Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

कल्याण-डोंबिवली महापालिका चुनाव से पहले कांग्रेस में बड़ा प्रवेश, भाजपा-शिवसेना को झटका

ABATISH BHOIR
Dec 22, 2025 10:10:14
Kalyan, Maharashtra
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणणूकीच्या रणधुमाळीपूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या सत्ताधारी पक्षांना मोठा धक्का देत, त्यांच्या अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' केले आहे. काँग्रेस जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ पातकर, युवक काँग्रेस सचिव ब्रिज दत्त आणि पदाधिकारी नवीन सिंग यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. एकीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे हे पक्षवाढीसाठी प्रयत्न करत असताना, दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष, माजी शहराध्यक्ष, अनुसूचित सेलचे सचिव, तसेच शिवसेना शिंदे गटाचे विभागप्रमुख आणि शाखाप्रमुख यांचा समावेश आहे. भाजपच्या अनुसूचित जाती-जमाती सेलच्या सरचिटणीसांनी प्रवेशावेळी आपली नाराजी व्यक्त करताना सांगितले की, "सत्ताधारी पक्षात फक्त 'मन की बात' ऐकली जाते, सामान्य जनतेच्या प्रश्नांवर म्हणजेच 'जन की बात'वर कोणाचेही लक्ष नाही. ३५-४० वर्षे पक्षासाठी झिजणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून फक्त घराणेशाहीला महत्त्व दिले जात आहे." ते तसेच शिवसेना शिंदे गटात ३८ वर्षे काम केलेल्या एका विभागप्रमुखांनी भावना व्यक्त करताना म्हणाले, "पक्षासाठी तन-मन-धनाने काम केले, मात्र नव्या समीकरणात जुन्या निष्ठावंतांची दखल घेतली जात नाही, म्हणूनच आम्ही काँग्रेसचा हात धरला आहे." या वेळी बोलताना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी विरोधकांना थेट इशारा दिला. ते म्हणाले, "भाजप आणि शिवसेनेच्या भूलथापांना कंटाळून निष्ठावंत कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत. अनेक माजी नगरसेवक देखील आमच्या संपर्कात आहेत. ज्याप्रमाणे टीमचा कॅप्टन चांगला असेल तर वर्ल्ड कप जिंकता येतो, त्याचप्रमाणे आम्ही ही महानगरपालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरलो आहोत. येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस 'किंगमेकर' ठरेल यात शंका नाही." रस्त्यांच्या समस्या, वाढते नागरी प्रश्न आणि सत्तेचा गैरवापर याला शह देण्यासाठी आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे कार्यकर्त्यांनी या वेळी सांगितले. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे कल्याण-डोंबिवलीत काँग्रेस आपली अंतर्गत ताकद वाढवत असून महायुतीच्या गोटात मात्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRAFULLA PAWAR
Dec 22, 2025 11:03:52
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 22, 2025 10:53:21
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:नुकताच उद्धव ठाकरेच्या उपस्थितीत संभाजीनगरचे माजी महापौर राजी मोचुद्दीन राहि? यांची उद्धव ठाकरेच्या शिवसेनेत प्रवेश झालाय, त्याला चंद्रकांत खैरे यांनी विरोध दर्शवलाय. आज राजी मामू आणि चंद्रकांत खैरे यांची शिवसेना भवन जवळ सामोरे आले यावेळेस खैरे यांनी राजी मामुला माझा तुझ्या प्रवेशाला विरोध आहे असं सांगितलं. यावेळेस राजी मामू आणि खैरे मध्ये शाब्दिक भांडण सुद्धा झाले. माझा प्रवेश हा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला असल्यास राजी मामू यांनी सांगितलं. दरम्यान अंबादास दानवे यांनी राजी मामू यांच्या प्रवेशाचे जोरदार समर्थन केले. शिंदे सेनेत किती लोकांवर आरोप आहे, सत्तााऱ्यावर कुठं कुठले आरोप आहेत असा सवाल त्यांनी केला. सोबतच अजित पवार यांच्या सोबत असलेले मुंब्र्याचा मुल्ला नवाब मलिक यांचेही पाहावे असे दानवे म्हणाले.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Dec 22, 2025 10:52:26
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 22, 2025 10:51:35
Chendhare, Alibag, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार. खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती. रायगड जिल्ह्यातील तीन नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली तर महाड, श्रीवर्धन, कर्जत, खोपोली, पेण, रोहा, माथेरान व मुरूड मध्ये राष्ट्रवादी चे नगरसेवक निवडून आले. या विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळा प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सुतारवाडीतील कार्यालयात पार पडला. या वेळी मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, कार्याध्यक्ष सुुभाष केकाणे उपस्थित होते. श्रीवर्धन आणि खोपोली मधील नगराध्यक्ष पराभूत कोणत्या कारणांमुळे झाले याचे आत्मपरीक्षण करण्यात येईल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 22, 2025 10:48:21
kolhapur, Maharashtra:नागपुरातील मुख्यमंत्री निवासस्थान रामगिरी येथे नागपुरातील विजय नगराध्यक्षांचा गौरव करण्यात आला... यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते देवेंद्र फडणवीस:-मुख्यमंत्री, -नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली यश मिळाले आहे -नागपूर जिल्हा भाजपचे अभिनंदन,२७ पैकी २२ ठिकाणी आपले नगराध्यक्ष झाले, -तील अत्यंत उत्तम निकाल आपल्याला मिळाला आहे,नागपूर क्षेत्रातील जनतेचे आणि मायदारांचे आभार -निकालाने एक बाब स्पष्ट झाली आहे,महाराष्ट्रात नंबर १ चा पक्ष भाजप आहे -७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे निवडून आले आहेत,२१० नगराध्यक्ष निवडून आलेत महाविकास आघाडीचे केवळ५० नगराध्यक्ष आले, त्यांचा सफया केला -সर्वाधिक स्राईक रेट आपला है. मागच्या निवडणूकित १५०० नगरसेवक होते यावेळी ३००० हजार झाली आहे. - गेल्या ३० वर्षात एवढे नगरसेवक कुणाचे निवडून आलेले नाहीत - जनतेने आपल्याला कामाची पावती दिली आहे. - १८ नगर पालिका अश्या आहेत जिथे आपले नगरसेवक निवडणूक आलेत,पण नगराध्यक्ष येऊ शकले नाही नागपूरात अनेकांचे किल्ले उध्वस्त केले - सावनेर नगर पालिका काँग्रेस मुक्त केली आहे - बावनकुळे यांनी चँग बांधला होता, वाडी आणि कामठी नगर पालिकेत ऐतिहासिक विजय मिळाला - रामटेक काँग्रेस मुक्त झाला आहे - २२ आपले आणि पाच मित्रपक्षांचे शहर कश्या प्रकारे विकसित करता येईल या ---विजयाचा रथ सुरू राहील,जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीत हा रथ घोडदौड करेल - विजयाने माजनार नाही आणि मातनार नाही याची दक्षता घ्या. चंद्रशेखर बावनकुळे:- - नागरिकांचे आणि मतदारांचे आभार - विकसित नागपूर जिल्हा करिता भाजपला मतदान झालं - जनतेला देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यावर विश्वास आहे. - नागपूर जिल्हाला ६५०० कोटी रुपये विकास कामांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत - 1250 कोटी रुपयांची डीपीसी दिली आहे - एवढी एकसंघ भाजप बघायला मिळाली, एकही कार्यकर्ते घरी बसून राहिला नाही,जबाबदारी वाढली आहे. - ज्यांना उमेदवारी देऊ शकलो नाही त्यांची क्षमा मागतो - महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागायचे आहे -नागपूर महानगरपालिकेत उच्चांक गाठला जाईल त्याच प्रमाणे जिल्हा परिषदेत आपला अध्यक्ष बसेल
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 22, 2025 10:21:29
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - तरुणांनो लाल रंगाच्या एनर्जी ड्रिंकचे सेवन करताय खबरदार. लाल एनर्जी ड्रिंकमुळे तरुणांना जडतायत पोटाचे विकार? शरीराला घातक ठरणाऱ्या लाल रंगाच्या एनर्जी ड्रिंकची तरुणांमध्ये क्रेझ. बाजारपेठेत अगदी 20 - 30 रुपयांमध्ये उपलब्ध होणाऱ्या लाल रंगाच्या एनर्जी ड्रिंक पिण्याची तरुणांमध्ये मोठी क्रेझी निर्माण झाली आहे. शरीराला घातक समजल्या जाणाऱ्या या लाल रंगाच्या एनर्जी ड्रिंक मधील घातक कन्टेन्टमुळे तरुणांच्या जीवावर उठते की काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय. अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सहज उपलब्ध होणाऱ्या लाल एनर्जी ड्रिंक वीस ते पस्तीस वयोगटातील तरुणांच्या आकर्षणाचा जीवनावश्यक भाग बनली आहे. शरीराला तात्काळ ऊर्जा मिळवण्यासाठी अगदी किशोरवयीन मुले या लाल एनर्जी ड्रिंक च्या आहारी जात असल्याचं समोर येतंय. आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या टपऱ्या, किराणा दुकान, शॉपिंग मॉल अशा अनेक ठिकाणी उपलब्ध असणारी ही वस्तु आहे. अत्यंत सहज रीतीने उपलब्ध होणाऱ्या आणि शरीराला तात्पुरती ऊर्जा देणाऱ्या या लाल एनर्जी ड्रिंक ची युवकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. लाल एनर्जी ड्रिंक चे व्यसन असणारा तरुण हा दिवसभरात किमान 3-4 वेळा तरी पितोच. हे एनर्जी ड्रिंक पिल्यानंतर शरीराला खूप आराम मिळतो, स्ट्रेस निघून जातो आणि एनर्जी प्राप्त होते असं काही तरुणांचं मत आहे. आकर्षक दिसणारे आणि चवीला तात्पुरते चांगले लागणारे हे लाल रंगाचे एनर्जी ड्रिंक किती घातक आहे याबद्दल तरुणांना पुसटशी देखील कल्पना नाही. लाल रंगाच्या एनर्जी ड्रिंकमुळे स्वादुपिंड, हृदय, पोटाचे विकार वाढल्याचं समोर आलंय इतकंच नव्हे तर लिव्हर डॅमेज होण्याचे प्रकारही तज्ज्ञांच्या उपचारातून निदर्शनास आले आहेत. एनर्जी ड्रिंक मध्ये असलेल्या साखर कॅफिन आणि इतर घटकांमुळे यकृतावर वाईट परिणाम होतो. यामुळे फॅटी लिव्हर रोगही होऊ शकतो. म्हणजेच जे अल्कोहोल पीत नाहीत त्याला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणतात. त्याने यकृतामध्ये अधिकची चरबी जमा होते आणि यकृताच्या सामान्य कार्यावर परिणाम होतो. हे लाल रंगाचे एनर्जी ड्रिंक किती घातक आहे हे तज्ज्ञ डॉक्टरांच्या तोंडूनच ऐकूयात. किशोरवयीन मुलांसाठी लाल रंगाचे एनर्जी ड्रिंक जीव घेणा ठरते का? याकडे सरकारने गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. अभिषेक आदेप्पा, झी - 24 तास, सोलापूर
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 22, 2025 10:12:21
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ नगर परिषदेत प्रभाग क्रमांक 17 मध्ये पोलीस संरक्षणात प्रचार करणारा भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार भारत ब्राम्हणकर जायंट किलर ठरला आहे. भारत यांची उमेदवारी कापून पक्षाने माजी सभापती प्रवीण प्रजापती यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे बंडाचा झेंडा हाती घेऊन भारत ने अपक्ष उमेदवारी दाखल केली. बंदूकधारी पोलीस संरक्षणात भारत यांनी प्रचार केला. माजी मंत्री मदन येरावार यांनी स्वतः भारत यांचे विरोधात विडिओ बनवून पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केल्याने ह्या लाडतीकडे यवतमाळकरांचे लक्ष लागले होते. निवडणूक निकालात भारत ब्राम्हणकर भरघोस मतांनी विजयी झाले असून प्रजापती तिसऱ्या क्रमांकावर गेले.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Dec 22, 2025 10:06:38
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 22, 2025 09:55:10
Pandharpur, Maharashtra:राज्यात 11 हजार 136 इतक्या दोन नंबरच्या मताधिक्याने पंढरपूर मध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या दिवंगत आमदार भारत भालके यांच्या सून डॉक्टर प्रणिता भालके यांचे पुत्र शौर्यतेज भालके याचा दंड थोपटेलेला व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाला आहे. भारत भालके विजयी झाल्यानंतर त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीने शिवतीर्थावर दंड थोपटले होते. त्याची आठवण म्हणून त्यांचा नातू शौर्य तेज भालके याने दंड थोपटून विजय साजरा केला. 2021 ची विधानसभा पोट निवडणूक 2024 ची विधानसभा निवडणूक मध्ये भालके यांचा पराभव झाल्यानंतर नगरपालिका निवडणुकीत झालेला विजय भालके यांना राजकीय बळ देणारा ठरला आहे
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 22, 2025 09:47:13
Shirdi, Maharashtra:Sangmner News Flash नाशिक - पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी सर्व पक्षीय नेते एकवटले... मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या पहिल्या आठवड्यात शिष्ठमंडळासोबत मुंबईत बैठक घेण्याची माहिती... आ. सत्यजित तांबे यांनी बैठकीदरम्यान मुख्यंमंत्री यांचेशी संपर्क साधल्याची माहिती... मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या बैठकीत तोडगा निघेल अशी आ. तांबेची अपेक्षा... मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास रस्त्यावरची लढाई करणार असल्याचे आश्वासन... आळेफाटा, चाकण येथे बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्याचे संकेत... कुसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी इशारा दिला... नाशिक - पुणे रेल्वेसाठी सर्वपक्षीय नेते एकवटले... आंदोलनेची पुढील दिशा ठरवण्यासाठी मंथन बैठकीचे आयोजन... संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते... नाशिक - पुणे रेल्वे ही सिन्नर, अकोले, संगमनेर, जुन्नर, नारायणगाव मार्गेच नेण्याची मागणी... प्रस्तावित रेल्वेमार्ग बदलला गेल्याने जनतेत असंतोष... रेल्वेसाठी सर्वपक्षीय आजी माजी खासदार, आमदार आणि नेते एकवटले... बैठकीसाठी उपस्थित नेते - खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सत्यजीत तांबे, आमदार किरण लहामटे, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, देवदत्त निकम, सत्यशील शेरकर, शेतीनेते अजित नवले, बाजीराव दराडे आदींसह विविध पक्षांचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित... तर खासदार अमोल कोल्हे, खासदार राजाभाऊ वाजे, आढळराव पाटील आदींचा बैठकीत ऑनलाईन सहभागिता...
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 22, 2025 09:39:35
Gadchiroli, Maharashtra:मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या गडचिरोलीत भाजपचे कमळ फुलले. सर्व तीनही नगरपरिषदावर भाजपने सत्ता मिळविली आहे. विशेष म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी या सर्वांच्या विरोधात भाजपने तीनही जागी लढत दिली होती. गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज या तीनही ठिकाणी भाजपने अँटी इंकंबन्सी घटक धुळीस मिळवत सत्ता काबीज केली. गडचिरोली नगरपरिषदेत भाजपच्या उमेदवार ॲड प्रणोती निंबोरकर तब्बल 3700 मतांनी विजयी झाल्या. या नगर परिषदेत एकूण 27 नगरसेवक संख्या असून त्यापैकी भाजपने 15, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 5, काँग्रेस 6 तर वंचित बहुजन आघाडीचा 1 उमेदवार निवडून आला आहे. देसाईगंज नगर परिषदेत भाजपच्या लता सुंदरकर विजय झाल्या. इथली नगरसेवक संख्या 21 आहे. यापैकी भाजपने 12, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 2 तर काँग्रेसचे 7 उमेदवार विजयी झाले आहेत. आरमोरी नगरपरिषदेत भाजपने तरुण उमेदवार रुपेश पुणेकर यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी लढत जिंकली आहे. इथली सदस्य संख्या 20 असून त्यापैकी तब्बल 15 नगरसेवक भाजपने निवडून आणले आहेत. शिवसेना शिंदे गटाचा 1 उमेदवार तर काँग्रेसचे 4 उमेदवार निवडून आले. गडचिरोली
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Dec 22, 2025 09:38:58
Pune, Maharashtra:Headline : लोणावळ्यात फळ विक्रेतीचं 'भाग्य' उजळलं, नगरसेविका झाली, 24 तासांतच फळ विक्री सुरु केली. Anchor: लोणावळ्यात फळ विक्रेतील भाग्यश्री जगतापांवर मतदारांनी मोठा विश्वास दाखवलाय. त्यांचं नगरसेवक होण्याचं 'भाग्य' मतदारांनी उजळून टाकलंय. पण नगरसेवक झाल्यानंतर भाग्यश्री हुरळून गेल्या नाहीत. निकालाला चोवीस तास उलटायच्या आतचं भाग्यश्री यांनी पुन्हा फळ विक्रीला प्राधान्य दिलंय. दहा वर्षे ज्या व्यवसायानं आपलं पोट भरलं, तो व्यवसाय नगरसेवक झाले तरी सुरुचं ठेवणार आणि मतदारांचा विश्वास ही सार्थ ठरवणार. असा विश्वास भाग्यश्री यांनी व्यक्त केलाय. ग्राहकांना ही आपण नगरसेविकेच्या हातून पेरुचा गोडवा चाखतोय, हे पाहून सुखद धक्का बसला. राजकारणाच्या बाजारातील हे सकारात्मक चित्र पाहिलं की आपली लोकशाही अजून ही किती भक्कम आहे, हे यातून अधोरेखित झालं. बाईट : भाग्यश्री जगताप - नवनिर्वाचित नगरसेविका,लोणावळा (file no.04) बाईट : महादेव जगताप - भाग्यश्रींचे पती (file no.05)
0
comment0
Report
Advertisement
Back to top