Back
बार्शीटाकळी नगरपंचायत में पानी संकट चुनाव का केंद्र, हर उम्मीदवार का दावा
JJJAYESH JAGAD
Nov 24, 2025 06:21:46
Akola, Maharashtra
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी नगरपंचायत निवडणुकीत पाणीप्रश्न हा प्रमुख मुद्दा बनला आहे. “नागरिक चोरीचं पाणी पित आहेत” असा आरोप अनेक उमेदवारांकडून होत असून हा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अनेक वर्षांपासून शहराला हक्काचा पाणीपुरवठा न झाल्याची समस्या आता निवडणुकीत ज्वलंत ठरली आहे.
बार्शीटाकळी येथे यंदा नगराध्यक्ष पद महिला आरक्षित आहे. 20,947 मतदारांपैकी नगराध्यक्ष पदासाठी 5 उमेदवार स्पर्धेत आहेत. शहरातील सर्वात मोठी समस्या म्हणजे पाणीटंचाई. अकोला शहराला काटेपूर्णा धरणातून जाणारी मुख्य पाइपलाईन बार्शीटाकळी मार्गे जाते, मात्र शहराला स्वतंत्र पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे अनेक नागरिक बेकायदा पाईपलाईनला जोडून पाणी घेतात. अकोला महापालिकेने अनेक वेळा कारवाई केली असून त्यामुळे स्थानिकांमध्ये अनेकदा वादही झाले आहेत. हीच परिस्थिती लक्षात घेऊन विरोधकांनी सत्ताधारी काँग्रेसवर टीका करण्यास सुरूवात केली आहे आणि प्रत्येक उमेदवार ‘हक्काचा पाणी’ मिळवून देण्याचा दावा करत आहे.
रूपाली गोल्डे, शिवसेना (शिंदे गट) उमेदवार; वनमाला मुळे, शिवसेना (यूबीटी) उमेदवार; समीना अंजुम, काँग्रेस उमेदवार.
बार्शीटाकळी नगरपंचायत अद्यापही अनेक मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात आयसीयूची सुविधा नाही, एमआयडीसी नसल्याने बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र या सर्वांपेक्षा पाणीप्रश्न अधिक गंभीर असून त्याच्या निराकरणाचा दावा सर्वच पक्षांकडून करण्यात येत आहे.
पाणी समस्या गंभीर असल्याचे सत्ताधारी काँग्रेस पक्षही मान्य करतो. निवडून आल्यास शहरातील पाणीटंचाईसह महिलांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचे काँग्रेस उमेदवार सांगत आहेत.
समीना अंजुम, काँग्रेस उमेदवार.
110
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowNov 24, 2025 06:32:42166
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 24, 2025 06:31:4055
Report
AKAMAR KANE
FollowNov 24, 2025 06:05:23152
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 24, 2025 06:04:56150
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 24, 2025 05:48:36156
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 24, 2025 05:21:02103
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 24, 2025 05:17:04178
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 24, 2025 05:05:17152
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 24, 2025 05:04:50106
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 24, 2025 05:03:16182
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 24, 2025 04:47:34122
Report
KJKunal Jamdade
FollowNov 24, 2025 04:47:19125
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 24, 2025 04:34:5770
Report
AKAMAR KANE
FollowNov 24, 2025 04:34:35175
Report