Back
कल्याण पश्चिम की बिरला वन्या सोसायटी में कचरा 문제 से 800 परिवार परेशान
ABATISH BHOIR
Feb 26, 2026 06:17:06
Kalyan, Maharashtra
कल्याण पश्चिमेतील ‘बिरला वन्या’ सोसायटीत कचऱ्याचा कहर; दुर्गंधीमुळे ८०० कुटुंबस त्रस्त, रहिवासी रस्त्यावर उतरले
दुर्गंधीमुळे लहान मुले व ज्येष्ठ नागरिक आजारी... घर सोडून जाण्याची रहिवाशांची वेळ
Anc..कल्याण पश्चिमेतील बिरला वन्या या उच्चभ्रू सोसायटीमध्ये सध्या सुमारे ८०० कुटुंबस वास्तव्यास आहेत. बाराशेहून अधिक फ्लॅट्स असलेल्या या सोसायटीमध्ये ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी उभारण्यात आलेला प्रकल्प योग्य पद्धतीने न चालवता कचरा गोडाऊनमध्ये साचवला जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) ने १०० किलोहून अधिक घनकचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांना स्वतःच्या आवारात कचरा वर्गीकरण आणि खतनिर्मिती (कंपोस्टिंग) बंधनकारक केले आहे. मात्र संबंधित सोसायटीमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया न करता तो साठवून ठेवल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे.रहिवाशांच्या मते, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेक जण आजारी पडत आहेत. याबाबत अनेकवेळा विकासकांना सूचना करूनही दखल न घेतल्याने अखेर नागरिकांनी सोसायटीबाहेरील गाड्या आडव्या लावून निषेध नोंदवला. “हायप्रोफाईल सोसायटी म्हणून घर घेतले, पण आता दुर्गंधीमुळे घर विकण्याची वेळ आली आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांनी दिली.दरम्यान, विकासकांकडून याबाबत विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर महानगरपालिकेचे घनकचरा विभागाचे अधिकारी रामदास कोकरे यांनी संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.या प्रकारामुळे शहरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या अंमलबजावणीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, रहिवाशांना तातडीने दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Byte : रहिवाशी 1,2,3,4
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 26, 2026 07:15:490
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 26, 2026 06:51:400
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 26, 2026 06:46:470
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 26, 2026 06:46:180
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 26, 2026 06:17:400
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 26, 2026 06:06:450
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 26, 2026 06:01:180
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 26, 2026 05:47:250
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 26, 2026 05:46:590
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 26, 2026 05:46:380
Report
AKAMAR KANE
FollowFeb 26, 2026 05:46:150
Report
AKAMAR KANE
FollowFeb 26, 2026 05:46:060
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 26, 2026 05:45:54Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शहागंज दाम्पत्याला मारहाण प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी केली आहे, शहरामध्ये हातगाडी चालकांची दादागिरी वाढत चालली आहे पोलिसांनी ठोस भूमिका घ्यावी महापालिका या हातगाडी चालकांवर कारवाई करणार असल्याचे जंजाल यांनी सांगितले
0
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 26, 2026 05:00:290
Report