Back
भिवंडी धर्मांतरण केस: अमेरिकी नागरिक सहित तीन गिरफ्तार, अदालत ने कोठड़ी बढ़ाई
UJUmesh Jadhav
Oct 08, 2025 12:48:45
Thane, Maharashtra
भिवंडी... भिवंडी तालुक्यातील भुईशेत चिंबीपाडा येथे शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी धर्मांतराचा प्रयत्न उधळून लावला होता. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तीन जणांना अटक केली. ज्यामध्ये जेम्स वॉटसन या अमेरिकन नागरिकाचा समावेश होता. शनिवारी जेम्स वॉटसन व त्याचे स्थानिक साथीदार साईनाथ गणपती सरपे, मनोज गोविंद कोल्हा यांना भिवंडी न्यायालयात हजर झाले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली होती. सोमवारी पुन्हा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी कनिष्ठ स्तर न्यायालय सातवे न्यायालयात हजर झाले होते. त्यावर न्यायालयाने १७ ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी गावातील धर्मांतराची माहिती दिल्यानंतर आम्ही स्वतः त्याठिकाणी जाऊन पाहिले असता, जेम्स वॉटसन हा मनोज कोल्हा याच्या घरात गावातील महिला पुरुष व लहान मुलांना एकत्र जमवून त्यांना इंग्रजी मध्ये हिंदू धर्माबद्दल अपप्रचार करून बदनामी करून ख्रिश्चन धर्मांतर बद्दल सांगत होता. वॉटसनचा साथीदार साईनाथ सरपे मराठीत ते समजावून सांगत होता. जेम्स वॉटसन हा सुरवातीला भारतात आला व त्यानंतर व्यावसायिक व्हिसा बनवून वाटवे करीत असून व्यावसायिक व्हिसा ही त्याचा चार महिन्यांपूर्वी संपला आहे. तो महाराष्ट्रभर फिरून धर्मांतराचा कार्यक्रम राबवित आहे अशी आरोप बजरंग दलाचे कोकण प्रांत मंत्री संदीप भगत यांनी केला आहे. धर्मांतराचे प्रकार आदिवासी समाजात सुरू आहेत. हे प्रकार थांबले पाहिजेत. भोळ्याभाबड्या फसवून, पैशांचे आमिष दाखवून होत आहे हे थांबले पाहिजे. म्हणून महाराष्ट्र शासनाने भारतातील इतर अकरा राज्यांप्रमाणे धर्मांतर विरोधी कायदा राबविला पाहिजे. त्यासाठी कठोर कायदा केला पाहिजे व जेम्स वॉटसन सारख्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी संदीप भगत यांनी केली. ज्यांनी तक्रार दिली ते व बजरंग दलाचे संदीप भगत यांची राजकीय इच्छाशक्ती असल्याने स्वतःच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी ही खोटी कारवाई करायला भागाडले आहे. त्यांचा हिंदू धर्माशी काही एक संबंध नाही. हिंदू धर्माची लाज वाटेल अशी कामे ते करीत आहेत. देव हा प्रकार वयक्तिक आहे. प्रत्येकाने अपना देव शोधावा. ते स्वतः हिंदू धर्मासाठी काही करीत नाहीत स्वतः देवतांची पूजा करीत नाहीत आणि लोक काय करतात ते हे बघत आहेत. आणि प्रत्येकांच्या गावोगावी जाऊन त्यांना त्रास देत आहेत असा आरोप जेम्स वॉटसन यांचे वकील अँड. दीनानाथ कांबळे यांनी केला आहे. बजरंग दलाचे कार्यकर्ते जे करत आहेत त्यांचा धर्माला काही फायदा नाही. जेम्स वॉटसन बऱ्याच वर्षांपासून भारतात राहत आहे. त्याची बऱ्याच जणांसोबत ओळख आहे. मनोज कोल्हा याने त्यांना घरी जेवायला बोलावले होते. ते सर्व ख्रिस्ताला मानणारे असल्याने बायबल वाचत होते. बायबल वाचन हा काही गुन्हा नाही. आपल्या देशात बायबलला धार्मिक ग्रंथ म्हणून मान्यता आहे. तेथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली. महिलां सोबत गैरवर्तन केले. हे कोणत्याच धर्मात लिहिलेले नाही. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सल्ल्याची गरज नाही असा टोला जेम्स वॉटसन चे वकील अँड यांनी लगावला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 08, 2025 15:22:120
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 08, 2025 15:16:160
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 08, 2025 15:11:270
Report
DSDurag singh Rajpurohit
FollowOct 08, 2025 15:10:540
Report
RKRishikesh Kumar
FollowOct 08, 2025 15:10:300
Report
NCNITIN CHAWRE
FollowOct 08, 2025 15:10:130
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 08, 2025 15:09:494
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 08, 2025 15:06:080
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 08, 2025 15:05:540
Report
ABATISH BHOIR
FollowOct 08, 2025 15:05:380
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 08, 2025 14:56:340
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 08, 2025 14:52:450
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 08, 2025 14:52:320
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowOct 08, 2025 14:15:240
Report
SNSWATI NAIK
FollowOct 08, 2025 14:08:410
Report