Back
सांगोलात नगरपालिका चुनाव में भाजपा-शिवसेना के बीच टकराव; शाहाजी पाटिल एकला रहने को तैयार
SKSACHIN KASABE
Nov 24, 2025 06:32:42
Pandharpur, Maharashtra
राज्याच्या राजकारणात सध्या भाजप आणि शिवसेना यांच्यातील राजकीय असंतोष स्पष्टपणे दिसत आहे. मात्र याची पेरणी विधानसभा निवडणुकीत झाली होती. याची कबुलीच सांगोला नगरपालिका निवडणुक प्रचाराच्या निमित्ताने शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली आहे. महायुती मधील नेत्यांची खदखद बाहेर येऊ लागली आहे. याचे निमित्त ठरले आहे नगरपालिका निवडणुकांमधील भाजपचे वर्चस्व टिकवून ठेवण्याचा हट्ट, सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपालिका आणि 1 नगरपंचायत मध्ये भाजपने मित्र पक्षांच्या ताकती कडे दुर्लक्ष करून सर्व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी आपल्याकडे ठेवल्या आहेत. सांगोला नगरपालिका निवडणुकांतील नैसर्गिक मित्र शिवसेना असतानाही भाजपने शेकापचे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या सोबत युती केली. त्यांनी जाहीर केलेला उमेदवाराला अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपा मध्ये घेऊन उमेदवारी दिली. हे सर्व करताना माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना कोणतेही महत्व दिले नाही. या राजकारणात एकटे पाडल्याची भावना निर्माण झालेल्या शहाजी बापू यांनी सुद्धा 23 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष स्वतंत्र शिवसेना चिन्हावर लढवण्याचा निर्णय घेतला. यांनतर माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी एक एक गुपिते आपल्या विरोधात केलेल्या राजकारणाची कारस्थाने जाहीर पने सांगायला सुरुवात केली. भाजप नेत्यांवर दहशत दमबाजी ते थेट अबलेवर बलात्कार झाल्याची उद्विग्न होण्या पर्यंत वक्तव्य केली. आपण मरणाच्या दारात असतानाही लोकसभेला प्रामाणिक केल्याची आठवण सुद्धा भाजप नेत्यांना करून द्यावी लागली. तरीही भाजप नेतृत्वाने शहाजी बापू यांच्या बोलण्याला काडीची किंमत दिली नाही. त्यामुळे एकटे पडलेल्या शहाजी बापू साठी थेट एकनाथ शिंदे यांनी काल सांगोला येथे येऊन सभा घेतली. त्यांना वारंवार सांगावा लागलं बापू जखमी शेर आहे. त्यांनी एकटे पाडून कार्यक्रम झाला असल्याची भावना असल्यास तर एकनाथ शिंदे मागे असल्याची आठवण करून दिली. मी बाळासाहेबांचा चेला आहे. एक बार मैंने कमिट मेट करली तो मैं अपनी आप की भी नहीं सुनता म्हणत थेट भाजप नेत्यानं बापू साठी अंगावर घेतले आहे. सांगोल्याच्या जनतेपुढे काल शहाजी बापूंनी आपल्याला एकटे पाडल्याचे सांगत आक्रमक पने भाजप नेत्यांना उत्तर दिले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्यांनी आमचे कंबरडे मोडले होते. याची माहिती होती. विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी शेकाप आणि ठाकरे गटाच्या उमेदवाराला कशा रकमा पोहोच केल्या याची टायमिंग सह माहिती आहे. असा उल्लेख शहाजी बापूंनी केला. त्यामुळे महायुती असतानाही शेकापचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप नेत्यांनी राजकीय खेळ्या केल्याच गुपित फोडले आहे. नगरपालिका निवडणुका प्रचार निमित्ताने सांगोल्यातून शहाजी बापू पाटील यांनी आपले तोंड उघडले आहे. आता प्रचार संपेपर्यंत शिवसेना भाजप मधील अनेक दिवसांची खदखद व्यक्त होण्याची शक्यता आहे
166
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 24, 2025 07:46:050
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 24, 2025 07:33:080
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 24, 2025 07:32:500
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 24, 2025 07:32:380
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 24, 2025 06:31:4065
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 24, 2025 06:21:46110
Report
AKAMAR KANE
FollowNov 24, 2025 06:05:23152
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 24, 2025 06:04:56150
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 24, 2025 05:48:36156
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 24, 2025 05:21:02103
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 24, 2025 05:17:04178
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 24, 2025 05:05:17152
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 24, 2025 05:04:50106
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 24, 2025 05:03:16182
Report