Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

गोरेलाल चौक के कपड़ा दुकान के निर्माण में दीवार गिरने से मजदूर की मौत

PTPRAVIN TANDEKAR
Oct 03, 2025 02:17:27
Bhandara, Maharashtra
अंगावर भिंत पडल्याने बांधकाम मजुराच्या जागीच मृत्यू, एक मजूर गंभीर... गोरेलाल चौक कपडा दुकान येथील घटना.. गोंडिया शहरातील मुख्य बाजारपेठेतील गोरेलाल चौक जवळील कपडा व्यापारी अनिल जैन यांच्या दुकानाचे नवनीकरणाचा बांधकाम सुरू असताना त्यांच्या दुकानाच्या माळ्यावर लागून असलेली अंजली स्टील सेंटर भांड्यांच्या दुकानातील जुनी भिंत अंगावर पडल्याने बीरसी येथील राहणाऱ्या बांधकाम मजूर अक्षय पांचे याचा जागीच मृत्यू झाला असून, यात जितेश बाहे हा मजूर गंभीर जखमी झाला आहे.. रहदारीच्या जागेवर या अपघातामुळे स्थानिकामध्ये गोंधळ उडायला असून नागरिकांची मोठी गर्दी याठिकाणी दिसून आली.
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSATISH MOHITE
Oct 03, 2025 04:32:30
Nanded, Maharashtra:नांदेड शहरात गेल्या सत्तर, पंचेहात्तर वर्षात ज्या वाईट प्रवृत्ती फोफावल्यात त्यांना जबाबदार असणाऱ्यांचा नाश करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे असे वक्तव्य विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी केले. काल दसऱ्यानिमित्त आयोजित रावण दहन कार्यक्रमात हेमंत पाटील यांनी हे वक्तव्य केले. नांदेड शहरात रस्त्यावरून नीट वाहने नेता येत नाहीत. ज्यांच्या हातात महापालिका होती त्यांनी नांदेडच्या सर्व सार्वजनिक वापराच्या जमिनी बिल्डरांच्या घष्यात घातल्या. त्यांच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरेल त्यात मी पण असेन असे वक्तव्य करत हेमंत पाटील यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Oct 03, 2025 04:17:16
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Oct 03, 2025 04:17:03
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 03, 2025 03:49:11
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 03, 2025 03:32:08
Satara, Maharashtra:सातारा शहरापासून अवघ्या चार किलोमीटर असणाऱ्या वाढेगावातील दोन दुर्गादेवींचा भेटीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी वाडेश्वर नगर येथील दुर्गादेवी आणि वाढे गावातील दुर्गा देवीच्या विसर्जन मिरवणुकी दरम्यान दोन देवी समोरासमोर आल्यानंतर हा भेटीचा सोहळा दरवर्षी गेल्या अनेक वर्षापासून साजरा केला जातोय. भेटी दरम्यान दोन्ही मंडळांकडून फटाक्याची आतिषबाजीसह हळद कुंकवाची उधळण करत केला जातो यावेळी हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. हा क्षण पाहण्यासाठी मोठ्या संख्येने वाढे गावातील भाविक ग्रामस्थ उपस्थित राहतात विशेष करून महिलांची संख्या या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Oct 03, 2025 03:31:47
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 03, 2025 03:30:57
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी दसरा-दिवाळी सणादरम्यान सहा दिवसांचा शटडाऊन घेतला जाणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. नवीन पाणीपुरवठा योजनेच्या २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनी जोडणीसाठी सप्टेंबर महिन्यात शटडाऊन घेण्याचा निर्णय झाला होता. परंतु, मुसळधार पावसामुळे जलवाहिनी जोडणीचे काम थांबवल्याने शटडाऊन घेतला नाही. दसरा होताच कवडगाव येथे जलवाहिनी जोडणीसाठी शटडाऊन घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नवीन पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे. मजीप्रामार्फत जीव्हीपीआर कंत्राटदार एजन्सीकडून पाणी योजनेचे काम केले जात आहे. या योजनेचे जवळपास ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यान २५০० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. परंतु, १२ ठिकाणी ही जलवाहिनी जोडण्याचे काम रखडले है. हे काम पूर्ण करण्यासाठी मजीप्राने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ६ दिवसांचा शटडाऊन घेण्याचा निर्णय घेतला. मनपाकडून परवानगी घेण्यात आली. १२ सप्टेंबरपासून जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेण्यात आले. परंतु, पावसामुळे जोडणीचे काम थांबले होते.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 03, 2025 03:30:29
Nashik, Maharashtra:दसरा खरेदीत ३० टक्के वाढ; वाहनविक्रीत गाठला उच्चांक अँकर साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या दिवशी अनेक नागरिकांनी आपले स्वप्न पूर्ण करत स्वतःचे घर चार चाकी दुचाकी घेतल्या आहे... गत वर्षाच्या तुलनेने यंदाच्या दसऱ्याला ३० टक्के खरेदी वाढली असल्याचे विविध व्यावसायिकांनी सांगितले. जीएसटी सात टक्क्यांनी कमी झाल्याने ग्राहकांनी वस्तू घेण्यासाठीचे आपले बजेटही वाढविले. शहरात या एकाच दिवसात तब्बल ५,५०० हून अधिक दुचाकी तर एक हजाराच्यावर कारची विक्री झाली. तर फ्लॅटची बुकिंग व विक्रीदेखील वाढली. ३०० ग्राहकांनी साडेतीन मुहूर्ताचे निमित्त साधून गृहप्रवेश केला. सोने, चांदीचा बाजारही झळाळी देणारा ठरला. सोन्याचे भात १ लाख २१ हजार, तर चांदी किलोला दीड लाखाच्यावर जाऊनही गत वर्षाच्या तुलनेने याची खरेदी २० ते ३० टक्के वाढल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले... रिअल इस्टेटसह ऑटोमोबाइल व इलेक्ट्रॉनिक्स बाजाराला कमी झालेला जीएसटीचा दर बूस्टर देणारा ठरलाय....
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 03, 2025 03:20:08
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यात २०१२ मधील दुष्काळ आणि २०१४-१५ मधील गारपिटीपेक्षा यंदाच्या महापुराने शेतीचे प्रचंड मोठे नुकसान केले आहे. विभागात खरिपाच्या ६६ टक्क्यांवर पिकांचे नुकसान झाल्याचा महसूल प्रशासनाचा प्राथमिक अहवाल आहे. जायकवाडी प्रकल्पातून केलेल्या विसर्गामुळे शेतीच्या नुकसानीचे प्रमाण आणखी वाढू शकते. मराठवाड्यात ४८ लाख ३४ हजार ३६६ हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या. महापुराने ३१ लाख ९८ हजार ४७० हेक्टर क्षेत्रावरील पिके नष्ट झाली आहेत. २०१२ मध्ये दुष्काळाने खरिपाचे सुमारे २३ लाख ४१ हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले होते. यावर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली. मान्सूनच्या आगमनानंतर जून आणि जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होते. ऑगस्ट महिन्यात दमदार पाऊस झाला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पावसाच्या तडाख्याने मराठवाडा महापुराच्या विळख्यात आला, छत्रपती संभाजीनगर विभागात १ जूनपासून ३१ लाख ९८ हजार ४७० हेक्टर ८८ आर क्षेत्रावरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये ३१ लाख ५२ हजार १२६ हेक्टर कोरडवाहू शेतीचा समावेश आहे.
1
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 03, 2025 03:19:56
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर महापालिकेच्या ताफ्यात 25 घंटागाड्या दाखल सोलापूर महानगरपालिकेस जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मंजूर झालेल्या 38 घंटागाड्यांपैकी पहिल्या टप्प्यात खरेदी करण्यात आलेल्या 25 घंटागाड्यांचे लोकार्पण महापालिकेच्या इंद्रभुवन येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सोलापूर शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेस एकूण 38 घंटागाड्यांची मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी 25 गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले असून उर्वरित गाड्यांची खरेदी लवकरच पूर्ण होणार आहे. नवीन घंटागाड्यांमुळे शहरातील कचरा संकलन व्यवस्थेत अधिक गती येणार असून “दरवाजा-दरवाजा कचरा संकलन” उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येणार आहे. नागरिकांना वेळेत व सुटसुटीत सेवा मिळेल, तसेच शहर स्वच्छता मोहिमेला बळकटी मिळून सोलापूर हे स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी शहर बनविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
3
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Oct 03, 2025 03:19:46
Hingoli, Maharashtra:हिंगोली - देशातील दुसऱ्या क्रमांकाचा दसरा महोत्सवात 51 फुटी रावणाचं दहन,फटाक्यांच्या आतिषबाजीत रावणाचे दहन देशात मैसूर नंतर दुसऱ्या क्रमांकाचा लोकसहभागातून साजरा होणारा हिंगोलीचा दसरा महोत्सव प्रचलित आहे. या दसरा महोत्सवाला 171 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असून हिंगोलीच्या रामलीला मैदानावर 11 दिवस नवरात्रीत महोत्सव भरविला जात असतो. विजया दशमीला हजारो राम भक्तांच्या उपस्थितीत रावण दहन करण्याची परंपरा आहे. रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांनी लखलखत्या प्रकाशात फटाक्याची आतिश बाजी करीत रावणाचं दहन करण्यात आल. हजारो राम भक्त हिंगोलीत दाखल झाले होते. यावेळी प्रशासनाच्या वतीने कडक बंदोबस्त लावण्यात आला होता...
1
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 03, 2025 03:19:30
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ट्रॅॅक्टर धुतल्यानंतर पोहण्यासाठी खदानीत उतरलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लिंबेजळगावात गुरुवारी घडली. मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ आणि त्यांच्या एक मामेभावाचा व गावातील अन्य एका मुलाचा समावेश आहे. इरफान इसाक शेख, इम्रान इसाक शेख, सैन हयात पठाण, आणि व्यंकटेश ऊर्फ गौरव दत्तू तारक अशी मृतांची नावे आहेत. सगळे मृत 15 वर्षाखालील आहेत... जाहेद रसूल पठाण यांची गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव शिवारात ६ एकर शेतजमीन आहे. याच ठिकाणी त्यांचे दुमजली घर असून त्यांची तीन मुले, मुलगी आणि जावई असे सर्व येथेच राहतात. त्यांच्या शेजारी दत्तू तारक हा कुटुंबीयांसह राहतात. गुरुवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या नातू इरफान इसाक शेख हा ट्रॅक्टर धुण्यासाठी त्याचा लहान भाऊ इम्रान, मामे भाऊ झैन आणि शेजारील दत्तू तारक यांचा मुलगा व्यंकटेश या तिघांसह घराबाहेर पडले होते. जवळच्या गायरान जमिनीत काही लोकांनी मुरूम उपसा करून भला मोठा खड्डा केला आहे. त्या खड्यातच साठलेल्या पाण्यात त्यांनी ट्रॅक्टर धुतले. त्यानंतर पोहायला गेले आणि बुडाले...
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Oct 03, 2025 03:19:13
Chendhare, Alibag, Maharashtra: स्लग - माणगाव आणि इंदापूरच्या वाहतूक वाहतूक कोंडीतून सुटका होणार ...... बायपासच्या कामांना आजपासून पुन्हा सुरुवात ...... तिसऱ्यांदा निविदा प्रक्रियेनंतर अडथळा दूर ........ ठेकेदाराने माघार घेतल्याने रखडले होते काम ....... अँकर - मुंबई गोवा महामार्गावर माणगाव आणि इंदापूर इथं होणाऱ्या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची लवकरच सुटका होईल अशी आशा निर्माण झाली आहे. महामार्गाच्या कामातील महत्वाचा टप्पा असलेल्या माणगाव आणि इंदापूर येथील बायपासचे काम मागील काही वर्षांपासून रखडले आहे. ठेकेदाराने कामातून माघार घेतल्याने हे काम रखडलं आहे. परंतु आता पुन्हा एकदा या कामाला सुरुवात होत आहे. तिसऱ्यांदा निविदा प्रक्रियेनंतर ठेकेदाराची नियुक्ती झाली असून या कामातील अडथळा दूर झाला आहे. मंत्री आदिती तटकरे , खासदार सुनील तटकरे आणि खासदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत या कामाचे भूमिपूजन आज होत आहे.
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top