Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sindhudurg416812

दिनदहाड़े चोरी: कळसुली गांव में घर से लाखों के आभूषण और नकदी लूट

UPUmesh Parab
Nov 05, 2025 05:31:39
Oros, Maharashtra
कळसुली गावात भर दिवसा चोरट्यानी डल्ला मारलाय. चोरट्यानी घरातील दागिने व रोकड असा तब्बल लाखोंचा माल लांपास केलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्या भात कापनीचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे कळसुली येथील दळवी कुटुंब भात कापणीसाठी शेतात गेलेले असताना संधी साधून चोरट्यानी घराचे कुलूप फोडून घरातील दागिने व रोकडं लांपास केलीय. या घटनेमूले कळसुली परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून कणकवली पोलीस अधिक तपास करत आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 05, 2025 08:45:45
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 05, 2025 08:37:17
Nashik, Maharashtra:मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत प्रशिक्षण पूर्ण करूनही रोजगार न मिळाल्याने राज्यभरातील युवकांनी आज नाशिकमध्ये अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आणि आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. गोदावरी नदीत स्नान करून भगवे वस्त्र धारण करत युवकांनी सकाळी मोर्चाची सुरुवात केली. हातात भगवे ध्वज, घोषणाबाजी आणि संत परंपरेचा संदर्भ देत आंदोलनाला धार्मिक व सांस्कृतिक रंग देण्यात आला. प्रशिक्षण घेऊन देखील नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या युवकांचा संयम सुटला असून राज्यभरातून आलेल्या शेकडो युवकांनी नाशिकमध्ये दाखल होत आक्रमक भूमिका घेतली. तुकाराम बाबा महाराज यांनी स्पष्ट इशारा दिला की, "जोपर्यंत नियुक्ती आदेश मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. आवश्यक असल्यास उपोषणाचा मार्ग धरू." आंदोलनामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासन आणि आंदोलक यांच्यात चर्चा सुरू होण्याची शक्यता असून, युवकांच्या मागण्यांवर राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 05, 2025 08:02:05
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:खासदार श्रीकांत शिंदे प्रतिक्रिया... शेतकऱ्यांची फसवणूक झाली ही उद्धव ठाकरेची तीच तीच कॅसेट जुनी झाली, तीच रटाळ कॅसेट........ तोच टेप दररोज लोकांना ऐकायला आवडत नाही उल्था? हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी काय शेतकऱ्यांना दिलं... ओला दुष्काळ झाला तेव्हा 36 हजार रुपयांचे पॅकेज या सरकारने दिले, या अगोदर देखील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा एनडीआरएफ चे निकष बाजूला ठेवून मदत देण्याचं काम आमच्या सरकारनेच केलं. ज्यांनी काहीच केलं नाही ते आज शेतकऱ्यांना येऊन बोलत आहेत त्याांना बोलू द्या. शेतकऱ्यांना माहिती आहे त्यांच्याबरोबर कोण उभे आहे. शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ मिळाला त्यामुळे विधानसभेला शेतकरी आमच्या मागे उभे राहिले. म्हणून महायुती सरकार पुन्हा निवडून आले. या दौऱ्याबद्दल काय म्हणायचं हे त्यांना विचारा... शेतकऱ्यांची फसवणूक केली ही उद्धव ठाकरेंची कॅसेट जुनी झाली, तीच रटाळ कॅसेट, तेच टेप लोकांना दररोज ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नाही तुम्ही पण दाखवू नका नाहीतर तुमचा पण टीआरपी पडेल. महायुतीची निवडणुकिची तयारी जोरात सुरू आहे. आमची शिवसेनची देखील तयारी सुरू कडे सुरू झाली असून बैठका सुरू झाल्या आहेत, आज वैजापूर दहिसर मध्ये पक्षाचा कार्यक्रम आहे. कालच निवडणुका जाहीर झाल्या पहिल्या नगरपालिका नंतर जिल्हा परिषद निवडणुका होतील, या निवडणुकीमध्ये देखील जसे यश विधानसभेला मिळाले होते तसेच यश आम्हाला मिळेल, महायुती म्हणून आज आम्ही एकत्र आहोत. जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणूनच लढणार, काही स्थानिक पातळीवर वेगळी परिस्थिती असेल तिथं विचार करून निर्णय घेण्यात येईल, माहितीच्या बैठकी बद्दल मला माहिती नाही.
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 05, 2025 08:01:37
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - भाजपा नेते वैभव खेडेकर भाषण pointers काही कार्यकर्त्यांचं सुख आणि काही नेतृत्वाना त्याची कल्पना येत नाही परंतु उपजत कार्यकर्ता आणि पक्षाला बळ देणाऱ्या कार्यकर्त्याची दखल रवींद्र भाऊंनी घेतली आणि मला भाजपमध्ये प्रवेश दिला वैभव खेडेकर यांनी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली राज ठाकरे यांच्या बद्दलची खंत माझा पक्ष प्रवेश होऊ नये म्हणून अनेक लोकांनी प्रयत्न केले, देव पाण्यात बुडवले पण भाजपचं शीर्ष नेतृत्व माझ्यासोबत होतं, इथली सर्व भाजप माझ्यामागे भक्कमपणे उभी होती आपल्याला चिंता करायचं कारण नाही नगरपरिषदेचं आणि विधानसभेचं चित्र या ठिकाणी बदललेले आहे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकित भाजपचा झेंडा फडकलेला दिसेल On शिवसेनेला टोला इथे एका विशिष्ट पक्षाची सत्ता आहे, दुसरा पक्ष पुढे जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात कोट्यवधीचा निधी आपण दिलात, परंतु त्याचं श्रेय मात्र दुसरे घेत होते माझे सर्व सहकारी भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत खेड नगर परिषदेचा झेंडा भाजपच्याच हाती राहील, बहुमतात सत्ता भाजपची येईल खेडेकर यांनी अप्रत्यक्षपणे भाजप उमेदवारीची केली घोषणा
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 05, 2025 07:54:55
Khed, Maharashtra:शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावात नुकताच १३ वर्षीय रोहन बोंबे या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता, आणि ही घटना ताजी असतानाच खेड तालुक्यातील काळेचीवाडी येथे आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. घराच्या अंगणात झोक्यावर खेळणारा एक चिमुकला बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला असून, हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. खेड तालुक्यातील काळेचीवाडी येथे घराच्या अंगणात चिमुकला झोक्यावर खेळत असताना बिबट्या अचानक कुत्र्याची शिकार करण्यासाठी थेट कंपाऊंडमध्ये घुसला. काही क्षणातच चिमुकल्याने प्रसंगावधान राखत घरात धाव घेतली. कुटुंबीयांनी आरडाओरड केल्याने बिबट्या घाबरून पळून गेला. बिबट्याच्या या थरारक हालचाली सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे कैद झाल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, स्थानिकांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 05, 2025 07:54:32
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात शेतातील उभ्या धानाला फूटले कोंब, बळीराजाच्या डोळ्यात पाणी, परतीचा पाऊस उठला जीवावर. शेतकऱ्यांचा मदतीसाठी सरकारने कोट्यवधी घोषणांचे आकडे पुढे ठेवले. मात्र घरातील जमापुंजी मातीत पेरणाऱ्या जगाचा पोशिंद्यावर यावर्षी पावसाने कहरच केलाय. कधी पुराने पीक गिळलं, कधी अतिवृष्टीने पिकांना जमिनीवर लोळवलं. या सर्व संकटाला मात देत देत राजा उभा राहिला. काळ्या मातीवर हिरवं पांघरूण टाकलं. शेतकऱ्यांचा जीवावर उठलेल्या पावसाने येथे ही घात केला. तोंडाजवळ आलेला घास पावसाने हिरावला. काही शेतकऱ्यांनी धान कापणी केली. कापलेले सर्व उत्पन्नात पाणी साचले. हलके, मध्यम धान जमिनीवर आडवे पडलेत. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात आता स्थिती अशी की उभ्या धानाला कोंब फुटले आहे. हा धान व्यापारी खरेदी करीत नाही. वेळेवर उसनवारी करून उभं केलेल्या पिकाची ही अवस्था बघून शेतकऱ्यांचा धीर खचला आहे. जाहीर झालेल्या मदतीतून या राजाचे दोन अश्रू तरी पुसले जातील का? हा खरा प्रश्न आहे. मायबाप सरकारने बळीराजाला धीर देणं, त्याचा डोळ्यातील पाणी पुसण्याची हीच खरी वेळ आहे. पूरग्रस्त शेतकरी.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 05, 2025 07:53:58
Jalna, Maharashtra:जालना : बेपत्ता विवाहित तरुणीचा विहिरीत मृतदेह सापडला हुंड्यासाठी छळ करून हत्या केल्याचा माहेरच्या लोकांचा आरोप 4 संशयीत ताब्यात अँकर: जालन्यात दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या विवाहित तरुणीचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला आहे. 19 वर्षीय सानिया फारुख शेख असं मयत तरुणीचं नाव आहे. ती खादगाव शिवारात राहत होती. दोन नोव्हेंबर रोजी ही तरुणी घरातून बेप्ता झाल्याची तक्रार चंदनझिरा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मात्र तरीही ही तरुणी सापडली नाही. दरम्यान आज सकाळी या महिलेचा मृतदेह खादगाव शिवारातील विहीरीत आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. दरम्यान या महिलेने आत्महत्या केली नसून सासरच्यांनी पैशासाठी छळ केल्याचा आरोप मयत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.दरम्यान पोलीस या घटनेचा तपास करत असून संशयित चार जणांना चंदनझिरा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 05, 2025 07:52:01
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 05, 2025 07:50:55
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर में पान टपरी चालक पर चाकुओं से हमला हुआ, घटना CCTV में कैद है. उल्हासनगर कैंप तीन स्थित बाल्कनजी बारी के राहुल नगर में पन्नालाल जयस्वाल के कनक जनरल स्टोअर पान टपरी का व्यवसाय है. रात के लगभग साढ़े नौ बजे करण नामक युवक दुकान पर आया, उसने चॉकलेट की बोतल फेंकी. इसके बाद दुकान में घुसकर जेब से चाकू निकालकर पन्नालाल पर घुमाया. सौभाग्य से उन्होंने बचाव किया, इसके बाद करण ने लात-घूंसे से पन्नालाल को बेदम मारहाण की. जाते समय बोला, “मेरा मर्डर कर दूंगा” जैसी धमकी भी दी. इसके लिए पन्नालाल ने मध्यवर्ती पुलिस ठाणे में शिकायत दर्ज कराई. आरोपी करण लबाना गुरु तेज बहादूर कॉलोनी का रहने वाला बताया गया है. पुलिस ने मामले में जीवे ठार मारने की कोशिश के धाराएं लगाईं या नहीं, इसकी स्थिति न लाने पर शिकायत दर्ज की गई है.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 05, 2025 07:31:14
Nagpur, Maharashtra:नागपूर - स्मशानभूमीतून दोन पार्थिवांची 'राख आणि अस्थी' झाल्या गायब, नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील धक्कादायक प्रकार - जादूटोणा आणि मंत्र तंत्रांचा संशय - दोन वेगवेगळ्या कुटुंबातील मृतांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले होते - मंगळवारी सकाळच्या sुमारास कुटुंबीय धार्मिक विधीसाठी राख आणि अस्थी गोळा करण्यासाठी स्मशानभूमी परिसरात पोहोचल्यावर दोन्ही पार्थिवांची राख आणि अस्थी गायब असल्याचे समोर आले - राख आणि अस्थी गायब झालेल्या पार्थिवांमध्ये एका 23 वर्षीय तरुणी आणि 48 वर्षीय मृत पुरुषाचा समावेश आहे - उमरेड येथील शेतकरी कुटुंबातील 23 वर्षीय साक्षी पाटीलचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता तर नरेश सलोटे या 48 वर्षे मजुराचा आजारपणाने मृत्यू झाला होता - दोन्ही पार्थिवाचे राखेतून उरलेल्या हाडांचे एकही अवशेष स्मशानभूमीवर सापडले नाही - 5 नोव्हेंबर हा कार्तिक पौर्णिमेचा दिवस आहे त्रिपुरारी पौर्णिमा या पार्श्वभूमीवर पार्थिवांची राख आणि अस्थि गायब करण्यात आली असा अंदाज वर्तवला जात आहे - या सर्व प्रकारामागे तांत्रिकांची गॅंग असावी असाही संशय व्यक्त केला जात आहे - महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये उमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 05, 2025 07:17:09
Jalna, Maharashtra:जालना |जिल्ह्यात तीन नगरपरिषदांसाठी होणार निवडणूक तीन नगरपरिषदांमध्ये जवळपास 60 हजार मतदार 65 सदस्यांची करणार निवड टोपे, लोणीकर, कुचे आणि दानवेंची प्रतिष्ठा पणाला युती अन् आघाडीचे तळ्यात-मळ्यात अँकर- जालना जिल्ह्यात तीन नगरपरिषदांसाठी निवडणूक होणार असून यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीये.. जिल्ह्यातील भोकरदन, अंबड आणि परतूर नगपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक पार पडणार आहे.. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केलीये. मात्र युती आणि आघाडीसंदर्भात कोणतिही चर्चा नाहीये. तीन नगरपरिषदांमध्ये जवळपास 60 हजार मतदार 65 सदस्यांची निवड करणार आहेत. विशेष म्हणजे तिनही नगरपालिकांमध्ये महिलांकडेच नगराध्यक्षपदाची जबाबदारी येणार आहे. कोरोनानंतर नगरपरिषदेची ही पहिलीच निवडणूक असणार आहे. सत्ताधा-यांचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासनाकडून कारभार हाकण्यात येत होता. आता निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय पुढा-यांकडे कारभार जाणार आहे.. यात अंबड नगरपरिषदेत राष्ट्रवीदीचे राजेश टोपे आणि नारायण कुचे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये. तर भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे आणि परतूरमध्ये भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्थानिक नेते सुरेश जेथलिया यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये...
0
comment0
Report
Advertisement
Back to top