Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444601

CCI cotton purchase registration closes from Feb 27, farmers in trouble

ADANIRUDHA DAWALE
Feb 26, 2026 05:00:29
Amravati, Maharashtra
27 फेब्रुवारीपासून सीसीआयची कापूस खरेदी नोंदणी होणार बंद; हजारो विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडून, कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी अँकर :- 27 फेब्रुवारी पासून अमरावती जिल्ह्यात सीसीआयची कापसू खरेदी नोंदणी बंद होणार आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या आठ-दहा दिवसात कापसाचे दर हजार ते बाराशे रुपये कमी झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सीसीआय मध्ये कापूस विकण्यासाठी नोंदणी करायला सुरुवात केली होती मात्र आता 27 फेब्रुवारी पासून सीसीआयची कापड खरेदीची नोंदणी बंद होणार असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांकडे कागदपत्र तयार नसल्याने शेतकरी 27 फेब्रुवारी पूर्वी सीसीआय कडे नोंदणी करू शकणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कमी भावात कापसाची विक्री करावी लागणार आहे आता सीसीआयने नोंदणी बंद केली तर शेतकऱ्यांनी कापूस विक्री कुठे करावी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Feb 26, 2026 06:17:06
Kalyan, Maharashtra:कल्याण पश्चिमेतील ‘बिरला वन्या’ सोसायटीत कचऱ्याचा कहर; दुर्गंधीमुळे ८०० कुटुंबस त्रस्त, रहिवासी रस्त्यावर उतरले दुर्गंधीमुळे लहान मुले व ज्येष्ठ नागरिक आजारी... घर सोडून जाण्याची रहिवाशांची वेळ Anc..कल्याण पश्चिमेतील बिरला वन्या या उच्चभ्रू सोसायटीमध्ये सध्या सुमारे ८०० कुटुंबस वास्तव्यास आहेत. बाराशेहून अधिक फ्लॅट्स असलेल्या या सोसायटीमध्ये ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी उभारण्यात आलेला प्रकल्प योग्य पद्धतीने न चालवता कचरा गोडाऊनमध्ये साचवला जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) ने १०० किलोहून अधिक घनकचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांना स्वतःच्या आवारात कचरा वर्गीकरण आणि खतनिर्मिती (कंपोस्टिंग) बंधनकारक केले आहे. मात्र संबंधित सोसायटीमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया न करता तो साठवून ठेवल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे.रहिवाशांच्या मते, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेक जण आजारी पडत आहेत. याबाबत अनेकवेळा विकासकांना सूचना करूनही दखल न घेतल्याने अखेर नागरिकांनी सोसायटीबाहेरील गाड्या आडव्या लावून निषेध नोंदवला. “हायप्रोफाईल सोसायटी म्हणून घर घेतले, पण आता दुर्गंधीमुळे घर विकण्याची वेळ आली आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांनी दिली.दरम्यान, विकासकांकडून याबाबत विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर महानगरपालिकेचे घनकचरा विभागाचे अधिकारी रामदास कोकरे यांनी संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.या प्रकारामुळे शहरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या अंमलबजावणीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, रहिवाशांना तातडीने दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Byte : रहिवाशी 1,2,3,4
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 26, 2026 06:06:45
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील सरडपार गावात आंतरजातीय विवाह केल्याने गावाने सामाजिक बहिष्कार घातल्याचा दाम्पत्याचा आरोप, गावाने केला इन्कार अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात असलेल्या सरडपार गावात राहणाऱ्या सचिन आणि सुजाता सोनटक्के या जोडप्याने गावाने आपल्यावर आंतरजातीय विवाह केल्याने सामाजिक बहिष्कार घातल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. ग्रामस्थांनी मात्र याचा इन्कार केलाय. व्ही. ओ. १) चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या सरडपार गावात आंतरजातीय विवाह केल्याने ग्रामस्थांनी एका जोडप्यावर बहिष्कार घालण्याची घटना उजेडात आली आहे. सचिन सोनटक्के हे अनुसूचित जातीतले आहेत तर सुजाता या अनुसूचित जमातीतील आहेत. मे 2023 मध्ये या दाम्पत्याचा अंतरजातीय विवाह झाला. मात्र त्यानंतर सोनटक्के कुटुंबीयांचे घरगुती वाद सुरू झाले आणि सचिन उनकी आई आणि भावाने सरडपार गावातील घर सोडून सिंडेवाही येथे आपला मुक्काम हलवला. मात्र सचिन आणि त्यांच्या पत्नीचा आरोप आहे की त्यांच्या कुटुंबीयांनी गावातील लोकांना त्यांच्या विरोधात भडकवले आणि तेव्हापासून त्यांच्यावर गावाने आणि विशेषत: त्यांच्या जातीतील लोकांनी सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार टाकलाय. इतकच नाही तर त्यांच्या एक वर्षाच्या मुलाला देखील आशा वर्कर कडून कुठल्याही प्रकारची लस किंवा इतर गळ्या दिल्या गेल्या नाही. याबाबत पोलिसांत अनेक वेळा दाद मागितली गेली मात्र यावर कुठलीही कारवाई झालेली नाही असाही या दाम्पत्याचा आरोप आहे. TICTAC with सचिन सोनटक्के आणि सुजाता सोनटक्के, बहिष्कृत दाम्पत्य व्ही. ओ. २) तर दुसरीकडे गावातील लोकांनी या दाम्पत्यावर कुठल्याही प्रकारचा सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार टाकण्यात आल्याच्या बाबीचा स्पष्टपणे इन्कार केलाय. बाईट ३) वासुदेव रामटेके, ग्रामपंचायत सदस्य, सरडपार व्ही. ओ. ३) या गंभीर घटनेवर सिंदेवाही पोलीसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यावर प्रकरण चौकशीत असल्याचं सांगत पोलिसांनी यावर बोलण्यास नकार दिलाय. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 26, 2026 05:46:59
Shirdi, Maharashtra:राजूर ते अहिल्यानगर निघालेल्या लॉंग मार्चचा आज तिसरा दिवस असून संगमनेर प्रांताधिकारी कार्यालय परिसरात कालचा मुक्काम आंदोलकांनी केला. 148 किलोमीटर पैकी 50 किलोमीटरच्या अंतर आंदोलकांनी पार केले असून काल मंत्रालयात झालेल्या बैठकीच्या चर्चेनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. डॉ. अजिक नवले यांच्यासह 13 जणांच्या शिष्टमंडळाने काल मंत्रालयात चर्चा केली. या चर्चेत काही मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती असली तरी अनेक मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत. या सगळ्या मागण्यांबाबत आज दुपारी 12:00 वाजेपर्यंत मंत्रालयातून काय निर्णय होतो यावरच आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट होईल. आंदोलकांनी आपल्या पुढील टप्प्याच्या लॉंग मार्च साठी तयारी पूर्ण केली असून आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या लोणी गावात हे लाल वादळ आज धडकणार आहे. संगमनेर प्रांत कार्यालयाबाहेर आंदोलकांनी घोषणाबाजी करत ठिय्या सुरू केलाय या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 26, 2026 05:46:15
Nagpur, Maharashtra:नागपुरात एका घरातील झाकण नसलेल्या पाण्याच्या टाकीत पडून दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय . कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी घरमालक शेजाऱ्याला अटक केली आहे. कुश राजेंद्र पटेल असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. मंगळवारी तो घरासमोर खेळत होता. सायंकाळी सात वाजून गेल्यावरदेखील तो घरी न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी त्याची शोधाशोध सुरू केली. घरासमोर राहणाऱ्या घराच्या जिन्याखाली रस्त्यालगत असलेल्या पाण्याच्या टाकीत एकाने सहज वाकून पाहिले असता तेथे कुश बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला तातडीने बाहेर काढून पारेख इस्पितळात व तेथून वर्धमाननगरातील पुगलिया इस्पितळात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ज्या घराचे पाण्याच्या टाकीला झाकण किंवा जाळी लावली नव्हती. त्यामुळे खेळता खेळता कुश त्यात पडला. कुशचे काका जितेंद्र पटेल यांच्या तक्रारीवरून टाकीचे झाकण उघड्या असलेल्या घरमालकाला गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 26, 2026 05:46:06
Nagpur, Maharashtra:नागपूर एम्स मेस के खाने में किडे और सुरवंट आढळले विद्यार्थ्यांच्या मेसमधील घटना, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) में विद्यार्थ्यांच्या मेसच्या जेवणात किडे आणि सुरवंट आढळले. मशरूमأैवजी, मशरूम करीमध्ये स्पंजयुक्त पदार्थ आढळला. बुधवारी, पदवीधर विद्यार्थ्यांच्या मेसमध्ये जेवताना, विद्यार्थ्यांना एक सुरवंट आढळला. सुरवंट पूर्णपणे तेलात तळलेला होता. फळांच्या तुकड्यावर एक मृत किडा आढळला आणि भाजीमध्ये माशीसारखा पदार्थ आढळला. शिवाय, मशरूम करीमध्ये एक स्पंजयुक्त पदार्थ आढळला, एम्ससारख्या प्रतिष्ठित संस्थेच्या मेसमधील निष्काळजीपणामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Feb 26, 2026 04:32:46
Shirur, Maharashtra:गेली काही दिवसांपासून कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने कांदा उत्पादन शेतकरी मोठ्या संकटात सापडलााय, सध्या कांद्याला किलोला ८ ते १२ रुपये पर्यंतचा बाजार मिळत असल्याने केलेला खर्च हि निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अक्षरशः अश्रू अनावर झालेत. मागील वर्षी ही वखारीत साठवलेल्या कांद्याला बाजार भाव न मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकय्रांना मोठा तोटा सहन करावा लागला होता तर या वर्षी हा वातावरणातील बदलामुळे कांद्याचे उत्पादन घटल्याने आणि कांद्याचे बाजारभाव गडगडल्याने कांदा उत्पादक शेतकय्रांना मोठा तोटा सहन करावा लागतोय याचाच लोणी बाजार समितीतून आढावा घेतलाय
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Feb 26, 2026 04:19:47
Virar, Maharashtra:वसई विरार मध्ये भाजपला खिंडार पडण्यास सुरवात भाजप नेत्या ऍड साधना धुरी बविआ मध्ये अँकर : निवडणुकीपूर्वी बहुजन विकास आघाडीला लागलेली गळती आता थांबली आहे. मात्र आता चक्क भाजपालाच खिंडार पाडण्यास सुरुवात झाली आहे. वसई शहरातील भाजपच्या फायर ब्रँड नेत्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा एडवोकेट साधना धुरी यांनी बुधवारी बहुजन विकास आघाडी मध्ये प्रवेश केला. बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, महापौर अजीव पाटील, यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. या वेळेला अनेक भाजप कार्यकर्त्यांनी बविआ मध्ये प्रवेश केला. साधना धुरी यांनी नुकतीच भाजप तर्फे महापालिका निवडणुक लढवली होती. बविआ मध्ये प्रवेश करताच धुरी यांनी आंद स्नेहा दुबे पंडित यांच्यावर टीका केली. त्या फक्त रील बनवत असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढील काळामध्ये देखील भाजपाचे अनेकजण बहुजन विकास आघाडीमध्ये येतील आणि आमचा पक्ष अधिक मजबूत होईल असा दावा येथील हितेंद्र ठाकूर यांनी केला. बाईट : माजी आमदार हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडी
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 26, 2026 04:19:03
0
comment0
Report
Advertisement
Back to top