरामध्ये जबरी चोरी झालेली आहे. शहरातील सर्वात जुना ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिरातून सात लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती आहे. धुळे शहरातील पांजरा नदी किनारी असलेल्या पंचमुखी मारुती मंदिरात मध्यरात्री चोरी झाली असून, या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. हनुमानाचा डोक्यावर असलेल्या 22 ग्रॅम सोन्याचा टिळक चांदीची छत्री त्याचबरोबर दानपेटी चोरट्यांनी लंपास केले. तब्बल सहा ते सात लाख रुपयाची चोरी असून, वाढलेल्या थंडीचा चोरट्यांनी फायदा घेतल्याच बोललो जात आहे. पहाटे मंदिराचे पुजारी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघड झाला. धुळे शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची पथक हे मंदिरात दाखल झाला असून चोरांचा सिद्ध सुरु झाला आहे. मंदिरा सुरक्षित नसेल तर सर्वसामान्यांचा काय असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 18, 2025 02:33:56
Beed, Maharashtra:बीड: पवनचक्की कंपनीकडून मनमानी, वहिती शेतात खड्डे खोदून पोल रोवले, शेतकऱ्यांचा तीव्र विरोध...! बीडच्या चाकरवाडी शिवारात पवनचक्की कंपन्यांच्या मनमानी कारभाराने शेतकरी त्रस्त आहेत. शेतकऱ्यांना कोणतीही विचारणा न करता उभ्या पिकात विद्युत पोल उभारण्यासाठी ऐन मधोमध दहा फुटांचे खड्डे करण्यात आलेत. शेतकऱ्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्याला याचा जाब विचारला असता कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांनाच दमदाटी केली जाते. त्यामुळे शेतकरी दहशतीत आहेत. याच पवनचक्की प्रकल्पाच्या प्रकरणावरून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण घडले होते. मात्र आजही परिसरात परिस्थिती जैसे थेच आहे. पवनचक्की प्रकल्प कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा अशी याचना इथले शेतकरी करत आहेत. आधीच अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातून सावरत असताना इतर पिकं शेतकऱ्यांकडून जोपासली जात आहेत. मात्र या पिकांचा कोणताही विचार न करता पवनचक्की कंपन्यांचा मनमानी कारभार पाहायला मिळतोय. दरम्यान या प्रकाराबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिलाय तर शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त केला जातोय
179
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 18, 2025 02:33:36
110
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 18, 2025 02:33:19
Nashik, Maharashtra:गोळीबारप्रकरणी लोंढेच्या दोघा साथीदारांना अटक नाशिक शहरातील सातपूरजवळच्या एका पबमध्ये खंडणी वसुलीसाठी पी. एल. टोळीने गोळीबार करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या पुण्यातील मुख्य आरोपी भूषण लोंढे मानला जाणारा अट्टल गुन्हेगार मिळतात साळवे यांना पोलिसांनी उत्तर प्रदेश मधून अटक केली....त्याचा दुसरा मित्र राहुल गायकवाड यालाही घेण्यात आले आहे...गोळीबारानंतर हे दोघेही राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांत भटकंती करत होते...सातपूर येथील पबमधील गोळीबार प्रकरणात रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संशयित प्रकाश लोंढे यांच्यासह त्यांचा मुलगा दीपक लोंढे व दहा ते बारा जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीतील मुख्य सूत्रधार सराईत भूषण लोंढे हा अद्याप फरार असून, त्याचा माग काढला जात आहे...
124
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 18, 2025 02:33:06
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६ नगर परिषदा आणि १ नगरपंचायतीच्या निवडणूक मैदानात महायुतीला तडे गेले. सोमवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. १६० जागांसाठी तब्बल १३१२ उमेदवार मैदानात उतरले असून यातील कितीजण माघार घेतील आणि किती मैदानात कायम राहतील हे २१ नोव्हेंबरला स्पष्ट होईल. ७ न.प.मध्ये १६० नगरसेवक आणि ७ नगराध्यक्षपदासाठी ही निवडणूक होत आहे. नगरसेवकपदासाठी पैठणमध्ये सर्वाधिक २९० उमेदवार तर नगराध्यक्षपदासाठी सिल्लोडमध्ये सर्वाधिक १७ उमेदवार आहेत. महाविकास आघाडीतील उद्धवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे तीन पक्ष निवडणुकीला एकत्र सामोरे जात आहेत. उद्धवसेनेने सिल्लोड, गंगापूर, पैठण, फुलंब्री आणि कन्नडमधून नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिले आहेत, तर काँग्रेसला वैजापूर आणि खुलताबादचे नगराध्यक्षपद देण्यात आल्याची माहिती दिली.
185
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 18, 2025 02:31:35
149
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 18, 2025 02:18:49
Nashik, Maharashtra:अंतिम प्रभाग आरक्षणासाठी २४ नोव्हेंबरपर्यंत मुदत अँकर नाशिक महापालिकेची सोमवारी प्रारूप प्रभाग रचनेमधील प्रत्येक प्रभागातील जागानिहाय आरक्षण जाहीर झाले असून, त्यावर २४ नोव्हेंबरपर्यंत हरकती घेता येणार आहे. मागील निवडणुकीप्रमाणे २०११च्या लोकसंख्येचा आधार, १२२ सदस्य संख्या, चार सदस्यीय प्रभाग पद्धत आणि प्रभाग रचनेच्या प्रक्रियेत कुठलाही बदल झालेला नाहीये... त्यामुळे २०१७च्या निवडणुकीप्रमाणेच प्रभाग रचना 'जैसे थे' राहिली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार शासनाच्या नगरविकास विभागाने २०२२ मधील प्रभाग रचनेचे आदेश कायम ठेवत, चार सदस्यीय प्रभागरचना करण्याचे निर्देश महापालिकांना दिले होते. त्यावर महापालिकेने २०१७च्या निवडणुकीप्रमाणे १२२ सदस्य संख्या असलेले चार सदस्यीय २९ व तीन सदस्यीय दोन अशा एकूण ३१ प्रभागांची प्रारूप रचना तयार करून दि. ५ ऑगस्टला सादर केली होती....
59
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 18, 2025 02:18:32
150
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 18, 2025 02:17:37
Bhandara, Maharashtra:Pravin Tandekar Bhandara Slug - 1811_BHA_ROAD_ISSUE FILE - 8 VIDEO मुख्यमंत्री सडक योजनेचा काम निकृष्ट दर्जाचा.... तक्रार करून देखील अधिकाऱ्यांचा कानाडोळा.... कामाची गुणवत्ता खालावली तर कामाचा फलक देखील लावण्यात आला नाही Anchor :- भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील जांभोरा ते बोरगाव हा 9 किलोमीटरचा सिमेंट रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून 8 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येत आहे.. रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून प्रथम कच्चा थर (DLC) हा चार इंचीचा टाकायला पाहिजे पण कंत्राटदार 2 इंच थर टाकत आहे. तसेच रस्त्यावर पाणी देखील टाकत नाही. व काम किती किमतीचा आहे. याचा फलक देखील लावण्यात आले नाही. कुठलाही शासकीय काम करत असताना कामाचा फलक आधी लावावा लागतो.. स्थानक लोकांनी याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिली अधिकारी कामाच्या ठिकाणी येऊन पाहणी केली व कामात अनियमितता आहे. असे सांगिले तरी पण कामात कुठलीही सुधारणा झाली नाही अधिकाऱ्यांना कंत्राटदारांनी केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर आता प्रश्न उपस्थित होत आहे. तर या संदर्भात अधिकारांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला असताना त्यांनी टाळाटाळ केली आहे. तर मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत अत्यंत निकृष्ट दर्जाचा काम आपल्याला पाहायला मिळत आहे.. BYTE :- भूपेंद्र पवनकर, माजी सरपंच जांभोरा
123
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 18, 2025 02:17:19
Beed, Maharashtra:बीड: भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आमनेसामने, प्रचंड घोषणाबाजी अन् राडा... हाय होल्टेज ड्रामाचा व्हिडिओ व्हायरल... ANC- नगरपालिका निवडणुकी साठीचा उमेदवारी अर्ज सादर करण्याची कालची शेवटची तारीख होती. त्यामुळे सर्वपक्षीयांनी नगरपालिकेत मोठी गर्दी केली होती. अशातच अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप नेते एकाच वेळी नगरपालिकेच्या बाहेर पडले. यावेळी दोन्ही कार्यकर्त्यांकडून नेत्यांच्या समर्थनात घोषणाबाजी झाली. एखाद्या दक्षिणात्य चित्रपटाला साजेसे असेच चित्र बीडमध्ये पाहायला मिळाले. एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करताना काही वेळ वातावरण चिघळण्याच्या स्थितीत होते. अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीचा विजय असो तर भाजप कार्यकर्त्यांकडून योगेश भैय्या तुम आगे बडोच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांच्या हाय होल्टेज ड्रामाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
144
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 18, 2025 02:16:32
Jalna, Maharashtra:जालना : जिल्ह्यातील तिन्हीही नगर परिषदेत भाजप स्वबळावर लढण्याची तयारी जालना जिल्ह्यात पार पडणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत भाजपने तिन्हीही ठिकाणी स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे.भोकरदन नगर परिषदेत सर्वच पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी करत उमेदवारी दाखल केली. परतूरला प्रमुख प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजप यांनी नगराध्यक्षपदासह सर्वच जागांवर अर्ज दाखल केले. दुसरीकडे, येथे राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेस एकत्र आले असून यात उबाठा पक्षाचा समावेश नाही. अंबड नगर परिषदेत भाजपने रासपला सोबत घेऊन उमेदवारी जाहीर केली असून आघाडीबाबत सध्या तरी निर्णय झालेला नाही, शुक्रवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर युती आणि आघाडीचे चित्र स्पष्ट होणार आहे. युती आणि आघाडीचा निर्णय स्थानिक नेत्यांवर सोपवण्यात आला आहे. राज्यातील पातळीवरही दिसत असल्याने युती आणि बदललेल्या समीकरणांचा परिणाम स्थानिक अडचाडीत अडचण दिसते आहे. प्रस्ताव घेऊन कुणी कुणाकडे जायचे यावरूनच सध्या तरी हा निर्णय झालेला नाही. त्यामुळेच सर्वच पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले
157
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 18, 2025 02:16:14
Jalna, Maharashtra:जालना : 3 नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदासाठी 42 उमेदवारी अर्ज अँकर : जिल्ह्यातील तीन नगर परिषदांच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. यात तिन्ही नगर परिषदांमध्ये तब्बल 42 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. परतूर नगर परिषदेत सर्वाधिक 16, अंबड येथे 14, तर भोकरदन नगर परिषदेत 12 उमेदवारांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले आहेत. तिन्ही नगर परिषदांमध्ये नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे. यात भोकरदन ओबीसी महिला, परतूर अनुसूचित जाती महिला, तर अंबड नगर परिषदेत सर्वसाधारण महिला असे आरक्षण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तिन्ही नगर परिषदांमध्ये महिलांसाठी आरक्षण असले तरी अध्यक्षपद मिळवण्यासाठी मोठी चुरस दिसून येत आहे.
135
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 18, 2025 02:15:57
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:येत्या दोन दिवसांत संभाजी नगर शहरात रस्ता रुंदीकरणाची मोहीम पुन्हा सुरू होणार असल्याचे संकेत मनपाकडून देण्यात आले. मात्र संपूर्ण नियमांची अंमलबजावणी करून कारवाई करा, असे आदेश मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले. या बैठकीत दहा रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याच्या पुढील टप्प्याला त्वरित सुरुवात करण्याचे आदेश देण्यात आले. मनपा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरदेखील पुन्हा कारवाई सुरू होते आहे, याबाबत आश्चर्य व्यक्त होते आहे. या बैठकीत दहा महत्त्वाच्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याच्या पुढील टप्याला त्वरित सुरुवात करण्याचे आदेश देण्यात आल,  कुंभमेळ्याबरोबरच शहरातील भविष्यातील पायाभूत सुविधांची गरज लक्षात घेऊन रस्ता रुंदीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे आणि ही कारवाई सुरूच राहणार आहे असे मनपाने स्पष्ट केलंय
137
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 18, 2025 02:01:23
Beed, Maharashtra:बीड ब्रेक - बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथे शेतीच्या वादातून लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने चार जणांवर प्राणघात हल्ला. - मारहाणीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ANC- बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथील समाधान चव्हाण, मनोज चव्हाण, जिवन चव्हाण आणि सुदाम चव्हाण या चार जणांवर भावकीतीलच 5 ते 6 जणांनी लोखंडी रॉड, लाठ्या काठ्या आणि धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंदर्भात जखमींनी नेकनूर पोलिसांना फिर्यादी जबाब दिले आहेत. यासंदर्भात कठोर कारवाई करण्याची मागणी जखमींकडून केली जात आहे. दरम्यान मारहाणीचा एक धक्कादायक व्हिडिओ देखील समोर आला आहे यामध्ये हल्लेखोरांच्या हातात लोखंडी रॉड आणि दांडके दिसत आहेत. बाईट- पीडित शेतकरी
162
comment0
Report
Advertisement
Back to top