Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421506

ठाणे में फसलों के नुकसान का तात्कालिक पंचनामा, Ajit Pawar का आश्वासन

CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Oct 03, 2025 01:17:53
Ambernath, Maharashtra
ठाणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी मदत दिली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन दिलं. अजित पवार मुरबाडमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले आणि त्यांनी ठाणे जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानीचा आढावा घेतला. इथल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्यांचा आम्ही समाधान करू असं पवारांनी यावेळी सांगितलं.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Oct 03, 2025 02:46:13
Niphad, Maharashtra:गेल्या पाच महिन्यांपासून सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यातच गेल्या आठवड्यातील दोन दिवसांच्या अतिवृष्टीने निफाड तालुक्यातील द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा मोठा फटका बसला असल्याने नाशिकच्या निफाड तालुक्यातील उगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी आक्रमक होत द्राक्ष बागांचे सरसकट पंचनामे करावेत, ओला दुष्काळ जाहीर करावा आणि संपूर्ण कर्जमाफी करावी, या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी थेट उगाव गावातील विनता नदीच्या पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे अचानक शेतकऱ्यांनी पाण्यात उतरून आंदोलन सुरू केल्याने प्रशासन व पोलिसांची एकच धावपळ उडाली, तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर जलसमाधी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी बाहेर येत चर्चा केली आणि पंचनामे करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले
2
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 03, 2025 02:46:00
Nashik, Maharashtra:नाशिक जिले में धान्य वितरण में गंभीर गड़बड़ी के आरोप; धान्य का अपहार, लाभार्थियों को प्रमाणपत्र/पावती नहीं देना, समय पर वितरण नहीं करना जैसी शिकायतों پر 8 रेशन दुकानदारों के लाइसेंस रद्द कर दिए गए हैं। साथ ही 97 दुकानों की जमा रकम भी जब्त की गई है। जिन दुकानदारों के बारे में नागरिकों से लगातार शिकायतें मिल रही थीं, उनके लाइसेंस भी रद्द कर दुकाने पूरी तरह बंद कर दी गईं। इसके अतिरिक्त वितरण में चूक, व्यवहार में त्रुटियाँ या सेवा समय पर नहीं देना जैसी मामूली शिकायतों पर भी आर्थिक दंड ठोके गए और 97 दुकानों की जमा रकम जब्त की गई। अन्न और नागर आपूर्ति मंत्रलयों के जिले में इस प्रकार के घोटाले को देखते हुए राज्यभर में क्या चल रहा है, इसकी कल्पना इसी से की जा सकती है.
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Oct 03, 2025 02:45:48
Pune, Maharashtra:मावळातील विजयादशमी महोत्सव समितीच्या वतीने यंदाचा दसरा उत्सव एकदम थाटामाटात साजरा करण्यात आला. ३५ फुट उंच रावणाची प्रतिकृती उभारून पारंपरिक रावणदहन सोहळा पार पडला. यावेळी खास आकर्षण ठरली मद्रास फटाक्यांची नेत्रदीपक आतिषबाजी, आकाशात रंगांची उधळण पाहून उपस्थित हजारो प्रेक्षक भारावून गेले. राम-लक्ष्मण आणि हनुमान यांची आरती सुरू होताच, सभोवतालचे वातावरण “जय श्रीराम” च्या घोषणांनी दुमदुमून गेले. विशेष म्हणजे, हजारो आबालवृद्ध रामभक्तांनी मोबाईलची लाईट चालू करून प्रभू श्रीरामाला अभिवादन करत अविस्मरणीय दृश्य निर्माण केले. तत्पूर्वी भव्य राम-लक्ष्मण मिरवणूक काढण्यात आली होती. या संपूर्ण कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून शिस्तबद्ध वातावरणात महोत्सव यशस्वीरीत्या पार पडला.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 03, 2025 02:33:44
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मनपा, कंत्राटदाराच्या वादात कर्मचाऱ्यांचा पगार रखडला 2 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दसरा अखेर वेतनाविनाच; दिवाळी तरी गोड होणार का? छत्रपती संभाजी नगर महापालिका प्रशासन आणि मनुष्यबळ पुरविणाऱ्या कंत्राटदाराचा वाद काही दिवसांपासून सुरू आहे. या वादात निष्पाप कर्मचारी भरडले जात आहेत. दसऱ्यासारख्या सणालाही कर्मचाऱ्यांना चार महिन्यांचा पगार मिळालेला नाही. बुधवारी मनपा प्रशासनाने महाराणा एजन्सीला मागील दोन महिन्यांचा पगार स्वतःहून करावा, अशा आशयाची नोटीस पाठविली. कायमस्वरूपी महापालिकेत कर्मचारी कमी आणि कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी जास्त झाले आहेत. महापालिकेच्या कामकाजाचा कणा हे कर्मचारी बनले आहेत. कंत्राटी कर्मचारी काढून टाकले तर महापालिकेचे कामकाज ठप्प होऊ शकते, अशी विदारक स्थिती आहे. कायमस्वरूपी कर्मचारी भरतीसाठी अनेकदा प्रयत्न झाले; मात्र त्याला फारसे यश आले नाही. त्यामुळे मागील दहा वर्षात कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सर्वत्र बोलबाला झाला.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 03, 2025 02:33:26
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर: गँगवारमधून खून; दोन सख्ख्या भावांसह तिघांना 9 तासांत अटक मुजीब डॉनवर गंभीर गुन्हे दाखल; गॅस व्यवसायाचा जुना वाद जुन्या वादातून गुंडटोळीने सय्यद इम्रान सय्यद शफिक याची त्याच्या मुलासमोर रेल्वेस्थानक उड्डाण पुलाखाली हत्या केली. बुधवारी रात्री 8:30 वाजता झालेल्या या हत्ये नंतर पोलिसांनी रात्री नऊ तासांत मुख्य संशयित मुजीब डॉनसह त्याचा सख्खा भाऊ सद्दाम हुसैन मोईनोद्धीन आणि आतेभाऊ शेख इरफान शेख सुलेमान याला झाल्टा फाटा येथे अटक केली. 13 वर्षांचा आयान व तीन वर्षांचा आजान या मुलांसोबत इम्रान बाहेर गेला होता. तो घरी जाताना सिल्क मिल कॉलनी परिसरात उड्डाण पुलाखाली सुसाट कारने त्याची रिक्षा अडवली. कारमधून पाच ते सहा जणांनी उतरून मुलांना रिक्षाबाहेर काढत इम्रानवर शस्त्राने हल्ला चढवला. इम्रानने शस्त्र पकडण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोरांनी त्याची बोटे कापून उजव्या हाताचे मनगट छाटले. त्यानंतर शस्त्राने डोके, मानेवर वार करून हत्या केली होती गॅस व्यवसायाच्या जुन्या वादातून ही हत्या झाली होती असा पोलिसांचा अंदाज आहे...
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Oct 03, 2025 02:31:08
Bhandara, Maharashtra:ट्रॅक्स मधील प्रवाशांचा मागच्या दराला लटकत जीवघेणा प्रवास.... चालकही चालत्या गाडीत फोनवर बोलण्यात धुंद.... नागपूर वरून प्रवासी घेऊन प्रवाशांना ट्रॅक्स च्या माध्यमातून भंडाराच्या दिशेने आणताना खरबी नाका परिसरातील जीवघेण्या प्रवासाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. दरम्यान गाडीमध्ये बसण्यासाठी जागा नसल्याने काही प्रवासी मागच्या दराला हात पकडून उभे प्रवास करत असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे..... तर या ट्रॅक्स मधील चालक हा फोनवर बोलताना दिसत आहे. अशा प्रकारचा जीवघेणा प्रवास होत असताना RTO विभाग काय करत असतात??? असा सवालही या माध्यमातून उपस्थित होत आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Oct 03, 2025 02:30:55
Bhandara, Maharashtra:सोन्या चांदीचे दागिने चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक... वेगवेगळ्या ठिकाणी चोरी केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी दोन चोर दुचाकीवरून आले. पण पोलिसांना आधीच टीप मिळाल्याने लाखनीतील सोनार गल्लीतच त्यांना पकडून नंतर कोठडीत पाठविण्यात आले. त्यांच्या ताब्यातून तब्बल ८ लाख ९० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले. अनिल बोरकर (३८) अक्षय गुप्ता (२४, दोघेही लाखनी) अशी आरोपींची नावे आहेत. सोनार गल्लीच्या वळणावर मोटारसायकलवरून येणाऱ्या दोन्ही संशयितांना अडवण्यात आले. आपण पोलिसांच्या तावडीत सापडत असल्याचे लक्षात येताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून पकडले.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Oct 03, 2025 02:30:45
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Oct 03, 2025 02:17:27
Bhandara, Maharashtra:अंगावर भिंत पडल्याने बांधकाम मजुराच्या जागीच मृत्यू, एक मजूर गंभीर... गोरेलाल चौक कपडा दुकान येथील घटना.. गोंडिया शहरातील मुख्य बाजारपेठेतील गोरेलाल चौक जवळील कपडा व्यापारी अनिल जैन यांच्या दुकानाचे नवनीकरणाचा बांधकाम सुरू असताना त्यांच्या दुकानाच्या माळ्यावर लागून असलेली अंजली स्टील सेंटर भांड्यांच्या दुकानातील जुनी भिंत अंगावर पडल्याने बीरसी येथील राहणाऱ्या बांधकाम मजूर अक्षय पांचे याचा जागीच मृत्यू झाला असून, यात जितेश बाहे हा मजूर गंभीर जखमी झाला आहे.. रहदारीच्या जागेवर या अपघातामुळे स्थानिकामध्ये गोंधळ उडायला असून नागरिकांची मोठी गर्दी याठिकाणी दिसून आली.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 03, 2025 01:19:57
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:अँकर - दसऱ्याच्यानिमित्ताने सांगलीच्या विटा मध्ये पालखी शर्यतीचा सोहळा पार पडला. अत्यंत चुरशीच्या आणि थरारक अशा पार पडलेल्या पालखी शर्यतीमध्ये मूळस्थानची पालखीने प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. विट्याचा श्री रेवणसिध्द देव व मूळस्थान येथील श्री रेवणसिध्द देव या दोन देवांच्या पालख्यामध्ये ही शर्यत झाली. रेवणसिध्दाच्या नावानं चांगभलंच्या गजरात पार पडलेल्या शर्यती मध्ये मूळस्थानच्या पालखीने निर्णायक क्षणी आघाडी घेत पालखी शर्यत जिंकली. दीडशे वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी ऐतिहासिक पालखी शर्यत सोहळा पाहण्यासाठी देशभरातून लाखो भाविक विट्यात उपस्थित होते.
8
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 03, 2025 01:19:05
3
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 03, 2025 01:18:49
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीमध्ये एका बंगल्यामध्ये धाडसी दरोड्याचा प्रयत्न झाला आहे. रिव्हॉल्वरची धाक दाखवत लुटण्याचा प्रकार करण्यात आला,पण आरडाओरडा झाल्याने चोरट्यांनी पळ काढला, मात्र नागरिकांनी थरारक पाठलाग करत चोरट्यांना पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.शहरातल्या कॉलेज कॉर्नर जवळ असणाऱ्या रतनशीनगर नजीक हा प्रकार घडला आहे.दसऱ्याच्या दिवशी रात्रीच्या sुमारास दोघा चोरट्यांनी दिवेश शहा यांच्या बंगल्यामध्ये प्रवेश करत शहा यांना रिव्हॉल्वरची धाक दाखवत दागिने व पैश्याची मागणी केली,हा प्रकार सुरू असताना शहांच्या पत्नीकडून घराच्या मागील दरवाज्यातून आरडा-ओरडा करण्यात आल्यानंतर चोरट्यांनी बंगल्यातून पळ काढला,दरम्यान आवाजाने जमा झालेल्या नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला, यावेळी चोरट्यांकडुन नागरिकांवर रिव्हॉलवर रोखण्यात आली,पण नागरिकांनी दगडफेक करत पाठलाग सुरूच ठेवला,यानंतर लपलेल्या चोरट्यांना नागरिकांनी पकडून बेदम चोप देत त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.शहर पोलिसांनी दोघां चोरट्यांवर गुन्हा दाखल करत अटक केली आहे.या घटनेमुळे परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली होती.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 03, 2025 01:18:32
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:दसऱ्याच्यानिमित्ताने सांगलीच्या विटा मध्ये पालखी शर्यतीचा सोहळा पार पडला. अत्यंत चुरशीच्या आणि थरारक अशा पार पडलेल्या पालखी शर्यतीमध्ये मूळस्थानची पालखीने प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. विट्याचा श्री रेवणसिध्द देव व मूळस्थान येथील श्री रेवणसिध्द देव या दोन देवांच्या पालख्यामध्ये ही शर्यत झाली. रेवणसिध्दाच्या नावानं चांगभलंच्या गजरात पार पडलेल्या शर्यतीमध्ये मूळस्थानच्या पालखीने निर्णायक क्षणी आघाडी घेत पालखी शर्यत जिंकली. दीडशे वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी ऐतिहासिक पालखी शर्यत सोहळा पाहण्यासाठी देशभरातून लाखो भाविक विट्यात उपस्थित होते.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Oct 03, 2025 01:18:16
Ambernath, Maharashtra:गरब्याच्या कार्यक्रमात गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक Anchor उल्हासनगर एका सराईत गुंडाने गरब्याच्या कार्यक्रमात शिवसेना शाखा प्रमुखावर बंदूक रोखत गोळीबार केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीला उल्हासनगर गुन्हे शाखेने अवघ्या काही तासात गजाआड केली आहे उल्हासनगर कॅम्प 2 मधील 24 नंबर शाळा परिसरात बंजारा विकास परिषद येथे बालाजी मित्र मंडळाचा गरबा आहे. ह्या गरब्याचे आयोजक शिवसेना शाखाप्रमुख बाळा भगुरे हे आहेत. त्यांना स्थानिक सराईत गुन्हेगार सोहम पवार याने गरब्याच्या ठिकाणी रात्री पावणे बारा वाजता अडवले. गरब्याला माझ्याकडून परवानगी घेतली का, मी इकडचा भाई आहे असे म्हणत सोहमने अग्निशस्त्र काढून बाळा भगुरे यांच्यावर रोखले. आणि दहशत माजवण्यासाठी त्याच्या कडच्या गावठी कट्ट्याने हवेत दोन गोळ्या झाडल्या होत्या. या प्रकरणी बाळा भगुरे यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर उल्हासनगर गुन्हे शाखेने सापळा रचून सोहमला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली असता गावठी बनावटीचे पिस्तूल मिळून आले. त्याला पुढील कारवाईसाठी उल्हासनगर पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top